मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 October, 2024 - 12:25

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -

1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.

सर्वांचेच अभिनंदन Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> भाषा ही प्रवाहीच रहाते. त्याचं डबकं बनवलंत तरी ती त्यात सीमित रहात नाही.

अमित, +१११

MyLetterInNewspaper_1996.jpg

हे माझे १९९६ सालचे विचार होते. त्यातल्या शीर्षकाशी मी अजूनही तंतोतंत सहमत आहे. परंतु पत्रातील मसुद्यात व्यक्त केलेली "परभाषेतून आलेले आणि मराठी माणसांच्या तोंडात कायमचे बसलेले शब्द" हि चिंता व्यर्थ आहे हे आता कळून चुकले आहे. भाषा हि प्रवाही असते व जिवंत राहायची असेल तर ती प्रवाहीच रहायला हवी. नवनवीन शब्द येणारच. जगातील मोठमोठ्या संस्कृती आणि त्यांच्या भाषा बदलत गेल्या. त्यातल्या काही नामशेष झाल्या. रोमन साम्राज्य दीर्घकाळ होते. त्यामुळे न्यूटनच्या काळात जगातील सारे ज्ञान लॅटिन भाषेत सामावलेय अशी समजूत होती. त्यामुळे न्यूटनने आपला संशोधन ग्रंथ इंग्लिशमध्ये न लिहिता लॅटिन मध्ये लिहिला. आज लॅटिन लयास गेली. इंग्लिश जगभरात वापरली जात आहे. हे नैसर्गिकच असावे. जे नदी, संस्कृती, भाषा या सर्वाना लागू पडते. भाषा "अभिजात" म्हणून जाहीर करा किंवा करू नका.

>> अभिजात भाषा ही concept फक्त भारतात दिसते आहे. हा स्पेशल दर्जा देण्याची योग्यता मंत्रिमंडळात किंवा प्रधनसेवकात कुठून येते?

+१ अगदी सहमत

लोकसत्तेचा अग्रलेख - अभिजाततेचे भोक

त्यात मांडलेल्या सगळ्याच मुद्द्यांशी सहमत आहे, असं नाही. मुळात मराठी भाषा अभिजात आहे असं सरकारने (शासनाने Wink ) ठरवलं, याचा मराठीच्या आजच्या स्थितीशी काही संबंध नाही.
पाली आणि प्राकृत भाषा सध्या वापरात आहेत की फक्त अध्ययन- अध्यापनापुरत्या उरल्यात?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचा आनंदच झाला...पण सध्या शाळांमध्ये ज्या पद्धतीने मराठी पुस्तकाचा अभ्यासक्रम निवडला जातो...तो पाहून पुढच्या पिढीला मराठीची किती ओढ निर्माण होईल अशी शंकाच आहे....मध्यंतरी एका दुसरीच्या कवितेपासून खूप वाद निर्माण झाला होता...आणि ते अतिशय रास्त होतं.... मराठीचं भविष्य धोक्यात आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही..

<पूर्वी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या क्लासिकल अर्थात अभिजात भाषा होत्या> म्हणजे या आता अभिजात भाषा राहिल्या नाहीत का?
>>>>>
धन्यवाद भरत, वाक्यरचना बदलली आहे.

"..मराठी भाषिक सर्वसाधारण नागरिकांना 'अभिजात' ह्या शब्दाचा, संकल्पनेचा अर्थ, जाण कितपत आहे? अभिजातपणाची लक्षणे, खाणाखुणा, उदाहरणे मराठी सभ्यतेत चर्चिली गेलीत का? जात आहेत का? इतर कुठले, काय असे मराठी सभ्यतेत आहे की ज्याला मराठी सभ्यतेत, समाजात 'अभिजात' असा दर्जा प्राप्त झाला आहे?.."

"..नागरिकांचे सरासरी आर्थिक उत्पन्न ठरवायची, सांगायची पद्धत असते. नागरिकांचे सरासरी आयुर्मान ठरवण्याची पद्धत असते. मराठी भाषिकाची सरासरी भाषा किती आहे हेही ठरवले पाहिजे. किती सरासरी भाषा नागरिकाला आली, की ती भाषा अभिजात होते, हेही ठरवायला हवे आणि वाचनसंस्कृतीचे मोजमापही करता यायला हवे. किती कशी वाचनसंस्कृती असली म्हणजे ती भाषा अभिजात होते , हेही ठरवायला हवे. त्या भाषिकाची सरासरी विचारक्षमता किती आहे आणि किती सरासरी विचारक्षमता असली, की ती भाषा अभिजात होते, हेही ठरवायला हवे.."

"..भाषा संपन्न, प्रगल्भ आणि सभ्यता जोपासणारी हवी. संपन्न म्हणजे : सूक्ष्म छटा व्यक्त होणार्‍या शब्दांचा मोठा साठा. प्रगल्भ म्हणजे : व्यामिश्र प्रकिरिया भाषेत मांडणे, मांडता येणे. समाजाची सभ्यता म्हणजे : जगण्याचे व्यवहार सुकर होण्यासाठी लागणारी भाषा.."

"..प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी, एकदा तरी जीवनाचा अर्थ शोधावासा वाटतो. कधी अंधूकपणे जाणवतोही. व्यक्तीने ध्यान देऊन जीवनाचा अर्थ भाषेत व्यक्त करणे- यामुळे भाषा अभिजात होते. केवळ मराठी भाषाच वापरून मराठी ही 'ज्ञानभाषा' होईलही, परंतु 'अभिजात' होण्यासाठी जगण्यातली अजून बरीच क्षेत्रे हुडकावी लागतील.."

----
श्याम मनोहर, २०१५ साली केलेल्या भाषणातले अंश.

"..आपले संवाद आठवा.. कशी असते आपली भाषा? वाक्यरचना कशी असते? नीट असते का? शब्दांची निवड नीट असते का? जे सांगायचेय तेच भाषेत मांडले जाते का? तपशील अचूक असतो का? भाषा वापरायचा कंटाळा, आळस असतो का? मुद्दा सोडून बोलले जाते का? बडबड जास्त होते का? प्रश्नाला प्र्श्न विचारला जातो, 'मला असे म्हणायचे नव्हते', 'भाषा नीट वापरा की'- असे प्रकार रोज होतात- ते का?.."

"..रिक्षावाला, कंडक्टर, दुकानदार, कचेर्‍या ह्यांच्यात होणारे संवाद कटकटींचे असतातच. घरातलेही संवाद सहज, लयदार नसतात. संवाद, गप्पागोष्टींत सहज भांडणे होतात- ती का? या प्रश्नाच्या उत्तराकडे येण्याआधी मी एक प्रश्न तयार करतो- मराठी माणसाला मराठी भाषा किती येते?.."

"..आपण इंग्रजी भाषा शिकतो. आपण म्हणतो : अमक्याला इंग्रजी जेमतेम येते, कामचलाऊ येते. किंवा, तमक्याचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. एखाद्या मराठी माणसाला मराठी भाषा जेमतेम येते, कामचलाऊ येते, असे म्हटले तर?.."

"..एखाद्या प्रदेशातल्या लोकांचे सरासरी उत्पन्न, सरासरी आयुर्मान, सरासरी उंची - यासारखाच आता मी 'सरासरी भाषा' असा शब्दप्रयोग करतो. ही सरासरी भाषा कशी मोजायची? दोन गोष्टींवरून मोजता येईल : १) शब्दसाठा २) वाक्यरचनांचे प्रकार. मराठी माणसाचा सरासरी शब्दसाठा किती आहे यावरून मराठी माणसाला कमी मराठी भाषा येते, की मध्यम, की खूप- हे ठरवता येईल. सरवसाधारण मराठी भाषिक मराठी भाषेच्या बाबतीत गरीब आहे, की मध्यम की संपन्न- हा प्रश्न मी आपल्यापुढे विचारार्थ ठेवतो.."

"..बोलणे, वर्णन करणे, निवेदन करणे हा भाषेच्या वापराचा एक प्रकार असतो. वर्णनात तपशील येतात त्यासाठी योग्य शब्द आणि वाक्यरचना वापराव्या लागतात. कारण त्या निवेदकाच्या वा पात्राच्या, संवादकाच्या भावना व्यक्त करतात. भाषेचा आनंद यातून निर्माण होतो. अगदी दु:खाचे वर्णन केल्यानेही भाषेचा आनंद निर्माण होतो..."

"..कोणत्याही भाषेवरचे 'प्रेम' हे इतके महत्वाचे नाही. आपल्या भाषेवर 'प्रभुत्व' येणे हे महत्वाचे आहे.."

---
श्याम मनोहर, २०११ साली केलेल्या आणखी एका भाषणातले अंश

---
वरील दोन्ही पोस्ट्सचा संदर्भ-
"श्याम मनोहर : मौखिक आणि लिखित"
संपादन- चंद्रकांत पाटील
पॉप्युलर प्रकाशन

>>> कोणत्याही भाषेवरचे 'प्रेम' हे इतके महत्वाचे नाही. भाषेवर प्रभुत्व येणे हे महत्वाचे आहे
टाळ्या!!

हेच देव, देश, धर्म, संस्कृती इत्यादींनाही लागू आहे. माहिती, किंवा निदान माहिती करून घेण्याची इच्छा, किंवा मुळात माहिती नसल्याची जाणीव नसेल तर नुसतं प्रेम किंवा अभिमान काय कामाचा!

>>>>>>"कोणत्याही भाषेवरचे 'प्रेम' हे इतके महत्वाचे नाही. आपल्या भाषेवर 'प्रभुत्व' येणे हे महत्वाचे आहे.."
माझ्या मते पहीली भावना उमाळा आहे म्हणजे कल पूर्णतः भावनात्मक आहे. तर दुसरं टेक्निक व तांत्रिक बाबी माहीती असणे आहे. सगळ्यांना तांत्रिक बाबी जमतीलच असे नाही. पण मातृभाषेबद्दल, आतून माया असणे नैसर्गिक आहे.
मला प्रेम हे तांत्रिक बाबींपेक्षा महत्वाचे वाटते.

सामो यांच्याशी सहमत. प्रेम ही सहजभावना आहे. प्रभुत्व यायला प्रयास करावे लागतात आणि ते करण्याची ऊर्मी सगळ्यांना येईल असे नाही.

प्रेम' हे इतके महत्वाचे नाही.
'प्रभुत्व' येणे हे महत्वाचे
>>>

खालीलपैकी एकच जोडीदार निवडायचा असेल तर कसा निवडाल
१) ज्याला आपल्याबद्दल फिलींग्ज आहेत पण रोमान्स नीट जमत नाही.
२) रोमान्समध्ये एक्स्पर्ट आहे पण आपल्या बद्दल फिलिंग नाहीत.
कुठलाही निवडला तरी त्यात काही चूक किंवा बरोबर नाही. कोणाला काय महत्त्वाचे वाटेल हे वैयक्तिक मत/आवड म्हणू शकतो.

“ हेच देव, देश, धर्म, संस्कृती इत्यादींनाही लागू आहे. माहिती, किंवा निदान माहिती करून घेण्याची इच्छा, किंवा मुळात माहिती नसल्याची जाणीव नसेल तर नुसतं प्रेम किंवा अभिमान काय कामाचा!” - बिंगो! पण माहिती मिळाली तर अभिमान (इथे गर्व/माज ह्या अर्थी) मिरवणं अवघड जातं. Happy

>>>>>पण माहिती मिळाली तर अभिमान (इथे गर्व/माज ह्या अर्थी) मिरवणं अवघड जातं. Happy
Happy ते युनिव्हर्सल ट्रुथ आहे. समांतर - Everybody's Normal Till You Get to Know Them Wink

प्रभुत्व "अ" भाषेवर आणि प्रेम "ब" भाषेवर.. असे होऊ शकतेच.

उदाहरण द्यायचे झाल्यास, मी कोकणातला आहे. तिथे फार जाणे होत नाही म्हणून मला कोकणी मालवणी अशी कुठलीही भाषा फारशी येत नाही. अर्थात समोरच्याने बोललेली समजते. ऐकायला आवडते. कोकणाशी नाळ जोडली गेली असल्याने म्हणा एक आपुलकी अन जिव्हाळा आपसूक वाटतो.

मी ना देव मानतो, ना कुठला धर्म मानतो. त्यामुळे एखाद्या अमुकतमुक जाती धर्म प्रांत प्रदेशात जन्म घेतल्याने जी आपल्याला केवळ जन्माने चिकटली आहे अशा कुठल्याही गोष्टीचा अभिमान वगैरे वाटत नाही. पण येस, आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो.

पण तो तसा वाटला आणि ती बोली ऐकायला गोड वाटली तरी आपण सुद्धा शिकावी अशी उर्मी कधी दाटून आली नाही.

फेफ +१११

प्रभुत्व "अ" भाषेवर आणि प्रेम "ब" भाषेवर.. असे होऊ शकतेच. >> खरं आहे. शिवाय हौ मच प्रभुत्व इज प्रभुत्व इनफ ही सब्जेक्टिव गोष्ट आहे.

>>>>>>>>शिवाय हौ मच प्रभुत्व इज प्रभुत्व इनफ ही सब्जेक्टिव गोष्ट आहे.
होय मलाही तसेच वाटलेले. अगदी डिट्टो.

स्वाती आणि फेफ +१.
मिरवण्याच्या प्रेमाचा उपयोग फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायला किंवा फोमो घालवायला.

आज मराठीवर किती प्रभुत्त्व आहे, आज ती किती समजते, किती शब्द साठा आज भाषेत आहे इ. याचा आणि अभिजात भाषा व्याख्येचा काही संबंध आहे का? नसावा.
अभिजात भाषा यात पाठ थोपटून वगैरे आपल्या मम लोकांना वाटते, पण त्यात काहीतरी करून दाखवले आणि फोमो हेच जास्त आहे. Fomo पैशाचा. त्याचा आणि पैशाचा संबंध आहे. ती जाहीर झाली की अनुदाने मिळतात. जसं दुष्काळ पडून उपयोग नसतो तो जोवर जाहीर होत नाही, आणीबाणी जाहीर करत नाहीत तोवर फंड मग फीमा असेल का आणि कुठला फंड असेल तो मिळू शकत नाही. तेच अभिजात वगैरे बद्दल आहे असं मला वाटतं. भाषा अभिजात झाली की ती जतन करायला नको? मग ती शिकवायला नको? मग फंडिंग मिळते.

सहमत अमितव. तसे असते तर संस्कृतला सुद्धा अभिजात भाषा म्हणता येणार नाही.
भाषा अभिजात आहे की नाही आणि सध्या कुठल्या स्थितीत आहे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते.

<< मग ती शिकवायला नको? मग फंडिंग मिळते. >>

---- मराठीला अभिजात दर्जा जाहिर केल्यावर फंडिंग मिळेल अशी आपली भाबडी आशा आहे. भाषेला अभिजात दर्जा आणि त्यामुळे मिळणारे फंडिंग यांचे आकडे बघितल्यावर संस्कृत भाषेला झुकते माप मिळते.

इतर सर्व भाषांना एकत्रित मदत मिळाली नाही त्यापेक्षा जास्त फंडिंग संस्कृत भाषेला मिळाले आहे. २०१७ - २०२२ या काळांत दरवर्षी साधारणत: दोनशे कोटी प्रत्येक वर्षाला, म्हणजे १०७४ कोटी रुपये.
https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2023/Apr/30/promotion...

कुठल्या classical / अभिजांत भाषेला किती आर्थिक मदत मिळाली याबाबतचे राज्यसभेतल्या उत्तरांत मंत्र्यांनी दिलेले आकडे.
२०१९-२० ते २०२३-२४ या काळांत तमिळ भाषेला दरवर्षी साधारणत: ७ ते १४ कोटी रुपये मिळाले. तुलनेने , इतर भाषांना फार कमी आर्थिक मदत मिळाली आहे. संस्कृत पण अभिजांत भाषा आहे पण येथे आकडे दिलेले नाहीत.
https://sansad.in/getFile/annex/260/AU1722.pdf?source=pqars

मराठी आणि बाकीच्या चार भाषा २०२४ मध्ये अभिजात ठरल्या ना? त्याचे काही अनुमान काढण्या योग्य आकडे यायला काही वर्षे जावी लागतील ना?

शिवाय हौ मच प्रभुत्व इज प्रभुत्व इनफ ही सब्जेक्टिव गोष्ट आहे.
>>>>

हो, आमच्या शाळेत दहावीत पूर्ण संस्कृत घेऊन मेरीट मध्ये आलेल्या वर्गात एकालाही आज संस्कृत मध्ये बोलता येत नाही.
किंबहुना आजच्या घडीला किती लोकं संस्कृत मध्ये बोलतात हा संशोधनाचा विषय ठरेल.
मग तरीही का पैसे खर्च केले जातात संस्कृतवर... का अनुदान मिळते?

तेलगू , कनडा यांना अभिजांत दर्जा २००८ मधे मिळाला, मल्याळमला २०१३ मधे त्यांना कुठे भरघोस म्हणावे असे फंडिंग मिळाले आहे ? सर्वात आधी ( २००४ ) जाहिर झालेल्या तमिळ भाषेला पण भरघोस फंडिंग नाही मिळाले.

अभिजांत दर्जा मिळाला म्हणजे सरकारी फंडिंग मिळेलच असे मला वाटत नाही.

भाषेबाबत लवचिक असायला हवे याबाबत सहमत. काळानुरुप भाषेत बदल झाले नाही तर ( अभिजात दर्जा असला तरी ) भाषा टिकणार नाही.

>>>>>>मग तरीही का पैसे खर्च केले जातात संस्कृतवर... का अनुदान मिळते?
आपली (आपण शिकलेली व मातॄभाषेस पूरक, मावस भाषा) एखादी भाषा मरते हे भयंकरच वाटते. कारण त्या भाषेतील, अलंकार, काव्य-विनोद आपल्या पुढच्या पीढीला वारसा म्हणुन जाणार नाहीत. प्रत्येक पिढी तिच्या परीने प्रयत्न करत समृद्ध होतच असते वगैरे कितीही खरे असले तरी त्यांना आपल्यासारखे समृद्ध होता येणार नाही. असे काहीतरी वाटते.

एक सहज सुचलं - माबोवर एखादं संस्कृत दालन काढता येइल का जिथे संस्कृतशी संबंधित धागे, काव्य- शास्त्र-विनोद तसेच 'लर्निंग मटीरीअल' असेल.

Pages