एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंडितांच्या नावाने देशभर मतं मागितली, फिल्म बनवून पैसा कमवला, लोकांना फुकटात दाखवून देशभर मुस्लिम द्वेष पसरवला. तिथे काश्मिरी पंडित
अजूनही रडताहेत.

आता ३७० रद्द करण्यासाठी भाजपने जी कृष्णकृत्ये केली, अख्ख्या राज्याला लॉकडाउनमध्ये टाकलं, देशभर त्यांना बदनाम केलं, लॉकडाउनच्या काळात आणि एरवीही लष्करामार्फत त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचं फळ म्हणूनच आता तिथे दहशतवाद पुन्हा वाढतो आहे.

भरत सर. राजकारणामधील जाणकार आणि मायबोलीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. काँग्रेसचे सोशल मीडिया आधारस्तंभ.
उदय सर. भारताबाहेर राहुन कधीही गेम पलटवण्याची ताकद असणारे एक शक्तिशाली व्यक्तिमत्व. दोघांना मानाचा त्रिवार मुजरा

मुस्लिम द्वेष पसरवायची गरज नाही तो आपोआप पसरतो.
लष्करामार्फत त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचं फळ म्हणूनच आता तिथे दहशतवाद पुन्हा वाढतो आहे.
नाही, दहशतवाद पसरवायला त्यांना काहीही कारण लागत नाही. भारतीय लष्कराला दोष द्यायचा असेल तर द्या. माझ्या माहिती प्रमाणे १९९० पासून तिथे हिंसाचार चालू आहे. आपल्या देहाचं विभाजनच मुस्लिम धर्मामनुळे झालंय. त्यावेळेस कोणी अत्याचार केला होता? आपल्या देशात भाजपा किंवा लष्कर आहे तुम्हाला टार्गेट करायला पण जगभर हेच चालू आहे.

कश्मीर फाईल्स, केरला स्टोरी या चित्रपटांचा वापर मुस्लिम द्वेष पसरवायला केला हे नाकारतात?
मोदींची आणि अनेक भाजप नेत्यांची भाषणं मुस्लिम द्वेष पसरवत नाही, म्हणताय?
गोहत्याबंदी कायदे मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी आणले नाहीत? कारण गाईंच्या दुर्दशेशी या गोरक्षकांना काही देणंघेणं नसतं.

जगाचे जाऊ द्या. केंद्र सरकारच्या कृपेने समाजात धार्मिक ध्रुवीकरण करून गल्लोगल्ली छोटे काश्मीर निर्माण केले गेले आहे. आतापर्यंत गुणागोविंद्याने एकत्र राहणारे एकमेकांकडे संशयाने बघू लागले आहेत.

भाजपा फायदा घेत नाही अस मी तरी म्हणत नाही. धार्मिक ध्रुवी करण हे आहेच पण हे फार पूर्वी पासूनच आहे. आपल्या देशाचं विभजनच धर्मावर झालंय. छोटे काश्मीर तयार झालेत जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथे.

तुम्ही मुस्लिमांना आपल्या वस्त्यांत घरं घेऊ देऊ नका. मग मुस्लिम बहुल वस्त्या झाल्या की रडा.

रास्वसं आणि सावरकर फाळणी आधीपासून मुस्लिम द्वेष करत आलेत. संघाचा पायाच तो आहे.आता त्यासाठी तुम्ही मुघलांचं नाव घ्या.
नुकतंच संघाच्या एका पदाधिकार्‍याचं वक्तव्य ऐकलं. हिंदूंना एकत्र करण्याबद्दल बोलले. संघाचे नाव रा स्व सं का आहे? हिं स्वं सं करा.

अच्छा! अन्य धर्मियांच्या गोराक्षस हत्या करतात तेथे तर हिंदूंची लोकसंख्या जास्त असते. तेही एक प्रकारचे छोटे काश्मीरच असते.

तुझ्यासाठी आईपरि बाप तुझा खुळा
पोरीसाठी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या तान्हुल्या फुला
दमलेल्या बापाची कहाणी तुला
बाप बाप रहेगा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणार्‍या हत्या आणि देशात गोरक्षकांकडून होणार्‍या हत्या - दोन्हीसाठी मोदी सरकार जबाबदार आहे.

<< आतापर्यंत गुणागोविंद्याने एकत्र राहणारे एकमेकांकडे संशयाने बघू लागले आहेत. >>

------ शिस्तबद्ध रितीने संशयाची पेरणी ' भोळ्या ' लोकांच्या मनांत सतत करत रहायची. सतत म्हणजे सत्य नारायणाची पूजा किंवा लहानग्याच्या नामकरणाचा कार्यक्रम किंवा दसरा - दिवाळीच्या निमीत्ताने लोक एकत्र येतात त्यावेळी त्यांच्यासमोर द्वेषाने भरलेली पुडी उघडायची. लोक एकत्र येण्याचा कुठलाही कार्यक्रम पुडी उघडण्यासाठी चालतो. द्वेषयुक्त पुडीची नशा अगोदर चाखलेले माना डोलावतात आणि द्वेषाची आग पसरत रहाते.

बहुसंख्य लोकांच्या मनांत संशयाने घर केल्यावर गोध्रा किंवा पुलवामा घडविले जाते. पुढचे कार्यक्रम शिस्तबद्ध रितीने पार पडतात.

पुलवामा किंवा गोध्रा येथे बळी गेलेले कोण लोक होते? येथे बळी गेलेले निरपराधी होते आणि त्यांच्या हत्या टाळता आल्या असत्या. दोन हजार जवानांची वाहतूक करण्यासाठी चार विमानांची मागणी नाकारली गेली. विमान मिळाले असते तर पुलवामा घडले नसते आणि जवानांच्या हत्या टळल्या असत्या. पण निवडणूक तोंडावर आलेली आहे, आणि पराभवाचे सावट आहे.

आज २०२४ मधे हल्ले वाढले आहेत. लोकनियुक्त सरकार आल्यावरच असे हल्ले वाढलेले आहेत आणि फरुख अब्दुल्लांचे वक्तव्य भयंकर आहे. येथे संशयाने भिनलेला समाज असेल तर ? फायदा कुणाचा होतो ?

काहीही असले तरी निरपराधी मारल्या जाण्याचे सत्र सुरु रहाते. Sad

वरची पोस्ट वाचली. फारुख अब्दुल्लांचं भयंकर वक्तव्य काय ते शोधलं.
https://www.indiatoday.in/india/story/farooq-abdullah-cries-conspiracy-b...

दहशतवाद्यांना मारू नका, त्यांना पकडून त्यांची चौकशी करा आणि त्यांच्या मागे कोण आहे ते शोधा, असं ते म्हणाले. यात वावगं काय आहे?

राइट विंगर्सनी यातलं फक्त मारू नका, एवढंच उचललंय का?

एक बडा पोलिस अधिकारी दहशतवाद्यांसोबत पकडला जातो. आधी अफझल गुरूनेही त्याचं नाव घेतलेलं असतं. त्याच्यावर काय कारवाई केली हे प्रकाशात येत नाही. अब्दुल्ला काय चुकीचं बोलले?

<< दहशतवाद्यांना मारू नका, त्यांना पकडून त्यांची चौकशी करा आणि त्यांच्या मागे कोण आहे ते शोधा, असं ते म्हणाले. यात वावगं काय आहे? >>
---- अब्दुल्ला यांच्या विधानांत चुकीचे किंवा वावगे असे काही नाही.

निवडणूकीनंतर आलेले सरकार डळमळीत व्हावे अशा उद्देशाने हे हल्ले/ स्फोट घडविले जात आहे असा त्यांचा गंभिर आरोप आहे. त्यांनी अशा हल्ल्यांची चौकशी व्हावी असे म्हटले आहे आणि ते अगदी योग्य आहे. अब्दुल्ला यांनी केलेला आरोप ( खरा असेल तर ) भयंकर आहे.

द्वेषाची बिजे २४-७ पेरण्याचे काम अहोरात्र सुरु आहे. मुस्लीमांबद्दल कायम संशय राहिल अशी वातावरण निर्मीती सतत केली जाते. अशा प्रकारचे स्फोट, हत्या घडल्यानंतर / घडविल्यानंतर अगोदरच तयार झालेले संशयाचे वातावरण अजून गडद संशयी होते. पुलवामा हल्ल्याची चौकशी झालेली नाही त्यामुळे अशा प्रकारचे सर्व हल्ले कोण करत आहेत हा प्रश्न आहे.

समजा फारुख अब्दुल्ला म्हणतायेत त्या प्रमाणे आपल्या आर्मी ने जीवावर उदार होऊन दहशतवाद्यांना न मारता पकडले, म्हणजे दहशतवादी AK ४७ ने गोळीबार करत असतानाही प्रत्युत्तर न देता त्यांना कसही करून जिवंत पकडले आणि त्यांना कोर्टात केस उभी करून काय करायची ती चौकशी करून जी काही शिक्षा ऐकवली. ते अब्दुल्ला आणि समर्थक काय म्हणतील ते खाली दिलेल्या उदाहरणावरून लक्षात येईल. काहीही करून मुस्लिम दहशतवाद्यांना समर्थन द्यायचे हेच धोरण आहे.

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/hanging-of-afzal-gu...

https://youtu.be/DuZzCrSkiEM?si=PYWPIj4ltM5WeQjX

अफझल गुरूबद्दल अब्दुल्लांशी सहमत. राजीवला मारणारे दहशतवादी नव्हते का?

मालेगाव दहशतवाद प्रकरणी तर एकेक करून साक्षीदार उलटले. पब्लिक प्रोसिक्युटर रोहिणी सालियन यांना आरोपींच्या जामिनाला विरोध करू नका असं सुचवलं गेलं. NIA तर त्यांच्या जामीन अर्जाला विरोधही केला नाही.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/nia-acted-...
https://www.thehindu.com/news/national/other-states/NIA-told-me-to-go-so...
आणि दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला भाजप संसदेत पाठवतं. तिथे ती राष्ट्रपित्याच्या खुनाचा गौरव करते आणि दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी मरण पावला तर आनंद व्यक्त करते.

पोलिसांनी गोरक्षकांना गोळ्या घातल्याचे एकही उदाहरण नाही. त्यांना अटक करावी लागलीच तर तुरुंगात पंचपक्क्वान्नांचं जेवण देत असतील.

बर हे फक्त भारतातीलच दहशतवाद्यांना समर्थन देतील अस नाही तर जगात कुठेही मुस्लिम दहशतवादी हल्ले होऊ द्या ते थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या त्याच समर्थनच करतील.

काल रागाचा एक व्हिडिओ वायरल झालाय. त्यात तो स्वतः बोलतोय की मोदीजी सलग चौथ्यांदा निवडून येऊ दे. आपण चुकून निवडून आलो तर पंतप्रधान कोण बनणार हा कळीचा मुद्दा आहे. त्यावर पाठीमागे बसलेला एक जण हळूच रागाला आवाज जाणार नाही आशा आवाजात बोलतो येडा झालाय का रे हा मोदीजी असताना दुसरा कोणी येईलच कसा. आणि दोघे हसत एकमेकांना टाळ्या देतात.

अमित शहा झारखंडमध्ये सांगतात - युनिफॉर्म सिव्हिल कोड आदिवासींना लागू होणार नाही.
सरळ सांगा ना मुस्लिमांसाठी आणायचाय.

Men should not tailor clothes for women or cut a woman’s hair either, the Uttar Pradesh State Women Commission has proposed to protect women from “bad touch” and stymie the ill intentions of men.

भारत
यू पी है. तिथले लोक असतील असेच!

Tension in Karnataka village after Dalits enter temple for first time.
देऊळ बंद.
आता जर त्यांनी धर्मांतर केले तर "हिंदू खतरेमे है"ची आरोळी.
एक व्हा.
कसे एक होणार?

मोदींशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. श्रीलंका पंतप्रधान नुकतेच बोलले की मोदी आमच्या देशात असते तर आम्ही सगळ्या जगावर राज्य केलं असतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मोदीजींचे आभार मानतो.

<< Tension in Karnataka village after Dalits enter temple for first time.
देऊळ बंद.
आता जर त्यांनी धर्मांतर केले तर "हिंदू खतरेमे है"ची आरोळी.
एक व्हा.
कसे एक होणार? >>

------ का होता येणार नाही? कामाची वाटणी करायची.

एका गटाने मंदिरांत जायचे, छान अभ्यास करायचा, परदेशांतली किंवा MNC मधे नोकरी मिळवायचे स्वप्न बघायचे, व्यावसाय/ धंदा करायचा किंवा राजकारणांत करिअर घडवायचे. योग्य काळ/वेळ बघून गोमांस संबंधांतल्या अफवा कधी पसरवायच्या आणि दुसर्‍या वर्गाला संतप्त होण्याचे आदेश द्यायचे. लिस्ट मोठी आहे.
" आजकाल जाती धर्म कुणी पाळत नाही, आम्ही तर मुळीच नाही. आधीच्या काळांत जातीवरुन भेदभाव झाला असेल, पण आता तसे काही नाही" चा जप करत रहायचा. Happy

दुसर्‍या गटाने धार्मिक मिरवणूका मशिदीसमोरुन जांत असतांना किंवा गोमांसाचे निमीत्त साधून दंगा करायचा. धर्मरक्षणासाठी मारामारी, जाळपोळ, डोकेफोड करायची. वेळ पडल्यास तुरुंगांत जायची तयारी ठेवायची. मोलमजुरी करणारे माय बाप जामिन देण्यासाठी कचेर्‍यांचे उंबरठे झिजवतील. मंदिरांत प्रवेशाची किंवा लग्नामधे घोड्यावर बसण्याची अपेक्षा करायची नाही.
https://www.ndtv.com/india-news/dalit-groom-assaulted-for-riding-horse-d...

कर्नाटक.
उच्च वर्णीयानी (वोक्कालन्गम) मग देवाची मूर्ती हलवली. आणि म्हणाले, "तुम्ही घ्या देऊळ. देव आमच्याकडे आहे." प्रश्न सुटला.

Pages