नेमप्लेट आणि इतर काही

Submitted by अल्पना on 8 October, 2024 - 11:00

मागच्या मोसैक धाग्यानंतर अजून काही छोटे मोसैक बनवून झाले. काहींना ग्राउट केलं, काही अजून तसेच आहेत. इथे त्यांचे फोटो राहून गेले होते.
अगदी व्यवस्थित पूर्ण झालेल्या मोसैक पैकी हे एक.
या नेमप्लेट ची ऑर्डर भावाने आणि वहिनीने दिली होती. त्यांना जास्त डिझाईन नको होते. शक्यतो पांढर्‍या रंगाची नेमप्लेट हवी होती. मध्यभागी पांढर्‍या चौकोनात नावं आणि बाजूने असमित फुलं अशी रफ डिझाईन माझ्या डोक्यात काम सुरू करताना होती. अशा वेगळ्या आकाराची लाकडी नेमप्लेट सहज मिळूनही गेली. मला पॉपी फुलं खूप आवडतात, त्यामूळे चित्रात एक तरी ते फुलं हवंच होते.अकागदावर एक पॉपी फुल आणि त्याच्याबाजूला अजून २-३ फुलं असं एक तात्पुरतं स्केच करून मी सरळ कामाला सुरवात केली. असलेले रंग, ते एकमेकांशेजारी कसे दिसतात हे बघत हळू हळू एका बाजूला फुलांची महिरप तयार झाली. मला खरं तर चारी बाजूंना पूर्ण फुलांची महिरप करायची ईच्छा होती. पण भावाला आणि वहिनीला कमी फुलं हवी होती. ही एवढीच महिरप पुरे असे त्यांनी सांगितल्याने मी थांबले.

nameplate 1.jpg

काम सुरू करताना...

माझ्या मुळ डिझाईनमध्ये बाहेरच्या चौकटीत निळ्या आणि ग्रे रंगाच्या टाईल्स बॅकग्राउंडला ठेवल्या होत्या. स्केच मध्ये तसे छान दिसत होते. पण प्रत्यक्ष मात्र वेगवेगळ्या प्रकारे निळ्याच्या २-३ शेड आणि ग्रे च्या काही शेड्स एकत्र ठेवूनही ते तितकेसे चांगलं दिसलं नाही. वेगवेगळ्या प्रकारे या टाईल्स बॅकग्राउंडला ठेवून फोटो काढून वहिनीला दाखवून झाले आणि शेवटी फक्त ग्रेच वापरू असं ठरवलं.

nameplate 2.jpgnameplate 3.jpg

एका बाजूची महिरप पूर्ण झाल्यावर बॅकग्राउंड्च्या टाईल्स चे प्रयोग

nameplate pre.jpg

ग्राउट करायच्या आधी. मधल्या पांढर्‍या भागात आयव्हरी आणी बॉर्डरला ग्रे ग्राउट केला
nameplate final.jpg
ही फायनल नेमप्लेट, ग्राउट करून नावं चिटकवून तयार झालेली.

याशिवाय १-२ बॉक्स आणि अजून काही छोट्या फ्रेम केल्यात. यातल्या काहींना ग्राउट केलं आहे, पण फ्रेम करणं बाकी आहे. काहींना अर्धवट ग्राउट केलं आहे. बहूतेक सगळे फोटो मात्र ग्राउट करायच्या आधीच काढले आहेत. माझ्या घरात ग्राउट करायला फारशी जागा नाही. ग्राउट करताना खूप पसारा होतो. ग्राउट केल्यावर स्वच्छता करताना वापरलेलं पाणी घरात बाथरूम मध्ये फेकता येत नाही. पाईप ब्ळोक होवू शकतात. त्यामूळे एका कुंडीत किंवा भांद्यात काढून कुठेतरी जमिनीत एखाद्या ठिकाणी खद्दा करून डिस्पोज करावं लागतं. या सगळ्या कारणांनी मी एकत्र एखाद्या दिवशी ३-४ वस्त्तूंना ग्राउट करते. मग फोटो राहूनच जातात.
rose (2).jpgrose .jpg
हे दोन बॉक्सेस आहेत.
बाकी इतर छोट्या वस्तू नंतर कधीतरी दाखवेन. आज बरेच फोटो आडवे होत होतआतात्यामूळे ते नंतर कधीतरी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर झाली आहे नेमप्लेट.
बाकीचे मोसैक पण मस्तच आहेत.
फार नजाकतीने आणि लक्षपूर्वक करायचे काम आहे हे.
मला आवडेल याविषयी अधिक जाणून घ्यायला.

Thank you पराग, अश्विनी, अस्मिता, जाई, झकासराव, ऋतुराज.
याआधी मी मोझाईक करायला कशी शिकले या माझ्या प्रवासाबद्दल आणि या कलाप्रकराची थोडक्यात माहिती, माझे सुरवातीचे काही पिस याबद्दल लिहिले आहे मायबोलीवर.

लिस्बन शहरात सर्व पादचारी मार्ग व सार्वजनिक जागा अश्या मार्बलच्या मोसॅक ने सुशोभित केलेल्या आहेत.
Screenshot_20241009_072721_Photos.jpg
.
Screenshot_20241009_072255_Photos.jpg

सुरेख आहे हे वरचं मोसॅक. युरोपात बर्‍याच सार्वजनिक ठिकाणी मोसॅक कलाकृती आहेत. बाहेरच्या देशात हा कलाप्रकार शिकायला सहज मिळतो, त्यासाठी लागणारं सामान सहजासहजी मिळतं.
आता आपल्याकडे पण काही सार्वजनिक ठिकाणी आहेत मोसॅक कलाकृती. माझ्या लेकाच्या शाळेने जवळच्या मेट्रो स्टेशन च्या पिलर्स वर केलं आहे मोसॅक. करोल बाग मेट्रो स्टेशन जवळ ४-५ पिलर्स आहेत यांच्या शाळेच्या संस्थेने केलेल्या मोसॅकचे.
चंदिगढ चे रॉक गार्डन पण मोसॅक कलाकृतींनी भरलेलं आहे.
हे ऊन, पावसात वर्षानू वर्षे टिकतं ही या कलाप्रकाराची खासियत आहे.

काय मस्त झालीये नेमप्लेट. तुझा भाऊ वहिनी लकी आहेत अशी छान नेमप्लेट मिळाली त्यांना.
मला मधमाशीचा बॉक्स सगळ्यात आवडला. खूपच छान झालंय सगळं.
ऋतूराज ने पोस्ट केलेले फोटो पण छान. आमच्या NRC कॉलनीत हॉस्पिटलमध्ये होतं मोसॅक. आणि काही बिल्डींगचं फ्लोरिंग पण होतं.

धन्यवाद धनुडी.
मधमाशी चा बॉक्स मला पण खूप आवडतो. त्यापेक्षा पण छान mosaic झालेत अजून, पण ते finish नाही केले आणि इथे अपलोड होताना झोपले जात होते. त्यात माझ्या आवडीचे आहेत काही.
जरा सवडीने टाकीन इथे. मार्च पासून हे काम बंद पडले आहे. आता परत करते सुरू. इथे टाकल्यावर परत नवे काहीतरी बनवायची ईच्छा झाली.

नवीन प्रतिसाद लिहा