गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वसाधारण लोक स्वयंपाक करताना काळजी घेतात, हात भाजू नये वगैरे..
आणि माबोकर be like..images (5).jpeg
(गात गात )
तो बोल मंद हळवा सा..

मी रोज सकाळी पहिल्यांदा हाच धागा उघडून हसत बसतेय.

प्रभाते मनी मीम चिंतीत जावा
पुढे वैखरी 'लोल' आधी वदावा

साठी संयोजकांचे आणि मीमोपासकांचे आभार. Happy

अगागा, ६०० पार, २ दिवस इकडे आलो नाही तर फक्त मिम्स वाचायला तासभर पेक्षा जास्त वेळ गेला आणि एवढा हसतोय विचारू नका. कमाल मिम्स आलेत इकडे.

@संयोजक @ऍडमिन निवडक १० मध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करतोय तर एरर येतोय.
Error.jpg

उबो Lol
सगळेच Lol

मायबोलीकर - एक प्रसंग
फारएंड - friends reference फेकून मारताना

(मला अनेक मीम सुचतायत पण फोटो एडिट नाही करता येत)

IMG-20240915-WA0001.jpg
.

कठीण प्रश्न आल्यावर अचूक उत्तर शोधण्याची माझ्या मनातील सुप्त इच्छा
.
giphy.gif

.
काश!! पाच मिनिटांनी येणारे प्रतिसाद मला आधीच वाचता आले असते...

धन्स mi_anu
आज थोडं निवांत म्हणून Lol

अni >> Lol

शू ले चू >> शु पहिला हवा Wink

Pages