खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

हो देवकी फक्त डाळीचे होतात पण डाळी+ rice जास्त क्रंची होतात. रेसिपी लिहिणे जमले असते तर बैरिस्टर, आय मीन शेफ़ नाही का झालो असतो ? Lol

आप्पे माझे फेवरेट आहेत, घरी फारसे आवडत नाहि कूणाला त्यामुळे मी माझ्यापुरते करुन खाते...फक्त डाळिचे आप्पे नाही केले आता करुन बघेन...
तिमी पुर्‍या कसल्या भन्नाट दिसतायत..फार आवडता पदार्थ...तिमी पूर्‍या दिसल्या की डब्यात घालुन शाळेच्या ट्रिपला जावस वाटायला लागलय.

आज लंच

गरम पिठलं + जोंधळ्याची खरपूस भाजलेली भाकर. होम मेड.

तेल जरा जास्तच पडलं पिठल्यात Happy

3c69fe72-a5dc-4cae-90a7-7a7fc1a4964b.jpeg

पिठले भाकरी मस्त.. तो आमचा पावसाळा स्पेशल मेनू.. आणि आज किंबहुना गेले दोन चार दिवस आहे सुद्धा छान पाऊस.. फक्त आमचे पिठले कुळीद पिठाचे.. तरी आज अमाच्याकडे बेसनाची गट्टे की सब्जी होती.

वरच्या पुऱ्या या पालकपुऱ्या आहेत..
मेथी असेल तर पराठे आणि पालक असेल तर पुरी.. हे चहासोबत आले की माझे वन डिश मील झाले Happy

मेथी पुर्‍या मस्त दिसताहेत. मलाही चहात बुडवुन खायला आवडतात.

पिठले अजुन थोडे फिरवले असते तर झुनका झाला असता का??? झुणक्यात तेल भरपुर घालतात.

मी गावात भावाच्या घरी गेले की चुलीवरच्या जाडजुड भाकर्‍या मिळतात खायला. मीही घरी तशाच जाडजुड गरगरीत करते पण चुलीवरच्या जास्त चांगल्या होतात, चुलीची आंच जास्त असते, गॅसवर तशी आंच मिळत नाही. इथले भाकरींचे फोटो बघुन गम्मत वाटते. इथले फोतो बघुन मुळ भाकरी डोळ्यसमोर येते व तुलना होते. कृपया रागाऊ नका.

भाकरी चुलीवरच्या जास्त चांगल्या होतात

+ १

चुलीचा option घरात उपलब्ध नाही.

भाकरी, चपाती, फुलके, पुरी, आप्पे, वडे कुरकुरीत आणि थोडे जास्त भाजलेले, क्रंच असलेले आवडतात. तंदूर असेल तर “करारी रोटी” फ़िक्स ऑर्डर. भाकरीवरचा पापुद्रा फेव्ह.

भाकरी जाडजूड केल्या तर क्रंच येत नाही/ मला जमत नाही. मोठ्या साइजच्या भाकरी / हातावरच्या भाकरी करता येण्याचे स्किल अजून साध्य झाले नाही.

मग जे जमते आहे त्यात समाधान Happy

झुणका ड्राय असतो ना ?

प्रत्येक भागाची पद्धत निराळी. तुम्ही केला की फोटो डकवा.

तिमी पूर्‍या दिसल्या की डब्यात घालुन शाळेच्या ट्रिपला जावस वाटायला लागलय >>> +१

मस्त मेनू सगळे. डोळ्यात बदाम.

Screenshot_20240929_151738_Gallery.jpg
घरगुती चॉकलेट बनवले आज. रमा, रुसलेला ओम आणि मी
.
ह्यावेळो कोकोनट ऑइल वापरले, एक वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी कोको पावडर, अर्धी वाटी मिल्क पावडर मिक्स करून केलेत.
.
छान झालेत ह्यावेळी.
कोकोनट ऑईल चा फ्लेवर फारच छान लागतोय

वरचे उचलून तोंडात टाकावे अश्या आप्पेला आमचा कुरकुरीत झब्बू
देसी नाचोज. घरी पहिल्यांदाच केले हे. फडशा पडला. व्हेरिएशन सुद्धा करू शकतो याचाही अंदाज आला.

IMG-20240929-WA0068.jpg

पुरी चहा, पिठलं भाकरी मस्तं.. आप्पे मला फार आवडत नाही पण हे वरचे तोंपासू दिसत आहेत.
भाकरी महत्प्रयासाने शिकले आहे.. मला जाड आवडत नाही. पूर्वी पापुद्रा नाही यायचा, आत्ता काही वर्षांपासून यायला लागला, माझ्यावर दया आली भाकरी ला Happy

Date with Dad ❤️

आजचा ब्रेकफ़ास्ट - ईरानी चाय + ब्रून मस्का.

IMG_7256.jpeg

ऑटाफे स्नॅक.
तो ब्रुन आहे का बन? ब्रुन कडक असतो ना?

पैनी नज़र !
बरोबर, हा बन आहे, कडक ब्रून पण होता तो या फोटोत नाही.

मस्त
मला नरम बन नाही आवडत
पण कडक ब्रून मस्का चाय हा लहानपणी कित्येक वर्षे आठवड्यात सात पैकी चार दिवस सकाळचा नाश्ता होता Happy

… रुसलेला ओम आणि मी … ?

चॉकलेट करतांनाही रुसवा ? केलेले चॉकलेट खाल्ल्यानंतर गेला असेल मग रुसवा Happy

Bless him !

Pages