केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -
1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -
1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.
सर्वांचेच अभिनंदन
मराठी भाषेला मोदीजींनी काय
मराठी भाषेला मोदीजींनी काय तरी भारी पदवी दिलीय.
आता किनई खळ्ळंखट्याक, दगडफेक अस्सं काही काही मुळीच म्हणायचं नाही.
पाषाणक्षेपणम अस्सं म्हणायचं गडे.
नाहीतर कट्टी.
अनिंद्य यांच्या प्रतिसादातील
अनिंद्य यांच्या प्रतिसादातील शेवटची वाक्ये अगदीच पटण्याजोगी! मात्र, ही अशी अवस्था असतानाही 'अभिजात दर्जा मिळण्याचे जे काही निकष आहेत' त्यानुसार हा अभिजात दर्जा मिळाला आहे असे माझे आकलन आहे. मग आता 'तो मिळून काय होणार आहे' हा सूर हळूहळू उमटू लागला आहे त्याचे कारण काय असेल ते कळत नाही. मराठी भाषेसाठी काहीतरी थोडे वेगळे व लाभदायक घडेल इतपत गृहीत धरता येईल ना?
जो पर्यंत मराठी माणूस गरीब
जो पर्यंत मराठी माणूस गरीब आहे तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही!
>>>>
हे वाक्य विचारात पाडण्यासारखे आहे. म्हणजे मराठी भाषेत संवाद साधायला उच्चशिक्षित किंवा ऊच्च आर्थिक स्तरातील लोकांना एक प्रकारचा संकोच वा कमीपणा वाटतो असा त्याचा अर्थ झाला का? वरच्या स्तरात ती भाषा डाऊन मार्केट समजली जाते असे म्हणायचे आहे का?
नाही नाही. गरिबाला इंग्लिश
नाही नाही. गरिबाला इंग्लिश मिडिअम/ कॉवेंटची फी कशी परवडणार?
हेमावैम.
सर तुम्ही " हिंदी मिडीअम"
सर तुम्ही " हिंदी मिडीअम" नावाचा पिक्चर बघितला आहे का? नसेल तर अवश्य पहा.
हिंदी मिडीअम बघितला आहे. बरा
हिंदी मिडीअम बघितला आहे. बरा वाटला होता. पण शाळेत ऍडमिशन मिळवायला श्रीमंत गरीबांचे नाटक करतात हे कायच्या काय होते. इरफान खान ऐवजी कोणी दुसरा खान असता तर लोकांनी फाडून खाल्ले असते या लॉजिकला..
असो, इथे विषयांतर नको.
नेमका मुद्दा काय आहे त्या पिकचरचा उल्लेख करण्यात?
गरीबांना इंग्लिश शाळा नाही तर मराठी शाळा परवडतात म्हणून त्या शाळा टिकून आहेत आणि मराठी भाषा बोलली जाते असा मुद्दा आहे का?
हो. सहमत आहे बरेपैकी...
अभिनंदन
अभिनंदन
अभिजात दर्जा फक्त कागदावर राहू नये म्हणजे झालं. फायदे प्रत्यक्षात येवोत.
अभिनंदन मराठी आणि मराठी जनहो.
अभिनंदन मराठी आणि मराठी जनहो.
चित्तरंजन भटांनी हा लेख शेअर केला आहे त्यांच्या फेसबुकवर. अनेकांनी वाचला असेल. इथं विषय निघाला आहे तर डकवून ठेवतो दस्तावेज म्हणून. लेखातल्या सगळ्या मतांशी (मी पोस्ट केलीय म्हणून) सहमत असेनच असं नाही. भटही नसतील कदाचित.
https://www.bbc.com/marathi/india-43212740?fbclid=IwY2xjawFtArZleHRuA2Fl...
चार दिवसांनी आणखी काहीतरी
चार दिवसांनी आणखी काहीतरी वेगळेच घडेल आणि हा विषय विस्मरणात जाईल.
यानिमित्ताने आणखी एक गोष्ट
यानिमित्ताने आणखी एक गोष्ट इथं नोंदवून ठेवावीशी वाटते, ती ही, की आपल्याला आपलीच भाषा, म्हणजे मातृभाषा, म्हणजे मराठी- नीट येत नाही. मराठीच्या नावाने खळखट्याक करणार्यांना तर जेमतेम 'ढ' अक्षर येत असतं. आपलीच भाषा आपल्याला नीट व्यवस्थित येत नसेल, तर दुसर्या भाषा आपण शिकणार कधी नीट?
म्हणजे असं, की आप्ल्याच भाषेतले जरा कमी वापरले जाणारे शब्द आले, की आपण गोंधळात पडतो. वाचलेल्यातला एखादा शब्द अनवधानाने (की अनावधानाने? बघा!) घरात गप्पा मारता मारता तोंडातून निघाला की आपले प्रियजन विचित्र नजरेने बघू लागतात. मित्र एकमेकांकडे 'बघ, हे असं आहे!' नजरेने बघू लागतात. त्यामुळे असे शब्द बोलताना लिहिताना सुचले की मी आताशा ते 'चायला' 'साला' 'यू नो' 'आय मीन' वगैरेने रिप्लेस करतो. आपली सुटका. आणि समोरच्याला अर्थ लागतोही!
शब्दांचा सुंदर खेळ असलेल्या मराठी भाषिक रचना कुणाला अपीलच होत नाहीत, समजत नाहीत, म्हणून प्रसवत नाहीत आणि पसरवल्याही जात नाहीत. कविता हसण्याचा विषय झाला आहे, आणि कथा दिवाळी अंकांचा. बाकी रसग्रहण, क्रिटिक आणि समीक्षा-टीका लेवलचं काही बोलणंच नको.
परवा श्याम मनोहर म्हणाले- 'पावसाच्या रेघांत, खेळ खेळू दोघांत'- हे छानेय. 'मी झोपताना आणि उठताना- दोन्ही वेळेला निराशच असतो' असं म्हणणारा, मराठीतला function at() { [native code] }इशय महत्वाचा आणि द्र्ष्टा लेखक हे म्हणतोय. लहाणपणापासून ऐकत असूनही 'पावसाच्या रेघांत' मधलं सौंदर्य कुणाला जाणवतं? कोण समजावतं? किती शिक्षक यावर मेहनत घेतात? किती मुलांपर्यंत पोचतं?
'लटपट लटपट तुझं चालणं'- हे आणखी. 'लटपटणे' या (खरंतर देहबोलीच्या दृष्टीने 'निगेटिव' किंवा अडखळलेपण, किंवा साधारणतः व्यंग दाखवणार्या) शब्दातल्या काही अक्षरांचा उपयोग करून त्याचा अर्थ अपसाईड डाऊन करून टाकण्याची किमया. याबद्दल किती लोकांनी विचार केला असेल? कितींना यात जादू, गंमत किंवा माधूर्य वाटलं असेल?
खरंतर अशा जादू ठिकठिकाणी आहेत. शेकडो हजारो नव्हे तर लक्ष ठिकाणी आहेत. आपले डोळे उघडे नसतात. शब्द आपलेच, पण अनोळखी असतात, मग त्यांनी उलगडून दाखवलेली जादू कशी कळणार?
कुठल्याही भाषेतले असतात, तसे मराठीतले शब्द हीही संपत्तीच आहे, जबरदस्त साधनसंपत्ती आहे, आणि तिथं प्रवेश आपल्या सगळ्यांना आहे. आपण उपयोग केला तर त्या शब्दांचा सन्मान आहे. नाही केला तर अभिजात वगैरे फुकटच की नाही?
आपण आपणा सार्यांचे अभिनंदन करूया. पण मराठी भाषा आपल्याला नीट येत नाही- हे सत्य आहे.
माझ्यामते आत्ताच्या युगात
माझ्यामते आत्ताच्या युगात सर्वाधिक आवश्यकता आहे ती आपला दृष्टिकोन उचित आहे की नाही हे परखडपणे तपासण्याची!
विशेषतः सोशल मीडिया सर्वत्र व्यापलेली असताना, जरा बाजूला होऊन, क्षणभर थांबून ही तपासणी करणे आवश्यक आहे.
बहुतांशी लोक आपापली मते 'अशी' बनवतात:
■ जे सर्वमान्य तज्ञ आहेत त्यांची मते हीच आपली मते
■ जे स्वतःला तज्ञ समजतात व त्यांना इतरजण तज्ञ समजण्यास तयार होतात त्यांची मते हीच आपली मते
■ जी मते व्यक्त केल्याने कुठेही काहीही फरक पडत नाही अशी मते ही आपली मते
प्रत्यक्षात, एखादा निर्णय, कायदा, घोषणा व अश्यापैकी काहीही, यातील कोणत्या गोष्टीने आपल्याला एक 'सामान्य माणूस' म्हणून
नेमका काय फरक पडत आहे / काय फायदा, तोटा होत आहे / आपण ज्या समाजघटकाचे प्रतिनिधित्व करतो त्याला यातून काही लाभ मिळणार आहे की नाही, या गोष्टींचा विचार करून मतप्रदर्शन करणे हे आता आवश्यक होऊ लागले आहे.
समाजमाध्यमांवर मतप्रदर्शन करताना आपण हिरीरीने कोणतीतरी बाजू घेतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात त्या गोष्टीने व त्या गोष्टीबाबत विशिष्ट बाजू घेण्याने फरक पडणार असो, नसो! समाजमाध्यमांवर लिहिणाऱ्यांनी खूप पटकन याचे भान बाळगायला लागणे जरुरीचे झाले आहे.
अभिजात दर्जा मिळाला? अभिनंदन! परिस्थिती तीच राहणार असेल तर हा निर्णय नगण्य ठरेल.
मराठी भाषेला अभिजात दर्जा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला.
१४००० मराठी माध्यमाच्या शाळा बंद.
आमच्या जाहिरात जगात गेल्या १५
आमच्या जाहिरात जगात गेल्या १५-२० वर्षांत भयंकर क्रांती झाली. 'टेक्स्ट' हे शस्त्र असण्याची अनेक वर्षं होती. कॉपीरायटिंग्ला चांगले दिवस तेव्हा होते. (डीसकेंच्या भावनांना हात घालणार्या आणि कवेत घेणार्या लघुनिबंधरुपी जाहिराती आठवतात का?) स्लोगन्स, कॅचलाईन्स आणि ओपनिंग लाईन्सना महत्त्व होतं. त्यानंतर टेक्स्टची जागा ग्राफिक ने घेतली. चित्र असेल तर जास्त लोक जास्त बघू लागले. टेक्स्ट कोण वाचणार?
आता ग्राफिकची जागा रील्स (इंस्टाग्राम) आणि शॉर्ट व्हिडिओज(यूट्यूब)ने घेतली.
म्हणजे सगळं संपलं काय? अजूनही आपापसांत शब्दांनीच बोलावं लागतं. रोजचं जगताना आणि व्यवहार करताना शब्द लागतात. प्रेम करताना ओठांसोबत शब्दही लागतातच. द्वेष करताना तर शब्दांची हजारोंची लवंगी माळ उडवावी लागते. भाषणं अजूनही होतात. जीआर निघतात, फतवे आणि आदेश निघतात, पत्रं लिहावी लागतात. या सार्यांत शब्द लागतात. खरं तर हेच शब्द आपल्याला किती महत्वाचे असायला हवेत की नाही?
पण गल्लीछाप स्वघोषित पुढारी पोरांपासून ते नगरसेवक-आमदार-खासदार-मंत्री-प्रधानमंत्री यांची भाषा आपल्याला 'आपली' भाषा वाटते. त्यांच्यातलं, ते बोलत असलेल्यातलं कुठेही काहीही खुपत नाही. यांचे फोटो जिथं छापून येतात त्या वर्तमानपत्रांतली भाषा आपल्याला 'आपली' वाटते, 'आदर्श' वाटते. अशी भाषा वापरणारे न्यूज चॅनेल्स आणि सोशल मेडिया आपल्याला 'आपले' वाटतात.
या सार्यांच्या 'शुद्धलेखनाच्या' चुकांवरूनही अनेकदा अनेक मीम्स होतात, आपण हसतो. पण मुद्दा तो नाहीच. शब्द आपले आहेत, आपल्या भाषेतले आहेत ना? आणि फुकट आहेत की नाही?
जिथं आत्माच नाही, तिथं परमात्मा कसा सापडेल असं काहीतरी ओशो म्हणालेले. भाषेशी काही देणंघेणंच नाही तुम्हाला. आणि आता उत्सव करताय?
मी लिहून देतो तुम्हाला- तुम्हाला तुमचीच भाषा नीट येत नाही. तुम्हाला तुमची भाषाच नीट येत नाही. तुम्हाला तुमची भाषा नीट येतच नाही.
आता शब्दांची गरज नाही. काही
आता शब्दांची गरज नाही. काही दिवसांनी निव्वळ इ-मोजी वापरून कादंबरी लिहिली जाईल. आणि साईन लँग्वेज वापरून प्रेम व्यक्त करता येईल. आपण "मराठी अभिजात आहे कि नाही " यावर चर्चा करत राहू आणि "वो लोग" तिकडे दारुच्या प्यालावर "दे टाळी" म्हणत "काय चाल चली मैने " असे एकमेकांना सांगतील.
ATM! आमेन.
>>> काही दिवसांनी निव्वळ इ
>>> काही दिवसांनी निव्वळ इ-मोजी वापरून कादंबरी लिहिली जाईल
मग चिनी आणि इजिप्शियन म्हणतील 'आमच्या संस्कृतीत सग्गळं सग्गळं आधीच होतं!'
आपल्यासाठी भाषा आहे, भाषेसाठी
आपल्यासाठी भाषा आहे, भाषेसाठी आपण नाही. बहुसंख्य लोक जे काही बोलतील/ जशी काही वापरतील तीच भाषा, तेच त्या शब्दांचे अर्थ, तेच विभ्रम, तेच शुद्धलेखन. ते स्विकारा आणि पुढे चला. स्विकारा म्हणजे तुम्ही तसंच बोला का? अजिबात नाही ते कदाचित नाही. पण हा असा पाठभेद असू शकतो इतके मोकळे तरी निदान व्हा. उगा 'पेटपीव्ह' करुन विव्हळत बसू नका. किंवा बसा. हु केअर्स!
भाषा ही प्रवाहीच रहाते. त्याचं डबकं बनवलंत तरी ती त्यात सीमित रहात नाही. आणि जोर लावुन ठेवलाच तर थेट मरते. आणि मेली तरी त्याची गरज आता उरलेली नाही. बस!
'येस अँड' मनोवृत्ती असु द्या. 'नो बट' किंवा अगदी 'येस बट' करुन कुणाचं भलं झालेलं नाही.
बाकी अभिजात भाषा जाहीर करुन काय होणार त्याचं वरचं नकारात्मक चित्रच वास्तवात येईल असं मलाही वाटतं. पण येईल ही कुठे एखादा कोंब नव्या जोमाने.
अमितव
अमितव
आपल्यासाठी भाषा आहे, भाषेसाठी आपण नाही... इत्यदी >>>
अगदी अगदी पटलय.
ही विचारसरणी अंगिकारल्यानेच इंग्रजी भाषेची प्रगती झाली आहे. आपल्या मराठीतही फारशी तुर्की भाषेतील शब्दांची रेल चेल आहे. ह्याची आपल्याला जाणीवही नसते.
काही दिवसांनी निव्वळ इ-मोजी
काही दिवसांनी निव्वळ इ-मोजी वापरून कादंबरी लिहिली जाईल

मग चिनी आणि इजिप्शियन म्हणतील 'आमच्या संस्कृतीत सग्गळं सग्गळं आधीच होतं!' >>
मराठी भाषेला अभिजात भाषेचा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणून स्वत:ची पाठ स्वतःच थोपटून घेणाऱ्यांना बघून ही कथा आठवली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही हे लोकांना अजूनपर्यंत माहीत न्हवतं. काल दर्जा काय मिळाला सगळे व्हॉट्सअप स्टेटस ठेवायला लागले. शाळा सुटल्यानंतर मराठीत दोन चार ओळी लिहल्या असतील तर शप्पथ. लोकाना दर्जा मिळाल्यावर काय होईल हे पण माहीत नाय. विनाकारण कायतरी वेगळं दाखवायचं म्हणून स्टेटस टाकायचे. खोट्याची दुनिया सगळी.
“ मग चिनी आणि इजिप्शियन
“ मग चिनी आणि इजिप्शियन म्हणतील 'आमच्या संस्कृतीत सग्गळं सग्गळं आधीच होतं!” -
सायेबानं सांगितलंय अभिमत
सायेबानं सांगितलंय अभिमत विद्यापीठ झालं मराठीत. आता चान्सलर म्हनुन धाकट्या अभिजीतराजेंना नेमणार म्हनले.
अभिजात दर्जाचा आनंद साजरा
अभिजात दर्जाचा आनंद साजरा करूयात.
एक अभिजात खाद्यपदार्थ खाऊयात.
चिनी आणि इजिप्शियन म्हणतील
चिनी आणि इजिप्शियन म्हणतील 'आमच्या संस्कृतीत सग्गळं सग्गळं आधीच होतं!'
<पूर्वी तमिळ, तेलगू, कन्नड,
<पूर्वी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या क्लासिकल अर्थात अभिजात भाषा होत्या> म्हणजे या आता अभिजात भाषा राहिल्या नाहीत का?
मराठी इ. भाषांना अभिजात भाषा
मराठी इ. भाषांना अभिजात भाषा घोषित करताना सरकारने अभिजात भाषेसाठीचा - The literary tradition be original and not borrowed from another speech community” हा निकष वगळला.
हा निकष वगळला >> +१. हा निकष
हा निकष वगळला >> +१. हा निकष कदाचित यापूर्वी अडथळा ठरत असावा. वगळावा हे कसं काय पटवून देण्यात आलं ते माहीत नाही.
येत्या निवडणुकीने पटवून दिलं
येत्या निवडणुकीने पटवून दिलं असावं
टायमिंगचे प्रतिसाद सुरू झाले
टायमिंगचे प्रतिसाद सुरू झाले
अभिजात भाषा ही concept फक्त
अभिजात भाषा ही concept फक्त भारतात दिसते आहे. हा स्पेशल दर्जा देण्याची योग्यता मंत्रिमंडळात किंवा प्रधनसेवकात कुठून येते? राजकारण तमिळ अभिजात घोषित करण्यापासून चालू झाले आणि चालूच आहे. एकंदरीत लोकांमधला उत्साह बघून राजकारण यशस्वी होत आहे असे दिसते.
Pages