गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल Lol
गब्बर विचारतोय म्हणजे लवकर यायलाच हवा

पूरनमासी के दिन, जब मौसी गाना गाएगी
चाचा नाचेंगे और चाची चम्मनचिडी कि तरह फुसफुसाएगी..
तब आयेगा नानी के देवारानी के मटके से
कच्चा चिट्ठा...
जिसमे लिखा होगा,
जितने व्होटस उतने ड्युआयडी

कालिया तुम्हारे कितने है?
दो सरदार
आयडी दो और वोटस तीन
बहुत नाईन्साफी है यह
इसका हिसाब होगा
बराबर होगा
अरे ओ सांबा..
बता तो जरा कौन जीत रहा है

बस आपको छोडके सभी, सरदार

Lol र आ

पहिलच मीम Happy

एव्हढा रागराग का करतायत.png

मीम गोड आहे
(मला आधी ते दुसऱ्या बाजूने लिहिलं असं वाटलं)

रआ Lol

उपक्रमाच्या धाग्यावरची मी अनु यांची सूचना गांभीर्याने घेतली आहे.

सगळ्या शशक लेखकांकडून 5 रु फी घेऊन पहिल्या 3 विजेत्यांना500 ची अमेझॉन व्हाउचर(गंमत हां) >> सूचना स्विकारली आहे असे समजले. फक्त दुकान सुप्रसिध्द आणि खात्रीचे असावे म्हणून इथे ते व्हाउचर्स स्विकारले जातील.
FB_IMG_1727253657252.jpg

images (43)_0.jpeg

इकडे बक्षिसाची वॉवचर्स ठेवली पाहिजेत. उत्सव संपल्यानंतर रूटीन हाणामारी धागे सुरू होणार तर त्याची पूर्व (/उत्तर /दक्षिण /पश्चिम ) / पूर्ण तयारी करायला उपयुक्त !!

(हे फोटोशॉप नसून ओरिजनल दुकान आहे)

DVGO.jpg

हेहे Happy
सध्या मलाच कोडी ओळखता येत नसल्याने मी पण दुसरा मीमच आहे.पण जगरहाटी प्रमाणे लोक कठीण कठीण कोडी शोधत राहणार..चालायचंच(डोक्यावरचा पदर ऍडजस्ट करून डोळे टिपणारी इमोजी)

मानव Lol

मला तर चुल्लु भर पानी मे डूब जा feeling येत Sad झिलमिल आणि श्र आणि अनु च knowledge बघून

Lol

Pages