Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हैदर मलाही आवडला होता. पण तो
हैदर मलाही आवडला होता. पण तो एकांगी आहे हेही खरंच आहे.
(No subject)
यही एक बाफ बचा था, यहा भी शुरू हो गया?
हे दयाघना, हे विधात्या!
आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं रे?
अरे मिम्स चा धागा इथे मिसळला
अरे मिम्स चा धागा इथे मिसळला होय!!
उजव्यांच्या मुद्द्याबद्दल सहमत माझेमन.
गेल्या विकांताला सहज टाइमपास
गेल्या विकांताला सहज टाइमपास म्हणून धर्मेंद्रचा 'कर्तव्य' बघितला. (सध्या एकही ओटीटी सब्स्क्राइब केलेलं नाही, त्यामुळे)
फॉरेस्ट ऑफिसर धर्मेंद्र पोचर्सविरुद्ध कसा लढा देतो ही स्टोरी.
जंगलं, जंगली प्राणी आपल्यासाठी का महत्त्वाचे हे सुरुवातीला जंगल विभागातल्या अधिकार्यांना (आणि प्रेक्षकांनाही) सविस्तर समजावून दिलं आहे. पर्यावरण, जमिनीची धूप वगैरे
पोचर्सच्या थीमवरचा टिपिकल बॉलिवूड मसाला सिनेमा आहे.
उत्पल दत्त व्हिलन. त्याला रात्री जंगलात २-४ पोचर्स वाघाची कातडी दाखवतात- कापडाच्या दुकानातले विक्रेते कापडं दाखवतात तसं
त्या काळाच्या मानाने स्टंट्सवर मात्र बर्यापैकी मेहनत घेतली आहे. त्यामुळे बघायला त्यातल्या त्यात मजा येते.
"कर्तव्य सिनेमात धर्मेंद्रने वाघाशी मारामारी केली आहे," असं तेव्हा इतक्या जणांकडून इतक्या वेळेस ऐकलं होतं, की मला बाकी काही नाही तर ती मारामारी तरी बघायचीच होती.
वाघाशी मारामारी आहे खरी, रादर वाघांशी आहे.
व्हिलनची माणसं पिंजर्यांचे दरवाजे उघडतात, सगळे वाघ बाहेर पडतात आणि बस्तीवाल्यांवर हल्ला करतात. धर्मेंद्र तिथे येतो. आणि सगळे वाघ एकेक करत जेरबंद करतो, मग फॉ.कर्मचारी वाघांवर जाळी टाकत जातात.
रेखा वाइल्ड लाइफ फोटोग्राफर. ती पिंजर्यातल्या वाघ-सिंहाचे फोटो काढत असताना धर्मेंद्र तिला म्हणतो खुल्यातल्या प्राण्यांचे फोटो काढण्यात खरा चॅलेंज. त्यावर ती म्हणते तसे फोटो सगळेच वा.फो. काढतात. पिंजर्यातल्या प्राण्यांचेच कुणी काढत नाही.
वाघांशी मारामारी झाल्यावर रेखा जखमी धर्मेंद्रचं ड्रेसिंग करताना गाणं आहे. ते बर्यापैकी इरॉटिक वगैरे करण्याचा प्रयत्न केलाय. रेखाने आपल्या बाजूने पुरेपूर सहभाग नोंदवण्याची खटपट केलीय. पण धर्मेंद्रला असलं काही जमत नाही. तो पूर्ण गाण्यात (आणि सिनेमातही) ठोकळाच दिसतो.
इथे कंटिन्युटी जराशी गंडली आहे. वाघांशी मारामारी आणि इरॉटिक ड्रेसिंग यांच्यामध्ये तो पिंजरे-फोटोग्राफीचा सीन आहे. तिथे धर्मेंद्रच्या जखमा वगैरे दिसत नाहीत. त्यानंतर लगेच ड्रेसिंग-गाणं सुरू होतं.
साऊथच्या सिनेमाचा रिमेक आहे असं तिथल्या कमेण्ट्सवरून कळलं.
ललिता प्रीति >>>
ललिता प्रीति >>>
फारएंड, अस्मिता, श्रद्धा, पायस लोकहो इकडे लक्ष द्या. वीकेंड येतो आहे. त्याचा सदुपयोग करा.
ती पिंजर्यातल्या वाघ-सिंहाचे
ती पिंजर्यातल्या वाघ-सिंहाचे फोटो काढत असताना धर्मेंद्र तिला म्हणतो खुल्यातल्या प्राण्यांचे फोटो काढण्यात खरा चॅलेंज. त्यावर ती म्हणते तसे फोटो सगळेच वा.फो. काढतात. पिंजर्यातल्या प्राण्यांचेच कुणी काढत नाही.>>>>
जंगलात २-४ पोचर्स वाघाची कातडी दाखवतात- कापडाच्या दुकानातले विक्रेते कापडं दाखवतात तहाहा
कर्तव्य यु ट्यूबवर तुकड्यात
कर्तव्य यु ट्यूबवर तुकड्यात पाहिला आहे. बहुतेक मां, हाथी मेरे साथी वाल्या देवल / र फिल्म्सची हिंदीतली पहिली कामगिरी आहे.
गाणे पाहिले. बिचारी रेखा किती
गाणे पाहिले. बिचारी रेखा किती कोशिश करून ऱ्हायली. धर्मेंद्र आधी ताप आल्याने डोळे मलूल झाल्यासारखा, मग उघडा असल्याने थंडी वाजत असल्यासारखा वावरला आहे. कदाचित हे गाणं पिक्चराईझ केल्यावर दोन दोन घरी झाडूने मार खावा लागेल असं वाटत असणार त्याला.
आणि वाघाशी लढाई केल्यावर कपाळावर एक छोटीशी पट्टी आणि रेखाचे अरमान पुरे झाल्यावर पार काखेपासून गळ्यापर्यंत पट्टी? नक्की कोण डेंजरस असणं अपेक्षित आहे इथे?
परत सिक्वेन्स गंडलाय. हिंदी चित्रपटांच्या नॉर्म्सप्रमाणे 'कभी साथ नही छोडोगे, तुम मेरी कसम खाओ' झाल्यानंतर 'मैं तुम में समा जाऊँ, तुम मुझ में समा जाओ' असणे अपेक्षित आहे. इथे उलटंच. त्यात ते धुकं.
कुठल्या क्षणी रेखा आपले सुळे बाहेर काढेल याची वाट पाहत होते मी.
कर्तव्य बर्यापैकी चाललेला..
कर्तव्य बर्यापैकी चाललेला.. रेखाचे ते गाणे तेव्हा खुप ऐकायला यायचे. मि. नटवरलाल पण तेव्हाचाच बहुतेक. रेखा तेव्हा हिट होती.
Arrival मागे बघितलेला तेव्हा
Arrival मागे बघितलेला तेव्हा समजला नव्हता आणि त्यामुळे आवडला नव्हता. आज परत बघितला. समजला आणि आवडला.
>> अरायवल जाम आवडला.
पुस्तक आवडले असूनही आवडला.
पुस्तक वाचले नसेल तर नक्की वाचा. भन्नाट आहे.
स्टोरी ऑफ युअर लाइफ - बाय टेड चिआंग - भन्नाट!
मीम
मीम
ललिता प्रीती, धमाल पोस्ट.
रेखाचे अरमान पुरे झाल्यावर पार काखेपासून गळ्यापर्यंत पट्टी? नक्की कोण डेंजरस असणं अपेक्षित आहे इथे?
>>> गाणे बघितले नाही पण 'अरमान' शब्दानी विचारात पाडले.
दुःख वाटल्याने हलकं होतं
दुःख वाटल्याने हलकं होतं म्हणतात. >>> Lol
मग प्लीज..bad newz पण पहा...!
मी प्राईम वर पाहिला..पण का? का? का पाहिला?
अतिशय अ आणि अ आहे.. लॉजिक च दूरदूर पर्यंत पत्ता नाही.!
विकी कौशल ने हा सिनेमा का केला असेल? पण का? का? का?
जाणकारांनी ह्याची चिरफाड केली तर दोन तीन भागात लिहू शकतील..
लप्री वाघाची २-४ कातडी!
लप्री वाघाची कातडी दाखवतात!
माझेमन गाणं ( आणि पिक्चरही ) बघायला हवा.
त्यावर ती म्हणते तसे फोटो
त्यावर ती म्हणते तसे फोटो सगळेच वा.फो. काढतात. पिंजर्यातल्या प्राण्यांचेच कुणी काढत नाही. >>>
आणि वाघाशी लढाई केल्यावर कपाळावर एक छोटीशी पट्टी आणि रेखाचे अरमान पुरे झाल्यावर पार काखेपासून गळ्यापर्यंत पट्टी? नक्की कोण डेंजरस असणं अपेक्षित आहे इथे? >>>
जंगलात २-४ पोचर्स वाघाची कातडी दाखवतात- कापडाच्या दुकानातले विक्रेते कापडं दाखवतात तहाहा >>>
धमाल दिसतोय
अपारशक्ती खुराना, राहूल बोस
अपारशक्ती खुराना, राहूल बोस अशी स्टारकास्ट असलेला झी५ वरील बर्लीन सिनेमा पहायला घेतला. ससा कासवाच्या शर्यतीतल्या सश्यापेक्षा स्लो आहे आणि प्लॉटही खूप अॅवरेज आहे. वेळ जात नसेल तरी बघू नका...
bad newz >> +१ १० मिन वर पाहू
bad newz >> +१ १० मिन वर पाहू शकले नाही. काहीही अतर्क्य आहे. रॉकी रानी सारखी फेमिनिस्ट पण बिंडोक सुद्धा असेच लीड स्त्री कॅरॅक्टर आहे..
विकी कौशल ने हा सिनेमा का
विकी कौशल ने हा सिनेमा का केला असेल? पण का? का? का? >> स्वतःच्या डान्स स्किल्स तपासून पाहायला, " तोबा तोबा" च्या निमित्ताने.
कुठल्या क्षणी रेखा आपले सुळे बाहेर काढेल याची वाट पाहत होते मी. >> हा हा, मी इमॅजिन केलं हे.
त्याला रात्री जंगलात २-४ पोचर्स वाघाची कातडी दाखवतात- कापडाच्या दुकानातले विक्रेते कापडं दाखवतात तसं>>भयंकर:-))..
पूर्ण रिव्ह्यूच छान आहे. पाहायला हवं.
बर्लिन बघितला , बरा आहे.
बर्लिन बघितला , बरा आहे.
९३ मध्ये वायरलेस टेलिफोन होते का? तो पुष्कीन चक्क टेबलफोन उचलून दुसर्या खोलीत घेऊन गेला.
बर्लिन >> साधारण स्टोरीलाईन
बर्लिन >> साधारण स्टोरीलाईन काय आहे?
वेळ जात नसेल तरी बघू नका... >
वेळ जात नसेल तरी बघू नका... >>
ललिता-प्रीति
वेळ जात नसेल तरी बघू नका... >
दोनदा
>>९३ मध्ये वायरलेस टेलिफोन
>>९३ मध्ये वायरलेस टेलिफोन होते का? तो पुष्कीन चक्क टेबलफोन उचलून दुसर्या खोलीत घेऊन गेला.
वायर्ड फोनच होते, फक्त त्यान्ची वायर खूप मोठी असायची. माझ्या मित्राच्या वडिलांच्या वर्क शॉप मध्ये होता एक असा लांब वायरचा फोन.
शोलेपूर्व आणि लगान, ताल,
शोलेपूर्व आणि लगान, ताल, गदर पश्चात चित्रपट फारसे बघितले जात नाहीत.
मधुबालाला पाहिलं कि वाटतं त्या वेळचं पब्लिक फारच सुदैवी. त्या वेळच्या लोकांना ऐश्वर्या, माधुरी, सोनाली ला बघून वाटत असेल असंच. सोनालीला सुनील शेट्टीची हिरॉईन बघून काळजाला प्रचंड वेदना व्हायच्या. पण या वेदना शीतल वाटाव्यात असं एक गाणं सापडलं.
https://www.youtube.com/watch?v=RskyUU1oA4E
एक वेळ सुशे परवडला, पण यातला नायक जो म्हणे देशाचे भूषण आहे, तो मधुबालाबरोबर ? त्याला बघून मधुबाला म्हणते " इक परदेसी मेरा दिल ले गया ? "
त्याचा खांदेउडूउडू डान्स विलक्षण आहे, या गाण्यातल्या गेट अप शिवाय त्याला पाहिले कि आपोआप डोळ्यातून अश्रू झरू लागतात. नासिर हुसेन आणि हा नायक यांचे चेहरेच इतके करूण आहेत. नासिर हुसेन किमान अभिनयात कुशल तरी होते. तर हा नायक या गेट अप मधे पाहिल्यावर अनेक राजस्थानी किराणा आणि मिठाईच्या दुकानातले चेहरे आठवले जे झाडू मारून लगेचच त्याच हाताने मिठाई उचलून ग्राहकाला देतात.
म्हणतात ना आपल्यापेक्षा आधीच्या पिढीने खूप भोगलंय. अगदीच प्रत्यय आला याचा.
सौंदर्याला दूषणांचा शाप असतो.
लहान मुलाला नजर लागू नये
लहान मुलाला नजर लागू नये म्हणून काजळाचा ठिपका लावतात किंवा पॉश शोरुमसमोर चप्पल बांधून ठेवतात तसं मधुबाला स्क्रीनवर असताना अपशकून नको म्हणून असं करत असावेत.
नृत्यातून मिळणारा आनंद सापेक्ष असतो. राकुचा चिपळ्या डान्स पाहिलात ( साधारण ४ः३५ पासून पुढे ) तर तुम्हांला हा खांदेउडवू डान्स चांगला वाटू शकेल.
माझेमन, हे आता दिलंयस गाणं,
माझेमन, हे आता दिलंयस गाणं, ते उत्तम hiit आणि बर्पि वर्कआऊट बनू शकेल.बसणे, हात वर, उड्या मारणे, स्क्वॅट इत्यादी
मा़झे मन
मा़झे मन
त्या डान्सची दोन समर्थने
१. (अध्यात्मिक) - नायक त्याचा देह सोडून सूक्ष्म देहाने नृत्यासाठी सज्ज झाला आहे. पण देह नसल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा येत आहेत हे स्पष्ट जाणवत आहे.
२. (ऐतिहासिक) - राजकुमार चित्रपटात येण्याआधी पोलीस दलात होता. तिथल्या कवायती, जोरबैठका आणि रायफल डोक्यावर धरून धावण्याने त्याचे शरीर मोडेन पण वाकणार नाही इतपत कडक झालेले असल्याने त्याच्या नृत्यात कवायती येणे स्वाभाविक आहे.
अनु, र आ
अनु, र आ
तिसरं समर्थन (आध्यात्मिक - सुख दुःख समे कृत्वा) सुखाची अपेक्षा (मीना कुमारीचा रोमॅंटीक डान्स) करताना आयुष्यात अनपेक्षित धक्क्यांना पचवणं भाग पडतं या अविनाशी सत्याची प्रेक्षकांना जाणीव करून देणं हे दिग्दर्शकाने फारच मनावर घेतलं असू शकतं.
आचार्य आणि माझेमन,
आचार्य आणि माझेमन,
एकवेळ सुशे परवडला असे कसे म्हणू शकता तुम्ही ? सुशे आणि भाभु सामान्य माणसाला परवडत नाहीत. कल्पनाही नको.
गाणी आध्यात्मिक नसून सुशे आणि भाभु हे स्वतःच या भुतलावरचे योगी आहेत. त्यांनी नअभिनयातून 'निष्काम कर्मयोग' साधला पण तुमचं लक्ष षड्रिपूंनी नियंत्रित, तुम्हाला योग्यांची किंमत ती काय कळणार. मग एक 'परदेसी मेरा दिल लेगया, जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात' यांतले भाभु असो वा 'आंखोमें बसे हो तुम, शहर की लडकी/ सुंदरा सुंदरा/ हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय' मधला सुशे त्यांनी प्रेक्षकांना मोहापासून परावृत्त करण्यासाठी जे केलेय त्याला तोड नाही. निदान मंदिर बांधणे होत नसेल तर जेथे आहात तेथून नमस्कार करा त्यांना.
‘पिक्चरमधे रोल करत रहा,
‘पिक्चरमधे रोल करत रहा, प्रेक्षकांपर्यंत पात्राच्या भावभावना पोहोचल्यात का याकडे लक्ष देऊ नकोस’अशी निष्काम कर्मयोगाची सोपी व्याख्या प्रत्यक्ष कृष्णानेही केली नसेल. हे गुरूमैय्या आम्हां पामरांचे डोळे उघडलेस. तुझे आभार कसे मानू?
हसून मान.
हसून मान.
एक कन्फेशन 'हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय' माझे आणि मैत्रिणींचे आवडते गाणे होते, शाळेत असताना सहलीच्या बसमधे सतत गाऊन बाईंना डोकेदुखी दिली होती. 'तुम्ही कुठेच घेऊन जायच्या लायकीच्या नाहीत' असे त्या आम्हाला नंतर म्हणाल्या.
Pages