Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
* सूत्रपात >>> भारीच !
* सूत्रपात >>> भारीच !
*मजेशीर संवाद. अश्विन चितळे
*मजेशीर संवाद. अश्विन चितळे यांचा
>>> छान अभ्यासपूर्ण.
पूर्वी त्यांची एक अन्य मुलाखत ऐकली होती
तुमुल
तुमुल
= घनघोर; भयंकर ( द्वन्द्व, युद्ध)
>>>>> तुंबळ
तुमुलचा वापर कमी आहे; तुंबळ सर्वपरिचित.
हा शब्द मराठीत असा वापरतात
हा शब्द मराठीत असा वापरतात माहीत नव्हतं. संस्कृत आहे. गीतेत युद्धाच्या सुरुवातीला सगळे आपापले शंख फुंकतात आणि त्या आवाजाने कौरवांची हृदये चि विदारली (विनोबांची भाषा) आणि नभ आणि पृथ्वी यांमध्ये तो भयंकर आवाज घुमला - यासाठी "नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्" असं म्हटलं आहे.
छान स्पष्टीकरण.तुमुल द्वन्द्व
छान स्पष्टीकरण.
तुमुल द्वन्द्व
उमा कुलकर्णी यांनी गिरीश कारनाड यांच्या एका लेखाचा अनुवाद केलेला आहे त्यात मी हा शब्दप्रयोग वाचला.
तुमुल मराठीत नव्हता वाचला.
तुमुल मराठीत नव्हता वाचला. हिंदीत वापरतात. शब्द वाचल्या़क्षणी जयशंकर प्रसाद आणि त्यांची प्रसिद्ध कविता आठवते.
तुमुल कोलाहल कलह में
मैं ह्रदय की बात रे मन !
वयवाद
वयवाद
हा अधिकृत मराठी शब्द नाही/ नसावा. परंतु ते एका मराठी लघुपटाचे नाव असल्याचे पाहिले. दोन पिढ्यांमधील वैचारिक मतभेदांना उद्देशून तसे नाव दिलेले आहे.
शब्द वैशिष्ट्यपूर्ण वाटल्याने त्याची ही दखल.
( गुगलने ते ageism चे मराठी भाषांतर दिले आहे).
त्या लघुपटाबद्दल म्हटलंय
त्या लघुपटाबद्दल म्हटलंय Vayvaad - When Generations Clash म्हणजे इथे हा शब्द दोन पिढ्यांतल्या संघर्षासाठी वापरलाय.
लोकसत्ताने ageism या अर्थी वयवाद हा शब्द वापरलाय. वयाविषयीच्या पूर्वग्रहबाधित दृष्टीमुळे केल्या जाणाऱ्या भेदभावाला मानसशास्त्रात 'एजिझम' वा 'वयवाद' म्हणतात. ..
बरोबर .
बरोबर .
दोन्ही अर्थाने वापरला आहे
लोकसत्तातील लेख माहितीपूर्ण.
छान चर्चा.
छान चर्चा.
लयलूट (= रेलचेल)
लयलूट (= रेलचेल)
या शब्दात मधोमध उभा छेद घेतल्यानंतर जे दोन वेगळे शब्द होतात त्यांचा भाषाप्रवास रंजक आहे
लय = अतिशय; पुष्कळ ( आणि अन्य अर्थ )
लै = लयचे अशिष्ट रुप
(दाते शब्दकोश)
. . .
लूट <<< लुट ( हिंदी व फारसी) <<< लुट्रम ( संस्कृत)
लूट >>> loot
https://www.etymonline.com/word/loot#etymonline_v_12429
रोचक माहिती.
रोचक माहिती.
मराठमोळा/मोळी मधला मोळा काय
मराठमोळा/मोळी मधला मोळा काय भानगड आहे ?
मराठी मोळा or मराठमोळा
मराठी मोळा or मराठमोळा
Ways and practices peculiar to the genuine Maráṭhá. = रीत, रिवाज, शिरस्ता,
( तुम्ही आपणास पवार म्हणवितां पण तुमच्या घरीं म0 दिसत नाही).
मोल्सवर्थ शब्दकोश
लय नेहमी विनाश या अर्थाने
लय नेहमी विनाश या अर्थाने जास्त वापरला जातो. 'लयाला गेले' वगैरे.
छान चर्चा.
https://www.transliteral.org
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A...
कुमार मोळा म्हणजे वळण आणि तो जनावरांच्या तोंडाला बांधायच्या मुसकी muzzle या अर्थाने आहे. फार भुंगा लावला होता.
अच्छा ! हा. पण अर्थ आहे तर
अच्छा !
हा पण अर्थ आहे तर
लय नेहमी विनाश या अर्थाने
लय नेहमी विनाश या अर्थाने जास्त वापरला जातो. 'लयाला गेले' वगैरे.>>>>>>> लय झाले की लयाला जाणार.... अति तेथे माती
मला कुत्रा असल्याने muzzle
मला कुत्रा असल्याने muzzle माहिती होता पण त्याला 'मोळा' म्हणतात हे आज कळले.
आता मोळा लावून केलेला हा
आता मोळा लावून केलेला हा जोडशब्द पहा :
चोळामोळा = चोळून, चुरडून, कुसकरून, चेंगरून झालेली दुर्दशा.
(चोळामोळ = चोळणे + मळणे)
दाते शब्दकोश
muzzle = मोळा हे आजच कळले.
muzzle = मोळा हे आजच कळले. ….
डिट्टो.
मला व्यक्तिश: अमुक व्यक्ती मराठमोळा/ मराठमोळी हे expression आवडत नाही, “मराठी” आहे हे पुरेसे वाटते.
रच्याकने,
तमिळ मधे मोळी = भाषा
मराठ मोळी = मराठी भाषा
कॉलिंग हरपा !
सिद्ध = साधू साधक =
सिद्ध = साधू
साधक = मोक्षसाधनासाठी जपतप, व्रतवैकल्ये इ. करणारा
पण . . .
सिद्धसाधक = संगनमताने कट करून फसवणारे लोक
(वझे शब्दकोश)
दोन पवित्र शब्दांचा संगम भलत्याच (कु) क्षेत्रात घेऊन गेला !
<<< तमिळ मधे मोळी = भाषा
<<< तमिळ मधे मोळी = भाषा
मराठ मोळी = मराठी भाषा >>> भारीच अनिंद्य! हा विचार नव्हता केला.
वरती ते तुम्ही पवार म्हणविता जे वाक्य आलंय, त्यात मराठमोळा हा शब्द नाम म्हणून वापरलाय, आपण सध्या तो विशेषण म्हणून वापरतो.
एकंदरीत उद्बोधक चर्चा. चिडकू, कुमार, आभार.
छान शब्द व चर्चा.
छान शब्द व चर्चा.
जंबू
जंबू
= जांभूळ
>>>> जंबुलातीत/ जंबूपार (किरण) = अतिनील (किरण); सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा
‘जंबूपार’ मजेशीर वाटतो.
‘जंबूपार’ मजेशीर वाटतो. >>
‘जंबूपार’ मजेशीर वाटतो. >>
जम्बु म्हटलं की ती कालिदासाची गोष्ट आठवते - जलमध्ये डुबुक डुबुक वाली.
*कालिदासाची गोष्ट >>> जालावर
*कालिदासाची गोष्ट >>> जालावर कुठे वाचता येईल ?
जलमध्ये डुबुक डुबुक शोधलेत तर
जलमध्ये डुबुक डुबुक शोधलेत तर सापडेल. बऱ्याच लोकांची ब्लॉग पोस्ट आहे म्हणून इथे देत नाही, इथला नियम माहीत नाही.
कालिदासाची गोष्ट शोधून वाचेन.
कालिदासाची गोष्ट शोधून वाचेन. छान चर्चा.
सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा>>>
अतिनील किरणांना ultra violet rays का म्हणतात हे कळले.
मला जंबू ऐकले की 'जम्बुद्विपे भरतखंडे' ह्या सत्यनारायण कथेतील शब्द आठवले. 'जम्बुद्विप' म्हणजे कोणता भौगोलिक प्रदेश आहे?
ठीक. गोष्ट शोधतो.
ठीक. गोष्ट शोधतो.
... .. .. .
* 'जम्बुद्विप' म्हणजे >>
विकीनोंदीनुसार सम्राट अशोकाच्या राज्याला 'जम्बुद्विप' म्हणत होते.
तसेच प्राचीन भारत (ग्रेटर इंडिया) 'जम्बुद्विप' या नावाने ओळखला जातो.
' सुदर्शनद्विप' हे त्याचे दुसरे नाव
Pages