चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेलर न बघता स्त्री २ ला गेल्यामुळे थियेटरात मी सर्व जोक्स एंजॉय केलेत. ट्रेलर मधे उघड झालेले आणि त्यामुळे अळणी झालेले जोक्स ऐकून लोक कसं नुसं हसत होते..

मीही नाही पाहिला ट्रेलर.
घाबरणे किती आहे?थिएटरमध्ये रात्री बघता येईल का मला?(पैज लावून एकटीने नाही, नॉर्मल लोकांसोबत)

दचकवणे आहे. घाबरणे नाहीच जवळपास.
मी पहिल्यांदा ने एकटीच गेले होते, मस्त खिदळत पाहीला आणि एंजॉय केला.

छावा टीझर पाहिला.
स्टंट्स अ आणि अ आहेत... त्यामुळे बघणार नाही!
दोन्ही कलाकार अत्यंत आवडते, त्यामुळे वाईट वाटतंय Sad

आशू२९ +१. मी पण काहीही न वाचता बघता गेलेलो स्त्री-२ ला. आणि जामच आवडला. सगळे जोक मस्त लॅंड होत होते.

सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी एकत्र>>

मागल्या खेपेला बासरी वाजवून अन् खिचडी खाऊन मूल झालं होतं ना
आता या वेळी काय???

'नवरा माझा नवसाचा' पिक्चर इतका पकाऊ असताना दुसरा भाग? त्यापेक्षा सचिन-सुप्रियाचे जुने कॉमेडी पिक्चर रि-रिलीज करा. ते पाहीन थिएटरमध्ये जाऊन.

सपि/स्वजो/शाखा यांचा चित्रपट येतोय
- बरं
सपि, स्वजो, शाखा हे सर्वात भारी कलाकार आहेत.
- बरं
सपि, स्वजो, शाखा यांचा चित्रपट थेटरातच पहा.
- बरं
सपि, स्वजो, शाखा यांचा चित्रपट चालला तर तंत्रज्ञांना दोन पैसे मिळतात
- बरं
सपि, स्वजो, शाखा यांचा चित्रपट मी पाहिला नाही पण तुम्ही पहा
- बरं

ड्रायव्हर सर, एक गाणे लावा हो
जी साहेब

कुछ तो लोग कहेंगे

अरे कमाल आहे पाणीचा ट्रेलर.. त्या ट्रेलर धाग्यावर सुद्धा शेअर करतो. हा वेळीच समजायला हवा सर्वांना

https://www.youtube.com/watch?v=YsTRUFcOCkM

टॉयलेट - एक प्रेमकथा सुद्धा असाच होता. पण तो अक्षय कुमारचा होता. त्यामुळे बरेपैकी उथळ होता. हा चित्रपट तसा वाटत नाहीये हे ट्रेलर आणि बॅकग्रांऊड म्युजिक वरून सुद्धा जाणवत आहे. हिरो-हिरोईन दोघांमधील केमिस्ट्री फार आवडली.

छान आहे ट्रेलर. पाणी लागलेलं दाखवायला हवं होतं. चुटपुट लागली.

हिरॉईन गोड, निरागस आहे, नवीन दिसतेय. आदीनाथ आवडतो.

फुलवंती चा ट्रेलर पहिला का कोणी..
प्राजक्ताचे उच्चार काहीही आहेत आणि मधेच प्रमाण मधेच बोलीभाषेत बोलते..
सेट चांगले आहेत.

ट्रेलर पाहिला. सेट संजय लीला भन्साळीला डोळ्यासमोर ठेऊन केल्यासारखा वाटतोय. पेशवे म्हटल्यावर काही कारण नसताना मागे चित्रात मोठा गणपती येतो. पेशवे गणेश भक्त होते, पण असा भला मोठ्ठा गणपती कुठे सिंहासनाच्या मागे रेखाटत नसावेत. भन्साळीने बा म मध्ये केला म्हणून यांनी केलेला दिसतोय.

प्राजक्ताचे उच्चार काहीही आहेत आणि मधेच प्रमाण मधेच बोलीभाषेत बोलते..>> +१ मलाही खटकल ते. ती सह निर्माती
आहे.प्रविण तरडेच्या बायकोने डिरेक्ट केलाय.
प्राजक्ता भरतनाट्यम शिकलिय त्यामुळे डान्स स्किल आहेतच पण अभिनय मात्र तितकासा जमत नाहि तिला किवा
सारख अ‍ॅकरिन्ग करताना बघुन आता कधिही "वा दादा वा" म्हणेल वाटत...

वा दादा वा" म्हणेल वाटत>> Lol
कॉमेंट लिहिणारी पण प्राजक्ताच Wink
नृत्य छान आहे, दिसणे मस्त, कोस्च्युम पण भारी. बाकी अभिनय सो सो आहे तिचा. मला अशा पिक्चरात जबर घुसडलेली हिंदी खटकतं फार.

सिंघम अगेन चा ट्रेलर पाहिला. शब्द थिटे पडतिल इतकी घाण भरून पौराणिक आव आणुन बनवलेला चित्रपट.
१ सीन मधे तर १ कार हेलीकॉप्टर मधे घुसते. रोहित शेट्टी च्या बुद्धीची करावी तितकी कीव कमी आहे.
प्लास्टिक घालून, सर्जरीने फुगलेल्या चेहर्याची करीना..हिला सीता मातेची झालर, हिला कोण पळवून नेणार? प्लिजच. Sad

भारंभार कलाकार भरून ठेवलेत, टायगर, अर्जून नेपो किड्स ना जरा रोजगार देण्यासाठी केला गेलेला केविलवाणा प्रयत्न. लोकांनो मेहनतीचा पैसा वाया घालऊ नका, फ्लॉप करा पिक्चर ला. उगा मराठा मराठा म्हणुन बोलबाला केलाय, जेणे करून मराठी माणुस बघायला येईल Angry
अस्मिता ला पिसे काढायला वर्थ आहे पण.

सिंघम रिटर्नला आलेल्या कॉमेंट मस्त आहेत. पाच मिनिटे ट्रेलर आणि त्यात सर्व हिरो हिरोईन एन्ट्री, फाईट सीन, स्टोरी, सस्पेन्स, जवळपास पूर्ण पिक्चर दाखवला म्हणून लोकं फार खेचत आहेत. बेस्ट कॉमेंट म्हणजे ये तो बस पिक्चर है, ट्रेलर अभी बाकी है मेरे दोस्त Proud

दूरदर्शन वर अर्चना जोगळेकर, अरुण गोविलची फुलवन्ती मालिका पाहिलेली आठवली लहनपणी!
अर्चना जोगळेकर परफेक्ट कास्ट होती, कथ्थक नृत्यांगना , तिचा अ‍ॅटिट्युड परफेक्ट वाटते तिथे, अर्चना जोगळेकर उत्कृष्ट डान्सर आहे.
प्राजक्ताची लावणी नृत्य पाहून मात्र क्लासिकल कमी, आयटेम साँग्ज जास्तं आठवतायेत , तरी ट्रेलर पाहून एकदा बघावा असा दिसतोय फुलवन्ती !
अर्चना जोगळेकरच्या ताकदीची उत्तम नृत्यांगना तशीही कोणी आठवत नाही, नेहमीची यशस्वी अमृता खानविलकरलाही बघून कंटाळा आलाय आता , प्राजक्ता इतर डान्सेस कशी करतेय बघावे लागेल, आशिष पाटीलची कोरिओग्राफी आह्द म्हणून आपेक्षा आहेत.
गश्मीर महजानी मात्रं खूप आवडला !
बाकी भन्सालीची आठवण येण् स्वाभाविक आहे, सिन्द्मॅटोग्राफर महेश लिमये आहे ज्याने हीरामंडी सारखी व्हिज्युअली ग्रँड सिरीज बनवली आहे त्याची जादू इथे दिसणार आहे !

Pages