अंत: अस्ति प्रारंभ: - २ - वर्षाविहार रियुनियन - अतुल.

Submitted by अतुल. on 11 September, 2024 - 13:18

दहा वर्षांनी कॉलेजमेट्सच्या रियुनियनचा योग आला. पावसाळ्यात करायचे ठरले.

वर्षाविहार रियुनियन!

सारे आले होते. "ते दोघे" वगळून! पाऊसही तसाच धुंद होता. दहा वर्षांपूर्वी असायचा तसाच. आणि आम्ही सारेच रेनडान्स करत होतो. दहा वर्षांपूर्वी करायचो तसेच. पण माझ्या मनात प्रश्न येत होते. ते दोघे का आले नसावेत? कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमप्रकरण किती गाजलेले. आता कुठे असतील? काय झाले असेल?

आणि अचानक माझे लक्ष गेले. ते दोघे सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. "अरे तुम्ही दोघे कधी आलात?", असे विचारत मी त्यांच्याकडे निरखून पाहीले. एकमेकांसोबत डान्स करत होते खरे.

आणि मला जाणवलं. आम्ही सारे अंतर्बाह्य चिंब! पण...

...ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी!

धन्यवाद सर्वाना Happy
ते दोघे एकतर भूतं वगैरे असू शकतात. किंवा भास असू शकतात. किंवा जिवंत असतील तर त्यांच्या नात्यात कोरडेपणा दिसून येत आहे असाही अर्थ असू शकतो (कारण इतर सर्व अनेक वर्षांनी भेटलेत. म्हणून ओलावा. त्या दोघांत मात्र तो आता तितका राहिला नाही).

शशक च्या format नुसार कथा पूर्ण झाली तरी वाचकाला त्यातून विविध अर्थ निघत रहायला हवेत. तो प्रयत्न केला आहे.

शशक च्या format नुसार कथा पूर्ण झाली तरी वाचकाला त्यातून विविध अर्थ निघत रहायला हवेत. तो प्रयत्न केला आहे.>>> ह्या शशक ने ती नस पकडली आहे. मस्त.