अंत: अस्ति प्रारंभ: - २ - {हक्काचं अन्न} - {mi_anu}

Submitted by mi_anu on 14 September, 2024 - 23:12

इथे आल्यापासून मायलेकांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.घरून शिदोरी बांधून घेऊन येता आली नव्हती.
सर्वत्र रंगीत वातावरण.सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्न भाव.पण कोणाच्या घरी आवर्जून जाऊन हात पसरणं फार भीतीदायक. अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये.अगदी ओसरीपर्यंत भुकेने नेलंही होतं.पण आतलं दृश्य पाहून परत फिरावं लागलं होतं.शिवाय बाहेर अखंड कोसळता पाऊस.

रात्र अशीच पोटात उसळलेला आगडोंब विसरत गेली.आजी कायम म्हणायची 'दिवस बसून राहत नाहीत.सत्त्वपरीक्षा असते ही.आपली सहनशीलता वाढवायची.संकटांचाही आपला मुहूर्त असतो येण्याजाण्याचा.'
सकाळ झाली.मनात आशा परत डोकावू लागली.समोरून एका घरातून आवाज आला."आता मनोभावे स्मरण करून ही पत्रावळ तिठ्यावर ठेवून या.मनात कोणत्याही शंका नकोत.एकदा ठेवल्यावर मागे वळून पाहू नका,इकडे तिकडे जाऊ नका,सरळ घरी परत या."

अतिशय खुश होऊन मायलेकानी पानाकडे धाव घेतली.पाऊस अजूनही आभाळाला भगदाड पडल्यासारखा कोसळतच होता.
ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच!

Group content visibility: 
Use group defaults

अभिनंदन
मी या गटात स्वतःलाच मत दिल्याने इथे देऊ शकलो नाही..पण आवडली होती Happy

Pages