वैभवशाली अमेरिका

Submitted by सामो on 12 September, 2024 - 10:10

अमेरिकेत राहूनही आपण भारत कसे मिस करतो - याविषयी बरेच ऐकले आहे, वाचले आहे, अनुभवले तर आहेच आहे. पण कधी कधी विचार येतो, इथे आवडण्यासारखे काय आहे? गूळाला लागणार्‍या मुंग्यांप्रमणे जगभरातून लोक इथे येतात. या देशाला 'मेल्टिंग पॉट' म्हटले जाते, असे काय आकर्षण आहे इथे?मग अर्थात पहीला मुद्दा येतो तो म्हणजे, समृद्धी, श्रीमंती, सुबत्ता, वैभव, पैसा, हिरवे डॉलर्स. पण त्याच्यापलिकडे काय आहे? ते पाहू यात.

इथल्या हवेत आहे आशा, एक संधी आणि ती संधी आपल्याला मिळणारच हा विश्वास. सोशल फॅब्रिक (फायबर?) मध्ये अपवर्ड मोबिलिटी इथे फार सोपी आहे. तुम्ही काळे, गोरे, पिवळे असा वा लाल. इथे कोणीतरी तुमच्याहून अगदी वेगळे आणि कदाचित सोशली वेल ऑफ तुमच्या प्रेमात पडू शकते. ना जात आड येते ना धर्म ना वंश. अगदी तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा आड येणार नाही. तुम्ही कॉफीशॉप मधले बरिस्ता असाल की प्लंबर, ट्रक ड्रायव्हर असा की उबर चालक - तुमच्या प्रेमात राजा पासून रंकापर्यंत कोणीही पडू शकते आणि ते समाजमान्यच आहे. कोणी जजमेन्ट पास करणार नाही. तुम्ही कोणीही असा, जर लायकी असेल तर तुम्हाला पदोन्नतीसाठी कोणी डावलणार नाही. खरीखुरी लँड ऑफ अपॉर्च्युनिटी.

ओह माय गॉड!! ज-ज-मे-न्ट. आपण जादूचा पेटाराच उघडला. किती किती प्रकारे नॉनजजमेन्टल फ्रीडम(स्वातंत्र्य) हवे ते करण्याचे, हवे ते लेण्याचे, खाण्याचे, वागण्याचे स्वातंत्र्य, मुभा मिळू शकते. मुभा? कोण देणार मुभा तुम्हाला? आहेच कोण द्यायला. प्रत्येकाला स्वतःचे व्याप आहेत. आयुष्य आहे. कोणालाही दुसर्‍याच्या जीवनात नाक खुपसण्यात अजिबात म्हणजे अजिबात स्वारस्य नाही. जर सामाजिक शिष्टाचारांच्या चौकटीच्या (जी की खूप खूप व्यापक आहे) आत तुम्ही राहणार असाल तर कोणी तुमच्याकडे ढुंकुनही पहाणार नाही. अदृष्य आहात तुम्ही. हव्या तितक्या आयडिओसिंक्रसीज (विक्षिप्तपणा) जपा, हवे ते करा. खरच स्टॅचु ऑफ लिबर्टी हेच या देशाचे प्रतिक म्हणुन योग्य आहे. खूप इन्डिव्हिज्युअ‍ॅलिटी आहे. अगदी हवीहवीशी. अर्थात हे जास्त प्रमाणात न्यू यॉर्क सारख्या महानगरांमध्ये दिसते. विस्कॉन्सिनच्या लहान खेड्यात क्वचित पायात पाय येतात.

अगदी महानगरात, खेड्यात यत्र तित्र सर्वत्र इथे उपवने, वाटिका, बागा, उद्याने आहेत. खेळाची मैदाने आहेत, लहान मुलांकरता जंगलजिम आहेत. कधी मूड फार पेन्सिव्ह झाला, खुशाल एखाद्या वाटिकेत फिरुन या, निवांत बाकावर बसा. नाहीतर सार्वजनिक वाचनालयात जाउन , कवितांचे पुस्तक काढुन निवांत वाचत बसा. कोणी डिस्टर्ब करणार नाही. खूप 'सुकून' आहे, असीम शांती आणि 'मी-टाईम'. हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. बागेत कोणी सॅक्सोफोन वाजवते कोणी क्लॅरिनेट तर कोणी व्हायोलिन - पैसे टाका पुढे जा. बरं खिशात पैसे नाहीत का, कोई बात नही. ऐका अगदि फुकट ऐका. एका सुंदर कवितेच्या या ओळीच पहा ना -

It is a place where
as you sit on the grass by the lake
a tall black man of a certain age
strolls by
blowing his saxophone
you smile and bow
he bows back
with his horn, his day is mellow
He's in the sun.
He has given mellowness
and sun
free of charge to you.

बाकी गर्दीचा अभाव, गर्दीतल्या धक्क्यांचा अभाव, सर्वत्र रेस्टरुम्स असणे, हवा तेवढा गर्दीतला एकांत मिळणे आणि अनेक ऑब्व्हियस आणि सर्वांना माहीत असलेले मुद्देही आहेत.

मला या धाग्यावर 'तुम्हाला, अमेरिकेबद्दल' काय आवडते त्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. शक्यतो गाडी रुळावरती राहो Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत. मी जे अमेरिकेबद्दल ऐकून आहे त्याच्याशी तुमचे मुद्दे जुळतात. हा लेख वाचून तिकडे जाणाऱ्यांना निर्णय घेण्यास मदत होईल. लिहिल्याबद्दल धन्यवाद .

आवडेश...

जजमेंटल नाही म्हणत जॉर्ज फ्लॉईड घडतो, शाळेत दररोज अंदाधुंद गोळीबार होतो, कार्डिंग होतं, रेशिअल प्रोफायलिंग होतं, सरकार बेडरुम मध्ये राजरोस घुसते...
असो. इथे काय आवडते अपेक्षित आहे तर 'फ्रीडम ऑफ स्पीच!' फर्स्ट अमेंडमेंट.

सामो, विषय छान आहे. तुझ्या पोस्टमधे तु आटोपशिर व थोडक्यात चांगला आढावा घेतला आहेस. पण विषय व्यापकही असल्यामुळे खुप काही लिहीण्यासारखे आहे.

अमित, तु म्हणतोस ते बरोबर आहे पण थोडेसे एक्झॅजरेशन नाही वाटत तुला? गेल्या २०-२५ वर्षातल्या काही घडामोडींमुळे तसे ( ऑप्टिक्स) वाटणे साहजिक आहे पण त्या ब्रॉड ब्रश्ड चित्राने खरी अमेरिका चितारलीस तर ते अन्यायाचे होइल. अमेरिकेच्या सुरुवातीपासुन अमेरिकन जनतेच्या विचारसरणीत एक “ डायकॉटॉमी“ आहे. अगदी १७८० -९० च्या सुमारासच्या हॅमिल्टन-मॅडिसन वादांपासुन तो २ भिन्न विचारसरणींचा संघर्ष चालु आहे. मग त्या " डायकॉटॉमी मधे अमेरिकेत गन कंट्रोल हवा की नको, अ‍ॅबॉर्शन लिगल करावे की नको पासुन ते अमेरिकेतला काळे- गोरे हा संघर्ष हे सगळे विषय येतात. १८६१ ते १८६५ चे जे अमेरिकन अंतर्गत यादवी युद्ध झाले ते त्या दोन भिन्न विचारसरणीच्या संघर्षाचे एक्स्ट्रिम उदाहरण होय!

त्यात “ अमेरिकेत सुरु झालेली गुलामगीरी“ या अजुन एका युनिक कंगोर्‍याने अमेरिकेच्या समाजाला रेशिअल डिसक्रिमिनेशनची झालर ( शाप म्हण हवे तर!) लागलेली आहे. त्यामुळे तु म्हणतोस त्या मुद्द्यांवर ग्रंथच्या ग्रंथ लिहीता येतील( व इथल्या इतिहासकारांनी ते लिहीलेही आहेत!) असो.
(पण सामोच्या या बीबीचा हेतु त्याचा उहापोह करण्याचा नसल्यामुळे इथे त्यावर जास्त लिहीत नाही. पण जाता जाता एवढेच लिहीन की इथेच मायबोलीवर “ मो“ ने २ वर्षांपुर्वी अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांचा इतिहास ही खुपच सुंदर मालीका लिहीली आहे. ती वाचली तर त्यात आजच्या अमेरिकेत होणार्‍या जॉर्ज फ्लॉइड, रेशिअल प्रोफाइलींग वगैरे होणार्‍या गोष्टींची पाळेमुळे समजण्यास मदत होइल)

सामोच्या या चांगल्या विषयावर अजुन बरेच काही लिहीण्यासारखे आहे. हळुहळु जसा वेळ मिळेल तसे लिहीनच.

<<सामोच्या या बीबीचा हेतु त्याचा उहापोह करण्याचा नसल्यामुळे>>
बरोबर आहे. म्हंटले तर भारतात सुद्धा तुम्हाला नावे ठेवण्याजोग्या गोष्टी सापडतील.
पण अजकाल चांगल्या गोष्टीच भारतात जास्त नि अमेरिकेत कमी.

मुकुंद जरुर लिहा. वाचायला आवडेल.
अमित वेगळ्या पातळीवरती म्हणजे मी मग बर्‍याच सुपरफिशिअल पातळीवरती म्हणत असेन की जजमेन्टल नाही.
नंद्या आपले मत येउ द्यात.
कंसराज, दसा माबोवाचक आभारी आहे.

मला एकाच रंगाने अजिबात रंगवायचं नाही. मला मनापासून युएस मध्ये यायला आवडतं, फिरायला आवडतं. आवडणार्‍या अनेक गोष्टी आहेत. थोडी वर्षे राहुनही बघितलं पण आता रहायला नाही आवडणार. पण देश म्हणून नि:संशय आवडतो. वरच्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींशी अर्थात सहमत आहे. पण... गन, डिस्क्रिमिनेशन, अबॉर्शन, फ्लोरिडा मध्ये तर पुस्तकांवर बंदी हे ऑप्टिक्स पेक्षा जास्त काही वाटतं. मुलगा पहिलीत असताना ठार ब्लू राज्यात अ‍ॅक्टिव्ह शूटर संशयावरुन शाळेत लॉकडाऊन झालेला. माझ्या कामाच्या ठिकाणी फायर ड्रिल व्ह्यायचं पण पोराच्या शाळेत के पासून फायर आणि अ‍ॅक्टिव्ह गन ड्रिल दोनदा व्ह्यायची. विचारसरणी संघर्ष वगैरे समजुन घ्यायला ठीकच आहे, पण सामान्यमाणसाला त्याचं काय असं वाटतं.
असो. इथे शक्यतो पॉझिटिव्ह लिहिन.

आमित,
मला या धाग्यावर 'तुम्हाला, अमेरिकेबद्दल' काय आवडते त्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. <<<<< हे धागा लेखिकेने स्पष्ट (आणि बोल्डमध्ये) लिहिलेलं असताना वरचे सगळे मुद्दे उगाळायचं प्रयोजन अजिबात समजलं नाही. खुला बाफ आहे, आम्ही काय वाटेल ते लिहू वगैरे ठिक पण हा मुद्दाम खाजवून खरूज काढण्याचा प्रकार झाला.

असो. इथे शक्यतो पॉझिटिव्ह लिहिन. >>>> "शक्यतो" ची पाचर मारलेलीच आहे पण तुका म्हणे त्यातल्या त्यात. Happy

मला इथली नॅशनल पार्क सिस्टीम आणि पब्लिक लायब्ररी हा प्रकार खूप आवडतो. सरकारी पातळीवर दोन्ही अगदी व्यवस्थित चालवल्या जातात आणि लोकही बर्‍यापैकी समजूतीने वापरतात. रिटायरमेंट नंतर कुठल्यातरी नॅशनल पार्कात "हाऊ मे आय हेल्प यू?" वाल्याचं काम करायचं बकेट लिस्टमध्ये आहे Proud

जजमेंट म्हणून कोणी फक्त गुणगान केलं की दुसरी बाजू दाखवून दिलीच पाहिजे. तरच त्याला अर्थ. नाही तर फेसबुक वर पोस्ट लिहिली असती. त्यात काहीही खाजवून खरूज नाही. मला काय आवडतं ते ही लिहिलेलं आहे.
दुसरी पोस्ट मुकुंद ला प्रतिसाद आहे. त्यामुळे त्यात प्रतिसादावर प्रतिसाद यात शक्यतो पडणार नाही. अशा अर्थाने ते आहे. ऑफकोर्स शक्यातोच!

सामो छान लिहिलत. मुकुंदाने लिहिलेलंही आवडलं.
प्रत्येक बाजूला दोन काय किती तरी मिती असतात. पण सामोचा मुद्दा आशा, संधी अन संधीच्या विश्वासाबद्दलचा अगदी पटला. नॉनजजमेंटल फ्रिडम हे मलाही फार भावलं. गर्दीतला मी टाईम अन सुकुनही अन बागा, नॅशनल पार्क्स, रेस्टरुम्स, आणि सगळ्याच सकारात्मक गोष्टी पटल्या, आवडल्या, अनुभवल्या.
समाज म्हटला की प्लस, मायनस दोन्ही असणार. पण ज्या समाजात मुस्कटदाबी नाही तो मलाही वरचढ वाटतो.
थँक्य सामो

छान लिहिलंय!
अमेरिकेच्या हवेत व्यक्ती स्वातंत्र्याचा वास आहे आणि अजून हवं अजून हवं असा आवाज येतो. लवकरच तुम्हाला त्या दोन्ही गोष्टींची सवय होते. अमेरिका तुम्हाला एक संधी नक्की देते अमेरिकन बनण्याची.
मला तिथला निसर्ग आवडतो. इतकी नैसर्गिक सुबत्ता दुसऱ्या कुठल्याही देशात नाही.
अमेरिकेची खाद्यसंस्कृती आवडते - साऱ्या जगभरातील खाद्यपदार्थ बहुतांशी अमेरिकनाईझ्ड आणि काही ठिकाणी मूळ स्वरूपात मिळतात. एकूण खाण्यापिण्याची रेलचेल असते.
लोक रोज समाजात वावरताना एका चांगल्या upbeat mood मध्ये दिसतात - अनोळखी माणसांना हसून हॅलो म्हणतात. स्वतःबद्दल मोकळेपणाने बोलतात. दुसर्‍याची चौकशी करतात. हे मला आवडतं. त्यावरचा हा शॉर्ट कालच पाहिला.
America is the king of customization and comfort. साऱ्या प्रेयस गोष्टी तिथे मिळतात!

पराग, अरे अमितच्या पोस्टीचा तसा अर्थ मला नाही वाटला. असो . त्यावरुन इतका चांगला बीबीचा विषय भरकटु नको देउयात.

पराग, अवल अरे तुम्ही दोघांनी मला प्राणप्रिय असणार्‍या अमेरिकन नॅशनल पार्क सिस्टीमचा उल्लेख केला! नुसत्या त्या एका विषयावर मी या बीबीवर पानेच्या पाने भरुन लिहु शकतो! पराग तुला आठवतय का माहीत नाही पण आपण एकदा फोनवर बोलत असताना मी तुला म्हटलेही होते की जसे मी ऑलीम्पिक्स वर एक बीबी काढला होता तसा विंबल्डनच्या मॅचेस व अमेरिकन नॅशनल पार्क्स वरही बीबी काढायचा माझा मनसुबा आहे. पण येन केन कारणांनी अजुन तो मनसुबा साकार झाला नाही आहे. ज्यांनी ज्यांनी अमेरिकन नॅशनल पार्क सिस्टीम व त्यातली नॅचरल ब्युअटी अनुभवली आहे त्यांनाच कळेल की तो नॅशनल पार्कचा युनिक अमेरिकन कॉन्सेप्ट हा अमेरिकेने जगाला दिलेल्या २ महत्वाच्या देणग्यांमधला एक आहे! निदान मी तरी असे मी मानतो. (पहिला म्हणजे जगातली पहीली वर्किंग डेमॉक्रेसी). अमेरिकन नॅशनल पार्क्स वर केन बर्न्सची ‘ द नॅशनल पार्क्सः अमेरिका’ज बेस्ट आयडिया.” ही अप्रतिम डॉक्युमेंटरी इच्छुकांनी जरुर बघावी!

त्या अनुषंगाने अमेरिकेची एक गोष्ट मला वाटत वाखाणण्यासारखी आहे. ती म्हणजे त्यांनी त्यांचा प्रत्येक गोष्टींचा बरीकसारीक इतिहास वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करुन इतका डिटेल मधे जतन करुन ठेवला आहे की ते बघुन डोके गरगरयाला होते! काय एक एक डॉक्युमेंटरीज आहेत! हॅट्स ऑफ!

सामो लेख आवडला!

इकडे सगळं परफेक्ट आणि चांगलं आहे अस अजिबात नाही.
वरती उल्लेख केलेले नॅशनल पार्क, सार्वजनिक वाचनालये हेही आवडलं.
सार्वजनिक शिस्त आवडते. वक्तशीरपणा आवडतो
तसच इकडची शैक्षणिक पद्धती आवडते... यासाठी की ते मुलांना फाउंडेशन ( पाया) करायला मदत करतात..
.

वाचन, लिखाण, विचार करायला शिकवले जाते.. ..

( बाय द वे सामो, मी तुझ्या बीबीच्या “ वैभवशाली अमेरिका“ या शिर्षकाला शब्दशः धरत नाही. माझ्या मते अमेरिकेचे वैभव फक्त डॉलर मधेच मोजाल तर ती एक मोठी चुक होइल असे मला प्रामाणिक पणे वाटते. अमेरिकेचे वैभव मोजायची मापे अनेक आहेत. वर तु, अमित, पराग , अवल व जिज्ञासा यांनी त्यांच्या पोस्टीत बर्‍याच तश्या “ अमुल्य“ गोष्टींचा उल्लेख केलाही आहे.)

सर्वत्र रेस्टरुम्स असणे >>> हा मुद्दा सगळ्यात बेस्ट मुद्दा आहे इथला. अगदी छोट्या छोट्या गावात पण चांगली आणि स्वच्छ सोय असते.

जिज्ञासाच्या पूर्ण पोस्टला +१

वरती सगळ्यांनी लिहीलेल्या चांगल्या मुद्द्यांव्यतिरिक्त मला अजून काही आवडणार्‍या गोष्टी म्हणजे -
१. बर्‍यापैकी शिस्त असणारं ट्रॅफिक
२. सर्वत्र आढळणारं झाडांनी / फुलझाडांनी केलेलं सुशोभिकरण
३. ठिकठिकाणी उपलब्ध असलेले आणि बहुतेकवेळा निगा राखलेले ट्रेल्स

सार्वजनिक शिस्त, बर्‍यापैकी शिस्त असणारं ट्रॅफिक तसेच वर लिहलेल्या गोष्टी बाकीच्या विकसित देशात पण मिळतात.
पण अमेरिकेत शाळेत खुप चांगले शिक्षण मिळते. शाळा खुप flexible आहेत. मुलाना काय पाहिजे त्यावर जोर असतो. मुलाना पाहिजे ते विषय घेउ शकतात . मुलाना पाहिजे तेवढ्या वेळात ते शिक्षण पुर्ण करु शकतात. माझ्या मुलाने दिड वर्षात हायस्कुल ( ९ ते १२ वी) केले होते आणि मुलीने ५वीत असताना ६चे सायन्स. ७ वीचे गणित, ५वीचे ईग्लिश आणी बाकेचे विषय घेतले होते.
ईग्लंड , भारत, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया ह्या सगळ्या पेक्षा अमेरिकेतिल शाळा वरचढ आहेत.
वर लिहले आहे की शाळेत रेशिअल प्रोफायलिंग होते, रेड राज्यात राहात असुन पण आम्हाला असे कधीच जाणवले नाही.

केलं की दुसरी बाजू दाखवून दिलीच पाहिजे >>>> पण विचारलय कोणी ? चर्चाप्रस्तावात स्पष्टपणे लिहिलं आहे की एकच बाजू लिहा. असो. नेहमीप्रमाणे उच्चासनी पोस्ट म्हणून सोडता आली असती पण जमलं नाही.

पराग तुला आठवतय का माहीत नाही पण आपण एकदा फोनवर बोलत असताना मी तुला म्हटलेही होते की जसे मी ऑलीम्पिक्स वर एक बीबी काढला होता तसा विंबल्डनच्या मॅचेस व अमेरिकन नॅशनल पार्क्स वरही बीबी काढायचा माझा मनसुबा आहे >>>> हो आठवतं आहे ना! त्या फोन कॉलला आता दहा वर्ष झाली! २०१४ साली बोललो होतो आपण. काढ ते बाफ आतातरी. Happy

माझ्या मुलाने दिड वर्षात हायस्कुल ( ९ ते १२ वी) केले होते आणि मुलीने ५वीत असताना ६चे सायन्स. ७ वीचे गणित, ५वीचे>>>> वाह!

सविस्तर सांगाल का कसे??
आमच्या शलेनुसर
गणित घेता येत पण सायन्स कसं घेतलं?? सायन्स लॅब दरवर्षी एकच करता येते...
निश्चित मला काहीतरी माहीत नाहीये.. तुमच्याकडे माहिती/ लिंक्स असल्यास सांगाल का?

प्रत्येक शाळेचे नियम वेगळे असतात. काउन्सलर शी संपर्क करा ,काम नाही झाले तर प्रिनिस्पल, तिकडे पण काम नाही झाले तर स्कुल बोर्ड शी संपर्क करा.
आम्ही जिथे राहातो तिकडे ९-१२वी ला २८ क्रेडिट लागत होते. विझा मिळायला ६ महिने लागल्यामुळे आम्ही नोहेंबर मध्ये गेलो आणि ११वी ला फक्त ६ महिनेच मिळाले त्यात काही क्रेडीट केले . त्यातले काही भारताच्या ९-१० वीच्या मार्क शिट मधुन वापरले. काही समर च्या सुट्टी मध्ये केले.
(समर क्रेडिट बाहेर केले त्यासाठी काही पैसे लागले). उरलेले क्रेडीट १२ वी मध्ये पुर्ण केले.

मुकुंद, जि, साहिल सहमत सगळ्याशी.
मुकुंदा, हो रे, डॉक्युमेंटेशन हे फार फार सुंदर जपलय अमेरिकेत, इंग्लंडचा वारसा असेल का हा?
आणखीन एक म्हणजे सार्वजनिक लायब्ररीज, तिथल्या पुस्तकांची रेंज आणि कोणालाही असणारा त्यांचा अक्सेस.
अजून एक म्हणजे धूळ नसणं Lol
एकूणच निसर्गाबाबत खरच समृद्ध देश, फॉल हा एक सिझनही जीवन ओवाळून टाकावा असा! हा एक बरिक खंत, सुगंधी फुलं कमी असतात का? म्हणजे भारतात कशी सरसरकट रानातल्या फुलांनाही सुगंध असतो. तसं सापडलं नाही मला. अर्थातच माझा अनुभव फारतर 2-3 सिझनपुरता.
तिथला बर्फाळलेला स्तब्ध निसर्गही आवडतो, त्यातल्या धीरगंभीर, मळभ, काहीसा निरस वाटू शकणारा अन तरीही सुंदर भासणारा!

गेल्याच महिन्यात मी माउंट रेनिअर नॅशनल पार्क, व ऑलिंपिक नॅशनल पार्क( यु एस ए) .. तिसर्‍यांदा व बॅन्फ नॅशनल पार्क(कॅनडा). चौथी वेळ.. जाउन आलो. वरचा फोटो माउंट रेनिअरचा.. मर्टल फॉल इन द फोरग्राउंड. इथे नॅशनल पार्क्स बद्दल लिहीताना हा फोटो टाकल्याशिवाय राहवले नाही. या बीबीवर तो अस्थायी असेल तर नेमस्तकांनी हा फोटो उडवला तर माझी हरकत नाही.

मायबोलीवर “ मो“ ने २ वर्षांपुर्वी अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांचा इतिहास ही खुपच सुंदर मालीका लिहीली आहे. ती वाचली तर त्यात आजच्या अमेरिकेत होणार्‍या जॉर्ज फ्लॉइड, रेशिअल प्रोफाइलींग वगैरे होणार्‍या गोष्टींची पाळेमुळे समजण्यास मदत होइल)>> अतिशय सुंदर मालिका आहे ती.

१. बर्‍यापैकी शिस्त असणारं ट्रॅफिक
२. सर्वत्र आढळणारं झाडांनी / फुलझाडांनी केलेलं सुशोभिकरण
३. ठिकठिकाणी उपलब्ध असलेले आणि बहुतेकवेळा निगा राखलेले ट्रेल्स>>
Rmd, मी तर ह्या संगळ्याच्या प्रेमात पडले तिथे.

वर छंदीफंदी यांनी अमेरिकेतल्या शाळांमधल्या अभ्यासाबद्दल व त्यात मिळत असलेल्या शिक्षणाचा उल्लेख केला आहे.

मी तर त्याच्याही पुढे जाउन असे म्हणेन की कॉलेज मधे अंडरग्रॅज्युएट व ग्रॅज्युएट लेव्हल शिक्षणाचे म्हणाल तर रिसोर्सेस व ओरिजिनॅलिटी मधे अमेरिका अग्रगण्य व “ रिच“ आहे. अमेरिकेच्या शिक्षणपद्धतीत “कॉपी” कल्चर पेक्षा इनोव्हेटिव्ह,नविन ओरिजिनल थिंकिंग व आयडियाज डेव्हलप करण्यात जास्त भर व एन्करेजमेंट दिले जाते. म्हणुनच मग आपल्याला दिसुन येते की १७९४ मधे अमेरिकेच्या इलाय व्हिटनी ने शोधुन काढलेल्या “ कॉटन जिन“ पासुन अमेरिकेत जी अमेरिकन औद्योगीक क्रांती सुरु झाली तेव्हापासुन अमेरिकेने जगाला एकापेक्षा एक सरस असे शोध, प्रॉडक्ट्स व औषधे दिली आहेत. त्यात मग अमेरिकेने जगाला दिलेल्या एडिसनच्या दिव्यापासुन, ते सध्याच्या कॅन्सरच्या नवनविन औषधापर्यंत अनेक गोष्टी आल्या.

या सगळ्या जगभर वापर होणार्‍या अमेरिकेने शोधुन काढलेल्या गोष्टींच्या मागे अमेरिकेमधे जे इनोव्हेशन ( व त्या अनुषंगाने तुम्हाला होउ शकणारा आर्थिक फायदा) व ओरिजीनल आयडियाज वर भर देणारे जे कल्चर आहे ते कारणीभुत आहे.त्यामुळे आपल्याला दिसते की अ‍ॅपल स्मार्ट फोनची निर्मीती अमेरिकेत स्टिव्ह जॉब्स सारखा. माणुस करतो, जेफ बेझोस सारखा माणुस त्याच्या गराज मधुन अ‍ॅमेझॉनसारख्या जायंट ऑनलाइन रिटेलरचा बिझीनेस सुरु करतो, बिल गेट्स व मार्क झुकरबर्ग सारखी माणसे हार्व्हर्ड युनिव्हर्सीटि सोडुन देउन अनुक्रमे स्वतःची (आता जगात सगळ्यात मोठी असलेली सॉफ्टवेअर कंपनी) " मायक्रोसॉफ्ट" व सगळ्या जगात पॉप्युलर असलेली व वापरण्यात येणारी फेसबुकसारख्या कंपनीज निर्माण करतात, आणी सध्या एन्व्हिडिया सारखी कंपनी आर्टिफिशिअल इंटलिजंस साठी लागणारी प्रचंड शक्तीशाली " चिप" शोधुन काढते. फार्मा कंपनीमधे व मेडिसिन बाबात तर अशी कित्येक व अगणित उदाहरणे देता येतील की ज्यात फायझर, इलाय लिली, मर्क, जॉन्सन अँड जॉन्सन, अ‍ॅबट व अ‍ॅमजन सारख्या अमेरिकन फार्मा कंपनीजनी जगाला लाइफ सेव्हींग औषधे, उपकरणे व व्हॅक्सिन्स( कोव्हीड १९ व्हॅक्सिन हे आत्ताचे ताजे उदाहरण) दिली आहेत.

माझ्या मते अमेरिकेच्या वैभवाबद्दल व अमेरिकेबद्दल लिहीताना व त्याचा उहापोह करताना या अमेरिकन कल्चरच्या महत्वाच्या पैलुबद्दल, जो पैलु मला प्रचंड आवडतो , ते लिहीणेही महत्वाचे आहे.

Pages