Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माहिती तुमचे Roe V Wade, उगा
माहिती तुमचे Roe V Wade, उगा बसा >>> अगदी अगदी
All We Imagine as Light शोधला पाहिजे.
हो. विकी म्हणतंय परवा रिलीज
हो. विकी म्हणतंय परवा रिलीज झाला इंड्यात. बाकी तो इंडियन आहे का अर्धा फ्रेंच आहे? कसं ठरवतात कोण जाणे.
अरे दोन्हीत 'छाया कदम' आहे. आता तिकडे गाडीवर डोसे करण्याच्या स्टिरिओटाईप मधुन सुटका झालेली असू दे!
अस्मिता, पिक्चर ओळख छान आहे.
अस्मिता, पिक्चर ओळख छान आहे. मी बघेन असं वाटत नाही. पण वाचायला छान वाटलं.
Netflix - Penguin Bloom
Netflix - Penguin Bloom
फार सुंदर आणि inspiring movie आहे. सत्य कथेवर आधारित आहे आणि producers त्या सत्यकथेतील खरेखुरे लोक आहेत. Actress ने सुंदर काम केले आहे. आणि यातील मुख्य पात्र magpie पक्षी animated नाहीत. चक्क 7-8 पक्ष्यांना ट्रेन करून त्यांच्याकडून काम करून घेतलं आहे.
Penguin Bloom आवडला होता.
Penguin Bloom आवडला होता. पेंग्विनचे ऊडून जाणे आणि जखमी होऊन परत येणे आणि त्या सगळ्याचा नायिकेच्या जीवनाशी असलेला संबंध - खूप सुंदर दाखवला आहे. फक्त थोडा स्लो असल्याने नेटाने पहावा लागला मला.
मीरा आणि माधव, Penguin Bloom
मीरा आणि माधव, Penguin Bloom नोट केला आहे.
लाले बाबत अस्मिताशी अगदी सहमत
लाले बाबत अस्मिताशी अगदी सहमत!
प्राईमवर - गिफ्टेड बघितला.
प्राईमवर - गिफ्टेड बघितला.
छान आहे. ख्रिस ईवान आणि यंग शेल्डन मधे काम केलेली एक गोड मुलगी (नाव माहित नाही) फार क्यूट मामा भाची दाखवलेत. ती मुलगी गणितात असामान्य बुद्धिमत्तेची असते, गिफ्टेड जस्ट लाईक हर मदर. तिने मरणाआधी या भावाकडे मुलीला सोपवलेलं असतं की तू तिला नॉर्मल माणूस म्हणून जगव. कारण या दोघा भावंडांची आई फार कंट्रोलिंग असते. पण शेवटी ती कोर्टकचेर्या करून आपल्या नातीला स्वतःच्या ताब्यात ठेवू बघत असते जसं तिने तिच्या मुलीला कंट्रोलमधे ठेवलेलं असतं. त्यामुळेच की काय माहित नाही तिची मुलगी आत्महत्या करते पण मरणाआधी तिच्या छोटीला या मामाकडे स्वाधीन करते. याला मनातून माहित असतं की आपण नीट तिचा सांभाळ करू शकू की नाही, तिला उत्तम शाळेत घालू शकू का? पण त्याचं मुख्य ध्येय तिला चांगली माणूस बनवणे हेच असतं. अती हुशारी डोक्यात जाऊ द्यायची नसते. पण त्याच्या आईच्या लिगल हस्तक्षेपामुळे त्या मुलीला शेवटी फोस्टर मधे ठेवायचा निर्णय होतो पण शेवटी लहान मुल आणि भावनांचा खेळ यात कोण जिंकेल हे माहित असतंच. पण तो प्रवास बघण्यासारखा आहे. त्या लहान मुलीने पण इतकं गोंडस काम केलंय की अक्षरशः एक दोन सीनमधे डोळ्यात पाणीच आलं.
मीरा आणि माधव, Penguin Bloom
मीरा आणि माधव, Penguin Bloom नोट केला आहे.>> मीरा आणि माधवाला असं कोणी सांगेल हे स्वप्नातही आलं नसेल. कलियुग!
अमितव
अमितव
स्त्री २ बघितला.
स्त्री २ बघितला.
एवढा नाही आवडला. काही काही जोक्स चांगले आहेत. पण पार्ट १ ची मजा नाही.
शेवट तर अ तीच ताणलेला. किती वेळ ती मुंडक्याची मारामारी. कंटाळाच आला. ते मुंडकं पण नुसतं व्हॅअॅअॅअॅअॅअॅअॅ करून बोंबलतंय. ना त्याची भिती वाटली ना काय! त्यापेक्षा स्त्री बरी होती
Penguin Blooms @Netflix
Penguin Blooms @Netflix बघितला आणि आवडला.
तीन लहान मुले व आईबाबा असे गोड-आनंदी कुटुंब फिरायला थायलंडला जाते आणि आईचा विचित्र अपघात होऊन ती कण्याला मार लागल्याने पांगळी होते. नंतर सगळेच बदलून जाते, तिला नैराश्य येते. मुलांना एकेदिवशी मॅगपायचे छोटे पिल्लू सापडते, ते काळेपांढरे असल्याने त्याचे नाव ते पेंग्विन ठेवतात. पेंग्विनमुळे तिच्या मनस्थितीत थोडा फरक पडतो ती पुन्हा कयाक चालवायला सुरू करते. परिस्थितीचा स्वीकार करते व आनंदी व्हायला शिकते. नेओमि वॅट्स प्रमुख भूमिकेत आहे. सर्वांचीच कामे छान आहेत. चित्रपट उदास आहे पण चांगला आणि अर्थपूर्ण आहे.
प्राईमवर जितेंद्र कुमार
प्राईमवर जितेंद्र कुमार-श्रिया पिळगावकर चा 'ड्राय डे' पाहिला.जरा पंचायत फ्लेवर आहे.कथा चांगली आहे.जितेंद्र कुमार चा प्रत्येक कंटेंट पाहिलाच पाहिजे अशी अलिखित प्रतिज्ञा केल्याने हा बघायचा होताच.यात 'एक छोटा सा काम था' वाला परमेश्वर आणि पंचायत मधले काही इतर छोटे कलाकार पण आहेत.अन्नू कपूर नेहमीप्रमाणे एफर्टलेस चांगला अभिनय करतो.श्रिया साड्यांमध्ये छान दिसते. जितेंद्र कुमार हा पुढचा आयुष्मान आहे.डोळ्यातून अभिनय करतो.
प्राईमवर जितेंद्र कुमार
प्राईमवर जितेंद्र कुमार-श्रिया पिळगावकर चा 'ड्राय डे' पाहिला.>>> कुतूहल वाटले होते पण समहाऊ क्लिकसुद्धा केले नव्हते.
अन्नू कपूर नेहमीप्रमाणे एफर्टलेस चांगला अभिनय करतो. जितेंद्र कुमार हा पुढचा आयुष्मान आहे.डोळ्यातून अभिनय करतो.>>>>> +१ अनु
----------------
स्त्री २ बघितला. मला भलताच आवडला. ही विनोदाची/ उपरोधाची जातकुळी आवडते, उत्स्फुर्त वाटते. खूप ठिकाणी हसू आले. काहीकाही हुकलेले संवाद पुन्हा रिव्हर्स करून ऐकले. पुन्हा बघेनच. सगळ्यांचा अभिनय तोडीसतोड आहे. बॉईज गँग वेडी आहे, अभिषेक बॅनर्जीचे/ जनाचा किती छळ करतात. काय काम करतो तो. अपारशक्ती पण धमाल , त्याच्या भुवईतला व्रण फार डिस्टिंक्ट आहे. Imperfections छान दिसतात. छान दिसलाय तो यात, कामही मस्त. राजकुमाररावही जीव तोडून काम करतो नेहमीच, शिवाय त्याला विनोदी अभिनेत्याचे अंगही आहे. पंकज त्रिपाठी उत्तमच, अशा प्रकारच्या भूमिका त्याच्या पिंडाशी जुळूनच येतात.
काहीकाही पंचेस तर जाम आवडले. त्यापैकी काही-
गाडीवर बसून 'काम डाऊन काम डाऊन' गाणं रंगात येऊन पूर्णपणे चुकीचे म्हणणे. सरकट्याच्या (बिनडोक ?) पंजाच्या खुणावरून इथे जॉगर्स पार्क नाही, जुरासिक पार्क कुठून येईल. गाडीवर बसून पळत सुटलेले असताना, यहां हमारी जान जा रही है और आपको संतुलन की पडी है. तमन्ना सारखी अप्सरा त्रिपाठीची गर्लफ्रेंड आहे हे कळताच तिला बघून आपण आता तळ्यात उडी मारून जीव दिलेलाच बरा असे तरूण गँगला वाटणे. सरकटा असू शकतो पण बिट्टुला गर्लफ्रेंड असूच शकत नाही असे जनाला वाटणे. अक्षय कुमार आणि वरूण धवन अनावश्यक वाटले, तरीही खटकले नाही. 'आज की रात मजा हुस्न का आंखोसे लिजीये' खूप आवडले, तेथे तिला बेट म्हणून आणलेले असल्याने व तिच्याशिवाय एकही स्त्री ठेवायची नसल्याने तिच्यासोबत नाचणारे सगळे पुरुष आहेत आणि त्यांनी सगळे नृत्य फेमिनन हावभावात केले आहे , ज्याची कोरिओग्राफी अतिशय उत्तम वाटली. 'मॉडर्न डे' मुजरा वाटला, काव्यही शृंगारीक, सूचक आणि पूर्णपणे हिंदी- उर्दू आहे. मस्त आहे एकदम.
हो.मला तो विनोदी सरकटा सोडून
हो.मला तो विनोदी सरकटा सोडून बाकी सर्व ओके वाटलं स्त्री2 मध्ये.स्पेशली अपराशक्ती, जना आणि राजकुमार राव तिघांची केमिस्ट्री मस्त जुळली.
अस्मिता..अगदी अगदी..मला पण
अस्मिता..अगदी अगदी..मला पण आवडला
“ 'आज की रात मजा हुस्न का
“ 'आज की रात मजा हुस्न का आंखोसे लिजीये' खूप आवडले” - हे ऐकताना बेगम अख्तरच्या ‘ऐ मुहब्बत तेरे अंजाम पें’ ची आठवण होत होती (गाण्याची चाल).
फेफ, मलाही यूट्यूब वर 'आजकी
फेफ, मलाही यूट्यूब वर 'आजकी रात- स्टोलन फ्रॉम पाकिस्तान' असे सजेशन आले होते.
‘घरत गणपती‘ बघितला.
‘घरत गणपती‘ बघितला. सिनेमॅटोग्राफीला एक नंबर!! अप्रतिम!!
कदाचित स्पॉयलर अॅलर्ट
रेखाच्या ‘खूबसूरत’ चा बाज आहे स्टोरीला
एण्ड ऑफ स्पॉयलर अॅलर्ट
बाकी पटकथेत लूपहोल्स पुष्कळ आहेत, पण 'काहीही चाललंय, बंद करून 'हास्य-जत्रा' बघू अश्या पातळीवर (म्हणजे 'कल्की') नाही. घरातले सगळे 'गजनी' आहेत, त्यामुळे 'तमाशा' म्हणता येईल अशी भांडणं झाली तरी पुढच्या सीनला नाच-गाणी व्यवस्थित करतात (गौरी-गणपतीला घरात सगळे नटून-थटून नाचतात ह्यातून करण जौहरला नवीन मार्केट ओपन होऊ शकतं). गणपती जर बोलायला लागला तर तो थकलेल्या अ तुल परचुरेच्या आवाजात बोलेल हे 'जरा' गुरूदेवांच्या 'आय इन द यू' इतकं अगम्य आहे.
अस्मिता, आवडले परीक्षण.
अस्मिता, आवडले परीक्षण.
जेव्हां पुन्हा सिनेमे पहायला सुरूवात करीन तेव्हां स्त्री २ पहिला असेल.
“ स्टोलन फ्रॉम पाकिस्तान' असे
“ स्टोलन फ्रॉम पाकिस्तान' असे सजेशन आले होते.” - बेगम अख्तर फैझबाद - उत्तर प्रदेशच्या होत्या. ही गझल सुद्धा शकील बदायुनीने लिहिली आहे.
ओके, मी तो व्हिडिओ बघितलाच
ओके, मी तो व्हिडिओ बघितलाच नव्हता, हेही मला माहिती नव्हते किंवा विसरून गेले असेन. पण ते ओरिजनल नसावे एवढे कळाले होते.
धन्यवाद आचार्य आणि केया.
घरत गणपती मधल गौरी आगमनाच गाण
घरत गणपती मधल गौरी आगमनाच गाण मस्त आहे..मुव्ही बघायचाय अजुन...हिरॉइन वाणी कपुरसारखी दिसते..
आवडला ना स्त्री-2!
आवडला ना स्त्री-2!
मी थिएटर मध्ये बघितला त्यामुळे मागे जाणं/ परत ऐकणं एकदा नक्की करायचं आहे. स्मार्ट संवाद आहेत. आणि ते स्ट्रेट फेस ने डिलिव्हरी झाले की जी मजा येते त्याला तोड नाही. त्यात कानाला गुदगुल्या करणारी शुद्ध हिंदी.
'आजकी रात ' आणि 'कटी रात मैने खेतो मै ' दोन्ही गाणी छान आहेत. शेवटी पिक्चर संपल्यावर अक्षय आणि वरुण येतात त्यामुळे ते खटकले नाही.
आजकी रात ' आणि 'कटी रात मैने
त्यात कानाला गुदगुल्या करणारी शुद्ध हिंदी.>>> त्यावर तर जीव कुर्बान केला आहे.
आजकी रात ' आणि 'कटी रात मैने खेतो मै ' दोन्ही गाणी छान आहेत.
>>> फुल्ल धमाल आहेत. नंतर किती वेळा यूट्यूब वर बघितली. 'कटी रात मैने' मधे कसला धमाल डान्स आहे. 'तेरे चक्करोंमें दुसरी पटाई नहीं' ला जाम हसले. ते तीनदा म्हटलं आहे. त्यात त्रिपाठी 'झाले की तीनदा, आता पुढे म्हण' हेही गाण्यातच सांगतो. या अशा टाईमिंगमुळे जास्तच आवडला.
अक्षय आधी वेड्यांच्या दवाखान्यात होता, नंतर शेवटी लाव्हा प्यायला आला.
त्यात,
त्यात,
ऐसे लडके जो खेतोमे बुलाते है, डॅडी (बेटी) बनते... काभिभी वो जमाई नहीं.
इथे थिएटर मध्ये मला बेटी ऐवजी ' डॅडी ' ऐकू आलं त्यामुळे करप्ट माईंड मी तिकडे हिस्टेरिकल हसत सुटलेलो. वेड्याचा बाजार.
(No subject)
मी पाठ करणार आहे ती दोन्ही गाणी.
इथे थिएटर मध्ये मला बेटी ऐवजी
इथे थिएटर मध्ये मला बेटी ऐवजी ' डॅडी ' ऐकू आलं त्यामुळे करप्ट माईंड मी तिकडे हिस्टेरिकल हसत सुटलेलो>>>> कहर चुकीची ऐकू
आलेली गाणी धाग्यावर लिहायला हवे..
अस्मिता रीव्ह्यु बद्दल +१ , पंकज त्रिपाठी अभिनय करतच नाहीये असं वाटतं. तू त्याचा वेगळा बाज असलेला लुका छिपी पाहिलायस का?
डॉलर अक्षय वाल्या हिरोचा? त्यात तो साडी दुकानात टवाळ्या करत बायकांवर लाईन मारणारा रोमीयो दाखवलाय, तो त्यात ही convincing वाटतोय
राजकुमार राव खूप गुणी अभिनेता आहे. अपारशक्ती दिसायला आवडत नाही पण अभिनय अॅट इट'स बेस्ट. अभिषेक बॅ. तर अजून मॅचुअर होत चालला आहे आता.
ड्राय डे नक्की बघणार. ओटीटी का बादशाह जितेंद्र कुमार साठी. पण अजून इथे प्राइम वर आला नाहीये.
Hillbilly Elegy बघितला. थँक्स
Hillbilly Elegy बघितला. थँक्स फॉर रेको अस्मिता.
एखाद्याचं बालपण किती ट्रॉमॅटिक असू शकतं बघून फार वाईट वाटलं पण नशीबाने त्यातून चांगलंच निपजलं.
कधी मुलांना असे मुव्हीज आवर्जून दाखवावे वाटतात की बघा तुम्ही किती सेफ आणि सिक्युअर आहात.
धन्यवाद अंजली.
धन्यवाद अंजली.
मूळ पुस्तक खूप politically convenient लिहिले आहे. ते वास्तव नाही किंवा 'एक हात लाकूड दहा हात ढलप्या' असण्याची शक्यता आहे. हा लेख मी आजच वाचला.
https://www.theguardian.com/us-news/article/2024/jul/16/jd-vance-hillbil...
Pages