मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 September, 2024 - 06:42

मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा :

यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.

मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/85615

आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/85598

बाप्पाचा नैवेद्य
https://www.maayboli.com/node/85599

सांस्कृतिक कार्यक्रमः-

माझी कलाकारी
https://www.maayboli.com/node/85614

लहान मुलांचे उपक्रम:

चित्रकला: माझी आवडती गाडी
https://www.maayboli.com/node/85608

चित्रकला: माझे आवडते कार्टून
https://www.maayboli.com/node/85607

हस्तकला: गणपतीसाठी पताका/ तोरण तयार करणे
https://www.maayboli.com/node/85609

मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:

शहाणे करुनि सोडावे। सकल जन।।
https://www.maayboli.com/node/85604

माझे स्थित्यंतर
https://www.maayboli.com/node/85595

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: १: दृष्य
https://www.maayboli.com/node/85610

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: २: पाऊस
https://www.maayboli.com/node/85631

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम
https://www.maayboli.com/node/85666

मोठ्यांसाठी कला उपक्रम:

नैसर्गिक संसाधनांमधून गणेश
https://www.maayboli.com/node/85592

पाककृती स्पर्धा:

One Dish Indian Meal
https://www.maayboli.com/node/85583

चटण्या
https://www.maayboli.com/node/85585

आरोग्यवर्धक पेये
https://www.maayboli.com/node/85584

गंमतखेळ

मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स
https://www.maayboli.com/node/85605

जुनी कढई, नवीन उपमा
https://www.maayboli.com/node/85597

गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?
https://www.maayboli.com/node/85606

प्रकाशचित्रांचे झब्बू

निसर्गनिर्मित सममिती
https://www.maayboli.com/node/85611

देवघर
https://www.maayboli.com/node/85612

श्रीमंती माझ्या नजरेतून
https://www.maayboli.com/node/85613

माझे शेत/ माझी बाग
https://www.maayboli.com/node/85693

सर्वसिद्धिकर प्रभो!
https://www.maayboli.com/node/85539

गणेशोत्सव विशेष लेख - भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे - (हरचंद पालव)
https://www.maayboli.com/node/85673

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्सवाचे स्वरूप जाऊन स्पर्धेचे स्वरूप येईल.
आधीच काय आजूबाजूला जीवघेणी स्पर्धा कमी आहे जे इथेही पुन्हा तेच वातावरण.>>>>
बरोबर आहे पण मग तसे असेल तर उपक्रमाचं ठेवावेत... स्पर्धेचा खटाटोप कशाला??

स्पर्धा म्हणून जाहीर केलीत तर त्यात उद्देश, fairness he सर्व हवे.
संयोजकांनी जबाबदारी घेणे आणि त्यानुसार काम होणे हेच प्रशस्त राहील.

जुन्या जाणत्या लोकप्रिय आयडीना मते जास्त मिळेनात पण नवीन आयडी जेव्हा या उपक्रमात भाग घेतात तेव्हा त्यांना ओळख मिळते. समजा हे सारे गुप्त प्रकारे केले तरी एखाद्या नवीन जिंकलेल्या आयडीला ती ओळख निकालापश्चात मिळेलही. पण न जिंकलेल्या नवीन आयडीला ना बक्षीस मिळणार ना त्याच्या नावाने धागा प्रकाशित झाल्याने ओळख मिळणार. अश्याने मायबोलीकरांशी त्याचा परस्परसंवाद होणार तरी कसा.>>> किती पक्षपाती विधान आहे हे.

नवीन आयडी ना ओळख मिळवून देणे हा बहुदा स्पर्धा करण्या मागे उद्देश नसावा.
की जुने लोकप्रिय आयडी घाबरले फक्त गुणांच्या जोरावर स्पर्धेत उतरायला.

Happy

उत्सवाचे स्वरूप जाऊन स्पर्धेचे स्वरूप येईल.
आधीच काय आजूबाजूला जीवघेणी स्पर्धा कमी आहे जे इथेही पुन्हा तेच वातावरण.>>>>
बरोबर आहे पण मग तसे असेल तर उपक्रमाचं ठेवावेत... स्पर्धेचा खटाटोप कशाला??

स्पर्धा म्हणून जाहीर केलीत तर त्यात उद्देश, fairness he सर्व हवे.
संयोजकांनी जबाबदारी घेणे आणि त्यानुसार काम होणे हेच प्रशस्त राहील.

जुन्या जाणत्या लोकप्रिय आयडीना मते जास्त मिळेनात पण नवीन आयडी जेव्हा या उपक्रमात भाग घेतात तेव्हा त्यांना ओळख मिळते. समजा हे सारे गुप्त प्रकारे केले तरी एखाद्या नवीन जिंकलेल्या आयडीला ती ओळख निकालापश्चात मिळेलही. पण न जिंकलेल्या नवीन आयडीला ना बक्षीस मिळणार ना त्याच्या नावाने धागा प्रकाशित झाल्याने ओळख मिळणार. अश्याने मायबोलीकरांशी त्याचा परस्परसंवाद होणार तरी कसा.>>> किती पक्षपाती विधान आहे हे.

नवीन आयडी ना ओळख मिळवून देणे हा बहुदा स्पर्धा करण्या मागे उद्देश नसावा.
की जुने लोकप्रिय आयडी घाबरले फक्त गुणांच्या जोरावर स्पर्धेत उतरायला.

Happy

आणि नवलेखकाना ओळख मिळणे हा विचार सुद्धा पटला>>>> कडे ते नाही कळले. आणि ते उपक्रम अंतर्गत, किंवा स्वतंत्र लिखाण करून कसे सध्या होणार नाही तेही नमूद करावे...

त्या गर्दीत नाव लेखकाच साहित्यकृती लोकं वाचत असतील ह्यात शंकाच आहे.

मजेमजेत घ्या स्पर्धा आणि पुरस्कार. दोन दिवसांनी कोणाच्याही लक्षात रहात नाही. >>>

Exactly मजेमजेत घ्यायचे हेच खरे . पण मग स्पर्धा हे नाव का द्यावे??

मुद्दा हा आहे स्पर्धा ठेवलीत तर सगळं पारदर्शक, कोणालाही झुकत माप न देता , समान संधी देऊन करावं... नाहीतर स्पर्धांची गरजच नाही.

रेसिपी सारख्या स्पर्धेत तर originality तर अभावानेच आढळते,
त्यात मुख्य मुद्दा असतो चवीचा, ती तर लिखाणातून कळत नाही. मग उपक्रम न ठेवता स्पर्धा ठेवण्यामागे उद्देश काय??

किती पक्षपाती विधान आहे हे. >> हे ठरवण्याचे अधिकार कसे आणि कोणाकडून प्राप्त करून घेतात ह्याचे विवेचन केल्यास इतरांना मार्गदर्शक ठरू शकेल

ह्यास उत्तर म्हणून हेमावैम इतक्यावर विषय संपत असेल तर तोच नियम इतरांना लागू असणारच / असावा. त्यामुळे ऋ आणि मी व्यक्त केलेली विधाने खोडून काढणे कोट करून लिहिणे ह्याचा उद्देश नाही समजला. माबुदो _/|\_

की जुने लोकप्रिय आयडी घाबरले फक्त गुणांच्या जोरावर स्पर्धेत उतरायला.
>>>>>

सॉरी पण मी काही जुना लोकप्रिय आयडी नाहीये आणि मी त्यांचे प्रतिनिधीत्व देखील करत नाहीये Happy

तसेच मी तुमचा मुद्दा खोडला नाहीयेच. आपल्याच मित्रमैत्रीणीना ओळखीच्या सभासदाला मत देणे हा प्रकार काही प्रमाणात होत असावा हा तुमचा मुद्दा मी देखील वर मान्य केलाच आहे.

पण त्यावर तुम्ही वर जे उपाय सुचवले आहेत ते सुद्धा फुलप्रूफ नाहीयेत. जो तो आपल्या मित्र मैत्रीणीना सांगू शकतोच की अमुक तमुक एन्ट्री माझी आहे किंवा जुने जाणते सभासद तर ते न सांगता सुद्धा ओळखतील. म्हणजे ते सुद्धा होऊ नये यासाठी अजून चोख बंदोबस्त करावा लागेल. नियम अजून काटेकोर करावे लागतील. यात या उत्सवाची मजा नाही जाणार का..

म्हणून हे सारे टाळायला माझे फक्त इतके म्हणणे आहे की या स्पर्धांना हारजीत पलीकडे एन्जॉय करा. नंबर कोणाला का मिळेना, कोणी किती छान लिहिले आहे, केले आहे हे सर्वाना ठाउक असते तर ते तितके पुरेसे असू द्या. त्यावर मायबोली प्रशस्तीपत्रकाची मोहोर नाही उलटली तरी चालतेय असाच विचार करा. स्पर्धेत उपक्रमात भाग घेणे एन्जॉय करा. त्या एन्ट्रीवर आलेले कौतुकाचे प्रतिसाद एन्जॉय करा.

--------- ++ --------

मुलांबाबत हे वाद फार होतात. आपल्या मुलांना कुठल्या पार्शलिटी, फेवरीजम, भेदभावाचा सामना करायला लागून त्यांचे टॅलेंट झाकोळले जाऊ नये म्हणून पालक बरेचदा तलवार उपसून तयार असतात. यावर माझ्याकडे काही स्वानुभावाचे किस्से आहेत. मी ते नंतर वेगळा धागा काढून शेअर करतो. तो स्वतंत्र चर्चेचा विषय राहील Happy

छन्दीफन्दीचा मुद्दा मला योग्य वाटतोय, सगळ मज्जे मज्जेच आहे पण किन्तू परतूसाठी तरी जागा कशाला? एकदा स्पर्धा अस डिक्लेयर केल की त्याला तेच निकष लावावेत...
यावेळेचा उत्सव छान दण़क्यात झालाय...मनोगत अजुन यायचे आहे की मी धागा मिसला आहे?
तसच एकदा उत्सव झाला की मनोगत, पोल्,निकाल, प्रशस्तिपत्रक हे सगळ फारतर एका आठवड्यात व्हावे नाहितर त्यातला चार्म निघुन जातो.

मिपावर आयडी मास्कड शशक स्पर्धा पाहिली आहे. स्पर्धेचे वातावरण वगैरे काही इश्यू येत नाही. पण संयोजक मंडळींवर अती जास्त काम पडते. प्रत्येक गोष्ट वाचा, त्यात त्यांनी ओळख उघड तर नाही ना केली बघा, नवीन धागे काढा हे काम फार वेळखाऊ आहे. तसे करायला कुणीच तयार होणार नाही पुढे पुढे आणि या स्पर्धा बंद पडतील. त्यापेक्षा यंदाच्या संयोजकांनी कल्पकतेवर भर दिला आणि लोकांना कामाला लावले हे आवडले.

समारोप आणि निकाल लवकरात लवकर व्हावा याच्याशी सहमत. पितृपक्ष संपून नवरात्र सुरू झाले की वातावरण वेगळेच असते. जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली - असे नको व्हायला Wink

प्रत्येक गोष्ट वाचा, त्यात त्यांनी ओळख उघड तर नाही ना केली बघा,
>>>>

म्हणजे माझी डोंगर जाळण्याची आणि शाहरूख शशक या दोन्ही एन्ट्री बाद झाल्या असत्या का? काय अर्थ उरला मग...
हे म्हणजे असे झाले की रोहीत शर्माला म्हणावे तू पुल शॉट मारायचा नाही, बुमराहला म्हणावे तू यॉर्कर टाकायचा नाही, कोहलीला म्हणावे तू शिवीच द्यायची नाही आणि ऋषभ पंतला तर कीपिंग करताना हाताची घडी तोंडावर बोट ठेवशील.. तरच तुम्हाला क्रिकेट खेळायची परवानगी देण्यात येईल ..

पण खरी मजा त्यातच तर असते, की तुमच्या कलाकृतीवर तुमची सिग्नेचर सोडून जाण्यात Happy

मुद्दा परत तोच आहे ज्याच उत्तर कोणी देत नाहीये...

मग स्पर्धे चां आग्रह का?? उपक्रमचं करावेत.. म्हणजे बाकी admin chi कामेही वाचतील.

तसेही यंदा मेम्स उपक्रम तुफान चालला...

स्पर्धा घ्यायच्या तर fairly घ्या... त्यावर ब्रेन स्टॉर्म करून उपाय शोधावेत.. अर्थात तेही धागे तुफान चालतील..

नाही तर उपक्रमही धमाल आणाताहेतच!

ऋन्मेऽऽष, पॉइंट आहे. जुने रेफ्रेंसेस कळण्यात जी मजा असते ती नसती आली. सगळ्याच शशक अगम्य झाल्या असत्या Wink

मुद्दा परत तोच आहे ज्याच उत्तर कोणी देत नाहीये...
मग स्पर्धे चां आग्रह का?? उपक्रमचं करावेत..
>>>

मी दिले आहे की माझ्या पहिल्याच पोस्टमध्ये उत्तर. त्यात लिहिले आहे की जर स्पर्धा खेळीमेळीत होत नसतील तर उपक्रम म्हणून राबवण्याचा पर्याय आहेच. पण उत्सवाला वादाचे गालबोट लागायला नको. ते जास्त महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठीच आहे त्या स्वरूपाच्या स्पर्धा स्विकाराव्यात आणि पुढे जावे असेही वाटते.

@ हपा हो,
एकदा सारे काही काटेकोरपणे व्हायला हवे हा हट्ट धरला की मग त्याला मर्यादा नसते. नुसते शशक नाही तर पाककृती सुद्धा ठोकळेबाज पद्धतीने लिहाव्या लागतील.

गेले दोन वर्षे लेखन स्पर्धेचे विषय कॉलेजचे मोरपिशी दिवस आणि फिटे अंधाराचे जाळे हे होते. त्या आधी कोविड अनुभव, लसीकरण वगैरे होते. या सर्वच विषयात कोण कसे आपली ओळख लपवून लिहीणार होते? की मग असे विषय सुद्धा बादच होणार. या प्रकारे स्पर्धा घेण्याच्या नादात किती किंमत चुकवावी लागेल..

तसेही प्रत्यक्षात या प्रकारच्या कुठल्याही स्पर्धेचा निकाल फेअर कधी लागूच शकत नाही. म्हणजे काही ना काही लूपहोल कायम राहणारच ते सोडा, पण ते देखील कितीही एफर्टस टाकून मिटवले तरी स्पर्धेचा निकाल लोकांच्या ओपिनियन आणि आवडीवरच ठरणार. जसे की मला पाकशास्त्रातले ओ की ठो कळत नाही, कोणाची पाकृ चांगली कोणाची वाईट हे जज करायची माझी मुळातच पात्रता नाही. पण तरीही मी मला मिळालेला मतदानाचा हक्क बजावतो आणि माझ्या आवडीने कोणाला तरी मत देऊन येतो. म्हणजे माझ्यासारखा स्वयंपाकघरात फारसा न फिरकणारा पाकशास्त्रातला अडाणी माणूस त्याचा विजेता ठरवतो. तर हे एखाद्या नंबरात मागे राहिलेल्या सुगरणीने का मनाला लावून घ्यायचे Happy

मला गेल्या चार-पाच वर्षात पाककृती स्पर्धा कोण जिंकले हे बिलकुल आठवत नाही. पण खाऊगल्ली वर कोणाचे फोटो छान छान पडतात हे माहीत आहे. गेल्या चार पाच वर्षात लेखन स्पर्धात कोणकोण जिंकले हे बिलकुल आठवत नाही. पण मायबोलीवर छान लिहिणारे कोण आहेत ही नावे चटचट तोंडावर येतील.
त्यामुळे कश्याला किती महत्त्व द्यायचे हे आपण लक्षात घेतले तर तितकेही अवघड नाही जे जसे आहे ते स्वीकारणे..

मला सध्या हपा, ऋन्मेष यांचीही मतं पटली. जर संयोजकांना भाराभार काम आणि व्याप पडणार असेल तर सगळे मागे सरतील.
इथे इतके मस्त मस्त पाककृती लिहिणारे आहेत.कल्पक फोटो,वेगवेगळ्या देशातल्या युक्त्या. (एकदा सगळेच जण बिझी होते आणि खूप प्रवेशिका आल्या नाहीत तेव्हा 3 एन्ट्री असलेल्या स्पर्धेत माझा तिसरा नंबर आला.ते सर्टिफिकेट अजूनही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलंय. Lol )

शशक च्या निमित्ताने अनेक आयडी लिहिते होतात हे आवडतं. सगळ्या वाचून होत नाहीतच.पण ज्यांचं शीर्षक लक्षवेधी असतं अश्या वाचल्या जातात.

एकंदर प्रसन्न माहोल, जास्त सहभाग हे जास्त महत्वाचं.

अनु चा मुद्दाही पटतोय, सयोजक त्याचे व्याप्,नोकरी साभाळुन उपक्रम्मकरतात त्यामूळे त्याना खुप काम पडावे हे नक्किच नकोय...असो, मला वाटत वेबमास्तराना ठरवु देत कुठला मध्यम मार्ग निघतोय का ते

मध्यम मार्ग - स्पर्धांना उपक्रम समजून गमतीत घ्यावे
उपक्रमांना स्पर्धा समजून शेरास सव्वाशेर भाग घ्यावा (सहभाग नोंदवावा) Light 1

स्पर्धा घ्यायच्या तर fairly घ्या... >>>> ह्या स्पर्धांमध्ये नंबर आला तर तुम्हांला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे की अ‍ॅकॅडमी अवॉर्ड की नोबेल प्राईज ? सोसायटीच्या मांडवात असतो तश्या प्रकारचा घरगुती, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणारा आपला हा मायबोलीवरचा गणेशोत्सव आणि त्यातल्या स्पर्धा. कधी कोणी संयोजनाच्या भुमिकेत असते कधी मांडवात हजेरी लावणाच्या. कधी काही जण अजिबात जमलं नाही/वेळ झाला नाही म्हणून केवळ प्रतिष्ठापनेच्या बीबीवर "मोरया"ची आरोळी ठोकून आणि संयोजकांना शाब्बासकी देऊन जातात. स्पर्धांच्या नियमांचं किती ते ताणायचं? आणि fairly म्हणजे काय इथे ना संयोजक काही पक्षपात करत आहेत ना अ‍ॅडमिन. मागे जेव्हा मान्यवर परिक्षकांना बोलावून लिखाणाच्या स्पर्धा घेतल्या होत्या, त्यावेळी गोपनीयता जपली होती. हे परिक्षक मायबोलीवरचे नव्हते आणि त्यांनी प्रवेशिका पिडीएफद्वारे पाठवल्या असं अ‍ॅडमिनांनी सांगितलं होतं (मी प्रत्यक्ष पिडीएफ वगैरे पाहिल्या नव्हत्या पण माझा अ‍ॅडमिनांवर विश्वास आहे). पण तो उपक्रम वेगळा. प्रत्येकवेळी हे एव्हडं सगळं करणं शक्य नसतं आणि त्या त्या वेळी जे संयोजक संयोजनाबाबत निर्णय घेतील तो मान्य करावा. आणि लोकप्रियतेमुळे मतं मिळतात असं जर वाटत असेल तर आपली लोकप्रियता वाढवा (त्याचे बरेच मार्ग आहेत. Proud ). अगदी अमेरिकन पद्धतीप्रमाणे बोलायचं झालं (if I were you type) तर "एव्हडा त्रास होत असेल तर मी भागच घेणार नाही". इतक्या वर्षात मी जेव्हडं बघितलय त्यानुसार चांगल्या कलाकृतींना मायबोलीवर नेहमीच दाद मिळते, मग ती कोणीही लिहिलेली असो.

पराग अगदी सहमत. हेच लिहायला आले होते.
ह्या स्पर्धा ऑलिम्पिक च्या आहेत का ? किती वितंड वाद त्या वरून ? आहेत त्या स्वरूपात त्याची मजा घ्या ना ...
बरं अगदी नाव लपवून आल्या प्रवेशिका तरी तुम्ही म्हणालच लिहिण्याची स्टाईल ओळखून , बशी ओळखून समजलं कोणाची रेसिपी आहे ते आणि म्हणून मत दिलं.. ह्याला अंत नाहीये.

संयोजकांना यंव करा आणि त्यंव करा हे सांगून त्यांचं काम वाढविण्यापेक्षा तुम्हीच फेअरली मतदान करा ना ... संयोजक त्यांची स्वतःची नोकरी आणि इतर उद्योग करून हे अधिकच काम करत असतात. त्यांचं काम कशाला वाढवत आहात ? त्या पेक्षा स्वतःच्या निरपेक्षपणे मत द्यायच्या बुद्धीला कामाला लावा. आणि ते नसेल जमत तर जे चाललं आहे ते बरच आहे म्हणून जमलं तर आनंदाने त्यात भाग घ्या.

इतक्या वर्षात मी जेव्हडं बघितलय त्यानुसार चांगल्या कलाकृतींना मायबोलीवर नेहमीच दाद मिळते, मग ती कोणीही लिहिलेली असो.>>+१
स्वतःची एंट्री असूनही दुसर्‍या मायबोलीकराची प्रवेशिका आवडली म्हणून दुसर्‍याला मतदान करणारे मायबोलीकर पण बघितलेत इथे.

या स्पर्धा असल्या तरी स्पर्धेला उपक्रम समजूनच इथे भाग घेतात बहूतेक सगळे.

स्वतःची एंट्री असूनही दुसर्‍या मायबोलीकराची प्रवेशिका आवडली म्हणून दुसर्‍याला मतदान करणारे मायबोलीकर पण बघितलेत इथे.>>>>

+१

यावेळेस तिसऱ्या शशकमधे माझ्या स्वतःच्या शशक असून पण मी रीयाच्या शशकला मत दिलं…. मला ती शशक जाम फनी वाटली.

(हे या धाग्यावर लिहावं की नको हे माहीत नाही…. पण मा कित्ती मोठ्ठा त्याग केलाय हे कुठेतरी Show off करायचं होतं. Proud )

Submitted by पराग on 21 September, 2024>>>> एवढी पर्सनल लेवलची कॉमेंट का केलीय समजले नाही.

माझ्या original post मध्ये फक्त जे खटकल किंवा प्रश्न पडले तेवढं नमूद केलं आहे. ( ज्यावर खर तर आक्षेप घेण्याची गरज दिसत नाही... कारण तेवढं व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असतंच)

त्यावर अनेकांनी त्यांची मात्र मांडली त्याओघाने काही कॉमेंट्स होत राहिल्या..

Original Post
आताच शशक मतदानाचा धागा बघितला.

गेल्या वेळी पण १ - २ वेळेच्या स्पर्धा बघितलेल्या..
तेव्हा जाणवलं, की एखाद कविता / लेख खरंच खूप छान होती/ होता, पण तितकेसे ते लोकप्रिय किंवा माबोप्रिय नसावेत, त्यामुळे ते जिंकले नव्हते.
पण बऱ्याचदा जे आयडी प्रसिद्ध किंवा लोकप्रिय आहेत त्यांचेच लिखाण उचलून धरले जाते किंवा खर तर मुळात वाचले जाते.

मला उत्सुकता आहे की संयोजकांचा ह्या मागे काय आणि कसा विचार असतो/ आहे. ही स्पर्धा लोकप्रियतेची असते की लिखाणाची असते? मतदान करताना मतदाराने सगळ्या प्रवेशिका वाचल्यात का ह्याची काहीच खात्री नसताना केलेले मतदान हे fair SEL का??

मागील वर्षापासून हा प्रश्न डोक्यात होता... आता तो धागा बघून आठवला.

यावेळेस तिसऱ्या शशकमधे माझ्या स्वतःच्या शशक असून पण मी रीयाच्या शशकला मत दिलं…. मला ती शशक जाम फनी वाटली.

(हे या धाग्यावर लिहावं की नको हे माहीत नाही…. पण मा कित्ती मोठ्ठा त्याग केलाय हे कुठेतरी Show off करायचं होतं. Proud )>>>

माझी शशक असून मीही दुसरीला मत दिलं कारण मला तिची जास्त चांगली वाटली म्हणून ... तुमच्या शो ऑफ वर माझा झब्बू Happy

एक शशक माझी मलाही आवडली नाही.. आता बोला Happy

एवढी पर्सनल लेवलची कॉमेंट का केलीय समजले नाही. >>>> माझ्या पोस्टमध्ये कुठलीही पर्सनल गोष्ट लिहिलेली नाही. जे सगळं आहे ते मायबोली गणेशोत्सवाबद्दल किंवा स्पर्धांबद्दलच्या तुमच्या आक्षेपाबद्दल आहे. पर्सनल काही लिहायला तुमच्या बद्दलची कोणतीही पर्सनल गोष्ट मला माहित नाही, ते माहित असायचं कारण नाही आणि माहित करून घ्यायची इच्छा/गरजही नाही.

एकंदर काही जुन्या जाणत्या लोकांचं मत आहे की जसं चालत आले तस चालू राहू दे. त्यात कोणतेही किंतू परंतु, शंका किंवा तुमची (विरोधी) मते मांडू नका.

आम्ही मोठे लुतूपुटु च्या स्पर्धा खेळणार आहोत ( मजा म्हणून) आमची करमणूक म्हणून, त्याला तेव्हढ्याच गांभीर्याने ( म्हणजे माझे मजेने) घ्यायचं तर घ्या नाही तर शांत गप गुमान बसा.

जशी तुमची इच्छा !

स्पर्धांमध्ये नंबर आला तर तुम्हांला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे की अ‍ॅकॅडमी अवॉर्ड की नोबेल प्राईज....

पूर्ण नोट पेस्ट केली नाहीये....

जनरल बोलणं चाललेलं त्यात वैयक्तिक कॉमेंट करायची गरज नाहीये

मी पण करते मग शो ऑफ! मी विचार केला आपली शशक फार भारी नाही तर ती तशी पण जिंकणार नाहीये म्हणून मग मी पण अतरंगी प्रवेशिकेला मत दिलं Lol

बाकी पराग, ममो +१

छन्दीफंदी, पुढच्या वर्षी संयोजनात संयोजक म्हणून या आणि तुम्हाला वाटतायेत ते बदल करा. कसा रिस्पॉन्स मिळतो पाहूया. चांगले बदल झाले तर नक्कीच स्वागत होईल.
या वर्षी स्पर्धा का उपक्रम का वगैरेचं सोप्पं उत्तर - संयोजकांना वाटलं म्हणून. त्यांचा खेळ, त्यांचे नियम.
तुम्हाला बदल हवा असेल तर तुम्ही सुरुवात करा.

Pages