अंत: अस्ति प्रारंभ: -१- {केबल कार} - {आशिका}

Submitted by आशिका on 11 September, 2024 - 05:16

उत्साहात तो रांगेत उभा होता. 'गुलमर्गची केबल कार राईड'.... या खोल दरीवरुन पलिकडे बर्फाच्छादित डोंगरावर पोचायचं.... भारीच ! एका गोंडोलात ७ जण या हिशोबाने पुढच्या ४ जणांच्या कुटुंबासोबत आपला नंबर येणार, येय !!

गोंडोला येऊन पोचली आणि अचानकच मागच्या तिघांनी याला विनंती केली की दादा आम्ही तिघे एकत्र आहोत तर आम्हाला या चौघांसोबत जाऊ दे प्लीज तुम्ही मागच्या गोंडोलातून येता का? याने हो, नाही म्हणेपर्यंत ते तिघे गोंडोलात घुसले आणि राईड सुरुही झाली.

हा मागे चरफडत राहिला शिव्या घालत आणि वाट बघत.........

इतक्यात.....

खळ्ळ्ळखाट.....

निखळलेल्या गोंडोलातून भिरकावले गेलेले ते ७ ठिपके...................

उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह! जमलेय मस्त

मला "यु होता तो क्या होता" या सिनेमाची आठवण झाली.

जबरी..
निखळलेल्या गोंडोलातून भिरकावले गेलेले ते ७ ठिपके>>>>> हे विशेष आवडले....दृश्य समोर आले.