मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 September, 2024 - 06:42

मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा :

यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.

मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/85615

आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/85598

बाप्पाचा नैवेद्य
https://www.maayboli.com/node/85599

सांस्कृतिक कार्यक्रमः-

माझी कलाकारी
https://www.maayboli.com/node/85614

लहान मुलांचे उपक्रम:

चित्रकला: माझी आवडती गाडी
https://www.maayboli.com/node/85608

चित्रकला: माझे आवडते कार्टून
https://www.maayboli.com/node/85607

हस्तकला: गणपतीसाठी पताका/ तोरण तयार करणे
https://www.maayboli.com/node/85609

मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:

शहाणे करुनि सोडावे। सकल जन।।
https://www.maayboli.com/node/85604

माझे स्थित्यंतर
https://www.maayboli.com/node/85595

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: १: दृष्य
https://www.maayboli.com/node/85610

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: २: पाऊस
https://www.maayboli.com/node/85631

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम
https://www.maayboli.com/node/85666

मोठ्यांसाठी कला उपक्रम:

नैसर्गिक संसाधनांमधून गणेश
https://www.maayboli.com/node/85592

पाककृती स्पर्धा:

One Dish Indian Meal
https://www.maayboli.com/node/85583

चटण्या
https://www.maayboli.com/node/85585

आरोग्यवर्धक पेये
https://www.maayboli.com/node/85584

गंमतखेळ

मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स
https://www.maayboli.com/node/85605

जुनी कढई, नवीन उपमा
https://www.maayboli.com/node/85597

गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?
https://www.maayboli.com/node/85606

प्रकाशचित्रांचे झब्बू

निसर्गनिर्मित सममिती
https://www.maayboli.com/node/85611

देवघर
https://www.maayboli.com/node/85612

श्रीमंती माझ्या नजरेतून
https://www.maayboli.com/node/85613

माझे शेत/ माझी बाग
https://www.maayboli.com/node/85693

सर्वसिद्धिकर प्रभो!
https://www.maayboli.com/node/85539

गणेशोत्सव विशेष लेख - भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे - (हरचंद पालव)
https://www.maayboli.com/node/85673

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया>>+११
खरंतर संयोजक स्वतः चे व्याप सांभाळून.. स्वतः चा वेळ देऊन.. जे करताएत ते कौतुकास्पद आहेत.. त्यात हेच का तेच का नाही म्हणणं काही बरोबर नाही...

छन्दीफंदी, पुढच्या वर्षी संयोजनात संयोजक म्हणून या आणि तुम्हाला वाटतायेत ते बदल करा. कसा रिस्पॉन्स मिळतो पाहूया. चांगले बदल झाले तर नक्कीच स्वागत होईल.
या वर्षी स्पर्धा का उपक्रम का वगैरेचं सोप्पं उत्तर - संयोजकांना वाटलं म्हणून. त्यांचा खेळ, त्यांचे नियम.
तुम्हाला बदल हवा असेल तर तुम्ही सुरुवात करा.

Submitted by रीया o>>>>

Same old problem.
Riya माझी original post वाचा.
बदल इतर मा बो करानी सुचविले आहेत.
पूर्ण वाचून मते मांडावीत किंवा उपदेश करावेत ही माफक अपेक्षा.

बाकीच्यांनी ह्या किंवा वरील २ -४ पोस्ट ना अनुमोदन किंवा उपदेश करण्याआधी किमान मुळापासून सगळ्या पोस्ट वाचाव्यात ही माफक अपेक्षा!

येथील सर्वच उपक्रम आणि स्पर्धा अतिशय नावीन्यपूर्ण, वाचनीय आणि देखण्या असतात. मी तर दरवर्षीच इथल्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पहात असते.

बक्षीस मिळालंच तर एक दिवस status वर प्रमाणपत्र चिकटवून, त्याबद्दल येणाऱ्या मेसेजना रीप्लाय (मागितल्या तरच उत्साहाने लिंकही) पाठवते. पण ते नाही मिळालं तरीही काही फरक पडत नाही. मनमुराद आनंद (जमलं तर लिखाणाचा नाहीतर इतरांनी लिहिलेलं वाचण्याचा) आधीच दहा दिवस मिळालेला असतो.

दिलेल्या स्पर्धा/उपक्रमाच्या निमित्ताने काही विचार करता येतोय का, हे माझे मलाच तपासायला मिळतं. त्या प्रवासाचा आनंदही खूप पुरतो. त्याच विषयांवर इतर लोकं किती वेगळा आणि सुंदर विचार करतात हेही बघायला मिळते. (एकदा एका पत्र लेखनाच्या उपक्रमातील विविध पत्रं अजून लक्षात आहेत.)

संयोजक मंडळींनी स्वत:चे व्याप सांभाळून ह्या भाकरी भाजलेल्या असतात त्या बद्दल त्यांच विशेष कौतुक वाटतं.

गेल्या वेळी पण १ - २ वेळेच्या स्पर्धा बघितलेल्या..
तेव्हा जाणवलं, की एखाद कविता / लेख खरंच खूप छान होती/ होता, पण तितकेसे ते लोकप्रिय किंवा माबोप्रिय नसावेत, त्यामुळे ते जिंकले नव्हते. <<

ते छान आहेत असं तुम्हाला वाटलं असेल (म्हणजे छान नाहीत असं माझं म्हणणं नाही), इतरांना ते तेवढं छान वाटलं नसेल किंवा त्याहून जास्त अन्य कोणाचं आवडलं असेल.
जे तुम्हाला आवडलं तेच पारितोषिक योग्य होतं असं तर नाही होऊ/म्हणू शकत ना..

Parag plus one.

मी गेली कित्येक वर्षे माबोवरच्या स्पर्धा बघतेय.

स्पर्धा राहुदे, काढु नका. जे भाग घेतात त्यांना पहिल्या नंबरमुळे अमेझोन वॉउचर जरी मिळत नसले तरी स्पर्धा आहे म्हणुन ते वेगळा विचार करतात आणि आमच्यासारख्या वाचकांना काहीतरी नविन अनुभवता येते.

स्पर्धाच नसेल तर हा वेगळा विचार केला जाणार नाही….

दर वेळेस मिम्स सारखा विषय हाती लागणार नाही ना ज्याने प्रत्येकाला क्रिएअटिव बनवले.

मी पण पराग यांच्याशी सहमत.
मी कितीतरी वर्षापासून स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवत होते. यावर्षी गणपतीत पहिल्यांदा वेळ मिळाला आणि काहीतरी सुचले मला ह्याचाच आनंद झाला आहे.
अजूनही पोस्ट टाकणे, नवे धागे काढणे किंवा साधा फोटो अपलोड करणे सुध्दा मला जमत नाही.
लिहिले जाणे हेच किती छान. आपण काय छोटी मुले आहोत काय? हिरमुसून जायला. आतापर्यंत इथल्या चतुर हुशार लेखकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कितीतरी बक्षिसे मिळवली असतीलच ना. समाधानी असणे जास्त महत्वाचे असे मला वाटते.
इथले सगळे उपक्रम मस्त होते. आयोजन करणे ही पण एक मोठी जबाबदारीच आहे. उत्सव छान साजरा झाला. सगळ्यांचे अभिनंदन.

अरे ते सगळे सोडा..
तिथे मला आलेले एक मत कमी झाले Lol

पण मुळात हे कसे झाले??
मत खोडता किंवा बदलता येते का??
आता राडा होणार.... वरचा वाद चालत राहील, संयोजक प्रशासन आधी मला उत्तर द्या Proud

१) नवीन कल्पना , न पटलेले नियम /उपक्रम /स्पर्धा याबद्द्लच्या कुठल्याही प्रतिक्रियांचे आपण स्वागत करतो. त्यातूनच काही चांगल्या गोष्टिही निघतात. संयोजक / अ‍ॅडमीन टीम गेल्या वर्षी आलेल्या कल्पनांचा विचार करतात.
२) पण त्या राबवल्याच गेल्या पाहिजे हे बंधन आपल्याला लावून घेता येणार नाही. त्या मागे तांत्रिक अडचणी , मायबोली चे धोरण , मायबोलीने ड्रुपलमधे केलेले बदल, मायबोलीचा आकार अशा अनेक अडचणी येतात. संयोजकांचे काम वाढेल असे बदल आपण शक्यतो करत नाही. किंबहुना गेल्या काही वर्षांत त्यांचे काम सोपे होत जाईल असा आमचा प्रयास असतो.
३) आपल्या स्पर्धांचे नियम्/धोरण/ अंमलबजावणी काही जणांना पटणार नाही. पण त्यात बदल घडवून आणायचा असेल तर पुढच्या वर्षी संयोजन मंडळात या , अडचणी समजून घ्या आणि कदाचित तुमच्या मनासारखे होईलही. पण होणारही नाही. पण या सगळ्या गोष्टीत मजा येणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. नाही तर गणेशोत्सवाला कोर्टाचे स्वरूप येईल.

आनंद वाटावा, मजा यावी, ऑन्लाईन असलो तरी गप्पा मारत हसत खेळत एकत्रित गणपती साजरा करतोय हा जो फिल येतो तो महत्वाचा…

मायबोली व मायबोलीकरांचे आभार. आयुष्याचा एक भाग झालीय मायबोली.

ह्या वर्षीचा गणेशोत्सव फक्कड झाला. माझ्यासारख्या १ ही क्रीयेटिव स्पर्धा/उपक्रमात भाग न घेणारीने मीम , पाकृ असे अनेक धागे एंजॉय केले.
वेळात वेळ काढून असे उपक्रम राबवणार्या संयोजकांचे आभार.
छंदीफंदींच्या शंकेचे ही बर्यापैकी समाधानपूर्वक उत्तर वेमांनी दिले.
आल इज वेल फायनली Happy उत्सवाचा आनंद घेणे हे महत्त्वाचे!

ह्या जन्मी ऋन्मेष ला धागा काढायला प्रोत्साहन देईन असे कधी वाटले नव्हते पण-

आपल्या मुलांना कुठल्या पार्शलिटी, फेवरीजम, भेदभावाचा सामना करायला लागून त्यांचे टॅलेंट झाकोळले जाऊ नये म्हणून पालक बरेचदा तलवार उपसून तयार असतात. यावर माझ्याकडे काही स्वानुभावाचे किस्से आहेत. मी ते नंतर वेगळा धागा काढून शेअर करतो. >>> हा खरंच इंटरेस्टींग विषय आहे. गो ऋन्मेष!

मी मायबोली २००९ पासून वाचते. आणि आयडी काढून ही १० वर्ष तरी झाली असतील. पण मी लॉगिन फक्त आणि फक्त गणेशोत्सवातच करते. (बऱ्याच जणांना मी डूआयडी ही वाटत असेन, माझे फक्त गणेशोत्सव ते गणेशोत्सव प्रतिसाद वाचून).
तर इतकी प्रस्तावना लिहिण्याचा उद्देश फक्त इतका की मायबोली गणेशोत्सवाची स्वतःची एक vibe आहे. माझ्यासारख्या नलेखकाला ही लिहावं वाटतं, इतर कुणी आपल्या लिखाणाला/विचाराला जज करेल म्हणून प्रतिसाद देवू की नको हा विचार न करता मी एखादी गोष्ट आवडल्याची पावती देते, इतका मी तो एन्जॉय करते. सो स्पर्धा असावी/नसावी, निकोप की कशी ह्यापेक्षा सगळे मिळून जस सेलिब्रेशन होतं ते फार महत्त्वाचं आहे.
बाकी ह्या वर्षीचा गणेशोत्सव one of the best होता.
सगळ्या संयोजकांना धन्यवाद..

ओह भक्ती, लिहीत जा की नेहमी!! इथे काय सगळे पहिल्या दिवशी 'जुने' नाही बनले.जे बनले तेही वेगवेगळ्या काळात नवेच होते.
लिखाण जज होते नवे नवे लिहीत असताना हे खरे(मला एका गृहस्थाने मोबाईलवर फोन करून 'तू फार वाईट गझला लिहितेस, आता बास कर' असं सांगितलं होतं Lol ), पण जज होणं हे नेहमी कंपूबाजीतून असेल असं नाही.त्यात काही महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. लिहितं झाल्याशिवाय हे कळणार नाही.श्रोडींगर च्या मांजराला खोक्यात घालावंच लागेल.

मला एका गृहस्थाने मोबाईलवर फोन करून 'तू फार वाईट गझला लिहितेस, आता बास कर' असं सांगितलं होतं>>> Rofl आता उत्सुकता निर्माण झाली. प्लीज विपु कर ना तेवढी गझल..

डोकावलोच मी तिथे. अनु, एक नंबर आहे गझल. शेवटचं कडवं वाचताना डोळे पाणावले ... हसून हसून.

आनंद वाटावा, मजा यावी, ऑन्लाईन असलो तरी गप्पा मारत हसत खेळत एकत्रित गणपती साजरा करतोय हा जो फिल येतो तो महत्वाचा… >>> १०००+++

ह्या जन्मी ऋन्मेष ला धागा काढायला प्रोत्साहन देईन असे कधी वाटले नव्हते >>> Lol उगाच जबाबदारीचे ओझे खांद्यावर आल्यासारखे वाटले. या जन्मी धागा काढणे जबाबदारीचे काम आहे असे कधी वाटले नव्हते Lol

Pages