आला पाऊस

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 5 November, 2024 - 07:21

आला पाऊस पाऊस
आल्या वळिवाच्या सरी
चल धावू वेगे वेगे
जाऊ भिजतच पोरी

नको पायात चपला
अनवाणी जाऊ पुढे
छप छप वाजे पाणी
नभी वाजती चौघडे

नको भीती आज काही
आज भिजूनिया घेऊ
नको विचार कशाचा
आज पावसात न्हाऊ

- डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...
लवकर संपली असे वाटले...

सुंदर!

ग्रीष्माच्या लाहीत,
छोटी सर येउन गेली
सरसरती कविता,
फुंकर घालून गेली