Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 5 November, 2024 - 07:21
आला पाऊस पाऊस
आल्या वळिवाच्या सरी
चल धावू वेगे वेगे
जाऊ भिजतच पोरी
नको पायात चपला
अनवाणी जाऊ पुढे
छप छप वाजे पाणी
नभी वाजती चौघडे
नको भीती आज काही
आज भिजूनिया घेऊ
नको विचार कशाचा
आज पावसात न्हाऊ
- डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
छान!
छान!
छान.
छान.
सुंदर आहे. आणखी कडवी वाचायला
सुंदर आहे. आणखी कडवी वाचायला आवडतील.
सुचली तर नक्की टाकते अजून
सुचली तर नक्की टाकते अजून काही कडवी.
ही पण आवडली.
ही पण आवडली.
सुंदर...
सुंदर...
लवकर संपली असे वाटले...
सुंदर!
सुंदर!
ग्रीष्माच्या लाहीत,
छोटी सर येउन गेली
सरसरती कविता,
फुंकर घालून गेली
सुंदर!
सुंदर!
छान कविता ..!
छान कविता ..!
अप्रतिम !!
अप्रतिम !!