खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

माम फराळ छान दिसतोय. मला साठ्याच्या रंगीबेरंगी करंज्या एकदा करुन बघायच्यात. तेच सिकेपी पद्धतीचे कानवले ना?? तसले बनवता येणार नाहीत माहित आहेत पण जशा बनतील तश्या बनतील म्हणत एकदा उडी घेणार आहे. Happy

सर्वांचे आभार….

साधना हो. हेच सीकेपी पद्धतीचे कानवले. मी निवेदिता सराफ यांची रेसिपी वापरून केले. फार किचकट नाही पण वेळखाऊ आहेत.

चिरोट्यांची रेसिपी माहिती होती. पण सायली’ज किचन यांची गुलाब कानवले रेसिपी ही चांगली आहे.

सगळे ३०-४० चिरोटे लेकीने हौसेने लाटले Happy

रंगीबेरंगी कानवले, चिरोटे छानच आहेत पण माझे लक्ष चिवड्याच्या वाटीला खेटून असलेल्या पदार्थाकडेच गेले.
काय आहे ते ?

यालाच फळं / बोरं म्हणतात का ? गव्हाची कणिक + गूळ + पाणी+ तीळ + तळणे ?

हो बोरे आहेत ती. आमच्याकडे आजी असताना व्हायची. त्या वयात तर फार आवडायची. फक्त जमली पाहिजेत ती चांगली तर मजा.

अनिंद्य बोरंच आहेत ती. आम्ही तांदळाचं पीठ + ओलं/सुकं खोबरं + खसखस वापरून करतो. बाकी कृती सेम. यावर्षीचा हिट आयटम आहे तो.

Ok, so बोरं it is !

काही जागी हे चैत्रात करतांना पाहिलेय. याच कॉंबोच्या पापड्या करतात माझ्या घरी अधून मधून. खोबरे मात्र नो नो Happy

बोरे आमच्याकडे सुद्धा तांदळाचे पीठ.. वर गव्हाचे पीठ वाचले त्याचेही करतात का? मला हा प्रामुख्याने कोकणातला प्रकार असावा असे वाटते.

बोरं.
आमच्याकडे दिवाळीच्या पदार्थांची सुरवात कालाष्टमीला कणिक गुळाचे शंकरपाळे करून करतात. त्याला खजूरया म्हणतात. त्या बरोबर त्याच कणकेची थोडी बोरं करतात.
धनत्रयोदशी ला नहाण झाल्यावर प्रथम ही तोंडात टाकण्याची प्रथा आहे.

Screenshot_20241104_090445_Gallery.jpg
खमंग कुरकुरीत शेव.
माझ्यासारखी तीही बारीक नाहीये.
.
शेव खाताना का कोण जाणे दमडी धडा आठवतो. Guilty वाटतं आणि असं वाटतं की ही शेव घ्यावी डब्यात भरावी आणि बाजारात जाऊन झाडाखाली पहुडलेल्या दमडीला स्वतःच्या हाताने भरवावी.

@ छल्ला, बोरं रेसपी लिंक बद्दल आभार.

जागू यांनी समन्वय साधला आहे, तांदळाचे + गव्हाचे पीठ दोन्ही वापरून. बेरजेचे फराळकारण, बेरजेच्या राजकारणासारखे Happy कुरकुरीत होत असणार.

साध्या पोह्यांचा चिवडा सर्वात जास्त आवडता. झाला आणि पटकन संपला Happy

@ किल्ली शेव छान. कडुम कुडुम चहासोबत Happy

वांगीभात.

da165be5-8216-47d1-817c-1e8b73a2cbdc.jpeg

वांगी आणि खोबरे दोन्ही नावडीचे. पण सौं चा धाक.

विवाहित पुरुषाचे जीवन (कधीकधी) खडतर असते.

मला तर वांगे वेचायला सुद्धा आवडत नाही. तो बुळबुळीत स्पर्श नकोसा वाटतो Sad पण वांगेबटाटा भाजी मधील बटाटे आणि ग्रेव्ही फार आवडते. फार भारी चव उतरते त्यात. त्यामुळे वांग्याबद्दल मनात इज्जत फार आहे. भरीत मात्र खाऊ शकत नाही.

सगळेच पदार्थ सुरेख दिसताहेत.
सरस्वती पूजन फार सुंदर आशु.
अनिंद्य, अप्रतिम प्रेझेंटेशन असते तुमचे.

Happy दिवाळी होऊन गेली तरीही आता आणतेय मी केलेली चकली व चिवडा-

चिवडा कढईतच आहे.
IMG-20241029-WA0008.jpg
चकल्या माकाचु सर्वायव्हर आहेत.
IMG-20241029-WA0007.jpg

Pages