गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sanyojak samiti.JPG

शशक आणि मीम यांच्यावरील प्रतिसाद पाहून पुढील विषय काय द्यावा याचा विचार करणारी संयोजक समिती २०२४

Lol

ऋतुराज, केया, अni , अतुल Lol
अतुल, A man who knew infinity या रामानुजन यांच्यावरच्या चित्रपटाचा संदर्भ कळला. Happy

अनु, हपा सुसाट. Lol
उंदरावरचे अफाट आहेत. Lol
हहपुवा मीम्स आहेत सगळेच.
धन्यवाद प्रज्ञा. Happy

अहो, तुमचे हे मायबोलीचे एवढे स्क्रिनशॉट्स श्रीमंतीच्या धाग्यावर चालतील असं कोणी सांगितलं तुम्हाला..??


काय सॉलिड आहे.
हपा!! वैगरे मिम भन्नाट आहे Happy

ऋतुराज, निरू, अमित आणि अni सगळ्यांच्याच प्रतिभेला जोरदार बहर आलाय.

लांब वैचारिक, (स्वतःला वाटणारा) छान प्रतिसाद लिहून झाल्यावर इमेज टाकताना बॅक दाबून ससर्व लिखाण उडालेला मायबोलीकर
he-ram.gif

र्म्द - टोटली! मी ही तसाच बसलोय Happy

हा धागा फुल रिवाईण्ड करून पुन्हा पाहणार आहे. पण पटकन नवीन पोस्ट्स स्कॅन करताना आजची सर्वात आवडलेली मीम म्हणजे मामी ची कार्तिक कॉलिंग कार्तिक Happy ब्रिलियंट आहे.

मामी ची कार्तिक कॉलिंग कार्तिक ब्रिलियंट आहे. >>> +१
खरंतर सगळेच मीम्स खूप भारी आहेत. मी आपली लुडबूड करतेय Happy

शब्दवेध धाग्यावर एकदा हर्पा आणि मी केटी पेरीच्या टॅटूतली शुले चूक काढली होती. Happy
katy-perry-in-dark-horse.jpeg
टॅटू दाखवताना
sddefault_0.jpg
चूक काढल्यावर तिची प्रतिक्रिया -

Pages