प्रकाशचित्रांचा झब्बू ३ - श्रीमंती माझ्या नजरेतून

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:23

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.

आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहिण्याचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य
१५० वर्षे गुलामी नंतर मिळालेले हे स्वातंत्र्य ही भारतीयांची श्रीमंती

MB Ganesh Shreemanti - 002.JPG

मध्यलोक, अगदी! काल गॅलरीत श्रीमंती सदराखाली आपल्याकडे कसले फोटो आहेत हे शोधताना तिरंग्याचा फोटो बघून अगदी हेच मनात आलेले. स्वातंत्र्य हिच श्रीमंती Happy

आता झब्बू देणे अपरिहार्य

IMG-20240815-WA0072.jpg

कौलारू घर, सारवलेल्या भिंती, मातीची उब, घरा समोर शेत, परसात झाडे, आजूबाजूला हिरवा निसर्ग
काळाच्या ओघात आणि पैश्याच्या शर्यतीत आपण मागे सोडलेली श्रीमंती
MB Ganesh Shreemanti - 003.JPG

सणवार, उत्सव, सोहळे यांच्या शिवाय जगणे निरस होईल.
पूर्वापार चालत आलेली ही आपली सांस्कृतिक श्रीमंती
MB Ganesh Shreemanti - 004.jpg

कविन तुमच्या श्रींमतीला आमचा झब्बू
परी आणि तिच्या मैत्रिणींनी मांजर आणि तिची पिल्ले दत्तक घेतली होती. म्हणजे सोसायटीमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था आणि दुधाची सोय केली होती. श्रीमंती असल्याशिवाय हे शक्य नाही Happy

IMG-20240915-WA0001.jpg

ऋन्मेष तुमच्या परीच्या चेहऱ्यावरील हास्यासाठी हा माझा झब्बू
माणसाच्या चेहऱ्यावर अनेक भाव असतात पण माझ्या नजरेतून हास्य हि मानवीय भावनांची उत्तुच्य श्रीमंती
(स्माईल इज इन्फेकशस)
MB Ganesh Shreemanti - 005.jpg

सामो Happy

मध्यलोक, +786 .. श्रीमंती कुठलीही असो.. हास्य हे ती मोजण्याचे परीमाण म्हणू शकतो Happy

बेलाग कडे, त्यावरून कोसळणारे जलप्रपात, अप्रतिम असे हे निसर्ग सौन्दर्य आणि मनुष्य हा एकमेव प्राणी जो डोळ्यात साठवू शकतो हि निसर्गाची श्रीमंती

MB Ganesh Shreemanti - 006.jpeg

Pages