चित्रकला उपक्रम : माझी आवडती गाडी - मनीम्याऊ - विजयालक्ष्मी

Submitted by मनिम्याऊ on 14 September, 2024 - 05:25

विजयालक्ष्मी: वय ७ वर्षे
आवडती गाडी... ट्रॅक्टर
Screenshot_2024-09-14-15-12-12-881-edit_com.miui_.gallery.jpg
.
IMG-20240914-WA0006.jpg

ट्रॅक्टरवर
IMG-20240914-WA0004.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर Happy
अजिबात गिचमीड केलेलं नाहीये. ( मला माझी लहानपणीची चित्रं आठवलीत हे लिहिताना Lol )

मस्तच.

चित्र आणि फोटो दोन्ही छानच!

चित्राबद्दल थोडेसे:
हे रिअल लाईफ ड्रॉइंग म्हणता येईल. चित्रामधले ट्रॅक्टर खरोखरच विजयालक्ष्मीचे आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या व्यक्ती म्हणजे दोघे बाप-लेक आहेत. शेतात गेल्यावर्षी गहू पेरला होता त्यावेळी हे दोघे पाणी ओलायला सकाळी ट्रॅक्टरवर बसून जायचे तेव्हा असेच दृश्य दिसायचे. मागे दिसणाऱ्या सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत.
याचा फोटो सापडला तर दाखवते येथे.

चित्र खूप खूप खूप आवडलं!
विजयालक्ष्मी, Keep it up!
शेवटचा फोटो किती गोड आहे. विजयालक्ष्मी क्यूट बाहुली सारखी दिसतेय!

चित्र आणि फोटो दोन्ही छान आणि भातशेती पण आवडली चित्रात काढलेली

रिअल लाईफ चित्र आहे हे वाचून तर एक शाब्बासकी जास्तीची

विजयालक्ष्मी आणि तिचे ट्रॅक्टर खूपच छान आहेत. चित्र खूप सुंदर काढले आहेस. अजून फोटो अपलोड केले तर छान वाटेल. खूप खूप अभिनंदन व गोड गोड पापा.

विजयालक्ष्मी चे कौतुक करावे तेवढे कमी . किती छान detailing आहे .
विजयालक्ष्मी चा फोटो पण क्युट. लेकीला पण चित्र दाखवले हे. तिला सुद्धा खूप आवडले.

सगळयांचे मनापासून आभार.
हा आणखी एक फोटो....
Screenshot_2024-09-17-20-21-07-596-edit_com.whatsapp.jpg

शेताच्या शेजारून वाहणारा पावसाळी ओढा आणि त्यात ट्रॅक्टर ला (आणि स्वतः लाही) घातलेली आंघोळ...

निर्मल आनंद....

काय मज्जा आली असेल थंड थंड पाण्यात भिजून ट्रॅक्टरला अंघोळ घालताना,विजयालक्ष्मीला.दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

मस्त काढलय!

तिचे ट्रॅक्टर बरोबरचे photo खूप छान!