Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जम्बुद्वीप +१
जम्बुद्वीप +१
आत्ता बाहेर आहे. नंतर वेळ मिळाला तर इथे गोष्ट लिहीन.
विकीनोंदीनुसार सम्राट
विकीनोंदीनुसार सम्राट अशोकाच्या राज्याला 'जम्बुद्विप' म्हणत होते.
तसेच प्राचीन भारत (ग्रेटर इंडिया) 'जम्बुद्विप' या नावाने ओळखला जातो.
' सुदर्शनद्विप' हे त्याचे दुसरे नाव
>>>> धन्यवाद कुमारसर.
नक्की हर्पा.
भारताला साधारणतः जंबुद्विप
भारताला साधारणतः जंबुद्विप म्हटले जाते. पण भारत कुठल्याही अर्थाने द्विप (बेट) नाही आणि फक्त तीन बाजूंनी समुद्र असलेल्या प्रदेशाला द्विप म्हणत नाहीत. त्यामुळे जंबुद्विप = भारत हे समीकरण कधी पटलं नाहीये मला. दुसरा काही संदर्भ आहे का?
जांभळाच्या आकाराचे बेट म्हणून श्रीलंकेला फिट्ट बसतो तो शब्द.
श्रीलंकेला सिंहलद्वीप म्हणतात
श्रीलंकेचे प्राचीन नाव सिंहलद्वीप
ताम्रपर्णी >>सिंहलद्वीप >>सिलोन >>श्रीलंका
श्रीलंकेला सिंहलद्वीप म्हणतात
श्रीलंकेला सिंहलद्वीप म्हणतात असे वाचले आहे. >>> हो तो शब्द सिंहली वंशावरून आला आहे. पण श्रीलंकेच्या भौगोलीक स्थीतीवरून जंबुद्विपही योग्य वाटतो त्या प्रदेशाला.
जंबुद्वीप :पुराणांतरीच्या
जंबुद्वीप :
पुराणांतरीच्या सप्तद्वीपांपैकी एक. पौराणिक वर्णनाप्रमाणे हे द्वीप पृथ्वीच्या मध्यभागी असून त्याच्या मधोमध मेरू पर्वत आणि सभोवती क्षारसमुद्र आहे. याचे भारतवर्षादी नऊ भाग असून यात नंदनादी चार वने, मानसादी चार सरोवरे होती. जांभूळ वृक्षावरून जंबुद्वीप नाव पडले असावे.
काही विद्वानांच्या मते हिमालय, काराकोरम, कुनलुन, तिएनशान, हिंदुकुश व सुलेमान हे आजचे पर्वत असलेला भाग म्हणजे जंबुद्वीप तर काहींच्या मते आजचे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण, आशियातील रशिया, मंगोलियाच्या वाळवंटाखेरीजचा चीन आणि बांगला देश एवढा जंबुद्वीपाचा विस्तार होता.
साभार : https://vishwakosh.marathi.gov.in/18888/
बरं आता गोष्टीकडे वळतो. मी ती
बरं आता गोष्टीकडे वळतो. मी ती माझ्या लहानपणी ऐकली असल्यामुळे तपशील चुकीचे असू शकतील त्याबद्दल आगाऊ माफी मागतो. त्याउप्पर ती गोष्ट खरी घडली आहे की नाही याचा काही पुरावा नसावा. माझ्या माहितीप्रमाणे ती आख्यायिका आहे आणि तिच्या वेगवेगळ्या आवृत्ती सांगितल्या जातात. तर मीही इथे ती थोडं तिखटमीठ लावून सांगतो आहे हा डिस्क्लेमर.
सम्राट विक्रमादित्य हा केवळ पराक्रमी नव्हता, तर कलागुणांची पारख असलेला आणि स्वतः बहुगुणसंपन्न असा राजा होता. आपल्या राज्यातील गुणवंतांची पारख असलेला आणि त्यांचा योग्य तो सन्मान करत असलेला होता. नवरत्न दरबाराची कल्पना बहुधा त्यानेच पहिल्यांदा काढली असावी. काव्य म्हणजे केवळ ट ला ट लावणे नाही किंवा गण-मात्रांचा हिशेब नाही हे अधोरेखित करणारी ही एक मजेशीर कथा.
असा हा सम्राट चांगल्या कवित्वाचा सन्मान करून थोडीबहुत बक्षिसी देतो हे कानावर पडत्साते तीन गरीब भाऊ मदतीच्या अपेक्षेने आपला हौशी काव्यगुण राजापुढे उधळण्याचा इरादा मनी धरून त्याच्या भेटीस निघाले. वाटेत एका तळ्याकाठी एक जांभळाचा वृक्ष होता, त्याला पाहून त्यांनी त्यावर अनुष्टुभ छंदात काव्य रचायचं ठरवलं. या छंदात प्रत्येक चरणात आठ अक्षरं येतात एवढी थिअरी त्यांना ठाऊक होती.
पहिला म्हणाला - 'जम्बूफलानि पक्वानि' (पिकलेली जांभळाची फळं)
दुसरा म्हणाला - 'पतन्ति विमले जले' (निर्मळ पाण्यात पडत आहेत)
तिसरा म्हणाला - 'तानि मत्स्या: च खादन्ति' (आणि मासे ती (फळं) खात आहेत)
आता त्यांनी पाहिलेल्या दृष्याचं वर्णन तर पूर्ण झालं. हाच श्लोक सांगायला ते राजापुढे आले. नेमका राजा त्यावेळी कुणावर तरी वैतागला होता. पण दारी आलेल्या कवीला आल्यापावली परत पाठवायला नको हा वैयक्तिक उसूल म्हणून तो काहीश्या नाखुशीनेच त्यांचं काव्य ऐकायला तयार झाला. म्हणाला, की ऐकवा तुमचं काव्य.
पहिला भाऊ सगळे चरण पाठ करून आला होता. त्याने सुरुवात केली -
जम्बूफलानि पक्वानि, पतन्ति विमले जले,
तानि मत्स्या: च खादन्ति
पुढे काही क्षण शांतता पसरली. राजाला वाटलं की कवी पुढचं काव्य विसरला की काय. तो म्हणाला - 'पुढे?'
'पुढे काही नाही महाराज, इतकंच.'
राजाच्या कपाळावरच्या आठ्या आता स्पष्ट दिसू लागल्या. 'अरे इतकंच कसं चालेल? तीनच चरण झाले. श्लोक पूर्ण व्हायला चौथा चरण हवा ना? हायकूचा जमाना यायला अजून वेळ आहे' - राजाने जमेल तेवढ्या शांत स्वरात सांगितलं. यावर तीनही भाऊ चपापले. मग एकत्र काहीतरी कुजबुजले आणि मग तो पहिला पुन्हा म्हणाला, 'महाराज, आता मी पूर्ण श्लोक ऐकवतो'.
जम्बूफलानि पक्वानि, पतन्ति विमले जले,
तानि मत्स्या: च खादन्ति, जलमध्ये डुबुक्डुबुक्
'जलमध्ये डुबुक्डुबुक्???' आतापर्यंत खाली माना घालून आपलं हसू लपवत असलेले इतर दरबारी गण अचानक राजाच्या मोठ्या आवाजाने सावध झाले. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्या विक्रम राजाला मनातल्या मनात वाटलं की ह्या तिघांना असंच जंगलात जाऊन वेताळ बनवून टाकावं .. पण नको, पुढेमागे आपल्याच मानगुटीवर येऊन बसायचे. राजा काही म्हणणार इतक्यात नवरत्नांपैकी एक विद्वान वेताळभट्ट पुढे आला (हे खरं नाव आहे) आणि राजाला म्हणाला, 'महाराज, मी यांच्याशी जरा बोलून घेतो.' वेताळभट्ट त्या तिघांना घेऊन दरबारातून बाहेर आला आणि म्हणाला की तुम्ही इथे एक क्षणही थांबू नका. महाराज चिडलेत.
सर्व प्रकार शांतपणे पहात असलेल्या कालिदासाने एक शिपाई त्या तिघांच्या मागावर धाडला व त्यांना निरोप दिला की संध्याकाळी मला येऊन भेटा. ठरल्याप्रमाणे तिघे येऊन भेटले. कालिदास म्हणाला की काव्याची आवड असलेले आणि त्यापायी स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणारे लोक विरळाच. तुम्ही एक काम करा; उद्या तुम्ही पुन्हा दरबारात या आणि हाच श्लोक पुन्हा म्हणून दाखवा, फक्त मी एक छोटासा बदल सुचवतो, तेवढा कराल? बाकी साधारण ७५% श्लोक तुमचाच आहे, त्यामुळे मी कॉपिराईट्स घेणार नाही. तिघे तयार झाले. इथे गरीबीने अन्नान्न दशा होऊन मरण्यापेक्षा राजाच्या हातातून निदान एका खटक्यात मरण आलेलं काय वाईट? जर राजाला आवडलंच, तर सोन्याहून पिवळं.
दुसर्या दिवशी पुन्हा तिघे दरबारात हजर! राजा आज तरी जरा बर्या मूडमध्ये होता. पण तरी तिघांना बघून त्याला आश्चर्य वाटलं. आता आज काय ऐकवत आहेत यासाठी तो कान देऊन तयार झाला.
पुन्हा पहिल्या भावाने सुरू केलं -
जम्बूफलानि पक्वानि, पतन्ति विमले जले,
आता राजाचे हावभाव पुन्हा हळूहळू बदलायला सुरुवात झाली. पण पहिला निर्धाराने पुढे म्हणत राहिला
तानि मत्स्या: न खादन्ति ...
आता इथे 'न' खादन्ति - म्हणजे खात नाहीत - असा बदल आल्यावर राजा श्वास रोखून ऐकत राहिला.
एक छोटा पॉज घेऊन पहिला भाऊ पुन्हा म्हणाला -
तानि मत्स्या: न खादन्ति ... ... जालगोलकशङ्कया
(म्हणजे मासे ती फळं खात नाहीत, कारण त्यांना ती मासेमारीच्या जाळ्याचे गोळे आहेत की काय अशी शंका येते). हे ऐकल्याबरोब्बर राजाच्या चेहर्यावरचा राग कुठल्याकुठे मावळला. श्लोक बराचसा तोच होता, शेवटचा चरण फक्त नवा होता, पण आता त्याला एक नवीनच आयाम प्राप्त झाला होता. ही खुबी या तिघांची नक्कीच नाही हे राजाने जोखलं. बाजूला बसलेल्या कालिदासाला पाहून राजा मिशीतल्या मिशीत हसला आणि त्याने तिघा भावांचं तोंड भरून कौतुक केलं. कोशाध्यक्षांना काही सुवर्णमुद्रा आणून यांना बक्षीस द्यायची आज्ञा केली व पाठोपाठ उत्तमोत्तम जुने काव्यग्रंथ न चुकता वाचण्याची तिघांना सूचनाही केली.
अश्या रीतीने कहाणी सुफल संपूर्ण.
*कालिदासाला पाहून राजा
*कालिदासाला पाहून राजा मिशीतल्या मिशीत हसला
>>> झक्कास हो !
आवडलीच आवडली
धमाल गोष्ट आहे. तू लिहिलेसही
धमाल गोष्ट आहे. तू लिहिलेसही रंजक. मी ऐकली होती बहुतेक पण विसरली होती.
माधव+1 तसेच वाटल्याने मी ते विचारले होते.
कुमारसर, तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे.
चर्चा आवडली.
ह.पा. मस्त!
ह.पा. मस्त!
आमच्या संस्कृतच्या सरांनीही ही गोष्ट सांगितली होती. पण मला फक्त जलमध्ये डुबुकडुबुक एवढंच लक्षात राहिलं.
हरपा, मस्तच
हरपा, मस्तच
हरपा, मस्तच
हरपा, मस्तच
जंबुद्वीपावरून आठवलं.
जंबुद्वीपावरून आठवलं. मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला आम्ही भंडारदर्याला गेलो होतो. तिथे बोटींग करताना त्यानं तलावातील एका बेटावर नेलं. तिथे अनेकानेक जांभळाची झाडं होती आणि ती असंख्य फळांनी लगडली होती. हातानं ताजी ताजी मधूर जांभळं खायला फारच मजा आली होती. त्या नावाड्यानं सांगितलं की पावसाळ्यात पाणी वाढल्यावर हे बेट आणि झाडांचा बराचसा भाग पाण्याखाली जातो.
हे आपलं उगंच अवांतर आहे खरं तर.
हपा गोष्ट आणि त्यातील
हपा गोष्ट आणि त्यातील तुम्ही वाढीव घातलेला मालमसाला मस्त आहे.
डॉक्टर, जंबुद्वीप माहीतीबद्दल
डॉक्टर, जंबुद्वीप माहीतीबद्दल धन्यवाद.
हपा, "हायकूचा जमाना यायला अजून वेळ आहे" - हे भारी होतं.
सूर्य सिद्धांतानुसार मेरू
सूर्य सिद्धांतानुसार मेरू पर्वत हा जंबुनदीने वेढलेला आहे आणि तिच्यासकट भूमध्यातून (पृथ्वीच्या गर्भातून) आरपार गेलेला आहे. वरती म्हणजे उत्तरेला या पर्वतावर इंद्रासहीत इतर देव महर्षी वास करतात, तर दक्षिणेला राक्षस.
या पर्वताचे उत्तरेचे टोक म्हणजे उत्तर ध्रुव, म्हणजे सुमेरू (किंवा फक्त मेरू) आणि दक्षिणेचे टोक म्हणजे दक्षिण धृव म्हणजे कुमेरू. भूमध्यात (पृथ्वीच्या गर्भात) महासागर देवता व राक्षसांची सीमा आखतो.
यावरून जंबुद्वीप म्हणजे पृथ्वीच, भारत नव्हे असा अर्थ निघतो.
"अनेकरत्ननिचयो जांबूनदमयो गिरी:
भूगोलमध्यगो मेरुरुभित्रय विनिर्गत:।
उपरिष्टात् स्थितास्तस्य सेन्द्रा देवा महर्षयः
अधस्तादसुरातद्वद् द्विषंतोsन्योन्यमाश्रिताः।
तत: समन्तात् परिधिक्रमेणायं महार्णवः
मेखलेव स्थितो धात्र्या देवासुरविभागकृत्।
सूर्य सिद्धांत - भूगोलाध्याय (१२) श्लोक ३४, ३५, ३६."
मग तिची (म्हणजे जंबुद्वीपाची) वर्षे, म्हणजे भाग आहेत आणि त्यातील एक भारतवर्ष.
अशा तऱ्हेने दोन्ही धृव
अशा तऱ्हेने दोन्ही धृव प्रस्थापित केल्यानंतर पुढे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील चार वर्षातील चार नगरी सांगितल्या आहेत.
शून्य रेखांश हे उत्तर दक्षिण जोडताना अवन्तीतून (उज्जैन) जाते म्हणजेच भारत वर्षातून. हे विषुववृत्ताला जिथे छेदते तिथे (भारत वर्षातच) लंका नगरी आहे. ही म्हणजे श्रीलंका नव्हे. कारण ती विषुववृत्तावर नाही तसेच उज्जैनच्या रेखांशावरही नाही. ही उज्जैनच्या रेखांशावर दक्षिणेला भारताच्या दक्षिण टोकापासून आधारण १००० किमी समुद्रामध्ये असलेली एक काल्पनीक नगरी.
मग विषुववृत्तावरच पूर्वेकडे ९० अंशावर भद्राश्व वर्षात यमकोटी नावाची सोन्याने मढलेली काल्पनीक नगरी. (ही सुद्धा समुद्रामध्ये, पृष्ठभागावर काल्पनिक नगरी).
पश्चिमेकडे ९० अंशावर केतुमाल वर्षात रोमक नामक (भर समुद्रातली) नगरी तर पूर्व किंवा पश्चिम दोन्ही दिशांनी १८० अंशावर कुरु वर्षात सिध्दपुरी नामक (भर समुद्रात) काल्पनिक नगरी अशा चार काल्पनिक नगरी सांगितल्या आहेत.
अशा रीतीने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विषुववृत्तारील (०, ०)* (०, ९०° पूर्व)*, (०, ९०° पश्चिम)* आणि (०, १८०° पूर्व/पश्चिम)* या अनुक्रमे लंका, यमकोटी, रोमक, सिद्धपुरी नामक काल्पनिक नगरी, अनुक्रमे भारत, भद्राश्व केतुमाल आणि कुरु वर्षात डिफाईन केल्या आहेत.
म्हणजेच हे वर्ष संपूर्ण पृथ्वीभर पसरलेले आहेत. तेव्हा जंबुद्वीप म्हणजे पूर्ण पृथ्वी याला यावरून दुजोरा मिळतो.
(* इथे शून्य रेखांश हे उज्जैनमधुन जाणारे आहे, ग्रीनविच मधुन जाणारे नव्हे.)
कदलिफल हे गणपतीला आवडते असे
कदलिफल हे गणपतीला आवडते असे काहीसहेश्लोकात वाचलेले. आता कुठे तो श्लोक हरवलाय माहीत नाही. तर कदलिफल म्हणजे काय?
-------------
शोधलं - केळं.
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
उद्बोधक चर्चा !
उद्बोधक चर्चा !
* * *
वरील कालिदासाच्या गोष्टीवरून आठवलेली अशीच एक पौराणिक कथा लिहितो. ती निसर्ग आणि भाषा या संदर्भातली आहे.
एका आचार्यांच्या आश्रमात दोन युवक शिक्षण पूर्ण करतात. त्यांचा निरोप घेताना ते आचार्यांना विचारतात की आता आम्ही कोणता व्यवसाय करावा? त्यावर आचार्य म्हणतात की आता तुमच्या दोघांची छोटी परीक्षा घेऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.
आचार्य दोघांना शिष्यांना घेऊन मैदानात जातात. तिथे एक जुना वाळलेला वृक्ष होता. त्यावर फक्त शुष्क फांद्या होत्या. आचार्य म्हणाले,
“या वृक्षाचे एका वाक्यात वर्णन करा”
पहिला शिष्य म्हणाला,
शुष्को वृक्ष: तिष्ठत्यग्रे l
(समोरचा वृक्ष वाळलेला आहे)
तर दुसरा शिष्य म्हणाला,
नीरस तरुरिह विलसती पुरतः l
( ज्यातला जीवनरस संपून गेला आहे असा हा वृक्ष समोर विलसत आहे).
आता आचार्य पहिल्या शिष्याला म्हणाले,
“ तू रोखठोक सत्य सांगतोस म्हणून तू व्यापार करायला हरकत नाही” आणि
दुसऱ्याला ते म्हणाले,
“तू राजधानीत जा. तिथल्या राजकवींच्या नावे मी तुला पत्र देतो. तिथे तू त्यांच्या सहवासात रहा. त्यात तुझे कल्याण होईल”.
(दुसऱ्या शिष्याचे वाक्य मधुर संगीतासम आहे)
(प्रा. द दि पुंडे यांच्या “निसर्गाची भाषा अन भाषेतला निसर्ग’ या लेखातून साभार).
* कदलिफल (कदलीफलम्) >>>
* कदलिफल (कदलीफलम्) >>>
छान. प्रथमच ऐकला.
व्यंकटेश स्तोत्रात पण आहे
व्यंकटेश स्तोत्रात पण आहे
....पात्रावशिष्टकदलीफलपायसानि.
आमंत्रण आणि निमंत्रण यात काय
आमंत्रण आणि निमंत्रण यात काय फरक आहे?
हे इथे विचारले आहे का आठवत नाही. पण मला अजून नीट कळलेला नाहीये फरक.
फरक हा आहे की एक शब्द आ ने
फरक हा आहे की एक शब्द आ ने सुरू होतो आणि दुसरा नि ने.
भाषा ही तुमचे विचार समोरच्या व्यक्तीला कळावेत, फक्त यासाठीच असते. समोरच्याला कळले की तुमचे उद्दिष्ट साध्य झाले. त्यामुळे जास्त विचार करू नका.
उबो.. तुमचे म्हणणे पटले असले
उबो.. तुमचे म्हणणे पटले असले तरी अर्थ समजून घ्यायचा नसेल तर या धाग्याचे प्रयोजनच काय?
धाग्यावर उत्तम चर्चा घडतात.
धाग्यावर उत्तम चर्चा घडतात. नवनवीन शब्द आणि त्यांचे वापर माहित होतात.
वर आलेला 'कदलीफल' शब्द विविध श्लोक-आरत्यांमध्ये अनेकदा येतो.
*आमंत्रण आणि निमंत्रण
*आमंत्रण आणि निमंत्रण
१.
https://www.loksatta.com/do-you-know/what-is-difference-between-amantran...
या लेखात लेखकाचे नाव नसल्याने विश्वासार्हतेबद्दल कल्पना नाही
***
२. बृहदकोशानुसार दोन्ही समानार्थी शब्द
कदली वरूनच कर्दळ शब्द आला आहे
कदली वरूनच कर्दळ शब्द आला आहे (का?).
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
आमंत्रण आणि निमंत्रण >>>
आमंत्रण आणि निमंत्रण >>>
या पानावरची चिनूक्सची पोस्ट https://www.maayboli.com/node/2229?page=57
Pages