शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता पुढच्या महिन्यात उज़बेकिस्तानला जातोय. तो देश double land locked आहे म्हणे. म्हणजे तो सर्व बाजूनी जमिनीने वेढलेला देश आहेच आणि त्याच्या शेजारचे सर्व देश परत सर्व बाजूनी जमिनीने वेढलेले !!

भूभूवेष्टित ( भूभूंच्या गराड्यात सापडल्याचे) जमीनजमीनबंद (गावबंदी झाल्याचे) स्थलस्थलरुद्ध ( जमिनीवर उताणे पडल्याचे) आणि भूभूमंडित (अनेक भूभूंचा स्वामी असल्याचे) अशी मनचित्रे स्वत:शीच रंगवत हसत सुटलो Lol माझा बाष्कळपणा !

ऑन सिरियस नोट, हा धागा खूप शिकवतो, आनंद देतो.

अनिंद्य Happy
'भूवेष्टित' चपखल वाटतो.

स्थलरुद्ध वगैरे, रोजच्या वापरातले शब्द वाटत नाहीत. कंठ रुद्ध झाल्यासारखे वाटते! Happy
भू वेष्टित मलाही सर्वात आवडला.
आणि बेटाला काय म्हणायचे मग?
जल वेष्टित?

विचारप्रेरित / उदरप्रेरित

एका लेखकांबद्दल लिहिलेल्या एका लेखातील ही शब्दजोडी फार आवडली. त्या लेखकांचे सुरुवातीचे लेखन विचारप्रेरित असायचे परंतु अखेरच्या टप्प्यातील त्यांचे लेखन उदरप्रेरित झाले होते.

वा ! रोचक माहिती. जरा शोध घेतल्यावर इथे ती पौराणिक कथा मिळाली ::https://antaraal.com/e107_v0617/e107_plugins/custom_ant_articles/2009/Oc...

ससा व हरिण यांच्यात चंद्राचा रथ चालवण्यावरून झालेले भांडण ही मूळ कथा. पुढे त्यात नील आर्मस्ट्रॉंगने केलेली मध्यस्थी अशा गमतीजमती पण आहेत !

चंद्रावरच्या डागांचे गैरसमज व शास्त्रीय कारणही तिथे दिले आहे.

hammer big.jpg

हा जड हातोडा तंबूच्या खुंट्या ठोकण्यासाठी वापरतात आणि त्याला एक मजेशीर तीन अक्षरी उकारान्त नाव आहे.
बघा कोणाला सापडते का. . .

नाही तर काही तासांनी लिहितो.

कुमार सर पण तुम्ही तर हातोड्याच नाव विचारलं.
मेखचू हे तर त्या लोखंडी खुंट्या असतात त्याचे नाव झाले.

हे पहा ना :
मेखचू=
mallet, esp. for tent-pegs.
मोल्सवर्थ शब्दकोश
mallet = हातोडा
peg = खुंटी

ओ सॉरी...
मी ते त्या मेखेलाच मेखचू असे नाव आहे असे वाचले.

सूत्र
=
१. सूत; धागा, तंतु; दोरा.
२. कळसूत्री बाहुलीची दोरी. >>>>>> ( ज्याच्या हाती तो ) सूत्रधार ( >>>> मंडळ, समाज, संघ इ. चा मुख्य चालक).

( सूत्रचे अन्य अर्थ पण आहेत).

स्रोत अश्या अर्थाने पण सूत्र वापरतात ना? अमुक तमुक माहिती पोलीस सूत्रांकडून कळली - असं.

गणितातही एक सूत्र असतं.

ह पा
अगदी बरोबर.
“माहिती पोलीस सूत्रांकडून कळली” या बातमीदारीतील शब्दप्रयोगाची मागे शिरीष कणेकरांनी भरपूर खिल्ली उडवली होती. हे सूत्र म्हणजे नक्की कोण, तसेच,
ही पक्षश्रेष्ठी म्हणजे नक्की कोण माणसं असतात हो?” अशीही टिंगल त्या लेखात केलेली होती.

इथे “सूत्र” शब्दाने नवीन चर्चेचा सूत्रपात केलाय मिलॉर्ड Happy

सूत्रपात मधे सूत्रे = लगाम, कासरा इ. सैल सोडणे, खाली ठेवणे ह्या क्रिया आहेत ज्यायोगे जुंपलेले घोडे, बैल वगैरे धावायला सुरुवात करतील- call of movement, action !

Pages