चित्रकला उपक्रम : आवडते कार्टून - ऋन्मेऽऽष - परी अस्मिता अभिषेक नाईक

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2024 - 17:56

घरचे/सोसायटीमधील गणपती गेल्यावर मायबोली उपक्रमासाठी एखादे कार्टून काढशील अशी लेकीशी सेटिंग लाऊन ठेवली होती. कारण स्पष्ट आहे. तेवढेच माझ्या धाग्यांच्या संख्येत एकाची भर Happy तरी ती लहरी असल्याने फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या.. पण आज ऑफिस मधून आल्यावर असे सरप्राईज मिळाले. एक सोडून चार चार.. आवडेल ते घ्या Happy

IMG_20240914_021953.jpg

आणि हे आमचे जय श्री कृष्ण!
याचे बॅकग्राऊंड रंगवायला तिने काहीतरी युक्ती/टेकनिक वापरली आहे. पण सांगत नाहीये Happy

IMG_20240914_022003.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल तिला विषय क्रमांक दोन साठी एखादे गाडीचे चित्र काढ म्हणालो. पण आम्ही मुंबईला आलो असल्याने तिचे नेहमीचे रंग सोबत नव्हते. तसेच तिला पेन्सिल न वापरता डायरेक्ट स्केच पेन वापरायची सवय असल्याने खोडाखोडीचा पर्याय सुद्धा नसतो.

तरी तिने एका कलरिंगबुक मधले बघून काढले. तिच्या मनासारखे न जमल्याने हे नको तुझ्या मायबोलीवर शेअर करूस म्हणालीस.. पण मला तितकेही वाईट न वाटल्याने किमान इथे तरी शेअर करूया म्हटले Happy

IMG-20240915-WA0026.jpg

मस्त रंगवली आहेत सर्व कार्टून्स.रंग स्मूथ करायला वॉटर कलरने रंगवून वर मेणबत्ती घासली का?(असं करायचे काही जण, आठवलं म्हणून वाटलं.)

अनु, हे रंग वापरले आहेत. एका बाजूने स्केच पेन सारखी fine nib जी rigid असते. दुसऱ्या बाजूने broad bush nib जी तुलनेत flexible असते. वरची चित्र काढताना काळया रंगाची fine nib वापरून काढली आहेत. रंगवताना कदाचित broad nib वापरली असेल. हे रंगच तसे स्मूथ आहेत. वेगळे काही केले नाही.

IMG-20240915-WA0039.jpg

बाकी तो मेणबत्ती फंडा आमच्या काळी सुद्धा काही सिन्सिअर कॅटेगरी मुले वापरायची.

IMG-20240919-WA0002.jpg
.
IMG-20240919-WA0005.jpg

Pages