मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 October, 2024 - 12:25

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -

1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.

सर्वांचेच अभिनंदन Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> भाषा ही प्रवाहीच रहाते. त्याचं डबकं बनवलंत तरी ती त्यात सीमित रहात नाही.

अमित, +१११

MyLetterInNewspaper_1996.jpg

हे माझे १९९६ सालचे विचार होते. त्यातल्या शीर्षकाशी मी अजूनही तंतोतंत सहमत आहे. परंतु पत्रातील मसुद्यात व्यक्त केलेली "परभाषेतून आलेले आणि मराठी माणसांच्या तोंडात कायमचे बसलेले शब्द" हि चिंता व्यर्थ आहे हे आता कळून चुकले आहे. भाषा हि प्रवाही असते व जिवंत राहायची असेल तर ती प्रवाहीच रहायला हवी. नवनवीन शब्द येणारच. जगातील मोठमोठ्या संस्कृती आणि त्यांच्या भाषा बदलत गेल्या. त्यातल्या काही नामशेष झाल्या. रोमन साम्राज्य दीर्घकाळ होते. त्यामुळे न्यूटनच्या काळात जगातील सारे ज्ञान लॅटिन भाषेत सामावलेय अशी समजूत होती. त्यामुळे न्यूटनने आपला संशोधन ग्रंथ इंग्लिशमध्ये न लिहिता लॅटिन मध्ये लिहिला. आज लॅटिन लयास गेली. इंग्लिश जगभरात वापरली जात आहे. हे नैसर्गिकच असावे. जे नदी, संस्कृती, भाषा या सर्वाना लागू पडते. भाषा "अभिजात" म्हणून जाहीर करा किंवा करू नका.

>> अभिजात भाषा ही concept फक्त भारतात दिसते आहे. हा स्पेशल दर्जा देण्याची योग्यता मंत्रिमंडळात किंवा प्रधनसेवकात कुठून येते?

+१ अगदी सहमत

लोकसत्तेचा अग्रलेख - अभिजाततेचे भोक

त्यात मांडलेल्या सगळ्याच मुद्द्यांशी सहमत आहे, असं नाही. मुळात मराठी भाषा अभिजात आहे असं सरकारने (शासनाने Wink ) ठरवलं, याचा मराठीच्या आजच्या स्थितीशी काही संबंध नाही.
पाली आणि प्राकृत भाषा सध्या वापरात आहेत की फक्त अध्ययन- अध्यापनापुरत्या उरल्यात?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचा आनंदच झाला...पण सध्या शाळांमध्ये ज्या पद्धतीने मराठी पुस्तकाचा अभ्यासक्रम निवडला जातो...तो पाहून पुढच्या पिढीला मराठीची किती ओढ निर्माण होईल अशी शंकाच आहे....मध्यंतरी एका दुसरीच्या कवितेपासून खूप वाद निर्माण झाला होता...आणि ते अतिशय रास्त होतं.... मराठीचं भविष्य धोक्यात आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही..

<पूर्वी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या क्लासिकल अर्थात अभिजात भाषा होत्या> म्हणजे या आता अभिजात भाषा राहिल्या नाहीत का?
>>>>>
धन्यवाद भरत, वाक्यरचना बदलली आहे.

Pages