विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दाट शंका आहे बहुमताबद्दल, कदाचित कुठल्याही आघाडीला बहुमत नसेल आणि मग जो काही घोडेबाजार बसेल त्याला तोड नसेल.

निवडणूकीची तारिख जाहिर झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. आमदारांच्या अपात्रतेबद्दल आता निर्णय घेण्याची गरज रहाणार नाही.

एकाच दिवसांत निवडणूका उरकणार म्हणून निवडणूक आयोग अभिनंदनास पात्र आहे.

गेल्या दोन वर्षांत शिंदे/ फडणविस / अजित पवार यांनी काही दिवे लावले, जनतेची कामे केली अशातला भाग नाही. ED/CBI/ पक्षपाती EC आणि गर्भश्रीमंत भाजपा या सर्वांसमोर विरोधी पक्ष कमकुवत आणि वैचारिक दृष्ट्या विखुरलेला आहे. विरोधी पक्षाचे सरकार येणे कठिण आहे पण जरी ते निवडून आले तरी शहा-मोदी-फडणाविस त्यांना काम करु देतील अशी शक्यता नाही. नवा कोश्यारी आणून बसवतील. सरकार टिकणे हे फार मोठे आव्हान राहिल. शेवटी नुकसांन महाराष्ट्राचेच होणार आहे.

<< घोडेबाजार बसेल >>

----- पक्षफोडीचा खोल अनुभव असलेले फडणविस हे मुरब्बी राजकारणी आहेत तोपर्यंत घोडेबाजार होणार नाही. त्यांना हवी तिथे साथ द्यायला केंद्रिय तपास यंत्रणा सदैव सज्ज आहे.

निवडणूकीची तारिख जाहिर झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. आमदारांच्या अपात्रतेबद्दल आता निर्णय घेण्याची गरज रहाणार नाही. >>> Wink

दर महा १५००/
आधी महागई वाढवायची मग मलम पट्टी.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले|
देव तेथेचि जाणावा. वोट तेथेचि द्यावा|
आमच्या इथे चम्पाने किराणा दुकान चालू केले आहे. सगळ्या वस्तू डिस्कौंट वर.
ECI काय घास उपटणार आहे?

मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा - मुख्यमंत्र्यांचा आरोप.

आता लाडकी बहीण सारख्या योजना न आवडलेले भाजप समर्थक मविआला मत देणार.

पण मी आजच वाचले कि आदित्य ठाकरे म्हणाले कि लाडकी बहिण आणि टोल माफी ह्या योजना आम्ही पण चालू ठेऊ!

एकनाथ शिंदे हे मोदींचे एकलव्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात मोदी म्हणाले - काँग्रेसची सत्ता आली तर ते राममंदिराला टाळं लावतील.
शिंदे त्यांचाच कित्ता गिरवतात. उद्या ते सांगतील महाविकास आघाडी आली तर गणेशोत्सव आणि दहीहंडी बंद होतील.

<< टोल माफी ह्या योजना आम्ही पण चालू ठेऊ! >>

----- जनतेसाठी टोल माफी आहे पण कंत्राटदारांना पैसे राज्यसरकार देणारच आहे, म्हणजे शेवटी हा पैसा जनतेच्याच खिशातून जाणार आहे. खिसा कापला जात असतांना कळणारही नाही अशी खास भाजपाई स्टाईल.

दुसरीकडे कंत्राटदार म्हणतात आमची ४० हजार कोटीं रुपयांची थकबाकी आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maharashtra-contractors-...

जाहिरातींसाठी पैसा कुठून आणत असतील ?

>>> जनतेसाठी टोल माफी आहे पण कंत्राटदारांना पैसे राज्यसरकार देणारच आहे, म्हणजे शेवटी हा पैसा जनतेच्याच खिशातून जाणार आहे. खिसा कापला जात असतांना कळणारही नाही अशी खास भाजपाई स्टाईल.

दुसऱ्या एखाद्या पक्षाने हा निर्णय घेतला असताच तर त्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वतःचे पैसे कंत्राटदारांना दिले असते हा मुद्दा फार महत्वाचा आहे.

दुसऱ्या एखाद्या पक्षाने हा निर्णय घेतला असताच तर त्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वतःचे पैसे कंत्राटदारांना दिले असते हा मुद्दा फार महत्वाचा आहे. >>> जर माझ्या आजीला चाके असती, तर ती मोटारसायकल असती - अशी एक इटालियन म्हण असल्याचे ऐकून आहे.
तुर्तास जी मोटारसायकल आहे तीला तर मोटारसायकल म्हणूया, जेव्हा केव्हा आजीला चाके लागतील तेव्हा तिलाही मोटारसायकल म्हणू...आहे काय, नी नाही काय... Rofl

दुसऱ्या एखाद्या पक्षाने हा निर्णय घेतला असताच तर त्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वतःचे पैसे कंत्राटदारांना दिले असते हा मुद्दा फार महत्वाचा आहे. >>> जर माझ्या आजीला चाके असती, तर ती मोटारसायकल असती - अशी एक इटालियन म्हण असल्याचे ऐकून आहे.
तुर्तास जी मोटारसायकल आहे तीला तर मोटारसायकल म्हणूया, जेव्हा केव्हा आजीला चाके लागतील तेव्हा तिलाही मोटारसायकल म्हणू...आहे काय, नी नाही काय... Rofl

जर माझ्या आजीला चाके असती, तर ती मोटारसायकल असती - अशी एक इटालियन म्हण असल्याचे ऐकून आहे. >> खोच लक्षात आली, शोधून शोधून तुम्हाला पण इटालियन भाषेतील म्हण सापडली.

पटोले साहेबांनी राऊत साहेब यांच्या श्रीमुखात भडकवायला धाव घेतली. त्यामुळे पटोले साहेब मीटिंगमध्ये असले तर चर्चेस येणार नाही असे उबाठा साहेब म्हणाले. दरम्यान, थोरल्या साहेबांनी जयंत पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास जाहीर केले. जयंत पाटील साहेब हे सज्जन गृहस्थ असावेत असे वाटते. पडत्या काळात तुतारी वाजवत होते यामुळे या पदावर त्यांचा दावा योग्य वाटतो.

"मी नव्वद वर्षांचा झालो तरी थांबणार नाही" अशी घोषणा थोरल्या साहेबांनी केली.

महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलावं असं काहीही त्यात छान नाही.
ज्याला राजकारणाशी घेणं देणं नाही त्यालाही काय चाललं आहे हे कळतं.

आमच्याकडे कामवाली यायची तिने सांगितलेलं कि लाडकी बहीण योजना फक्त दोन महीने आहे. निवडणुकीनंतर बंद होईल. ती मराठवाड्यातून आलेली, अशिक्षित आहे. नवरा मिळतील ती बिगारी कामं करतो. अशा महिलांना लक्ष्य करून स्कीम आणली असेल तर जनता अपडेट झाली पण राजकारणी नाहीत झालेले.

लोकांचा नाईलाज असा आहे क त्यांना यातूनच निवडून द्यायचेत. तसा प्रचार मीडीयाही करते. पूर्वी चार पक्षांच्या दोन आघाड्या होत्या. इकडे दोन तिकडे दोन. आता सहा पक्षांच्या दोन आघाड्या झालेल्या आहेत. इकडे तीन, तिकडे तीन.
यातले वाढीव हे पूर्वीच्या चार मधल्या प्रदेशिक पक्षांचे उडालेले टवके आहेत. त्यामुळं एक झालं कि बंडखोरांची सोय झाली.
बाकी, पक्षनिष्ठा, विचारधारा वगैरे १९९८ पासून या सर्वांनी वेशीला टांगलेली आहे.

कधी या पक्षात, तर कधी त्या पक्षात. विखे पाटील यांचे सरदार म्हणायला हवेत. हर्षवर्धन पाटील, निंबाळकर , शंभूराजे देसाई यांच्या कडे पाहून बाकिच्यांची सुद्धा भीड चेपली. मोहिते पाटील यांनीही युतीच्या सत्तेचा आस्वाद घेतला आणि वारे पाहून परतले. या मंडळींनी कितीही कोलांट्या मारल्या तरी मतदार त्यांना मत देतो. आपापल्या संस्थानचे अनभिषिक्त सम्राट असल्यावर काय होणार ?

आताही निवडून गेल्यावर कुठल्या आघाडीतला कुठला पक्ष कुणासोबत जाईल याची कसलीही शाश्वती नाही. पटोलेंनी हेच राऊतांना बोलून दाखवले तेव्हां राऊतांनी पण त्यांना भाजपच्या सांगण्यावरून तुम्ही सभापती पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेना फोडायचा रस्ता मोकळा केला असे म्हटले असे म्हणतात. हा आरोप राऊतांनी या आधी जाहीरपणे सुद्धा केलेला आहे.

शिवसेनेचे दुखणे हे आहे कि काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष संपत चालले होते. सरदार, मनसबदार, शिलेदारांचा धीर सुटत चालला असताना अचानक लॉटरी लागावी त्याप्रमाणे शिवसेनेने त्यांना सत्तेची संजीवनी दिली. पाण्याबाहेर काढलेली मासोळी तडफडत असताना तिला अचानक पाणी मिळून जीव वाचावा तसा या पक्षांचा जीव वाचला. असे संजय राऊत म्हणाल्याचे अनिल थत्ते सांगतात. जीवदान मिळाल्यावर यांनी शिवसेनेचे पंख छाटायला सुरूवात केली हा सेनेच्या नेत्यांचा समज आहे.

महायुती मधे शिंदेंनी उबाठा सेने पेक्षा चांगली कामगिरी केली. पण निवडणुकीत त्यांना भाजपकडून पाडण्याचे प्रय त्न झाले असे त्यांचे लोक म्हणत आहेत. अजित पवारांबद्दल भाजप आणि शिंदेसेना दोघांच्याही मनात संशय आहे.

थोडक्यात हे मारून मुटकून एकत्र आहेत. निवडणुकीनंतर भलतेच लोक सरकार मधे एकत्र हे चित्र दिसले तर नवल नको वाटायला.

ह्या निवडणुकीला आता काही अर्थ राहिला नाहीये. लाडकी बहिण. People are totally sold out.
कुणाला स्वस्तात दिवाळीच्या फराळ पाहिजे काय? या आमच्या इथे. येताना फक्त आधार कार्ड ची झीरोक्स वर आपला फोन नंबर लिहा. १००० रु चे पाकेज ४००रु घ्या. काल तिकडे दीड किलोमीटरचा Q लागला होता!

अजित पवार आपल्या वक्तव्यांनी सेल्फ गोल, हिट विकेट, पार्टनरला रनाउट करणं असले प्रकार करत सुटलेत.

शिंदेंनी बार्गेनिंग करून अधिक जागा मिळवल्या , पण काही जागांवर भाजपच्याच लोकांना तिकीट द्यावं लागलं.

ही आणखी एक गंमत- महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइं (आठवले) पक्षाला दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे.राज्यात महायुतीची सत्ता आल्यास एक विधान परिषद, एक कॅबिनेट मंत्रिपद, तसेच चार महामंडळांची अध्यक्षपदे, जिल्हा तालुका शासकीय समिती सदस्यपदे यांसह महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांना दिले आहे.

बाकी या निवडणुकांत कसलाही धरबंध राहिलेला नाही. एकाच घरातले चार लोक तिकिटासाठी चार वेगळ्या पक्षांत जातात.

Pages