वैभवशाली अमेरिका

Submitted by सामो on 12 September, 2024 - 10:10

अमेरिकेत राहूनही आपण भारत कसे मिस करतो - याविषयी बरेच ऐकले आहे, वाचले आहे, अनुभवले तर आहेच आहे. पण कधी कधी विचार येतो, इथे आवडण्यासारखे काय आहे? गूळाला लागणार्‍या मुंग्यांप्रमणे जगभरातून लोक इथे येतात. या देशाला 'मेल्टिंग पॉट' म्हटले जाते, असे काय आकर्षण आहे इथे?मग अर्थात पहीला मुद्दा येतो तो म्हणजे, समृद्धी, श्रीमंती, सुबत्ता, वैभव, पैसा, हिरवे डॉलर्स. पण त्याच्यापलिकडे काय आहे? ते पाहू यात.

इथल्या हवेत आहे आशा, एक संधी आणि ती संधी आपल्याला मिळणारच हा विश्वास. सोशल फॅब्रिक (फायबर?) मध्ये अपवर्ड मोबिलिटी इथे फार सोपी आहे. तुम्ही काळे, गोरे, पिवळे असा वा लाल. इथे कोणीतरी तुमच्याहून अगदी वेगळे आणि कदाचित सोशली वेल ऑफ तुमच्या प्रेमात पडू शकते. ना जात आड येते ना धर्म ना वंश. अगदी तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा आड येणार नाही. तुम्ही कॉफीशॉप मधले बरिस्ता असाल की प्लंबर, ट्रक ड्रायव्हर असा की उबर चालक - तुमच्या प्रेमात राजा पासून रंकापर्यंत कोणीही पडू शकते आणि ते समाजमान्यच आहे. कोणी जजमेन्ट पास करणार नाही. तुम्ही कोणीही असा, जर लायकी असेल तर तुम्हाला पदोन्नतीसाठी कोणी डावलणार नाही. खरीखुरी लँड ऑफ अपॉर्च्युनिटी.

ओह माय गॉड!! ज-ज-मे-न्ट. आपण जादूचा पेटाराच उघडला. किती किती प्रकारे नॉनजजमेन्टल फ्रीडम(स्वातंत्र्य) हवे ते करण्याचे, हवे ते लेण्याचे, खाण्याचे, वागण्याचे स्वातंत्र्य, मुभा मिळू शकते. मुभा? कोण देणार मुभा तुम्हाला? आहेच कोण द्यायला. प्रत्येकाला स्वतःचे व्याप आहेत. आयुष्य आहे. कोणालाही दुसर्‍याच्या जीवनात नाक खुपसण्यात अजिबात म्हणजे अजिबात स्वारस्य नाही. जर सामाजिक शिष्टाचारांच्या चौकटीच्या (जी की खूप खूप व्यापक आहे) आत तुम्ही राहणार असाल तर कोणी तुमच्याकडे ढुंकुनही पहाणार नाही. अदृष्य आहात तुम्ही. हव्या तितक्या आयडिओसिंक्रसीज (विक्षिप्तपणा) जपा, हवे ते करा. खरच स्टॅचु ऑफ लिबर्टी हेच या देशाचे प्रतिक म्हणुन योग्य आहे. खूप इन्डिव्हिज्युअ‍ॅलिटी आहे. अगदी हवीहवीशी. अर्थात हे जास्त प्रमाणात न्यू यॉर्क सारख्या महानगरांमध्ये दिसते. विस्कॉन्सिनच्या लहान खेड्यात क्वचित पायात पाय येतात.

अगदी महानगरात, खेड्यात यत्र तित्र सर्वत्र इथे उपवने, वाटिका, बागा, उद्याने आहेत. खेळाची मैदाने आहेत, लहान मुलांकरता जंगलजिम आहेत. कधी मूड फार पेन्सिव्ह झाला, खुशाल एखाद्या वाटिकेत फिरुन या, निवांत बाकावर बसा. नाहीतर सार्वजनिक वाचनालयात जाउन , कवितांचे पुस्तक काढुन निवांत वाचत बसा. कोणी डिस्टर्ब करणार नाही. खूप 'सुकून' आहे, असीम शांती आणि 'मी-टाईम'. हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. बागेत कोणी सॅक्सोफोन वाजवते कोणी क्लॅरिनेट तर कोणी व्हायोलिन - पैसे टाका पुढे जा. बरं खिशात पैसे नाहीत का, कोई बात नही. ऐका अगदि फुकट ऐका. एका सुंदर कवितेच्या या ओळीच पहा ना -

It is a place where
as you sit on the grass by the lake
a tall black man of a certain age
strolls by
blowing his saxophone
you smile and bow
he bows back
with his horn, his day is mellow
He's in the sun.
He has given mellowness
and sun
free of charge to you.

बाकी गर्दीचा अभाव, गर्दीतल्या धक्क्यांचा अभाव, सर्वत्र रेस्टरुम्स असणे, हवा तेवढा गर्दीतला एकांत मिळणे आणि अनेक ऑब्व्हियस आणि सर्वांना माहीत असलेले मुद्देही आहेत.

मला या धाग्यावर 'तुम्हाला, अमेरिकेबद्दल' काय आवडते त्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. शक्यतो गाडी रुळावरती राहो Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तसा लहानपणापासुन विविध खेळांचा भोक्ता होतो. वाडेकर-पद्माकर शिवलकर -गावस्कर- वेंगसरकर या माझ्या मुंबईतल्या क्रिकेट पटुंमुळे लहानपणी क्रिकेटचे वेड लागले नसते तरच नवल होते पण माझा मोठा भाउ १९७२ पासुन अमेरिकेत असल्यामुळे तो मला नियमीत अमेरिकेच्या जिमी कॉनर्स, जॉन मॅकेन्रो व ख्रिस एव्हर्ट या टेनिसपटुंच्या यु एस ओपन, फ्रेंच ओपन व विंबल्डनच्या मॅचेसच्या व्हिडिओ कॅसेट्स नियमित पाठ्वायचा. त्याचबरोबर १९७२ म्युनिक ऑलिंपिक्स व १९७६ च्या माँट्रियाल ऑलिंपिक्स च्या व्हिडियो कॅसेट्सही त्याने माझ्यासाठी भारतात पाठ्वल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट बरोबरच टेनीस व स्विमींग मधे आणी एकंदरतीच ऑलिंपिक्स मधल्या स्विमिंग, जिमनॅस्टिक्स व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांच्या प्रेमात मी अगदी लहान वयातच पडलो. त्या लहान वयातच मला तेव्हा अमेरिकेच्या सगळ्या खेळामधल्या वर्चस्वा बद्दल व नैपुण्याबद्दल खुप कुतुहल व आदर वाटु लागला. पण तेव्हा मी अमेरिकेत अजुन पाउल ठेवले नव्हते. तेव्हापासुन अमेरिकेच्या खेळातल्या या वर्चस्वाचे मला राहुन राहुन नवल वाटायचे. काय बर गौडबंगाल असेल यांच्या या " रिच" स्पोर्ट्स ट्रॅडिशन व कल्चरचे? ते मला मी स्वतः जेव्हा ८० च्या दशकात अमेरिकेत माझ्या उच्च्च शिक्षणासाठी आलो तेव्हा उमजले!

तर मंडळी, माझ्या पुढच्या पोस्टमधे आपण या अमेरिकेच्या " वैभवशाली" स्पोर्ट्स कल्चरचा आढावा घेउ व त्या " वैभवशाली अमेरिकन स्पोर्ट्स कल्चर" व त्यांच्या स्पोर्ट्समधल्या वर्ल्ड डॉमिनन्सच्या कारणांचा उहापोह करु. माझ्या मते तोही “ अमेरिकन वैभवाचा“ एक महत्वाचा पैलु आहे व अमेरिकेबद्दल जे मला आवडते त्याचा एक अविभाज्य भाग आहे!

फ्रीडम ऑफ स्पीच.
इथे सुप्रीम कोर्टाने अमेरिकन झेंडा जाळणे सुद्धा फ्री स्पीचच्या सीमेत ठेवले आहे. इथपर्यंत फ्री स्पीच साठी कमिटेड देश विरळा.

काही अंशापर्यंत अमेरिकन लोकांची लिबरटेरियन वृत्ती भावते. आपले हक्क माहित असणे व ते पोलीस, प्रशासन सर्वांना दाखवत राहणे ही वृत्ती आवडते.

उत्तम धागा आहे. मूळ लेख व अभिप्राय यातून देश थोडा थोडा समजत आहे. आजवर कधी इतक्या वैभवशाली देशात जाण्याची संधी तर आली नाहीच, यापुढेही ती शक्यता नाही.

आमच्या नातेवाईकांपैकी एक म्हणाले होते:

"There is nothing like America"

त्याचे प्रत्यंतर हा धागा वाचून येत आहे. Happy

धागा फारच आवडला. मी अमेरिका वारी केलेली नाही. त्यामुळे मुख्यतः वाचन ( लोकसत्ता मधील लेख) आणि यूट्यूब व्हिडिओज याद्वारे माझ्या मनात अमेरिकेची फारच चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. धागा वाचून त्यास पुष्टी मिळाली.
मला वाटतं अमेरिकेत माणूस म्हणून किंवा नुसतं नागरिक म्हणून तुम्हाला किंमत आहे. म्हणजे बाह्य गोष्टी जशा जात, धर्म, पद, ओळखी, पैसा असल्या किंवा नसल्या तरी रोजच्या जगण्यात काही फरक पडत नाही. नियम सर्वांना सारखेच असतात. इथे भारतात अशा सामान्य नागरिकांना कुत्रा पण भाव देत नाही. वशिला लावल्याशिवाय कोणतंच काम होत नाही. आणि योग्य वशिला असेल तर कोणतंही काम होऊ शकतं.

@बेफिकीर,
"There is nothing like America"
खरं आहे.
मलाही माझ्या मध्यम वर्गीय गृहिणी नजरेतून (शिवाय टुरिस्ट )काहीतरी लिहायचं आहे अमेरिकेबद्दल.

मुकुंद, संशोधन आणि त्यासाठी उपलब्ध असलेली व्यवस्था विशेषतः विद्यापीठांमध्ये हे निश्चित अमेरिकेचे वैभव आहे. तुमच्याकडे विषयाचे सखोल ज्ञान, passion, आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर भाषा किंवा इतर अनेक भेद आड न येता संशोधन कसे करता येते हे या विद्यापीठांत अनुभवता येते. कुठलीही मानसन्मानाची अनावश्यक उतरंड या परिसरात पाळली जात नाही. सर्वजण एकमेकांना आदराने वागवतात. लॅबमध्ये अर्धवेळ काम करणारा undergrad विद्यार्थी देखील आपले प्रामाणिक मत मांडू शकतो आणि ते गंभीरपणे घेतले जाते. भारतातल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या प्राध्यापकांची सवय असलेल्या माझ्यासाठी हा एक सुखद धक्का होता!
इथे अमेरिकेचे कौतुक करणे अपेक्षित आहे त्यामुळे खटकणाऱ्या गोष्टी मांडत नाहीये. त्या निश्चित आहेत. For me, these cons override the benefits पण म्हणून चांगल्या गोष्टींचे महत्त्व कमी होत नाही.

>>> @बेफिकीर,
"There is nothing like America"
खरं आहे.

हे माझे मत नाही. माझ्या एका नातेवाईकांचे मत आहे. अमेरिकेबद्दल माझे काही मत बनू शकत नाही, कारण मी आजवर तिकडे गेलेलो नाही व यापुढे जाईन ही शक्यता नाही. Happy

“There is nothing like America"

बेफिकीर, तुमच्या नातेवाइकांसारखे असे इतके टोकाचे विधान मी करणार नाही कारण कित्येक दशके अमेरिकेत राहुन मला इथल्या निगेटिव्ह गोष्टीही सखोल माहीत आहेत. पण जिज्ञासा बाबतीत जश्या त्या निगेटिव्ह गोष्टी आउटवेड पॉझिटिव्ह्ज, माझ्या बाबतीत मात्र पॉझीटिव्ह्स आउटवेड निगेटिव्ह्ज! आता ही कर्मभुमीच माझ्यासाठी मायभुमी सारखी आहे. आय अ‍ॅम रेडी अँड अ‍ॅट पिस विथ लिव्हिंग माय बोन्स हिअर व्हेन आय डाय! Happy

जिज्ञासा, तुझ्या पोस्टला अनुमोदन! अग मी जेव्हा इथे युनिव्हर्सीटी मधे दाखल झालो तेव्हा युनिव्हर्सिटीच्या मुख्य लायब्ररीची लांबलचक व रुंद अशी १२ मजली दगडी इमारत व त्यातली मिलिअन्स ऑफ पुस्तके व जर्नल्स बघुन अवाकच झालो! आणी मग दुसर्‍या आठवड्यात कळले की युनिव्हर्सीटीच्या कँपस वर अजुन सायंस ची अजुन एक वेगळी लायब्ररी व लॉ स्कुलची.अजुन एक लायब्ररी अश्या दोन अजुन लायब्ररीज आहेत! डोके बधीर झाले होते ते सगळे बघुन! ज्ञान संपादनासाठी आलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला अलिबाबाच्या गुहेत अलिबाबाला सोने, रत्ने, माणके पाहुन जसा हर्षवायु झाला होता तसे मला त्या लायब्ररीज बघुन झाला होता! Happy

(अमेरिकेचे स्पोर्ट्स कल्चर जसे एकदम रिच आहे व ते अमेरिकेच्या वैभवाचे जसे एक प्रतिक आहे तसेच “ अमेरिकन लायब्ररीज” हाही अमेरिकेच्या वैभवाचा एक महत्वाचा हिस्सा आहे! त्या विषयावर अजुन नंतर सविस्तर लिहीनच)

मी जेव्हा इथे युनिव्हर्सीटी मधे दाखल झालो तेव्हा युनिव्हर्सिटीच्या मुख्य लायब्ररीची १२ मजली इमारत व त्यातली मिलिअन्स ऑफ पुस्तके व जर्नल्स बघुन अवाकच झालो! >> अगदी असाच अनुभव माझ्या मुलाचा होता. तो यूनिवर्सिटीत गेल्यावर वेड्यासारखा सतत तिथल्या लायब्ररी बद्दल बोलायचा आणी तिथले फोटो पाठवायचा.
मला असच तिथली म्युझियम पण बघून झालं.

मुकुंद

वैभवशाली अमेरिका - स्पोर्ट्स कल्चर
वैभवशाली अमेरिका - नॅशनल पार्क्स
वैभवशाली अमेरिका - लायब्ररीज

ह्या यादीत वेळोवेळी भर पडत जाईल असेही वाटते. पण निदान ह्यावर वाचायला लवकरच मिळावे ही अपेक्षा ठेवत आहे.

>>> बेफिकीर, तुमच्या नातेवाइकांसारखे असे इतके टोकाचे विधान मी करणार नाही कारण कित्येक दशके अमेरिकेत राहुन मला इथल्या निगेटिव्ह गोष्टीही सखोल माहीत आहेत.

ते पर्यटक म्हणून गेले होते. तुमचे मत तसे असणे शक्यच नसणार.

अरे काय सुंदर लिहीताय लोकहो मुकुंद, पराग, जि, अवल - एकसे बढकर एक.
>>>>>>>फॉल हा एक सिझनही जीवन ओवाळून टाकावा असा!
आहाहा काय समर्पक शब्दरचना केलीस अवल. अगं आय अ‍ॅम लुकिंग फॉर्वर्ड
..................जरी सीझन चेंजेस चे मूड स्विंग्स आणि त्यातून येणारे डिल्युजनल रोमँटिक विचार सुरु होतात तरी
लवकरच सेट होइल ते.
असो. फॉल प्राणप्रिय सीझन आहे. ती घराघरंच्या पायर्‍यांवरती केलेली भोपळ्यांची उतरंड, पंपकिन स्पाईस कॉफीचा रतीब, मेणबत्त्या, केशरपानांची wreaths, कणसांची भरास आलेली शेते - ही पेन्सिल्व्हेनियात लँकॅस्टरला जाताना दिसू लागतात. कमालीची सुंदर दिसतात. मैलोंन मैल हिरवळ आणि मधे ही सोनेरी वार्‍यावरती डुलणारी शेते.
या ऋतुतला वारा म्हणजे खरोखर दैवी असतो. काय सुरेख वाटतं अंगभर सुंदर सुंदर शाली लपेटून रोज पानांच्या सड्यातून वाट काढताना. खूप शाली वापरुन घेते मी या ऋतुत.
-------------------------------------------------------
साहील तुमच्या मुलांचे कौतुक आहे.
----------------------------------------
मुकुंद तुमचे लिखाण या पोस्टवरती वाया घालवु नका. तुमचा धागा काढा कारण तुम्ही फार सुरेख लिहीताय आणि उत्कटतेने मांडताय म्हणजे तुमचं लिखाण वाचताना, मला ती दॄष्टी हवी असे वाटते आहे हाहाहा Happy तुम्हला लिहायचे तर जरुर लिहा अर्थात. धाग्याकरता फार चांगलेच आहे ते.
-------------------------------------------
डेलावेअरचा आमच्या घरामागचा हा फॉल -
इथे एक कोल्हा फॅमिली रहायची. क्ल्हिण व तिची ४ पिल्ले दिसायची.


.

.

.

अमेरीका ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. इथली वाचनालये, नॅशनल पार्क्स-स्टेट पार्क्स, पब्लिक एज्युकेशन सिस्टिम, उच्च शिक्षणाच्या संधी वगैरे अनेक गोष्टींचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मात्र मला रोजच्या जगण्यात वारंवार जाणवणारी, सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे इथल्या लोकशाहीत सामान्य माणसाचा सातत्याने असलेला सक्रिय सहभाग आणि श्रमाला असलेली प्रतिष्ठा! आपल्या हक्कांची जाणीव आहेच पण त्याही पेक्षा जास्त आपल्या कर्तव्यांची जाणीव आहे. अमेरीकेत सिविक एंगेजमेंट्/लोक सहभागाला प्रोत्साहन दिले जाते. गावातील सरकारी यंत्रणांच्या मिटिंगांना सामान्य नागरीकांची उपस्थिती असते. त्यांच्या तक्रारींची. सुचनांची नोंद घेणे होते. अगदी लहान लहान गावं, पण ती शक्य तितकी स्वयंपूर्ण असावित म्हणून प्रयत्न असतात. जर बजेट कमी असेल तर अँब्युलन्स, फायर ट्रक वगैरे इक्वीपमेंट्साठी पैसे वापरणे आणि काम करणारी माणसे ही ट्रेनिंग घेतलेले स्वयंसेवक अशा प्रकारे फायर डिपार्टमेंट, इमर्जन्सी सर्विस वगैरे चालवले जाते. जिथे बजेट मधे पैसे आहेत तिथेही पेड स्टाफच्या जोडीला वेळ पडलीच तर म्हणून स्वयंसेवक नोंदलेले असतात. केवळ आपत्कालीन परीस्थितीतच नव्हे तर सामान्य परीस्थितीतही आपल्या वेळाचे, कौशल्याचे दान करणे इथे आवर्जून केले जाते. गावातले सिनियर सेंटर, लायब्ररी, फुड पॅन्ट्री, हॉस्पिटल, शाळा, पार्क-ट्रेल्स वगैरे अनेक ठिकाणी तुम्हाला रोज नेमुन दिलेले काम शांतपणे करणारे स्वयंसेवक आढळतील. सरकारी यंत्रणांच्या बरोबरीने काम करणारे सामान्य समाजसेवकांचे जे जाळे आहे ते अमेरीकेला वैभवशाली बनवण्यात मोलाचा हातभार लावते.

मुकुंद,
तुमच्या कडून आणखी वाचायला आवडेल.
खूप छान पोस्ट स्वाती.

१ स्वच्छतागृहे , विशेषतः महिलांसाठी. भारतात आता काय स्थिती आहे कल्पना नाही पण मी होतो तेव्हा भयाण होती. इथे अगदी आडगावच्या सिनेमा थियेटर / किराणा दुकान /पेट्रोल पंप इथे छान सोय असते. भारतात मुली / महिला जायचेच टाळत, त्यातून मग बाकीची कॉम्प्लिकेशन्स !
२ अगदीच आवश्यक असेल तरच हॉर्न वाजवणे. रात्रीची शांतता !
३ सार्वजनिक वाचनालये व तिथे मिळणारी वागणूक. ( फुकट असूनही)
४ मध्यमवर्गीयांनी सरकारी शाळांकडे पाठ फिरवलेली नाही, त्यामुळे सरकारी शाळांचा दर्जा कायम आहे.
५ सरकारी नोकरीचे अवास्तव स्तोम नसणे. इतक्या वर्षात अनेकांशी तुमचा मुलगा /मुलगी काय करतो छाप संवाद झाले पण एकानेही पदवी झाली आहे आता सरकरी नोकरीसाठी परिक्षा देत आहे, असे उत्तर दिले नाही. एखाद्याला IRS ( इथले इन्कम टॅक्स डिपार्त्मेम्ट) मध्ये नोकरी मिळाली व त्याचे फोटो बिटो छापून आले असे होत नाही.

>>>>तिथे मिळणारी वागणूक. ( फुकट असूनही)
हाहाहा विकु सटली तुम्ही मस्त फटकेबाजी करता Happy
प्रतिसादाबद्दल आभार.

>>>>एखाद्याला IRS ( इथले इन्कम टॅक्स डिपार्त्मेम्ट) मध्ये नोकरी मिळाली व त्याचे फोटो बिटो छापून आले असे होत नाही.
Happy
पण लहान गावांत 'कमिंग होम' सोल्जर्सचे फ्लेक्स असतात बरं का. खांबांवरती सुशोभित वेलकमिंग पोस्टस वगैरे असतात. हे देशभक्तीचे लोण विशेषतः लहान गावांत खूप असते.

स्वाती२, तुझे पोस्ट लाख मोलाचे आहे. नेमक्या शब्दात तु अमेरिकन समाजातल्या वरकरणी मंडेन व साधारण वाटणार्‍या पण समाजाला प्रचंड उपयुक्त अश्या समाजसेवी व्हॅल्यु सिस्टिम्स वर बोट ठेवले आहेस! ब्राव्हो!

“सरकारी यंत्रणांच्या बरोबरीने काम करणारे सामान्य समाजसेवकांचे जे जाळे आहे ते अमेरीकेला वैभवशाली बनवण्यात मोलाचा हातभार लावते” या तुझ्या वाक्याला १००% अमुमोदन! (असे जाळे शाळांमधेही PTA ( parent teacher association ) सारख्या ऑर्गनायझेशन च्या रुपाने दिसुन येते.)

हर्पेन, स्कोर ठेवल्याबद्दल धन्यवाद! Happy

जसा वेळ मिळेल तसा त्या प्रत्येक मुद्द्यांवर सविस्तर लिहायची इच्छा आहे. अजुनही या विषयावर खुप मुद्दे आहेत. म्हणुन मी सामोला म्हणालो की विषयाची व्याप्ती फार मोठी आहे.

विकु, सही बोललात! “ एखाद्याला IRS ( इथले इन्कम टॅक्स डिपार्त्मेम्ट) मध्ये नोकरी मिळाली व त्याचे फोटो बिटो छापून आले असे होत नाही.“ Proud

त्या अनुषंगाने अजुन एक गोष्ट! ते म्हणजे रोजच्या जिवनात करप्शनला सामोरे जाण्याचे दिव्य इथे पार पाडायला न लागणे! कुठल्याही सरकारी कामात शंभर डॉलरची नोट पुढे केली तरच माझे काम होइल ही भिती इथे नसते! उलट जे असे लाच द्यायचा प्रयत्न करतील तेच इथे जेलची हवा खातील! तुम्ही हायवे वर किंवा कुठल्याही रस्त्यावर स्पिडींग करताना पोलिसाकडुन पकडला गेलात व तेव्हा १०० डॉलर्स पोलीसाला देउ केलेत तर ताबडतोब बेड्या पडतील याची खात्री बाळगा! ( अमेरिकेत करप्शन नाहीच असा दावा मी करत नाही पण रोजच्या जिवनात सामान्य माणसाला करप्शनच्या दिव्यातुन जायला लागत नाही हा फार मोठा मला आवडणारा प्लस पॉइंट आहे!)

अजुन काही महत्वाचे आवडीचे मुद्दे-

१:अमेरिकेतली ९११ ही इमर्जन्सी फोन लाइन! आग, मेडिकल इमर्जन्सी किंवा पोलीस मदत हवी असेल तर् ९११ डायल केल्यावर पोलीस, अँब्युलंस किंवा फायर ट्रक २ ते ३ मिनीटात बहुतेक ठिकाणी (विथ फ्यु एक्सेप्शन्स) तुमच्या दारासमोर हजर असतो!

आणी ते शक्य होते ते ..

२: मला आवडणार्‍या इथल्या शिस्तबद्द ट्राफिक व हायवे/ रस्त्यांच्या जाळ्यामुळे! इथे व बर्‍याच जणांनी इथल्या शिस्तबद्द ट्राफिकबद्दल लिहीले आहेच पण इथल्या इंटरस्टेट हायवेचे( थँक्स टु लेट प्रेसिडेंट ड्वाइट आयझेन्हॉवर) व इतर रस्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे! समर मधे फॅमीलीसकट कार मधुन व्हेकेशनसठी रोड ट्रिप न करणारा अमेरिकन मला अजुन बघायचा आहे! हे हायवेज व रोड्स माझ्या अमेरिकेतल्या अनेक आवडीच्या गोष्टींपैकी एक आहे!

सामो, तुझा बीबी काय की माझा बीबी काय? काही फरक पडत नाही. एकदा लिहायची लिंक लागली की दुसरा बीबी वगैरे भानगड नको म्हणुन इथेच लिहीत आहे. होप ईट्स ओके विथ यु!

स्वाती२, तु म्हणालीस की इथले स्वयंसेवक लोक व संस्था किती सक्रिय असतात. त्यावरुन आठवले व इथे ते जरुर नमुद केले पाहीजे की १९ व्या शतकात अमेरिकन सिव्हिल वॉरच्या सुमारास क्लॅरा बर्टन ही महीला जिने रेड क्रॉस ही आता जगभर प्रसिद्ध असलेली स्वयंसेवी संस्था स्थापन केली, ती अमेरिकेनच होती!

त्या अनुषंगाने अजुन एक गोष्ट! ते म्हणजे रोजच्या जिवनात करप्शनला सामोरे जाण्याचे दिव्य इथे पार पाडायला न लागणे!
अगदी अगदी,

अमेरिकेत निसर्ग सौंदर्याची लयलूट आहे. नॅशनल पार्क्स तर आहेतच पण कुठल्याही उपनगरी घराच्या आजू बाजूला, ऑफिसेस, शाळा वगैरे च्या परिसरात इतक्या सुंदर बागा, लँडस्केपिंग, लहान मोठे पार्क्स, लेक, पाँड्स, बसायचे बेन्चेस, सुंदर पायवाटा असे काही काही असते की कधी कधी आपल्याच भाग्याचा हेवा वाटतो Happy घराच्या खिडकीतून हरणांचा कळप सकाळी सकाळी चालत जाताना दिसणे, ससे, कोल्हे, बदके, (अगदी राजहंस सुद्धा!) हे कॉमन दृष्य.
घरांच्या आजूबाजूला सहसा भरपूर जागा मिळते. अंगण, बाग वगैरेची हौस पुरेपूर करता येते. अजून बारीक सारीक पण महत्त्वाचे :
१. रोजच्या जीवनात कसलीही लाच न देता सर्व सरकारी कामे दिलेल्या वेळेत होणे.
२. गर्दीचा फायदा घेऊन स्त्रियांची छेड काढणे , घाणेरडे स्पर्श, नाक्यावर बायका मुलींना आवाज टाकून हरॅस करणे हे गेल्या २० वर्षात अजिबात म्हणजे अजिबात अनुभवाला आले नाही.
३. नो जजमेन्ट - कुणीही कसेही कपडे घाला, कितीही जाड बारीक असा, कुणीही वळून बघणार पण नाही. पर्सनल स्पेस चे भान प्रत्येक जण ठेवतो. कुणी उगीच चिकटायला येत नाही.
४. स्वयंशिस्त - लेन न मोडणे, ट्रॅफिक चे नियम रात्री १ वाजता देखिल पाळणे, स्कूल बस, पायी चालणार्‍यांसाठी इतकेच काय एखाद्या रस्ता ओलांडणार्‍या बदक नाहीतर कासवासाठी पण गाड्या दोन्ही बाजूला थांबून राहतात! तसंच दुकानात वगैरे आपली पाळी येईपर्यन्त रांगेत थांबणे, कचरा बिन मधे टाकणे, आपल्या कुत्र्याची घाण आपण उचलणे. हे सर्व जण पाळतात ( अपवाद असतील)
५. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणि पार्किंग ची सोय असते. कधी फुकट , कधी पेड पार्कीम्ग पण जिथे असाइन्ड पार्किंग असेल तिथेच लोक गाड्या लावतात. उगीच कुणी रस्त्यात कुठेही कशाही गाड्या लावून रस्ते ब्लॉक केलेत असे मुळीच होत नाही.
६. वर मुकुंद आणि स्वाती२ ने म्हटले तसे, इथे सामाजिक बांधिलकी खूप दिसून येते. " गिविंग बॅक टू द कम्युनिटी" कल्चर रुजलेले आहे . बहुसंख्य लोक काही ना काहीतरी चॅरिटी, वॉलन्टियरींग असे करत असतात, एखाद्या संस्थे साठी, टाउन साठी, किंवा चर्च साठी वगैरे. गरजुंना मोफत गरम जेवण, शिधा, ख्रिस्मस गिफ्ट्स देण्यासाठी अनेक चर्चेस, संस्था मदत कार्य करतात आणि अनेक स्वयंसेवक तिथे जाऊन मदत करतात, सुट्टीच्या दिवशी वगैरे टाउनशिप ने पार्क्स, झरे, ट्रेल्स किंवा इतर पब्लिक प्लेसेस चे क्लीन अप प्रोजेक्ट जाहीर केले की लोक सह कुटुंब तिथे जाऊन स्वच्छतेत भाग घेतात. ही समाजाला काही ना काही परत देण्याची सवय शाळकरी वयातच लावली जाते. नोकर्‍या, कॉलेज अ‍ॅडमिशन्स इ. मधेही समाजसेवेचे अप्रिसिएशन केले जाते.
७. एकूणच वैचिध्यपूर्ण संस्कृतींचे मिश्रण असलेला समाज ही देखिल मला इथली श्रीमंती वाटते. इतके वेगवेगळ्या प्रकारचे , देशांचे , विचारांचे संस्कृतीचे लोक नेहमी भेटतात त्याने आपल्या कक्षा आपसूक रुंदावतात.

बऱ्याच गोष्टी वर लिहून झाल्यात. Libraries, national parks, public toilets, शिस्त, श्रम करण्याची लाज नसणे इ. त्या सगळ्याला पूर्ण अनुमोदन.
दोन तीन गोष्टी ज्या मला आवडतात, सध्या एक लिहीते..नंतर येते बाकीचं लिहायला.
- व्यक्तीपूजा, कोणाला अनाठायी महत्व, आदराच्या नावाखाली लाचारीने वागणे हे प्रकार नाहीत. उगीच कोणी कुठल्याश्या पदावर आहे या कारणास्तव त्याला सरजी/madamji करून, नावापुढे/मागे सु, श्री, आदरणीय, माननीय..जी/साहब अशी शब्दांची कुठलीही आगगाडी लावत नाही कोणी..पहिल्या नावाने संबोधणे!
त्याच अनुषंगाने मग मोठ मोठे banners/होर्डिंग्ज लावून कोणाचे वादि आणि असले चावट प्रकारांची public announcements नाहीत.

Submitted by स्वाती२ on 13 September, 2024>>>>
स्वयंसेवकांचे काम आणि त्यांचा रोल बघून खूप इंप्रेस झाले होते

नवीन Submitted by रायगड on 13 September, 2024 - 12:08>>>
पटलं

पण एक अनुभव नुकताच घेतला..

इकडे ३०- ४० वर्षे राहिलेले (मूळ) भारतीय यांच्याशी जवळून काम करायची वेळ आली तेव्हा जाणवले की येवढे वर्ष इकडे राहून ह्यांनी हे काहीच उचलले नाही,.. त्यांचे विचार / आचार अजूनही देशी/ साहेबी / राजा - प्रजा छापाचेच आहेत.
सखेद आश्चर्य वाटले.

मैत्रेयी चे मुद्दे अगदी पटले.

११वी ला फक्त ६ महिनेच मिळाले त्यात काही क्रेडीट केले . त्यातले काही भारताच्या ९-१० वीच्या मार्क शिट मधुन वापरले. काही समर च्या सुट्टी मध्ये केले. >> Oh ok
धन्यवाद!

त्यांचे विचार / आचार अजूनही देशी/ साहेबी / राजा - प्रजा छापाचेच आहेत.
सखेद आश्चर्य वाटले.>>>

अगदी १०१ टक्के अनुमोदन.
फक्त वरिष्ठ अधिकारी भारतीय मूळाचा असेल तर हे लागू होते असे नाही तर ग्राहकाच्या बाजूने कोणी जर कोणी भारतीय असेल तर त्याच्या गोऱ्या साहेबाला इम्प्रेस करण्यासाठी मीटिंगमध्ये विक्रेत्यांच्या प्रतिनिधींवर अरेरावी करणारी मंडळी देखील बघितली आहेत.
सॉरी टू से बट आय डोन्ट लाईक टू डिल विथ PIO पर्टीक्युलरली इन ऑफिस इन्व्हीरॉन्मेंट.

Pages