हस्तकला उपक्रम- तोरण/पताका - रीया - रिदीत गोडबोले

Submitted by रीया on 10 September, 2024 - 19:19

मुलाचे नाव - रिदीत गोडबोले (राघव)
वय - पाच वर्षे
पालकांची मदत - गणपतीचे चित्र काढुन देणे आणि सांगितलेली अक्षरे देवनागरीत लिहुन देणे (गणपती बाप्पा मोरया)

पताका करायच्या का विचारल्यावर राघव ने पताका म्हणजे काय असं विचारलं. उदाहरणे दाखवल्यावर हे तर बॅनर झालं म्हणाला.घरात आधी इट्स अ बॉय चे बॅनर होते. तर मी त्याचा उपयोग करेन हे डोकं त्यानेच लावलं आणि कसं करायचं याची आयडिया सुद्धा त्यानेच दिली. माझा सहभाग फक्त 'गणपती बाप्पा मोरया' लिहुन देण्यापुर्ता होता पण मग बाजुचे केशरी गोल रिकामे दिसायला लागले म्हणून त्यावर उंदिर काढुया अशी त्याने आयडिया दिली. उंदराची चित्रे गूगल करताना त्याला गणपतीची चित्रेच आवडली पण ती त्याला काढायला जड जात होती म्हणुन तू काढुन देशील का विचारलं त्याने. मग ही प्रवेशिका इथे वॅलिड होईल का असा मला प्रश्न पडला परंतु संयोजकांकडुन होकार आल्यावर मी हुश्श केलं.
हीच पताका आम्ही घरच्या गणपतीच्या डेकोरेशन साठी वापरली.

टिप -सामोला येत होती तशी एरर मलाही येत असल्यामुळे मायबोली गणेशोत्सव २०२४ ही शब्दखुण मला वापरता आली नाही. कविनची आयडिया काम करते आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सहीच

राघवच्या वतीने थँक्स सगळ्यांना Happy

अनु, अगं ते लांबलचक आहे त्यामुळे एका फोटोत येत नाहीये.
बघ बरं हे ठीक आहे का -
FA300164-ABF3-444E-A3FC-8814D3F9CCD3 Copy.jpeg

वाह! छानच केलय. मुळात कल्पना सुचणे हेच बेस्ट आहे.

टिप -सामोला येत होती तशी एरर मलाही येत असल्यामुळे मायबोली गणेशोत्सव २०२४ ही शब्दखुण मला वापरता आली नाही.>>> एरर मलाही येतेय. मी तात्पुरता शोधलेला जुगाड - शब्दखुणा द्यायच्या आहेत त्या जागेच्या खाली गृपचे नाव दिसते. तिथून कॉपी करुन वर पेस्ट केले तर ते काही अजॅक्सला उडवता येत नाही. अजून जर धाग्याचीही खूण त्यात स्वल्पविराम देऊन द्यायची असेल तर ती मी शिर्षकातून कॉपी करुन पेस्ट करते. अजॅक्स मधे मधे करतो पण त्याला "ओके हा!" असं म्हणून गंडवता येतं Proud

अरे वाह
रिदीत कलागुणी मुलगा आहे एकदम

बाई दवे.
>>>> मग ही प्रवेशिका इथे वॅलिड होईल का असा मला प्रश्न पडला >>>>> लहान मुलांच्या उपक्रम प्रवेशिकेला असे प्रश्न पडलेच नाही पाहिजेत मायबोलीवर.. अन्यथा ती आपली मायबोली कशी वाटेल Happy

सगळ्या मामा मावशांचे राघवकडून आभार.
ऋ, जरूर ढाप. त्याचं असं जुगाडू डोकं फार भारी चालत. अल्फाबेटस् वापरून फ्लेमिंगो पण केला होता त्याने असाच.