खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

तो जरास्सा फाटलेला मोदक इग्नोरा >>> इग्नोरा कशाला.. खाऊया की.. तिथूनच सुरुवात करुया.. माझी तर सवय आहे, असे फाटलेले तुटलेले पहिले खाऊन मोकळा होतो Happy

माझेमन, मोदक लै लै झकास! पण दोन व्यक्तिंनी मिळून केलेत असं वाटतंय. काही मोदकांना कमी कळ्या आहेत आणि काहींना जास्त Happy

माझेमन डोळे निवले. उकडीच्या & तळणी च्या मोदकांचे असे आहे, नो वन कॅन ईट जस्ट वन Wink
मावा मोदक १ वर गप बसू शकू.
माधव +१

दोन व्यक्तिंनी मिळून केलेत असं वाटतंय >>>
बरोब्बर…. माझ्या मदतनीस मुलीला शिकवत होते. तिला नीट जमत नव्हते. काल तिला वेळ होता तर शिकवणी घेतली. स्टुडंट फर्स्ट क्लास मध्ये पास झाला.

वाह मस्त जमलेत..
फोटो त्या भांड्यात लाईट चमकत आल्याने तितका स्पष्ट आला नाही. पण तरीही कळ्यांचे सौंदर्य लपत नाहीये.

IMG-20240919-WA0017.jpg
Spegeti पेस्तो सौस - छान होती ही डिश
IMG-20240919-WA0018.jpg
डिमसम (हे मी खाल्लेच नाहीत )
IMG-20240919-WA0016.jpg
हे काहीतरी आहे, नाही आवडलं, गोड पदार्थ.
IMG-20240919-WA0020.jpg
कोकोन्ट jaggery ice cream.. बरं होतं..
..
Team ब्रेकफास्ट ला गेलो होतो त्यातले काही फोटो

मला वाटतं काही रेसिपी मधे आख्खा लसूण फार भारी चव आणतो बहुतेक.. माझी एक मैत्रीण टाकते मसालेदार रेसिपीज मधे...

किल्ली, पार्टी मस्त.....

मोदक सुंदर

मोदक फारच सुरेख आहेत.
तों पा सू अगदी.. २१ तोफांची सलामी..

.
धन्यवाद मंडळी.
ऋतुराज आपण करूया सर्व पुण्यात गटग आणि मग इकडे फोटो देऊया

सणासुदीचे गोड खाऊन कंटाळलेल्या जिवाला दुपारची चैन:

शेवपुरी. बारीक शेव सोडून बाकी सर्व १००% होम मेड !

स्पाईस ईज नाईस Happy

2b5aa2ac0afa90ab3b2a068cf909df07.jpeg

ऋतुराज आपण करूया सर्व पुण्यात गटग आणि मग इकडे फोटो देऊया>>>>>नक्की, मी येणारच आहे तिकडे
किल्ली, आप्पे एकदम कलरफुल आणि हेल्दी दिसतायेत.
अनिंद्य,
एक नंबर, पुऱ्या पण घरी केल्या म्हणजे खासच. अगदी तोंपासू आहे.

… रेसिपी वेगळ्या धाग्यात लिहा….

रेसिपी लिहिता येत नाही, सर्व अंदाजपंचे दाहोदरसे आहे आमच्या किचनमधे Happy

इच्छुकांनी निशा-मधुलिकाची शेवपुरी / पाणीपुरी रेसिपी फॉलो करावी, परफ़ेक्ट होते.

@ किल्ली तुमच्या आप्प्यांनी फारच खळीला आणले होते. त्यात रव्याचे आवडत नाहीत, मिक्स डाळींचे करायचे तर पूर्वतयारी आली.

शेवटी आज ब्रेकफास्टला जमलं आणि जीव सुखात पडला Lol

b2bc79f2-3388-4e9a-bac0-8e9f3810c3b6.jpeg

वॉव आप्पे..
मिक्स डाळींचे आप्पे सांगा ना प्लीज कसे केले..

मोदक शुभ्र काही जीवघेणे.

आयत्यावेळेस डाळींचे आप्पे करायचे असल्यास कोमट पाण्यात मूग डाळ+ उडीद डाळ भिजत घालून अर्ध्या तासाने वाटून त्यात हि.मि+ कोथिंबीर+ कढीलिंब बारीक चिरून घालावा.लगेच आप्पे करावे. डाळ तांदळाच्या आपल्यापेक्षा हे आप्पे जास्त आवडतात.मूग डाळ उडदापेक्षा थोडी कमी घालावी.

Pages