मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.
आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
बालपणीचा काळ सुखाचा ..
बालपणीचा काळ सुखाचा ..
कित्येक उन्हाळी सुट्ट्या दररोज ह्या किनाऱ्यावर घालवायला मिळाल्या (तेव्हा तो स्वच्छ असायचा)., तासनतास वाळू त खेळायचो..
पुढे कधीतरी त्यानेच एकांताची अनुभूती दिली.. त्यातली जादू त्याच्याच सोबतीने गवसली...
अलिकडच्या काही वर्षात या लहानपणी सहज उपलब्ध झालेल्या ठेव्याच महत्त्व जाणवलं..
---
४ निवांत क्षण. मस्तंच.
४ निवांत क्षण. मस्तंच.
(No subject)
हर्पेन..मस्तं! तुम्हाला
हर्पेन..मस्तं! तुम्हाला अंबानी घोषित करायला हरकत नाही
घरच्या गोठ्यात असणा-या गाई
घरच्या गोठ्यात असणा-या गाई आणी वासरे ही त्या घराची श्रीमंती
Leki ne develope kelela show
Leki ne develope kelela show no. one on Prime. All India basis. Ananya Pandey OTT launch
माझी श्रीमंती
माझी श्रीमंती
लेकीची चित्रे घराच्या भिंतीवर
@ मामी, this artwork is so
@ मामी, this artwork is so nice.
सुंदर आहेत चित्रं. पहिलं
सुंदर आहेत चित्रं. पहिलं जास्त आवडलं.
मामी कसली भारी चित्रे आहेत गं
मामी कसली भारी चित्रे आहेत गं.
आणि त्या मुलीही शिडशिडित नाहीत हे पाहून मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या
Enough Champagne and more
Enough Champagne and more importantly, Enough Reasons to pop it
धाग्याने शंभरी गाठली, सर्वांची श्रीमंती celebrate करायलाच पाहिजेल !
aashu29 धन्यवाद
aashu29 धन्यवाद
श्रीमंती टाटांसारखी हवी पण अंबानींसारखेच प्रदर्शन मांडलंय त्यामुळे बोलू शकत नाही.
आता करतच आहे प्रदर्शन तर धावणे सुरु केले तेव्हा पासूनच्या वर्षामधली कमाई
धन्यवाद मंडळी. दुसरं निळ्या
धन्यवाद मंडळी. दुसरं निळ्या रंगातलं चित्रं मिक्स मिडिया आहे. सोनेरी वर्ख आणि अभ्रक लावलंय.
ओ हर्पेन एकदाच टाका ना..
ओ हर्पेन एकदाच टाका ना..
का आम्हा हडकुळ्या लोकांना खिजवत आहात..
जगाकडे स्वच्छ नजरेने
जगाकडे स्वच्छ नजरेने बघण्यासाठी चष्मा नावाचा दागिना 40 वर्षे वापरतोय.
त्याला जपून ठेवण्याची ही कोंदणे प्रेमाने जपली आहेत !
कुमार सर
कुमार सर
>>>>>ओ हर्पेन एकदाच टाका ना..
का हो दादा? तुमचं काय घोडं मारलय त्यांनी? हलकेच घ्यालच.
अहो सामो गमतीने म्हटले
अहो सामो गमतीने म्हटले त्यांना कळते ते.. कौतुकच आहे त्यांचे. मी त्यांना मायबोलीचे मिलिंद सोमण म्हणतो.
पहिला झब्बू कुटुंबाचा दिला
पहिला झब्बू कुटुंबाचा दिला आणि त्यातच मैत्रीच्या श्रीमंतीचा उल्लेख केला. त्यांचा फोटो टाकने योग्य की कसे हे समजले नव्हते. आज गॅलरी हुडकताना मात्र लेकीची ही मित्रसंपत्ती मिळाली ती डकवतो इथे.. तिच्या वाढदिवसाला तिच्या मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा..
माझे बालपण दक्षिण मुंबईतील चाळीत गेले. त्यामुळे मित्र इतके की मोजदाद नाही. लख्ख आठवणाऱ्या आठवणी लिहायला घेतल्या तरी सात जन्म त्यात जातील. अशात मुलीला सध्याच्या बदललेल्या कल्चरमध्ये तितकेच मित्रसुख मिळेल का याची खात्री नव्हती. त्यामुळे नवीन घर शोधताना मुलांना खेळायला मोकळी जागा आणि शक्य झाल्यास तिच्या वयाच्या मुलांची संख्या अधिकाअधिक असेल का हे चेकलिस्टमध्ये सर्वात वर होते. सुदैवाने मनाजोगते घर आणि सोसायटी मिळाली. भले इतर सतराशे साठ प्रॉब्लेम का असेना, पण मुलांना दिवसरात्र घराबाहेर मित्रांच्या गराड्यात पडीक असलेले बघतो तेव्हा बरे वाटते. उद्या मोठे झाल्यावर याच आठवणी त्यांना श्रीमंत असल्याचा फिल देणार हे नक्की
सगळ्यांच्या पोस्ट्स फारच छान
सगळ्यांच्या पोस्ट्स फारच छान आहेत. हे सगळं पहायला मिळणं आणि इथे मित्र मैत्रिणी मिळणं ही मायबोलीने दिलेली केवढी मोठी भेट मला श्रीमंत करून गेली आहे.
किल्ली, तुझी श्रीमंती
किल्ली, तुझी श्रीमंती रिलेटेबल आहे.
बाबांच्या इतर प्रॉपर्टी वर हक्क सांगणार नाही पण या श्रीमंतीचा उपभोग घ्यायला आवडेल. ही प्रॉपर्टी माझ्यानावावर करा बाबा
सामो, ऋन्मेषचं प्रेम आहे
सामो, ऋन्मेषचं प्रेम आहे माझ्यावर व्यक्त करायची तर्हा जरा वेगळी आहे.
ऋन्म्या एका रात्रीतली श्रीमंती असती तर अचानक एकदम दिसेल.
आता हळू हळू झालो श्रीमंत तर सगळे टप्पे दाखवणार
आता हाफ (२१ किमी) आणि फुल्ल (४२ किमी) मॅरॅथॉन च्या ढोल नगार्यानंतर हे काय ५ किमी तुणतुणं असे म्हणत असाल तर थांबा जरा. हे आहे पाच किमी पोहोल्याबद्दल मिळालेले मेडल
वाह!!
वाह!!
एका रात्रीतली श्रीमंती असती तर अचानक एकदम दिसेल.
आता हळू हळू झालो श्रीमंत तर सगळे टप्पे दाखवणार>>> yes, I think you are entitled to brag about it..
हा एक झब्बू
अथलेटीक फोटो काही फूट उंच हवेत मारलेली स्प्लिट..
ह्यासाठी पण बरच झिजाव लागलय.. अर्थात मला नाही
आमची श्रीमंती : लेकीची चित्रे
आमची श्रीमंती : लेकीची चित्रे>> फार फार आवडली चित्रं,प्लीज अजून दाखवा ना, अजून बघायला नक्की आवडेल.
नोव्हेंबर २००० :
नोव्हेंबर २००० :
राज्य पत्रकार संघातर्फे प्रसिद्ध झालेल्या वरील पुस्तकात समावेश झाल्यामुळे अंगावर मूठभर श्रीमंती आली.
अरे वा!! कुमार सर खूप छान.
अरे वा!! कुमार सर खूप छान.
५ किमी तुणतुणं >> अरे मला ५
५ किमी तुणतुणं >> अरे मला ५ किमी बघुन कोण आनंद झालेला. की तू पण सुरुवात अशी छोटी केली होतीस. पण कसचं काय!
भारी आहेस!
>>>>सामो, ऋन्मेषचं प्रेम आहे
>>>>सामो, ऋन्मेषचं प्रेम आहे माझ्यावर व्यक्त करायची तर्हा जरा वेगळी आहे.
हाहाहा
>>>>>>>>ऋन्म्या एका रात्रीतली श्रीमंती असती तर अचानक एकदम दिसेल.
आता हळू हळू झालो श्रीमंत तर सगळे टप्पे दाखवणार
खतरनाक हसतेय
माझी श्रीमंती, माझ्या
माझी श्रीमंती, माझ्या नजरेतून..
निरुदा - हाथ मिलाओ!
निरुदा - हाथ मिलाओ!
माझ्याकडे पण ऑलमोस्ट समग्र धारप कलेक्शन आहे. पण पुस्तकं माहेरी राहिली आहेत आणि इथे केवळ किंडलवर आहेत
पण मी ही धारप फॅन आहे अगदी लहानपणापासून. अनोळखी दिशा १,२,३ पण घेऊन टाका. आणि चेटकिण, लुचाई, शपथ, काळी जोगीण, अंधारातली उर्वशी सुद्धा घ्याच. अजून आठवली तर नंतर सांगते.
हर्पेंन
हर्पेंन
Pages