अमेरिकेत राहूनही आपण भारत कसे मिस करतो - याविषयी बरेच ऐकले आहे, वाचले आहे, अनुभवले तर आहेच आहे. पण कधी कधी विचार येतो, इथे आवडण्यासारखे काय आहे? गूळाला लागणार्या मुंग्यांप्रमणे जगभरातून लोक इथे येतात. या देशाला 'मेल्टिंग पॉट' म्हटले जाते, असे काय आकर्षण आहे इथे?मग अर्थात पहीला मुद्दा येतो तो म्हणजे, समृद्धी, श्रीमंती, सुबत्ता, वैभव, पैसा, हिरवे डॉलर्स. पण त्याच्यापलिकडे काय आहे? ते पाहू यात.
इथल्या हवेत आहे आशा, एक संधी आणि ती संधी आपल्याला मिळणारच हा विश्वास. सोशल फॅब्रिक (फायबर?) मध्ये अपवर्ड मोबिलिटी इथे फार सोपी आहे. तुम्ही काळे, गोरे, पिवळे असा वा लाल. इथे कोणीतरी तुमच्याहून अगदी वेगळे आणि कदाचित सोशली वेल ऑफ तुमच्या प्रेमात पडू शकते. ना जात आड येते ना धर्म ना वंश. अगदी तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा आड येणार नाही. तुम्ही कॉफीशॉप मधले बरिस्ता असाल की प्लंबर, ट्रक ड्रायव्हर असा की उबर चालक - तुमच्या प्रेमात राजा पासून रंकापर्यंत कोणीही पडू शकते आणि ते समाजमान्यच आहे. कोणी जजमेन्ट पास करणार नाही. तुम्ही कोणीही असा, जर लायकी असेल तर तुम्हाला पदोन्नतीसाठी कोणी डावलणार नाही. खरीखुरी लँड ऑफ अपॉर्च्युनिटी.
ओह माय गॉड!! ज-ज-मे-न्ट. आपण जादूचा पेटाराच उघडला. किती किती प्रकारे नॉनजजमेन्टल फ्रीडम(स्वातंत्र्य) हवे ते करण्याचे, हवे ते लेण्याचे, खाण्याचे, वागण्याचे स्वातंत्र्य, मुभा मिळू शकते. मुभा? कोण देणार मुभा तुम्हाला? आहेच कोण द्यायला. प्रत्येकाला स्वतःचे व्याप आहेत. आयुष्य आहे. कोणालाही दुसर्याच्या जीवनात नाक खुपसण्यात अजिबात म्हणजे अजिबात स्वारस्य नाही. जर सामाजिक शिष्टाचारांच्या चौकटीच्या (जी की खूप खूप व्यापक आहे) आत तुम्ही राहणार असाल तर कोणी तुमच्याकडे ढुंकुनही पहाणार नाही. अदृष्य आहात तुम्ही. हव्या तितक्या आयडिओसिंक्रसीज (विक्षिप्तपणा) जपा, हवे ते करा. खरच स्टॅचु ऑफ लिबर्टी हेच या देशाचे प्रतिक म्हणुन योग्य आहे. खूप इन्डिव्हिज्युअॅलिटी आहे. अगदी हवीहवीशी. अर्थात हे जास्त प्रमाणात न्यू यॉर्क सारख्या महानगरांमध्ये दिसते. विस्कॉन्सिनच्या लहान खेड्यात क्वचित पायात पाय येतात.
अगदी महानगरात, खेड्यात यत्र तित्र सर्वत्र इथे उपवने, वाटिका, बागा, उद्याने आहेत. खेळाची मैदाने आहेत, लहान मुलांकरता जंगलजिम आहेत. कधी मूड फार पेन्सिव्ह झाला, खुशाल एखाद्या वाटिकेत फिरुन या, निवांत बाकावर बसा. नाहीतर सार्वजनिक वाचनालयात जाउन , कवितांचे पुस्तक काढुन निवांत वाचत बसा. कोणी डिस्टर्ब करणार नाही. खूप 'सुकून' आहे, असीम शांती आणि 'मी-टाईम'. हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. बागेत कोणी सॅक्सोफोन वाजवते कोणी क्लॅरिनेट तर कोणी व्हायोलिन - पैसे टाका पुढे जा. बरं खिशात पैसे नाहीत का, कोई बात नही. ऐका अगदि फुकट ऐका. एका सुंदर कवितेच्या या ओळीच पहा ना -
It is a place where
as you sit on the grass by the lake
a tall black man of a certain age
strolls by
blowing his saxophone
you smile and bow
he bows back
with his horn, his day is mellow
He's in the sun.
He has given mellowness
and sun
free of charge to you.
बाकी गर्दीचा अभाव, गर्दीतल्या धक्क्यांचा अभाव, सर्वत्र रेस्टरुम्स असणे, हवा तेवढा गर्दीतला एकांत मिळणे आणि अनेक ऑब्व्हियस आणि सर्वांना माहीत असलेले मुद्देही आहेत.
मला या धाग्यावर 'तुम्हाला, अमेरिकेबद्दल' काय आवडते त्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. शक्यतो गाडी रुळावरती राहो
no language barrier >>> हे
no language barrier >>> हे खूप महत्त्वाचं कारण असावं लोकं इथे रुळण्यामागे.
मैत्रेयी, स्वाती२, मुकूंद ह्यांच्या पोस्टी आवडल्या. राजने पण एकदम वेगळा मुद्दा मांडला आहे. ह्या विषयावर विचार करताना त्यादृष्टीने कधी डोक्यात आलं नाही.
त्यामुळे अमेरिकेमधे " सिव्हिक सेंस" चा आय क्यु फारच वरचा असल्याचा माझा अनुभव आहे. >>>> ह्याला जोरदार अनुमोदन. शाळांमधून अगदी लहानपणापासून ह्याचे बाळकडू पाजले जातात आणि त्याचा फार फायदा दिसून येतो.
मी गरीब आहे माझ्याकडे
मी गरीब आहे माझ्याकडे अमेरिकेत जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. माझ्याकडे अमेरिकेत जाऊन तिथली मजा लुटण्यासाठी असलेले पर्याय
१. पायी चालत चालत - यात खूप धोका आहे.
२. स्कुबा डायव्हिंग शिकून समुद्रामार्गे- मेहनत आहे
३. भुयार खणून जाणे- सध्या याचं काम सुरू आहे.
>>>>रिटायरमेंट नंतर
>>>>रिटायरमेंट नंतर कुठल्यातरी नॅशनल पार्कात "हाऊ मे आय हेल्प यू?" वाल्याचं काम करायचं बकेट लिस्टमध्ये आहे Proud
मस्त मस्त!!! पराग, खूप सुरेख कल्पना आहे. तुमची ही इच्छा पूर्ण होवो. प्रतिसादांबद्दल, आपले आभार
अगदी खरे सांगायचे तर, लॉस
अगदी खरे सांगायचे तर, लॉस अँजेलिसमधील खेड्यापासून ते व्हर्माँटमधील शहरापर्यंत, टेक्सासमधील खेड्यापासून ते विसकॉन्सिन च्या अगदी इवल्याश्या खुर्द-बुद्रुकपर्यंत अनंत ठिकाणी वास्तव्य झाले. बट नथिंग कंपेअर्स टु व्हेअर आय लिव्ह करंटली - न्यु यॉर्क. अर्रे काय सुंदर महानगर आहे. सुपर ड्युपर लिबरल. किती मोकळा श्वास घेता येतो इथे. स्वातंत्र्य आहे, इन्डिव्हिजुअॅलिटीचे माहेरघर आहे न्यु यॉर्क. प्रत्येकाला स्वतःचे क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन जपण्याची मोकळीक आहे, मग ते एक्स्प्रेशन/अभिव्यक्ती फॅशनची असो, लैंगिकतेची असो, जाती-धर्माची असो की जेंडरची असो. आख्ख्या अमेरिकेच्या वास्तव्यात , माझी जी ग्रोथ झाली ती न्यु यॉरकात, लीप्स & बाऊंडसनी, एक्स्पोनेन्शिअली झाली. कोणतेही लेबल न लावता, पूर्वग्रह न ठेवता, माणसाकडे मी पहायला शिकले. हे स्वतः अनुभवल्याखेरीज मला तरी कळले नसते.
ना कोणाच्या पायात पाय. आपण आणि आपली स्पेस, क्रिएटिव्हिटी, आपले करीअर, आपली अभिव्यक्ती - अमर्याद संधी आहेत. ओह माय गॉड नो जजमेन्टस. काय मोकळा श्वास घेता येतो.
मुलीशी कल्चरल नुआन्सेस बद्दल खूप गप्पा मारल्या, मारते. ती मला हेच सांगते की इथे करीअरचे क्षेत्र तिथले लोक बरेचदा वेगळे आणि पर्सनल, वैयक्तिक ओळखी वेगळ्या ठेवतात लोकं. तुम्हाल तुमची कॉम्पिटंन्सी दाखवावी लागते. तुम्ही स्वतःची काळजी घेउ शकत नसाल, कॉम्पिटंट नसाल तर कोणी तुमच्यावर वेळ आणि उर्जा का खर्च करावी? मी तिला म्हटले अगं मी आत्मविश्वास नसल्यासारखी हळू आवाजात, आणि अगदी मेंगळटासारखी बोलले तर इथे लोक अजिबात उभेही करत नाहीत. गेल्या जॉब फेअरला मी लहान आवाजात स्टॉलवरच्या, एका म्हातार्या बाईला, विचा रत होते - व्हॉट आर युअर रिक्वायरमेन्टस. त्यावर ती बाई जोरात मला म्हणाली "वी नीड कॉन्फिडंट पीपल" आणि दुसर्याच कोणाशी तरी वळून बोलू लागली. हे रेसिझम नाहीतर काय आहे? मुलगी म्हणाली - धिस इस कल्चरल नुआन्स. इथे हळू पणा, मेंगळटपणा म्हणजे मॅनिप्युलेशन वाटते लोकांना. सुस्पष्ट नीट आवाजात बोलावे लागते, मात्र त्याच बरोबर पोलाईट मॅनर्स जसे थँक यु, प्लीज इथे जनरसली वापरावे लागतात, नाहीत लोकांना तुम्ही रुड वाटता. कोणाशीही बोलताना तुम्ही तक्रारी सांगू लागलात तर त्यांना वाटते या लहान सहान गोष्टींशी हिला डिल करता येत नाही. शी इज अॅन एनर्जी व्हँपायर. म्हणजे हा तिचा शब्द नाही पण म्हणजे असे की तक्रार करणार्या लोकांना इतर लोक थकतात आणि मग टाळू लागतात.
तर ते एक जाऊच देत पण एकंदर न्यु यॉर्क शहराने मला खूप समृद्ध केले. हे महानगर अजिबात सोडावेसे वाटत नाही. स्पेशली विसकॉन्सिनच्या रस्ट-बेल्ट, खेड्यात आणि इथे काय मोठ्ठा फरक आहे तो फर्स्ट हँड अनुभवल्यावरती तर नाहीच नाही.
विसकॉनसिनमध्ये ऑफिसात एक लेस्बिअन स्त्री होती. तिच्या मागे लोकं फार हेटाळणीच्या सूरात बोलत. स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियांबद्दलही असेच डेरोगेटरी भाव दर्शवत. मला रेसिझमचा अनुभव अगदी सिव्हीअर आलेला. 'मिनेसोटा नाईस' - https://en.wikipedia.org/wiki/Minnesota_nice अशी एक टर्म आहे म्हणजे - तोंडावरती गोड आणि मागे कुचूकुचू. हा अनुभवही मी घेतला. याउलट या महानगरात ना कोणाला पडलीये कोणाची हेटाळणी करायची ना आहे तितका मोकळा वेळ. तुम्हाला तुमच्या आईवडीलांच्या जातीवरुन, हुद्द्यावरुन, आर्थिक स्थितीवरुन इथे अजिबात विचारलेच जात नाही. तुम्ही आणि तुमचे कर्तुत्व. बस्स! दॅटस ऑल दॅट मॅटर्स.
ही अॅटिट्युड, वृत्ती अमेरीकेच्या वैभवात गणली जावी. किंबहुना ही लाईफस्टाइल ज्यावरती जीव पाखडावा.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
अनुभव अमेरिकेचा काहीच नाही पण वाचायला आवडतंय.
Ohh, that's interesting.
अद्वितीय अनुभव
छान अनुभव सामो.
छान अनुभव सामो.
छान लिहिलंय सामो!
छान लिहिलंय सामो!
शर्मिला, देवकी, अन्जू आभारी
शर्मिला, देवकी, अन्जू आभारी आहे.
चांगला धागा आहे, विशेषत:
चांगला धागा आहे, विशेषत: अमेरिकेत काय काय वाईट आहे हे जिथे तिथे वाचायला मिळते, त्याला काउंटर अशाही एका धाग्याची गरज होती.
सगळ्या मुद्द्यांशी अगदी सहमत. पार्क्स, लायब्ररी, पार्किंग, बाथरूम्स, ररस्त्यांचे जाळे, स्वच्छता, घरे - दुकाने - परिसर सुशोभित ठेवणे, पब्लिक शाळा, शिक्षण, तदनुषंगिक अनुभव, अपंग वा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांसाठी सोयी, हॉर्न गरज लागल्यासच वाजवणे ( मोठ्या शहरात परिस्थिती जरा वेगळी असू शकते ! ) , म्हाताऱ्या लोकांना मिळणारी वागणूक ( मी फ्लोरिडात राहते - हे नेहमी बघते), व्हॉलेंटीअर होण्याची आवड, सार्वजनिक मालमत्ता शक्यतो विद्रुप होणार नाही असे बघणे, कमी आवाजी प्रदूषण, ९११ ची सोय, श्रमाला-कामाला योग्य महत्व-प्रतिष्ठा , स्वावलंबन, रोजच्या जगण्यात - नेहमीच्या कामांत लाच वगैरे द्यायला न लागणे, लोकांनी एकमेकांच्यात नाक न खुपसणे, सगळीकडे एक प्राथमिक युनिफॉर्मिटी असणे ( त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर अगदी बेसिकपासून सुरवात करावी लागत नाही), उदंड संधी - अनेक गोष्टींनी इथले आयुष्य सुंदर केले आहे - मी ही एक think out loud करून घेतले.
इथे उपलब्ध असणाऱ्या संधीविषयी एक दोन वेगळे अनुभव -
साध्या गुन्ह्यात पकडलेल्या अल्पवयीन मुलांवर juvenile कोर्टात वेगळी केस चालवली जाते. गुन्हा तसा कबूलच असतो पण शिक्षा योग्य व्हावी, त्यांना योग्य मार्गावर नेईल, पुन्हा ते असे करण्यास ते उद्युक्त होऊ नयेत म्हणून मुलांच्या वतीने किंवा स्टेटच्या वतीने वकील म्हणून व्हॉलेंटीअर्स असतात. हायस्कुलमध्ये असताना मुलगा juvenile कोर्टात व्हॉलेंटिअर वकील म्हणून काम करत असे. थोडेबहुत कायद्याचे ज्ञान, आपल्याच बरोबरच्या मुलासाठी empathy, त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीबद्दल जाणीव असणे , कधीकधी त्याच्याच शाळेतला कोणीतरी आरोपी म्हणून असे तेव्हाची घालमेल - असे शिक्षण सहजासहजी मिळणार नाही ते १५-१६ वर्षांपासून आपसूक मिळाले. त्यासाठी तुम्ही कोणी privileged असण्याची गरज नव्हती,
आमच्या परिचयात एका ममव गृहस्थांनी ५५-५६ लाच निवृत्ती घेतली, तसे अमेरिकन स्टॅंडर्डने हे निवृत्तीचे वर फारच कमी आहे पण कदाचित त्यांना शक्य होते. निवृत्तीनंतर या गृहस्थाने लोकल शेरीफ / पोलीससाठी असते ते प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता आमच्या सिटी पोलीसमध्ये "व्हॉलेंटरी" काम करतात. रात्र - दिवस ८ ८ तास कधीही ड्युटी असो , एका नॉर्मल जॉबप्रमाणे करतात आणि ते कोणताही मोबदला न घेता.
चांगला धागा.
चांगला धागा.
बाहेरुन तिथे गेलेल्या लोकांमधे तिथे गेल्यावर हा अॅटिट्युड कसा डेवलप होतो? काय कारणे असावीत असा प्रश्न पडला.
>>बाहेरुन तिथे गेलेल्या
>>बाहेरुन तिथे गेलेल्या लोकांमधे तिथे गेल्यावर हा अॅटिट्युड कसा डेवलप होतो?>>
मूळात अॅटिट्यूड असतोच, तिथे गेल्यावर त्याला पोषक असे वातावरण मिळते, चांगल्या प्रकारे व्यक्त व्हायला संधी मिळते. मूळातच वृत्ती नसेल तर मग इथेही मागील पानावरुन पुढे सुरु रहाते.
मिस्टर जे चा उल्लेख तो जानीटर वगैरे करणारी, आपण साधेपणाने अबकला ओळखत असाल ना विचारल्यावर आढ्यतेने फ्रंटडेस्कवाले म्हणत झटकणारी देशी मंडळी बघण्यात आहेत. अशी मंडळी फक्त घेत असतात, देत काही नाहीत वर परत आपल्या महान संस्कृतीचे ढोल-ताशे वाजवणे असतेच.
Pages