Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54
नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोमांस असेल तर त्या प्रकाराची
गोमांस असेल तर त्या प्रकाराची चौकशीची मागणी करायची. राज्यात तसेच केंद्रात भाजपाचेच मजबूत सरकार आहे. पण तसे होतांना दिसत नाही.
बिल्कीस बानू बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार किंवा गौरी लंकेश , सुबोध कुमार यांचे खुनी आरोपी - तुरुंगातून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांचे स्वागत हारतुरे आणि भारत मातेच्या जयजयकार होते या हिणकस प्रकाराची आता सवय करायला हवी.
बहराइच संबंधी द रेड माइकचा
बहराइच संबंधी द रेड माइकचा कार्यक्रम पाहिला. त्यात विचारलेले व इतर काही प्रश्न
१. कोणतीही मिरवणूक काढायला पोलिसांची परवानगी लागते. मिरवणुकीसोबतही पोलिस असतात. मिरवणुकीत प्रक्षोभक गाणी वाजवली जात असताना पोलिस काय करत होते?
२. राम गोपाल मिश्रा मिरवणुकीतून बाहेर पडून एका घरावर चढला. त्याने तिथला हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा लावला. यावेळी जमाव त्याला प्रोत्साहन देत होता. पोलिस काय करत होते? या दोन्ही बाबी दोन समूहांत वैमनस्य निर्माण करणे या गुन्ह्यात येतात की नाही?
३. त्याचा खून झाल्यानंतरचं पोलिस अधिकार्याचं वक्तव्य आहे की आम्ही अधिक कुमक मागवली आहे, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मग दुसर्या दिवसापासून दंगे , जाळपोळ, तोडफोड कसे सुरू झाले?
४. वातावरणात तणाव असेल तर तो निवळा वा म्हणून प्रशासनाने प्रयत्न करायचे की वाढावा म्हणून? हाथरस केसमध्ये दलित मुलीचा मृतदेह रात्री अडीच वाजता पोलिस आणि प्रशासनाने जाळला ; दहन करताना तिचे कुटुंबीय तिथे नव्हते, त्यांना कोंडून ठेवले होते. पोलिस आणि प्रशासनाने to avert an extraordinary law-and-order problem posed by protesters and political parties intent on stoking caste clashes, हे कारण दिले. आताच्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था , धार्मिक वैमनस्य ही कारणे नव्हती? पोलिसांनी अंत्ययात्रा काढू दिली. त्यात लाठ्या काठ्या घेऊन लोक सामील झाले.
५. राम गोपाल मिश्राचा मृत्यू गोळी लागून झाला , तो त्या घराच्या गच्चीवर / सज्जामध्ये असताना त्याला गोळी लागली व तो खाली पडला याचा व्हिडियो आहे. मग काही लोकांनी त्याला ओढून घरात नेले, मारहाण केली, नखे उचकटून काढली अशा अफवा सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियावर पसरवल्या गेल्या. बहराइच पोलिसांनी असं काही झालं नाही, एवढं निवेदन दिलं. पण अफवा पसरवणार्यांवर काय कारवाई केली? अफवा पसरवण्याचे काम अजूनही थांबलेले नाही.
६. दुसर्या दिवशी दंगे, जाळपोळ, तोडफोड पोलिसांच्या उपस्थितीत होताना दिसली. भाजप राज्यात हे नेहमीचेच आहे म्हणायची वेळ आली आहे.
७. राम गोपाल मिश्राने जे कृत्य केले, ते धार्मिक वैमनस्य वाढवणारे होते. त्याबद्दल त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला का? तथाकथित गोरक्षकांकडून एखाद्याला ठार मारले जाते, तेव्हा गोतस्करी किंवा गोमासं बाळगण्याचा पहिला गुन्हा त्या मेलेल्या माणसाविरोधात नोंदवला जातो, मारणार्या झुंडीचा व्हिडियो असला तरी पोलिसांच्या कागदावर ते अज्ञात लोक असतात.
८. राम गोपाल मिश्राच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे, दिलीही असावी. तथाकथित गोरक्षकांकडून मारले गेलेल्यांना अशी नुकसान भरपाई दिली जाते का?
९. मिश्रा हत्येच्या आरोपावरून एका कुटुंबातील तीन व अन्य दोन मुस्लिम पुरुषांना पोलिसांनी त्यांच्या घरून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा नव्हता. त्या कुटुंबातील महिलेने यांचं एन्काउंटर केलं जाईल अशी भीती व्यक्त केली. झालंही तसंच. फक्त यावेळी पायावर गोळ्या मारल्या गेल्या. याबाबत वेगळं काही लिहायची गरज नाही.
आता हे प्रश्न विचारले म्हणजे मी मिश्राच्या खुनाचं समर्थन केलं असा नेहमीचा युक्तिवाद येईल. त्यांच्यासाठी - ज्याने कोणी खून केला असेल, त्याला कायद्याने आणि न्यायिक प्रक्रियेने शिक्षा व्हावी.
<< राम गोपाल मिश्रा
<< राम गोपाल मिश्रा मिरवणुकीतून बाहेर पडून एका घरावर चढला. त्याने तिथला हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा लावला. >>
------ घरावर चढण्याचे कृत्य त्याने का केले ? मिरवणूकीतल्या कुणालाही त्याला रोखणे शक्य झाले असते.
अर्थात दंगा करायचा असाच उद्देश असेल तर निमीत्त कुठलेही तयार करता येते. गुजरात प्रयोगशाळेत तयार झालेले द्वेषरुपी रसायनाची द्वेषमात्रा काही काळानंतर कमी होत जाते. डोक्यांतल्या द्वेषाची परिणामकारकता कायम ठेवण्यासाठी दर काही काळानंतर असे बुस्टर डोस आवश्यक असावेत.
चला, दंगली कुठे ही होऊद्या
चला, दंगली कुठे ही होऊद्या दोष हा हिंदूंचाच असणार. हिथे तर सरकारपण भाजपचं म्हणजे दोष द्यायला सोयीस्कर. मुस्लिम बहुल सोडा पण जिथे मुस्लिम लोकसंख्या २०-३०% जरी असेल तो भाग automatic संवेदनशील होऊन जातो. पोलिसांनी अधिक काळजी घ्यायला पाहिजे होती. कर्नाटकात पण गणपती मिरवणुकीत दगडफेक झाली.
रात्रीचे चांदणे, धार्मिक
रात्रीचे चांदणे, धार्मिक मिरवणुकीत मुस्लिमांना उद्देशून प्रक्षोभक आणि अश्लील गाणी का वाजवली जातात? एरवी चटकन दुखावणार्या तुमच्या धार्मिक भावना या गाण्यांनी दुखावत नाहीत का?
वरचा घटनाक्रम वाचला तर दंगे व्हावेत यासाठी हिंदुत्ववाद्यांनी प्रशासनाच्या साथीने पुरेपूर प्रयत्न केलेले दिसत नाहीत का?
अशोक चव्हाण ह्यांच्या कन्येला
अशोक चव्हाण ह्यांच्या कन्येला BJPने तिकीट दिले आहे. ह्याच साठी केला होता अट्टाहास.
नाही नाही हे डाय्नास्टी नाही आहे. हे आपले ते आहे... सबका साथ.
Sreejaya Ashok Chavan
नाव ऐकले आहे? नाही? कसे होणार तुमचे?
प्रेत यात्रेतल्या प्रेताला
प्रेत यात्रेतल्या प्रेताला सुद्धा हे लोक सदस्य बनवून घेतील.
काँधे पे सूरज, टिका के चला तू
काँधे पे सूरज, टिका के चला तू
हाथो में भर के, चला बिजलियाँ
"Believe me, if you have
"Believe me, if you have faith, God will always find a way." आपले सरन्यायाधीश.
त्यांनी देवाला साकडे घातले कि हे देवा, अयोध्या बाबरी मस्जिद विवादातून मार्ग काढ. त्याने ऐकले आणि तिढा सुटला.
त्या भागात २०-३०% असलेल्या
त्या भागात २०-३०% असलेल्या मुसलमानांनी सुप्रसिद्ध नुपूर शर्माकडून हे वदवून घेतलं
"35 गोलियां, नाखून उखाड़ दिया, पेट फाड़ दिया, आँखें निकाल लीं"
BJP नेत्री नूपुर शर्मा बहराइच के रामगोपाल मिश्रा की फर्जी पोस्टमार्टम रिपोर्ट खुले मंच से बता रही हैं। इस मंच पर 2–2 राज्यपाल भी मौजूद थे।
आता "मी जे ऐकलं, ते बोलले. माफ करा," म्हणतेय
https://x.com/NupurSharmaBJP/status/1848063057274032339
चंद्रचूड ! हसावं की रडावं
चंद्रचूड ! हसावं की रडावं कळेना.flattered to deceive
राज्य घटना अनुच्छेद ५१ A (h)
राज्य घटना अनुच्छेद ५१ A (h)
"51A. Fundamental duties
It shall be the duty of every citizen of India (h) to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform "
निवृत्ती नंतर शांत जीवन जगणे कुणाला नको आहे?
निकाल देताना घटनेचा,
निकाल देताना घटनेचा, कायद्याचा विचार करायचा की देवाला साकडं घालायचं?
तो निकाल न वाटता निवाडा वाटला होता.
बहराइच हिंसा - भाजप आमदाराने
बहराइच हिंसा - भाजप आमदाराने भाजप नेत्यासमवेत ८ लोकांविरोधात एफ आय आर नोंदवला.
आहे की नाही गंमत? आणि इथले निरागस लोक दंग्यांसाठी मुस्लिमच जबाबदार असतात असं गाणं गात असतात.
अकोल्यात योगेंद्र यादव यांची
अकोल्यात योगेंद्र यादव यांची सभा उधळली. पुण्यात निर्भय बनो सभेला जाताना निखिल वागळे इत्यादिंवर भाजपवाल्यांनी स्वतः हल्ला केला होता. आता हे काम आउटसोर्स केलं असावं.
आहे की नाही गंमत? आणि इथले
आहे की नाही गंमत? आणि इथले निरागस लोक
अस काहीही नाही, प्रत्येक धर्मात वाईट लोक असणारच, हिंदू धर्मही त्याला आपवाद कसा असणार. मुस्लिम धर्मात जास्त वाईट आहेत एवढंच. कलाचीच बातमी बघा, काश्मीर मध्ये ७ हिंदू मारले गेले. त्यांनी ना मिरवणूक काढली होती ना कोणत्या घोषणा दिल्या होत्या.
काश्मिर मध्ये गोळ्या घालणारे
काश्मिर मध्ये गोळ्या घालणारे दहशतवादी आहेत. बहराईच मध्ये दंगा करणारे शेकडो लोक सुद्धा दहशतवादी म्हणायचे का? मग तर त्यांचीच संख्या जास्त भरेल.
तुम्हाला लॉरेन्स बिष्णोई हा नवा हिरो मिळालाय. लोक त्याला नवे नवे टारगेट सुचवताहेत. तो कोण ?
चाळीसगावहून कल्याणला येणार्या ट्रेनमध्ये मुस्लिम वृद्धाला मारहाण करणारे , पोलिस भरतीसाठी जाणारे तरुण कोण? त्यांची संख्या किती?
गेल्या दहा बारा वर्षांत किती मुस्लिमांचं मॉब लिंचिंग झालं. हे मारणारे लोक कोण?
हिंदूंच्या तथाकथित धार्मिक मिरवणुकीय प्रक्षोभक, अश्लील गाणी वाजवली जातात, हावभाव केले जातात, त्याबद्दल एक हिंदू म्हणून अजूनही तुम्ही काही बोलला नाहीत. याचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजेच भाग घेणार्यांची संख्याही वाढते आहे. एका मिरवणुकीत शेकडो लोक असतातच.
भाजपला दंगे आवडतात, हा दुसरा किंवा अधिक महत्त्वाचा मुद्दा. कारण दंगे होण्यासाठी कारणं आणि पोषक स्थिती भाजपच निर्माण करतो. सोशल मीडिया आणि मेन स्ट्रीम मी डिया यांना ते कसं वापरतात, ते उघड आहे.
बिष्ण्या आला पळा पळा ब्यागा
बिष्ण्या आला पळा पळा ब्यागा भरा.
तर त्यांचीच संख्या जास्त भरेल
तर त्यांचीच संख्या जास्त भरेल.
तुमच्या सोई नुसार १-२ प्रसंग घेऊन तुलना नका करू. याच न्यायाने मग आझाद मैदानात दंगली करणारे जास्त होते म्हणून म्हणून मुस्लिमांना जास्त हिंसक समजणार का? भाजप नव्हता त्यावेळीही दंगली होताच होत्या.आणि नसला तरीही होणारच आहेत.
भारतात भाजपा असल्या मुळे टीका करायला सोपं जातंय. पण जगभर धर्माच्या नावाने कोण हिंसा करतय ते बघा. NIA ने किती तरी धाडी घालून होणारे बॉम्बस्फोट थांबवलेत. अत्ता तुमचा NIA वर विश्वास नसणार. बंगलोर मधल्या कॅफेत बॉम्बस्फोट प्रकरणात पकडलेले आरोपी कोणत्या धर्माचे आहेत?
१ -२ प्रसंग? गेल्या दहा
१ -२ प्रसंग? गेल्या दहा वर्षांत देशभरात मॉब लिंचिंगच्या किती घटना झाल्या? त्यांना एक दोन म्हणता?
रेल्वे पोलिस मुस्लिमांना वेचून वेचून मारतो, यापेक्षा भयंकर काय असू शकतं? त्याच्या तोंडी कोणाची नावं होती?
अमेरिका , पश्चिमी देश आणि आता इस्रायलने जगभरात जेवढे मुस्लिम आणि इतरही लोक मारलेत, ते बघता हिंसा कोण करतं हा प्रश्न पडू नये.
तुम्ही अजूनही तथाकथित धार्मिक मिरवणुकीत चालणार्या प्रकाराबद्दल बोलायला तयार नाही, यातच काय ते आलं.
भाजप नव्हता, तेव्हा जनसंघ होता, रास्वसं तर आता १०० वर्षांचा होईल, त्यांच्या परिवारातील संघटना कधीपासून आहेत. सरदार पटेलांनी फाळणीच्या काळातल्या संघाच्या कार्याबद्दल काय लिहून ठेवलंय, ते तुम्हांला माहीत नसेलच.
भाजपचा सौम्य चेहरा म्हणवल्या जाणार्या वाजपेयींचीही प्रक्षोभक भाषणे आणि त्याचे परिणाम नोंदले गेले आहेत.
Supreme Court Directs All States/UTs To Register Suo Motu FIR Against Hate Speeches Irrespective Of Religion - एप्रिल २०२३. महाराष्ट्रात राणेपुत्राची भाषणे सात्त्विक असतात का? त्यावर पोलिसांनी स्वतः हून कृती केली नाहीच, विरोधी पक्षांनी तक्रारी नोंदवूनही कृती केलेली दिसत नाही. तरीही भाजपला नावं ठेवायची नाहीत?
मी बहराइच मधल्या घटनाक्रमाबद्दल काही प्रश्न विचारलेत. त्याचं उत्तर तुम्ही काय देता, की कर्नाटकातही दगडफेक झाली. तुम्ही भाजप जे घडवून आणतोय, ते बरोबर आहे असं म्हणा. पुन्हा तुम्हांला उद्देशून त्याबद्दल काही लिहिणार नाही.
तुम्ही अजूनही तथाकथित धार्मिक
तुम्ही अजूनही तथाकथित धार्मिक मिरवणुकीत चालणार्या प्रकाराबद्दल बोलायला तयार नाही, यातच काय ते आलं.
काहीही, मला तर शांततेत चालणाऱ्या मिरवणूकही आवडत नाहीत, काही नाही तर ट्रॅफिक जॅम तरी होतेच. मी काही भजप समर्थक नाही त्यामुळे तुम्ही योग्य टीका केली तर मला फरक पडत नाही. पण तुम्ही सगळा दोष भजपा आणि हिंदुंवर टाकत आहेत म्हणून उदाहरण दिलं. काश्मीर मध्ये तर भजपं नावालाही नाही तरी हिंसा होतेय.
काश्मीर अजूनही केंद्रशासित
काश्मीर अजूनही केंद्रशासित प्रदेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिथे राष्ट्रपती राजवट होती, तेव्हाही हिंसाचार होतच होता.
नोटाबंदी, कलम ३७० रद्द करणे यामुळे हिंसाचार थांबणार होता, पण आता तर वाढतच चालला. कलम ३७० रद्द केल्यावर अख्ख्या काश्मीरला लॉकडाउनमध्ये ठेवलं होतं. त्या काळात लष्कराने तिथे काय काय जुलूम केले याच्या बातम्या दडपल्या गेल्या.
बरं त्या हिंदू शेरनी नुपूर शर्मा विरोधात तिच्या टाइम्स नाउ वरच्या वक्तव्यांवरून केसेस चालू होत्या, त्यांचे पुढे काय झाले? इतकी वर्षे ती गायब होती, यंदा मतदानाला बाहेर पडली. आता तिने पुन्हा मिशन हेट स्पीच सुरू केले.
आझाद मैदान मधे दंगल झाली,
आझाद मैदान मधे दंगल झाली, पोलीसांना पण मारहाण झाली - या व अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटना निषेधार्ह आहे. चौकशी आणि गुन्हेगारांवर कारवाई अशी अपेक्षा त्या वेळेसच्या सरकार कडे असेल.
जिथे हिंसा झाली, दंगल पसरविली गेली , महिलांवर अत्याचार झाले त्या त्या प्रत्येक घटनेचा निषेध अपेक्षित आहे. अशा गुन्ह्यांतल्या गुन्हेगारांवर कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करावी.
त्यांनी काल केले ते चूक होते , शुद्ध मुर्खपणा होता पण म्हणून आज आपणही अगदी तसेच वागायला हवे का? मशीदीवर चढणे, झेंडे काढणे, भगवा फडकाविणे, आमंत्रण नसतांना जबरदस्तीने मुस्लीमांच्या घरांत घुसणे याने काय साध्य होणार आहे? द्वेष भावना वाढेल का कमी होईल?
द्वेषाने अंध झालेल्या धर्मांधांच्या द्वेष भावनेचे बळी भवरलाल जैन किंवा सुबोधकुमार सारखे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी पडतात तरीही आपल्याला जाग येत नाही याचे दु : ख वाटते.
<< कलाचीच बातमी बघा, काश्मीर
<< कलाचीच बातमी बघा, काश्मीर मध्ये ७ हिंदू मारले गेले. त्यांनी ना मिरवणूक काढली होती ना कोणत्या घोषणा दिल्या होत्या. >>
----- ७ निरपराधी लोक मारल्या गेले हे वाईट झाले.
मागच्या काही दशकांत किती हिंदू / मुस्लीम/ इतर नागरिक ( civilians) मारल्या गेलेत याची आकडेवारी शोधतांना मला २००३ पर्यंतची आकडेवारी मिळाली. सर्व धर्माचेच लोक पोळल्या जात आहे, आपल्याला केवळ हिंदूंचेच पोळणे दिसते / मनाला लागते.
https://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/data_sheets/...
हे म्हणजे पाकिस्तानने बघा
हे म्हणजे पाकिस्तानने बघा आमचे किती लोक दहशवाद्यांनी मारले अस म्हणण्यासारखं आहे. आम्हीच दहशतवाद्यांचे खरे बळी आहे म्हणण्यासारखं आहे. यातील बहुसंख्य लोक एकतर मुस्लिम दहशतवाद्यांनीच मारले असतील नाहीतर पोलीस आर्मी इत्यादिकडून दहशतवाद विरोधी कार्यवाही दरम्यान मारले गेले असतील.
सर्वच हत्या पाकशी संबंधीत
सर्वच हत्या पाकशी संबंधीत संघटना करतात असे नाही. समझौता एक्स्प्रेस मधे स्फोट घडविण्यात असिमानंद, सुनिल जोशी, कर्नल पुरोहित यांची नावे आहेत. ७० निरपराधी लोक मारले गेले होते या स्फोटामधे. भारतातही अनेक ठिकाणी साखळी स्फोट झाले आहेत. यामुळे एक गोष्ट होते - दोन्ही समाजांत आधीच असलेला दुरावा आणि अविश्वासाचे वातावरण वाढते.
क्लिंटन यांच्या भारत भेटीच्या काही तास आधी ३५ पेक्षा जास्त निरपराध्यांची हत्या केली गेली. या हत्याकांडाला " जबाबदार" असणार्या पाच लोकां ना सुरक्षा दलाने चकमकीत मारले. हे पाच लोक खरोखरच हत्याकांडास जाबाबदार होते का सुरक्षा दलाने ( सत्य लपविण्यासाठी) पाच निरपराधी मारले?
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pathribal-...
बहराइच हिंसा; उपद्रवी बोले- 2
बहराइच हिंसा; उपद्रवी बोले- 2 घंटे पुलिसवाले हट गए थे:लोगों ने गद्दारी की, नहीं तो महराजगंज खत्म हो गया होता
(No subject)
https://x.com/UPTakOfficial
https://x.com/UPTakOfficial/status/1849024352375001485
बहराइच हिंसा का एक और वीडियो आया सामने,CO के सामने लोग करते रहे दंगा और टियर गन तक नहीं चला पाए..
व्हिडियो आहे हं. बघून घ्या.
तो क्या अब एक हिंदू एक
तो क्या अब एक हिंदू एक मुस्लिम से जय श्रीराम भी नहीं बुलवा सकता? धिक्कार है!
Pages