अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {तालमीच्या गोष्टी} - {कविन}

Submitted by कविन on 12 September, 2024 - 06:20

अरे ए! शुंभासारखा तिला बघत काय उभा राहिलायस? असा पुढे ये आणि समोर नजरेला नजर देऊन बोल घडाघडा.

छे! पालथ्या घडावर पाणी आहे

आज दोन महिने झाले तालीम करतोय ना आपण? प्रयोग चार दिवसांवर आलाय आणि तरी एकेकाची ही तऱ्हा. तुम्हा पोरांची नाटकं बसवणं म्हणजे माझ्याच संयमाची परिक्षा आहे.

ओरडून ओरडून माझा घसा दुखला आणि प्रॉंप्टिंग करुन या वामन्याच नरडं सुजलं तरी सुधारणा नाही.

आणि तू गं! लंच ब्रेक होऊन गेला ना आपला! जेवलीस ना पोटभर? बुगुबुगू नको नंदीबैलासारखं. बोलता येतं ना? मग तोंड उचकटून सांग आधी, शब्द का खात्येस संवादातले? शब्द खाण्यासाठी जन्म आहे का बयो!? संयम असावा जरा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे खूप छान. Happy
>>>>शब्द खाण्यासाठी जन्म आहे का
खी: खी:

छान. या अंतांच्या कथा सगळ्यांनी सोप्या लिहिल्या आहेत का? जरा तिरपाकड्या लिहा ना! Lol

धन्यवाद

छान. या अंतांच्या कथा सगळ्यांनी सोप्या लिहिल्या आहेत का? जरा तिरपाकड्या लिहा ना! >> Lol नको मग लोकं ओरडतील संत्र सोला म्हणून Proud

हेहेहे मस्तय. पहिलीच गोष्ट वाचली या उपक्रमातली.
>>जरा तिरपाकड्या लिहा ना! Lol>>>तू लिही, की लिहीलीयेस ? आता वाचते एकेक

छान