मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.
आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
श्रीमंती म्हणताच पहिले हेच
श्रीमंती म्हणताच पहिले हेच डोळ्यासमोर येते
जी आहे.. जशी आहे.. जेवढी आहे.. आपली फॅमिली हीच आपली पहिली संपत्ती वाटते.
त्यानंतर किंवा त्या सोबत मित्र परीवार.. ते सुद्धा जे आहेत.. जसे आहेत.. जितके आहेत.. त्यांचा फोटो इथे शेअर करणे योग्य की कसे न समजल्याने यातच उल्लेख करतो
कॅलरीचा विचार न करता मनात
कॅलरीचा विचार न करता मनात येईल तेंव्हा आमरस पुरी चापता येणे म्हणजे श्रीमंती
ज्जे बात ऋन्मेष!! मस्त
ज्जे बात ऋन्मेष!! मस्त सुरुवात धाग्याची!!
ज्जे बात ऋन्मेष!! मस्त
डबल पोस्ट
मस्त ऋन्मेष आणि स्वरूप!
मस्त ऋन्मेष आणि स्वरूप!
ह्या फोटोत आहे ते फणसाचं झाड २०२० ला निसर्ग चक्रीवादळात पडलं. त्याच स्थितीत त्याला कोंब फुटले. हा फोटो २०२४ चा आहे.
निसर्गाच्या नवनिर्मितीच्या क्षमतेची श्रीमंती.
फार सुंदर विषय. कल्पक. चला,
फार सुंदर विषय. कल्पक.
माझा जीवच सौंदर्ययुक्त स्वल्प उपभोगात श्रीमंती बघणारा आहे, तस्मात हेच सुचले सर्वप्रथम
Fresh, organically sourced, artistically presented food and the ability to afford it !
चला आपण सारेच एका लाईनीवर
चला आपण सारेच एका लाईनीवर आहोत..
आईच्या हातचे सारभात आणि मासे
धन्यवाद वावे आणि स्वरूप..
संयोजक, धाग्याच विषय फारच आवडला आहे
या निमित्ताने सर्वांनाच आपापल्या श्रीमंतीची पुन्हा नव्याने जाणीव होईल
Fresh, organically sourced,
Fresh, organically sourced, artistically presented food and the ability to afford it !>>>>
+१
माझ्याकडे फ्रुटप्लेटचे कोला़ज करुन टाकू शकेन एवढे फोटो आहे.... पण तुर्तास हा एकच....
फ्रुटप्लेटचे कोला़ज करुन टाकू
फ्रुटप्लेटचे कोला़ज करुन टाकू शकेन …
डिट्टो
पण मग नाविन्य नाही राहाणार म्हणून थांबतो.
सुखप्रवास.
सुखप्रवास.
पुन्हा एक वैयक्तिक फोटो येत
पुन्हा एक वैयक्तिक फोटो येत आहे. पण त्याला इलाज नाही.
आजच्या तारखेला लांब वाढवलेले केस किंबहुना लहानपणापासूनचे केस वाढवायचे स्वप्न पूर्ण होणे, ते देखील वयोमानानुसार टक्कल पडायच्या आधी हिच माझी श्रीमंती आहे
अन्यथा गेले काही वर्ष आपण फक्त मुलांचे फोटोग्राफर आहोत असे वाटत होते. सोलो सेल्फी काढणे जवळपास बंद होते. पण केसांमुळे आता ढिगाने काढले जातात
मस्त विषय.. मस्त फोटोज.....
मस्त विषय.. मस्त फोटोज.....
दारात असे गुलाबाच्या फुलाने
दारात असे गुलाबाच्या फुलाने लगडलेले झाड असणे ही पण एक श्रीमंती
आमचे साताऱ्याचे घर!!
मस्त! कल्पक विषय कसे काय
मस्त! कल्पक विषय कसे काय सुचतात बुवा संयोजक?
ढोबळमानाने श्रीमंती म्हणजे
ढोबळमानाने श्रीमंती म्हणजे प्रॉपर्टी.
पण त्यात जर कोकणात घर असेल तर क्या बात...!!
मग वाडा नसला तरी चालतो. पण हक्काने जाता यावे असे घर हवे.
अंगणात तुळस, पाऊस, सभोवताली नजरेला सुखावणारी हिरवळ... आणि हो, आपल्या गणपतीतील धमाल हे मग ओघाने आलेच.
फोटो सारे जुन्या लॅपटॉपमध्ये आहेत. हा ऑर्कुट वरून कुठून तरी एखादा शोधून काढला..
घरचं फेसाळलेल धारोष्ण दूध
घरचं फेसाळलेल धारोष्ण दूध हीच खरी श्रीमंती. ..
आमची श्रीमंती : लेकीची
आमची श्रीमंती : लेकीची चित्रे
क्या बात है अनिरुद्ध! फारच
क्या बात है अनिरुद्ध! फारच छान! अभिनंदन.
अनिरुद्ध आहाहा..
अनिरुद्ध आहाहा..
तुम्हालाच झब्बू.. आमच्या घराची श्रीमंती. मुलांनी रंगवलेल्या भिंती
ॠन्मेष, परत झब्बू..
ॠन्मेष, परत झब्बू..
घरातली एक अमूल्य भिंत..
लेकीने थेट दिवाणखान्याच्या भिंतीवर चित्रं काढलीयत आणि पेंटिंग्जचा आभास निर्माण करण्यासाठी आम्ही लाकडी मोल्डींग्ज बाजूने फिरवलीयत..
प्रचि -०१
प्रचि-०२
>>आमची श्रीमंती : लेकीची
>>आमची श्रीमंती : लेकीची चित्रे
खरच श्रीमंती आहे ही!!
खूपच सुंदर निरूसर
खूपच सुंदर निरूसर
अफाट सुंदर आहे हे..
अफाट सुंदर आहे हे..
आणि पेंटिंग्जचा आभास निर्माण करण्यासाठी आम्ही लाकडी मोल्डींग्ज बाजूने फिरवलीयत..
>>>
ही आयाडीया चोरावी अशी आहे
वाह !!!!
वाह !!!!
छान धागा आहे
निरुदा मस्तच
लेक कलाकार एकदम
निरू सर काय सुंदर चित्रे आहेत
निरू सर काय सुंदर चित्रे आहेत. आणि तुम्ही केलेली आयडीआ मस्तच….
ते टेबल आणि त्याच्या समोरची चित्रे काय मस्त दिसत आहेत…..
No Alarms, no commitments, no
No Alarms, no commitments, no deadlines…..
मला जाग आली की माझा दिवस सुरु व्हावा आणि सकाळी जाग आल्यावर मी ठरवावं की आज मी काय करणार आहे…..
इतके श्रीमंतीचे प्रदर्शन
इतके श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले आहे त्यात अजून याची भर..
ही पण एक श्रीमंतीच..
म्हणजे कामाच्यामध्ये मायबोली उघडले असणे हे आहेच.
पण मायबोलीवर प्रोफाईल असणे आणि त्यातून इतके भरमसाठ लिखाण करणे या संपत्तीला तोड नाही. यात चाहत्यांची संख्या सुद्धा जोडली तर आपल्या सारखे श्रीमंत आपणच वाटावे
मुलाचे नाव देखील ऋन्मेष ठेवले आहे. कधी तो मोठा झाल्यावर आपले नाव गूगल करेल तेव्हा त्याला हा खजिना सापडेल आणि जाणवेल आपला बाप किती श्रीमंत होता
कल्पक आहेत इथे आलेले प्रतिसाद
कल्पक आहेत इथे आलेले प्रतिसाद.
अनिरुद्ध, फारच सुंदर कला आहे मुलीकडे.पुढच्यावेळी प्रदर्शन असेल तेव्हा कळवा, बघायला येतो.
आजच्या काळात एकत्र एका घरात
आजच्या काळात एकत्र एका घरात स्वेच्छेने नांदणार्या ३ पिढ्या
Submitted by अ'निरु'द्ध on 11
Submitted by अ'निरु'द्ध on 11 September, 2024 - 13:42
सुंदर !
“Rides” अशी थीम घेतली आहे कन्येनी. बुद्धी आणि कला दोन्हींत समृद्ध. Bless her. जय हो !
Pages