मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 September, 2024 - 06:42

मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा :

यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.

मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/85615

आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/85598

बाप्पाचा नैवेद्य
https://www.maayboli.com/node/85599

सांस्कृतिक कार्यक्रमः-

माझी कलाकारी
https://www.maayboli.com/node/85614

लहान मुलांचे उपक्रम:

चित्रकला: माझी आवडती गाडी
https://www.maayboli.com/node/85608

चित्रकला: माझे आवडते कार्टून
https://www.maayboli.com/node/85607

हस्तकला: गणपतीसाठी पताका/ तोरण तयार करणे
https://www.maayboli.com/node/85609

मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:

शहाणे करुनि सोडावे। सकल जन।।
https://www.maayboli.com/node/85604

माझे स्थित्यंतर
https://www.maayboli.com/node/85595

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: १: दृष्य
https://www.maayboli.com/node/85610

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: २: पाऊस
https://www.maayboli.com/node/85631

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम
https://www.maayboli.com/node/85666

मोठ्यांसाठी कला उपक्रम:

नैसर्गिक संसाधनांमधून गणेश
https://www.maayboli.com/node/85592

पाककृती स्पर्धा:

One Dish Indian Meal
https://www.maayboli.com/node/85583

चटण्या
https://www.maayboli.com/node/85585

आरोग्यवर्धक पेये
https://www.maayboli.com/node/85584

गंमतखेळ

मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स
https://www.maayboli.com/node/85605

जुनी कढई, नवीन उपमा
https://www.maayboli.com/node/85597

गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?
https://www.maayboli.com/node/85606

प्रकाशचित्रांचे झब्बू

निसर्गनिर्मित सममिती
https://www.maayboli.com/node/85611

देवघर
https://www.maayboli.com/node/85612

श्रीमंती माझ्या नजरेतून
https://www.maayboli.com/node/85613

माझे शेत/ माझी बाग
https://www.maayboli.com/node/85693

सर्वसिद्धिकर प्रभो!
https://www.maayboli.com/node/85539

गणेशोत्सव विशेष लेख - भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे - (हरचंद पालव)
https://www.maayboli.com/node/85673

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा संयोजकच अपडेट करत राहतात. कोणी इथे प्रतिसाद देत नाही. असा शून्य प्रतिसाद धागा गणपतीत बरा दिसत नाही त्यामुळे हा प्रतिसाद Wink

पण खरेच छान स्पर्धा उपक्रम कार्यक्रम आहेत यावेळी.. रंगला आहे माहौल Happy

संयोजक - शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम या विषयाचा धागा द्याल का प्लीज? कारण पाऊस विषयाचा धागाच इथेही रिपीट झालाय बहुदा.

खरोखर अगदी रोचक आणि रंजक उपक्रम आहेत. ( शशक मात्र स्पर्धा असल्याने लिहिण्याचं जरा लांबणीवर टाकतेय. हो. रथीमहारथी उतरलेले असताना जरा कठीणच वाटतंय. :स्मित:)

रथीमहारथी उतरलेले असताना जरा कठीणच वाटतंय>> गेल्या वेळच्या तुमच्या शशक/ कविते नंतर मला तुम्ही राठी महारथी पैकीच वाटता Happy

एक मत..

यावेळी शशक चा अंत दिलाय आणि सुरुवातीची शशक लिहायची आहे.

बऱ्याचशा श श क मध्ये शेवट ओढून ताणून त्या वाक्याने केल्यासारखे वाटले.. बहुदा शेवट ठरवला असल्याने लेखकाला घातलेली / आलेली मर्यादाही कारण असावे.
काही कथा छान आहेत पण त्यात शेवटचे वाक्य त्यात तेवढे जात नाही असे वाटून गेले.

सामान्यत: शेवट हा उचांक ( क्लायमॅक्स) / कलाटणी देणारा असतो, त्यात वैविध्य साधता न आल्यामुळे अस वाटतं असेल.

***

अजुन एक जाणवलं

ह्या स्पर्धा/ उपक्रम गणपती उत्सवाचा भाग म्हणून करतोय.
काही कथा रंजक आहेत पण किंचित गणेशोत्सवाच औचित्य राखणाऱ्या नाहीत असं ही वाटून गेलं.

म्हणजे पूर्वी गणपतीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमात उगाच द्वायअर्थी / अश्लील / गाणी लावून नृत्य सादर केलं गेलं तर एखादी आठी चढते तसच काहीसं..

***

Memes chi कल्पना भन्नाट.. एकाहून एक सरस memes येतायत.

"स्थित्यंतर" हा विषय ही आवडला.

>>>>>>काही कथा रंजक आहेत पण किंचित गणेशोत्सवाच औचित्य राखणाऱ्या नाहीत असं ही वाटून गेलं.
म्हणजे पूर्वी गणपतीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमात उगाच द्वायअर्थी / अश्लील / गाणी लावून नृत्य सादर केलं गेलं तर एखादी आठी चढते तसच काहीसं..

नोटेड!! खरे आहे.

छन्दिफन्दि, कौतुक पोहोचलं हं.
गणेशोत्सवात माबोवर येण्यासाठी हे शशक निमित्त मला फार आवडतं. एरवी निमित्त लागतंच असं नाही.

एकसे बढकर एक उपक्रम होते सगळे.
गणेशोत्सव मध्ये उत्साह आणि उर्जा असतेच,
ह्यावेळी meme धाग्याने जास्त धमाल आली.
सगळ्या संयोजकांना दंडवत.

आताच शशक मतदानाचा धागा बघितला.

गेल्या वेळी पण १ - २ वेळेच्या स्पर्धा बघितलेल्या..
तेव्हा जाणवलं, की एखाद कविता / लेख खरंच खूप छान होती/ होता, पण तितकेसे ते लोकप्रिय किंवा माबोप्रिय नसावेत, त्यामुळे ते जिंकले नव्हते.
पण बऱ्याचदा जे आयडी प्रसिद्ध किंवा लोकप्रिय आहेत त्यांचेच लिखाण उचलून धरले जाते किंवा खर तर मुळात वाचले जाते.

मला उत्सुकता आहे की संयोजकांचा ह्या मागे काय आणि कसा विचार असतो/ आहे. ही स्पर्धा लोकप्रियतेची असते की लिखाणाची असते? मतदान करताना मतदाराने सगळ्या प्रवेशिका वाचल्यात का ह्याची काहीच खात्री नसताना केलेले मतदान हे fair SEL का??

मागील वर्षापासून हा प्रश्न डोक्यात होता... आता तो धागा बघून आठवला.

तांत्रिक अडचणी मुळे मतदानाच्या धाग्यावरच्या लिंका क्लिकेबल करता येत नाहीत. ही जूनीच अडचण आहे. धागा शोधायला सोपे व्हावे म्हणून लिंक दिली आहे. उदा हे पहा.
https://www.maayboli.com/node/63828 किंवा
https://www.maayboli.com/node/80221

मागील वर्षापासून हा प्रश्न डोक्यात होता... आता तो धागा बघून आठवला.
Submitted by छन्दिफन्दि on 21 September, 2024 - 05:11>>>>>>>
+1000
मी पण गेल्या वर्षी किँवा त्यामागे कधीतरी असाच प्रश्न उपस्थित केला होता... यावर उपाय म्हणून सारे स्पर्धक आपापल्या entries संयोजक मंडळाला पाठवतील आणि संयोजक त्या स्पर्धेअंतर्गत प्रकाशित करतील म्हणजे मतदान करताना कोणताही पूर्वग्रह राहू शकणार नाही. स्पर्धा संपल्यावर लेखकांची/स्पर्धकांची नावे जाहीर करता येतील. असे सुचवले होते.
पण या सूचनेला विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे पुढे काही घडले नाही.

तसेच आणखी एक वाटते ते सांगते. मायबोली गणेशोत्सव
अंतर्गत जे उपक्रम असतात ते एक प्रकारचे एकाच धाग्यावर टाकता येईल की. जसे की यावर्षीचा उपक्रम नैसर्गिक संसाधने वापरून केलेले गणपती सगळे एकाच धाग्यावर बघता येतील. किँवा छोट्यांची चित्रे सारी एकत्र राहतील. यामधे काही चुकून बघण्याचे राहून जाणार नाही.
अर्थात हा माझा वैयक्तिक PoV आहे.. संयोजक मंडळानी विचार करावा अशी विनंती.

छंदीफंदी +++
मी पूर्ण सहमत आहे. हे असेच घडताना बघितले आहे.
आयडी मास्क करून लिखाण पब्लिश करण्याची आयडिया छान आहे.

वरील सर्वांच्या मताचा आदर आहे पण मला फार काही पटली नाही ही कल्पना. याने उत्सवाचे स्वरूप जाऊन स्पर्धेचे स्वरूप येईल.
आधीच काय आजूबाजूला जीवघेणी स्पर्धा कमी आहे जे इथेही पुन्हा तेच वातावरण. एखादी कथा लेख पाकृ वाचावी आणि त्या मायबोलीकराला तेव्हाच्या तेव्हा दाद द्यावी. जर सादर करणारे आपण असू तर इतर मायबोलीकरमित्रांची दाद घ्यावी. हे सारे उत्स्फूर्त घडले पाहिजे आणि एकमेकांपर्यंत तेव्हाच्या तेव्हा पोहोचले पाहिजे. आनंद यातून आला पाहिजे न की मिळालेल्या बक्षीसातून. जर हे जमत नसेल तर स्पर्धा बंद करून मग सरळ उपक्रम म्हणून सुरू ठेवावे.

अजून एक मुद्दा म्हणजे,
जुन्या जाणत्या लोकप्रिय आयडीना मते जास्त मिळेनात पण नवीन आयडी जेव्हा या उपक्रमात भाग घेतात तेव्हा त्यांना ओळख मिळते. समजा हे सारे गुप्त प्रकारे केले तरी एखाद्या नवीन जिंकलेल्या आयडीला ती ओळख निकालापश्चात मिळेलही. पण न जिंकलेल्या नवीन आयडीला ना बक्षीस मिळणार ना त्याच्या नावाने धागा प्रकाशित झाल्याने ओळख मिळणार. अश्याने मायबोलीकरांशी त्याचा परस्परसंवाद होणार तरी कसा.

बाकी पुढे मागे यावर विचार करायचा झाल्यास बहुमताचा कल लक्षात घेऊन संयोजक आणि मायबोली प्रशासन काय ते ठरवतीलच,
पण माझे मत म्हणाल तर मी मायबोलीवर आजवर इतके वर्षे आणि खोऱ्याने धागे काढले आहेत. पण आजही दरवेळी मला धागा प्रकाशित करताना आणि त्यानंतर त्यावर थेट मला उद्देशून आलेले प्रतिसाद वाचताना एखाद्या लहान मुलासारखा जो आनंद होतो तो मला तरी गमवायचा नाहीये Happy

मागील वर्षापासून हा प्रश्न डोक्यात होता... आता तो धागा बघून आठवला.

नवीन Submitted by छन्दिफन्दि>> +१११ चांगली सूचना आहे.

ऋन्मेऽऽषच्या पूर्ण प्रतिसादासाठी +१
उत्सवाचे स्वरूप जाऊन स्पर्धेचे स्वरूप येईल.
हा मुद्दा महत्वाचा आहे.
आणि नवलेखकाना ओळख मिळणे हा विचार सुद्धा पटला.

बिन-आयडीचे पब्लिश केलं तरीही लेखक आपापल्या वर्तुळात सांगू शकतात ना की अमुकतमुक माझी कथा आहे.

मजेमजेत घ्या स्पर्धा आणि पुरस्कार. दोन दिवसांनी कोणाच्याही लक्षात रहात नाही.

मी उपयुक्त सूचना देते Lol
सगळ्या शशक लेखकांकडून 5 रु फी घेऊन पहिल्या 3 विजेत्यांना500 ची अमेझॉन व्हाउचर(गंमत हां)

अर्थात हा माझा वैयक्तिक PoV आहे.. संयोजक मंडळानी विचार करावा अशी विनंती.

नवीन Submitted by मनिम्याऊ on 21 September, 20>>> +1

कारण नंतर नंतर सगळं बघितलं पण जात नाही....

Pages