Submitted by कविन on 16 September, 2024 - 12:57
तो एक वाटाड्या होता. प्रवाशाला पुढचा रस्ता दाखवणं कामच होतं त्याचं. पुर्वी सठीसहामाशी हाताला काम मिळायचं, येतच कोण होतं मरायला इतक्या आडगावी.
आत्तापर्यंत ९९ जणांना त्याने वाट दाखवायचं काम केलं होतं. नियमाप्रमाणे शतक झाले की तो करार मुक्त होणार होता.
सद्गतीच्या वाटेवर नेणे हे कामच होते त्याचे. गोंधळलेल्या, घाबरलेल्या वाटसरूला या सुंदर शाश्वत वाटेची ओळख करुन द्यायला त्याला मनापासून आवडायचे. या वाटेवरचा तो एक वाटाड्याच तर होता. आणि आज तर मुक्तीचा दिवस होता. आज शतक पुर्ण होण्याचे संकेत त्याला कधीचे मिळाले होते.
ध्यानस्थ बसलेल्या त्याला ‘time’s up’ अलार्मने जाग आली आणि उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी तरी सोला. प्लीज पील
कोणी तरी सोला. प्लीज पील
आधी कृष्ण, का यम का इतर कोणी
आधी कृष्ण, का यम का इतर कोणी विचार केला पण कोणी बसत नाही.
मला वाटतं शत शब्द... अर्थात शब्दांचे मनोगत असावे. शंभर शब्दांचा करार, 'शब्द ' चुकलेल्या वाटसरू ला वाट दाखवती इ.. टाइम्स अप, अर्थात वर्ड काउन्ट भरला. आता परवलीचा शेवट होऊन जाऊ द्या! तदैव लग्नं सुदिनंत देव... टाटा टाटा ट्या टया... टया.
का जहाज अगदीच भरकटले आहे?
हा वाटाड्या pirates of
हा वाटाड्या pirates of Caribbean मधील Davy Jones सारखातर नाही ना. त्याचे काम समुद्राच्या पाण्यात बुडून मेलेल्याना वाट दाखवणे होते.
का जहाज अगदीच भरकटले आहे?>>
का जहाज अगदीच भरकटले आहे?>> भरकतले नाहीये. हा अर्थ लिहीताना मनात नव्हता माझ्या. पण हा अर्थही फिट बसतोय
हा वाटाड्या pirates of Caribbean मधील Davy Jones सारखातर नाही ना. त्याचे काम समुद्राच्या पाण्यात बुडून मेलेल्याना वाट दाखवणे होते.>>> मी एकटीच अशी आहे घरात जिने हा सिनेमा बघितलेला नाही. पण " त्याचे काम समुद्राच्या पाण्यात बुडून मेलेल्याना वाट दाखवणे होते." हे जर त्याचे काम असेल तर हो यातला वाटाड्या त्या जवळ जाणाराच आहे.
स्पिरिट गाईड्स, लाईट वर्कर्स फ्रॉम अदर वर्ड, सायकोपॉम्प्स वगैरे कन्सेप्टवर हा वाटाड्या बेतला आहे.
Psychopomp - Wikipedia
Psychopomps (from the Greek word ψυχοπομπός, psychopompós, literally meaning the 'guide of souls') are creatures, spirits, angels, demons, or deities in many religions whose responsibility is to escort newly deceased souls from Earth to the afterlife. Their role is not to judge the deceased, but simply to guide them. > हे एक गुगलने दिले मला इथे संत्र उलगडायला मदत म्हणून
आधी कृष्ण, का यम का इतर कोणी विचार केला पण कोणी बसत नाही.>> अमीत, हे सगळे टॉप बॉस झाले बाकी यांच्या ऑफीसमधे हाताखाली बरेच पे रोलवर असणार ना? त्यांच्यापैकीच एक वाटाड्या
मृत्यू म्हणजे फुलस्टॉप नाही. तो निगेटीव्हही नाही. जन्म - जगणे -मृत्यू या सर्कलमधे सगळ्यांचा प्रवास काही मोक्षापर्यंत लगेच पोहोचत नसेल. अशा आत्म्याचा प्रवास सुरवातीला गोंधळलेला असेल, त्याला वाट सापडत नसेल तिथे असा वाटाड्या ही वाट दाखवायचे काम करत असेल. कदाचित हा वाटाड्या त्याच्या मोक्षाच्या मार्गावरचा कर्माचे लोन फेडत इतरांना मार्ग दाखवायला नेमला असेल असे कल्पून लिहीले आहे. आणि जन्म काय किंवा म्रूत्यू काय यापेक्षाही हा मोक्षापर्यंतचा प्रवास किंवा हा जिवन-मृत्यू-जिवन- मृत्यू प्रवास मोक्षाचे ठेशन लागे पर्यंत अविरत सुरु राहील हेच प्रवासाचे चक्र शाश्वत आहे आणि ते त्याच्या मधल्या ठेशनांसह सुंदर आहे या गृहितकावर शशक बेतली आहे. (हे थोडक्यात लिहायचा प्रयत्न केलाय तो नक्कीच तोकडा आहे पण बोअर होण्याच्या भयापेक्षा बरे म्हणून आवरतेय)
@अमित, तिरपाकडे लिही म्हणून तू जो धोंडा पाडून घेतलास त्यामुळे हा अंत डिक्लेअर झाल्या झाल्या अर्धवट खरडलेली ही शशक पुर्ण करुन माथी मारायचे काम केले आहे, अब भुगतो
हां असाच काहीसा अर्थ वाटला
हां असाच काहीसा अर्थ वाटला होता. ( बऱ्याच के ड्रामा मध्ये पण हा concept असतो) आवडली.
ओके.
ओके.
मी वाट दाखवताना ' शंभर ' चे हार्ड सेट लिमिट आणि 'टाइम्स अप ' वर त्यात तो अलार्म आणि त्यात ते इंग्रजी मधुन लिहिणे यावर अडकलो होतो. त्या निमित्ताने टाइम्स अप ही 'मी टू ' वर एक मू्हमेंट चालू झालेली त्याच नावाचा गेस करायचा गेम आहे ही फुटकळ माहिती मिळाली
त्यात परत साठीसामाशी काम.. लोक काय मरत असतातच, त्यामुळे ही मोक्षाची वाट नसणार असं मी परस्पर खोडून टाकलं... :डोक्याला हात:
भुगतो नाही ... बेस्ट आहे हे. माझा वेळ चांगला गेला काल. आणखी असच पत्ता लागू न देता काय लिहिता येईल याचा विचार करत असताना शांत झोप लागली.
छान आहे शशक.
छान आहे शशक.
कथा कळली नाही.पण आत्म्यांना
कथा कळली नाही.पण आत्म्यांना गाईड करणाऱ्या वाटाड्यांची संकल्पना आवडली.
(नारायण धारप फॅन्स: धारपांची एक महावीर आर्य कथा आहे अशी.चायनीज पेंटिंग मधले नावाडी माणसाला शेवटच्या प्रवासाला घेऊन जातात.)
काही कळली, काही नाही.
काही कळली, काही नाही.