चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलवंती ट्रेलर बघितला नाही अजून.

अर्चना जोगळेकरची आई आशा जोगळेकर या कथ्थक शिकवायच्या मुंबईत, आमच्या शाळेतली मला एक वर्ष सिनियर असलेली एकजण डोंबिवलीहून जायची शिकायला, त्यामुळे अर्चनाच्या रक्तातच नृत्यकला आहे असं म्हणायला हरकत नाही.

प्राजक्ता माळी या क्षेत्रात येण्याआधी भरतनाट्यम क्लासेस घ्यायची पुण्यात असं मध्ये एका vlogger कडून ऐकलेलं.

चंद्रमुखी मधे ही प्राजक्ता & हर्षदा दोघींची जुगलबंदी आहे १ गाण्यात. प्राजक्ता चे अँकरींग मला सर्वात जास्त आवडते. उत्स्फूर्त असते. अभिनय करताना अवघडते ती.

अर्चना जोगळेकर परफेक्ट कास्ट होती, कथ्थक नृत्यांगना , तिचा अ‍ॅटिट्युड परफेक्ट वाटते तिथे >> मला बाकी काही आठवत नाही. पण अशी एक सिरीअल होती व अजो प्रमुख भुमिकेत होती हे आठवतंय.

बघायला हवेत, मला आठवत नाहीये सिरीयल. अर्चना उत्तम डान्सर आहे पण तिचा अभिनय फार नव्हता आवडत. प्राजक्ता अजिबात नाही आवडत.

गेल्याच आठवडय़ात या मालिकेची लिंक दिली होती कुठल्या तरी धाग्यावर. बहुतेक माझ्या पोस्टस स्पॅम मधे जात असतील. Lol

गुलाबी -
https://www.youtube.com/watch?v=ezx8Dvl75Sg

या 'मल्टिपल अनोळखी बायका एकत्र फिरायला जातात आणि मजा करतात' टाइप पिक्चरांचा आता कंटाळा आला आहे. या पिक्चरात काहीतरी नखभर 'हटके' असेलही पण ट्रेलर पाहून तसंही काही वाटत नाहीये. शिवाय मजा म्हणजे पब मधे जाणं, टल्ली होणं यापलिकडे काही सुचत नसावं असं वाटतंय.

फारच बंडल ट्रेलर. मृणाल कुलकर्णी अशी पब मध्ये वगैरे शोभतच नाहीये. जिजाबाई म्हणूनच डोक्यात बसलीये.

फुलवंतीमधे त्या डायरेक्टरनेच गश्मीरच्या बायकोची भुमिका का घेतली, ती मला जरा गश्मीरपुढे मोठी वाटली. कोणीतरी फुलवंती स्टोरी सांगा, एकट्या गश्मीरसाठी बघणं होणार नाही, ती प्राजक्ता आवडत नाही मला आणि तरडेही नाही आवडली.

"या गोष्टीला नावच नाही" ट्रेलर >>> आवडला.

"या गोष्टीला नावच नाही" ट्रेलर >>> काही‌ झेपला नाही. नक्की कशाबद्दल आहे ते समजत नाही. Catchy नाही वाटला.

"या गोष्टीला नावच नाही" ट्रेलर >>> काही‌ झेपला नाही. नक्की कशाबद्दल आहे ते समजत नाही. >>>>> +१

"या गोष्टीला नावच नाही" ट्रेलर >>> काही‌ झेपला नाही. नक्की कशाबद्दल आहे ते समजत नाही. >>> एक मनुष्य त्याच्या बाळाला गोष्ट सांगत असतो. " राघू चालला रे, राघू चालला रे , राघू चाल्ला रे, राघू चाल्ला रे ............................................................... राघू चाल्ला रे... "

या गोष्टीला नाव नाही.

फुलवंती स्टोरी सांगा, एकट्या गश्मीरसाठी बघणं होणार नाही>>> +१
मला प्राजक्ता चे कॉस्च्युम & नाच बघायला आवडतं पण युट्युबा वर आहेत गाणी.

>>ती प्राजक्ता आवडत नाही मला
तुमचा जाहिर निषेध!! Wink
कौन है ये लोग.... कहां से आते है ..... (ज्यांना राग येईल त्यांनी Light 1 घ्या)

आत्ताच 'संगीत मानापमान' चं ट्रेलर पाहिलं. चिडचिड झाली. तलवारींच्या मुठींचा आणि ट्रेलरमधे दाखवलेल्या फॉन्टचा रंग इतका सारखा कसा? त्या तलवारी अक्षरशः गॅदरिंग लेव्हल वाटतात. पिवळ्याधम्मक मुठींच्या. बेगडी. व्हिएफेक्सचा वापर आहेच. पण सगळीकडे भन्साळी पॅटर्न कशाला? वैदेही परशुरामीची झुळझुळीत साडी, ती नेसून तिने घेतलेली अंगडाई पाहून भन्साळीपेक्षा खरंतर केजोचीच आठवण येते. पण पुढे तर खूप रंगीबेरंगी फुलांचा मुकुट आणि तेवढीच रंगीबेरंगी फुलपाखरं तिच्या आसपास उडताना दाखवली आहेत. हे संगीत मानापमान घडतंय तरी कुठे? बाकीही बर्‍याच गोष्टी नकली वाटतात.

डायरेक्टर स्वतः सुभाच आहे त्यामुळे धास्तावण्यासारखच आहे हे! टिझर सेम भन्साळी पॅटर्न वाटला.. वैदेही गोड दिसतेय मला आवडते ती, अ‍ॅक्तिन्ग किती चान्गली करते ते काय माहिती नाही..टिझरच्या शेवटी काहि सेकद दिसलेला लिमयेच बरा वाटला.
(सुभा आणी शिवानी सोनार ची एक कुठली तरी सिरियल चालु आहे वाटत सध्या त्याचे एक दोन रिल चुकुन पाहिले तर त्यात भावे साहेब नेहमिचा चिडका ताणलेला चेहरा घेवुन आहेत.)

काहीही ट्रेलर. अजिबात नाही आवडला.
सुमित राघवन बिलकुल सुट होत नाहीये इथे. हिंदीची कॉपी मारली आहे एकदम.
भन्साळी, केजो, बाहुबली चं कडबोळं Lol

रमड एकदम बरोबर लिहिलं आहेस.
त्या तलवारी अक्षरशः गॅदरिंग लेव्हल वाटतात. पिवळ्याधम्मक मुठींच्या. बेगडी. >>>>>सुमित राघवन च्या हातातली तर थर्माकॉलला सोनेरी पावडर चिकटवलेली आहे.
वैदेही परशुरामीची झुळझुळीत साडी, ती नेसून तिने घेतलेली अंगडाई पाहून भन्साळीपेक्षा खरंतर केजोचीच आठवण येते. पण पुढे तर खूप रंगीबेरंगी फुलांचा मुकुट आणि तेवढीच रंगीबेरंगी फुलपाखरं तिच्या आसपास उडताना दाखवली आहेत. >>>>>>अगदी अगदी.

Pages