दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
मग लिहल कशाला..>>>
मग लिहल कशाला..>>>
अजूनही शंका आहे??
मी लै मागेच म्हणलं होतं अटेन्शन सिकिंग चा आजार बळावलाय
बरोबर...
बरोबर...
काही पण लीहातो हा आयडी ..त्याचा अर्थ काय होईल ह्यांचा विचार च करत नाही
मी लै मागेच म्हणलं होतं
मी लै मागेच म्हणलं होतं अटेन्शन सिकिंग चा आजार बळावलाय>> अनुमोदन. स्वतः चा उल्लेख थर्ड पर्सन मध्ये करायचा हे क्लासिक लक्षण आहे.
नॉर्मली माबो वर मतभेद झाले व ते होतातच. एकेकाळी इथे उच्च शिक्षित अनुभवी जग फिरलेले सभासद ह्यांची मांदियाळी होती. त्यांना चर्चा कशी करायची ते माहीत असे. आपले मतभेद झाले तर हो तुझे मत असे पण ही परिस्थिती आहे. हा त्याला सपोर्टिंग डाटा. व सोशल नेट वर्किन्ग प्लॅट फॉर्म वर प्रत्येक जण आपले मत घेउनच येणार. तर लोक हे माझे मत व हे तुझे मत असे समजून चर्चा पुढे नेत. आता असे होत नाही कुठे ही माझे मत तेच बरोबर व तेच पुढे जाइ परेन्त व समोरचा नामोहरम होई परेन्त हॅमरिन्ग. ह्याचा वैताग येउन इथे पोस्टणेच कमी होते.
मॅट्रिक्स सिनेमात कसे मी मी करत १०० एजंट एकदम चाल करून येतात तसे होते. त्यापेक्षा इथे न पोस्टणे श्रेयस्कर ठरते. साधी चर्चा होणे जरा अवघड होत चालले आहे.
In every action there is
In every action there is equal and opposite reaction.
Ha जागतिक law आहे पृथ्वी वर तरी लागू आहे
इतके प्रतिसाद होवून पण फटाके
इतके प्रतिसाद होवून पण फटाके खरेच प्रदूषण करत असतील .त्रासदायक असतील तर ते संपूर्ण बंद केले पाहिजेत ह्या वर एकमत नाही .....
दिवाळी मध्येच बंद झाले पाहिजेत हा हट्ट का?
होवू ध्या ना पूर्ण बंदी.
@ हेमंत,
@ हेमंत,
काल भाऊ बीज होती ...
पवित्र दिवस आहे.
>>>>
दारू हे अपवित्र पेय आहे असे म्हणायचे आहे का?
प्लीज कन्फर्म !
कारण तुम्हाला या मुद्द्यावर अनुमोदन देणारे बघून मला धक्का बसला आहे
--------------
मूर्ख अपवाद सोडले तर दारू पिऊन बहिणी कडे कोणी जात नाही.
>>>>
दारू कशी प्यावी हा धागा चेक करा.
तिथे मी लोकांना हीच विनंती केली आहे की दिवाळी सणाला दारू पिऊ नका.
----
घर एक मंदिर असते असे हिंदू मानतात .घरात असे खुले आम् दारू पिणारे फक्त ढोंगी पुरोगामी असतात
>>>>>
माझाच धागा आहे. घरात लहान मुलांसमोर दारू पिऊ नये. तिथेही मला विरोध होतोय.
-------
मग लिहिले कश्याला.
समाजाचा ढोंगीपणा उघड करायला.
आपल्याकडे संस्कृतीप्रेम आपल्या सोयीने असते.
तुमच्या वरच्या सर्व बोल्ड वाक्यांना हजार अनुमोदन
मामींचे म्हणणे लगे हातो सिद्ध
मामींचे म्हणणे लगे हातो सिद्ध करून दाखवलं सरांनी
लोकांनी न लिहलेली वाक्ये ते वाचून त्यावर प्रतिसाद येऊन आपण कसे जिंकलो हे स्वतःच जाहीर करतात
नुसता बळावला नई तर विकोपाला गेलाय आजार
दारू किंवा कोणतेही द्रव्य
दारू किंवा कोणतेही द्रव्य किंवा पदार्थ ज्यांनी नशा येते..आणि ते सर्व द्रव्य आणि पदार्थ हे वाईट च .
पण प्रत्येकाची आवड वेगळी म्हणू.न टोकाचा विरोध नाही.
हाताची बोटं समान नसतात तर आवड कशी समान असेल..
ह्या साठीच दारू कशी प्यायवी ह्या धाग्यावर प्रतिसाद.
व्यसन ह्याचा अर्थ सवय ती वाईट आहे असे पटत असून पण सोडता येत नाही.
पण घरात दारू पिने ह्याचे समर्थन नाही .
घराचे पवित्र राखलेच गेले पाहिजे
घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात.
गावी गेलो की शेतातील घरात कधी तरी दारू होते.मित्र न बरोबर .
तिथे कोण्ही राहतं नाही
शेतातील समान ठेवण्यासाठी असते
मुंबई मध्ये घरात कधीच दारू पित नाही.
मी माझे नियम योग्य रीती नी पाळतो
बूंद से गयी वो हौजसे नही आती.
बूंद से गयी वो हौजसे नही आती.
मुह मे राम और बगलमे "सुरा" का प्याला.
शराब / दारू पीती देवी का
शराब / दारू पीती देवी का वीडियो ये रहा - जानिए कैसे पीती है इतनी शराब ? Bhanwal Mata
https://www.youtube.com/watch?v=Gaz5lr9-nJg&ab_channel=ShubhJourney
ढोंगी पुरोगामी पावलो पावली
ढोंगी पुरोगामी पावलो पावली आहेत
हेमंत एक मित्रत्वाचा सल्ला.
हेमंत एक मित्रत्वाचा सल्ला.
जरा ब्रेक घ्या.
तुम्ही लिहिता ते पटो न पटो, तुमच्या दृष्टीकोनातून प्रामाणिकपणे लिहिता आणि बऱ्याचदा पोटतिडकीने. इथे बरेच एकमेकांची मजा घेण्यास लिहितात, तसे तुम्ही करत नाहीत म्हणुन हा जरा आगाऊपणा वाटत असेल तरी ब्रेक घेण्याचा सल्ला.
बाकी तुमची मर्जी.
हेमंत तुम्ही सर्व सिरीअसली
हेमंत तुम्ही सर्व सिरीअसली घेताय.
Why so सिरिअस?
तमाशा पाहून लोक बोघडत नाहीत कि मायबोलीवर धागे काढून समाज सुधारत नाही.
@ हेमंत
@ हेमंत
दारू किंवा कोणतेही द्रव्य किंवा पदार्थ ज्यांनी नशा येते..आणि ते सर्व द्रव्य आणि पदार्थ हे वाईट च.
>>>>
+७८६
------------------
पण प्रत्येकाची आवड वेगळी म्हणू.न टोकाचा विरोध नाही.
हाताची बोटं समान नसतात तर आवड कशी समान असेल..
>>>>
दारू हे आवडीत येत नसून व्यसनात येतो म्हणून विरोध.
पण तो दारूला असतो. न कि दारू पिणाऱ्या व्यक्तीला.
दुर्दैवाने दारूला वाईट म्हटले की दारू पिणारे हे पर्सनली घेतात.
पण त्यांचीच जास्त चिंता वाटते. कारण दारू वाईट आहे हे मान्य करणे हे या व्यसनाला सोडायची पहिली पायरी.
काहीजण पुढच्या पायऱ्या चढायला लागतील या भितीने पहिली पायरीही चढायची टाळतात.
---------------
पण घरात दारू पिने ह्याचे समर्थन नाही .
घराचे पवित्र राखलेच गेले पाहिजे
घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात.
>>>>>>
+७८६
दुर्दैवाने हे बरेच जणांना मान्य होत नाही.
यावर आधीही चर्चा झाली आहे.
घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
https://www.maayboli.com/node/52365
तमाशा पाहून लोक बोघडत नाहीत
तमाशा पाहून लोक बोघडत नाहीत कि मायबोलीवर धागे काढून समाज सुधारत नाही.
>.>
मायनस ७८६ केशवकूल
जो आपला मुद्दा असेल तो प्रामाणिकपणे मांडा.
तो मुद्दा ज्यांना सोयीचा नाही ते तुमच्यावर दगडफेक करतील.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा.
एकाला तरी तुमचे म्हणने पटले आणि त्याच्यात बदल झाला तर तुमचे ईथे लिहिणे सार्थकी झाले समजावे
काल पाडव्याला बायकोने ओवाळले
काल पाडव्याला बायकोने ओवाळले तेव्हा तिला भारी वाईन दिली. जेवणं आटोपल्यावर ओवाळलं त्यामुळे काल उघडणं झालं नाही. आता शुक्रवारी.
गेल्यावर्षी वाढदिवसाला तिने मला कॉकटेल शेकरचा स्टेनलेस स्टीलचा किट दिला होता.
I used to have this cocktail
I used to have this cocktail shaker set. Very useful. Make Mimosa.
सेम आमच्याकडे
सेम आमच्याकडे
बायको म्हणाली आपण प्रॉपर सेट घेऊया
मग आम्ही बराच वेळ ऑनलाइन शोधलं पण मनासारखं नाही मिळालं
काही अगदीच साधे होते काही कैच्याकै महाग
मग दिवाळी स्पेशल म्हणून ब्लॅक डॉग रिझर्व्ह उघडली
ही पण एक सुख व्हिस्की आहे
अरेच्चा हा प्रतिसाद तिकडे हवा
अरेच्चा हा प्रतिसाद तिकडे हवा होता
सर सगळीकडे सारखंच बोलतात त्यामुळे असा गोंधळ होतो
फटाक्यांना सुरुवात आमच्याईथे.
फटाक्यांना सुरुवात आमच्याईथे...
कारण - दिवाळी संपली पण आज पाकिस्तान झिम्ब्बाब्वेशी हरली..
शिल्लक राहिलेले संपवत आहेत लोकं
खर आहे. हा धागा फटाके सोडून
खर आहे. हा धागा फटाके सोडून दारूकडे केव्हा झुकला समजलेच नाही. फटाक्यात दारू असते म्हणून असेल कदाचित. ते असो. आता हा किस्सा.
पुण्यात एकेकाळी मे महिन्यात खुप लग्ने लागत. त्याकाळी नवरा नवरींची वरात काढण्याची प्रथा असे. एका सजवलेल्या गाडीत नवरा नवरी बसत. पुढे ब्रास बॅंडवाले सिनेमातली भयानक गाणी वाजवत. "'दो हंंसोंंका जोडा बिछुड गया रे..." मागे बाराती पायी. गप्पा मारण्यात दंग.
त्या सगळ्या वरांती जोगेश्वरी आणि कसबा गणपतींचे दर्शन घेऊन परत जात.
अ,ब,चौकात ह्या वरातींची ही गर्दी.
कधी कधी ह्या वरांती मिक्स अप व्ह्यायच्या. बराच वेळ पायपीट केल्यावर लक्षात यायचे की अरे आपण चुकीच्या गाडी मागून चाललो आहोत!
फटाक्यांना सुरुवात आमच्याईथे.
फटाक्यांना सुरुवात आमच्याईथे...>>>
बघा, सर यांचं समर्थन करत आहेत
फक्त आपल्या दिवाळी मध्ये फटाके फोडले तर त्यांना त्रास होतो
कायद्याने मनाई करा म्हणतात
हा खरा दुटप्पीपणा
कधी कधी ह्या वरांती मिक्स अप
कधी कधी ह्या वरांती मिक्स अप व्ह्यायच्या. बराच वेळ पायपीट केल्यावर लक्षात यायचे की अरे आपण चुकीच्या गाडी मागून चाललो आहोत!
>> भारी किस्सा
हॉल मधेही व्हायचे गोंधळ
एक मजल्यावर एकेक अशी लग्ने लागत
आपण घाईघाईने गाडी पार्क करून जावं तो मंगलाष्टके सुरू असतात
कोणीतरी आपल्यावर गुलाबपाणी शिंपडून हातात अक्षता कोंबतात
आणि मग लांबवर दिसणाऱ्या न दिसणाऱ्या वधूवरांना त्या भिरकावला जातात
आणि नंतर कळतं हे भलतंच लग्न आहे, आपल्याला दुसऱ्या मजल्यावर जायचं होतं
चला आता हा धागा git stash
चला आता हा धागा git stash करूया व पुढच्या दिवाळीला git pop !
विकु, स्टॅश करण्यासारखं काय
विकु, स्टॅश करण्यासारखं काय दिसतय का डीफ मध्ये? न्यूक करुन टाका रिपो.
धाग्यात फारच गुंता व्हायला
धाग्यात फारच गुंता व्हायला लागलाय
हे दिसत असेल तर बघा
डुप्लिकॅट
हे दिसत असेल तर बघा..
हे दिसत असेल तर बघा..
काय बोलावे यावर
https://www.facebook.com/reel/509560034365829?s=chYV2B&fs=e
पुर्ण विडिओ बघा.. मेरी तो रूह काप गयी.. असे झाले
साक्षात ब्रह्मास्त्र दिसले
नॉर्मली माबो वर मतभेद झाले व
नॉर्मली माबो वर मतभेद झाले व ते होतातच. एकेकाळी इथे उच्च शिक्षित अनुभवी जग फिरलेले सभासद ह्यांची मांदियाळी होती. त्यांना चर्चा कशी करायची ते माहीत असे. आपले मतभेद झाले तर हो तुझे मत असे पण ही परिस्थिती आहे. हा त्याला सपोर्टिंग डाटा. व सोशल नेट वर्किन्ग प्लॅट फॉर्म वर प्रत्येक जण आपले मत घेउनच येणार. तर लोक हे माझे मत व हे तुझे मत असे समजून चर्चा पुढे नेत. आता असे होत नाही कुठे ही माझे मत तेच बरोबर व तेच पुढे जाइ परेन्त व समोरचा नामोहरम होई परेन्त हॅमरिन्ग. ह्याचा वैताग येउन इथे पोस्टणेच कमी होते.>>>>+1000
दिवाळी मध्ये नव्हते त्या
दिवाळी मध्ये नव्हते त्या पेक्षा आता दिल्ली मध्ये प्रचंड प्रदुषण आहे लोकांना त्रास होत आहे श्वास घेण्यास इतके प्रदूषण आहे.
फटाके बंदी वर बोलताना पर्यावरण पर्यावरण ह्याचा गजर करणारे आता दिल्ली मधील प्रदूषण वर गप्प आहेत.
कारण, कारण प्रदूषणाची जी आहेत ती कबूल करणे नुकसानदायक आहे
Pages