Submitted by अमितव on 9 September, 2024 - 12:36
जंगलातले उंच वयोपरत्त्वे वठलेले झाड. मुळावर उठलेल्या वडवानला थोपवत अजुनतरी ताठ. इथल्या प्रजातींचे जैववैविध्य जपले, मूळच्या आणि नंतर रुजलेल्या; आता इथल्याच झालेल्या जाती जपल्या म्हणून सुबत्ता होती, पूर्वसुरींचा वसाच! पण टोलेजंग इमारती बांधणार्यांना त्याचं काय? एकाच साच्यातले पांढरे ठोकळे जोपासायचे, अफरातफर, सग्यासोयर्यांना कंत्राटं आणि नटलेलं जंगल उध्वस्त! सीमेवर भिंत उभारुन वारा थोपवायच्या, पूर्वीचं वैभव दाखवायच्या वल्गना!
वठलेल्या झाडावर हल्ला सोपाच, शकले उडू लागली आणि सार्या जंगलाचेच अवसान गळाले.
तिकडे कनकदेशीच्या धनदांडग्यांना गजाआड करणारी हसतमुख 'कमल'शलाका उदयास येताना बघुन मात्र झाडाने नि:श्वास सोडला. सेनापती बदलला आणि जंगलानेच जोम धरला. ऑरेंज जंपसुटच्या भयाने उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खतरनाक जमली आहे! उपमांच्या
खतरनाक जमली आहे! उपमांच्या चपखल वापराबद्दल टोटल रिस्पेट. भन्नाट! काही गोष्टी दुसर्यांदा वाचताना लक्षात आल्या मूळ कल्पना लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा वाचून मग अर्थ लक्षात येतात.
काहीतरी नर्डी असणार नाही
काहीतरी नर्डी असणार नाही कळली.
US राजकारण वर आधारीत आहे का?
US राजकारण वर आधारीत आहे का?
थोडी कळाली थोडी नाही असे काहीसे झालंय
सामो, झकास - पुन्हा एकदोनदा
सामो, झकास - पुन्हा एकदोनदा वाचा. तुम्हाला संदर्भ माहीत असतील तर एखादे वाक्य नक्की क्लिक होईल मग बाकी सगळा उलगडा होईल. इथे स्पॉईलर देत नाही. कारण ते क्लूज लागण्याची मजा वेगळीच असते.
मला कळलं सुंदर.
मला कळलं सुंदर.
येस येस
येस येस
आता कळाले
माझी दिशा बरोबर होती
बारकाव्याकडे दुर्लक्ष झाले होते.
मस्त अमित! डीटेलिंग पर्फेक्ट
मस्त अमित! डीटेलिंग पर्फेक्ट आहे!
भारी कल्पना ! उपमा एकदम चपखल
भारी कल्पना ! उपमा एकदम चपखल
छान !
छान !
>>>>>इथल्या प्रजातींचे
>>>>>इथल्या प्रजातींचे जैववैविध्य जपले, मूळच्या आणि नंतर रुजलेल्या; आता इथल्याच झालेल्या जाती जपल्या म्हणून सुबत्ता होती, पूर्वसुरींचा वसाच!
आवडलेच!!!
मस्त जमली आहे, कळली व पोचली.
मस्त जमली आहे, कळली व पोचली.
अरे, सहीच जमलीय ही कथा!
अरे, सहीच जमलीय ही कथा!
परफेक्ट लिहीलंय, अमितव! आवडली
परफेक्ट लिहीलंय, अमितव! आवडली कथा
समजलं नाही.
समजलं नाही.
संकेत वाक्यातील 'त्याने' ला '
.
अरे पण तसेच ते भारी होते. लोल
.
अमितव, फारच मस्त जमलीये.
अमितव, फारच मस्त जमलीये.
शेवटच्या वाक्यातला ऑरेंज जंपसुट कळला पण रस्त्याकडे धाव कोणी घेतली हे कळलं नाही.
ऑरेंज जंपसुटच्या भयापोटी
ऑरेंज जंपसुटच्या भयापोटी ज्याचा 'इंद्राय स्वाहा' 'तक्षकाय स्वाहा' प्रकार चालू आहे तोच तो!
आवडली कळवल्याबद्दल सर्वांचे आभार
समजली नसेल तर माझा दोष, मी जशी नंतर बदलून सोपी करायचा प्रयत्न केला तो वाचकांचा अपमान ठरला असता, म्हणून परत पूर्वपदावर आणली. बघतो आणखी काही टाकता आलं तर.
कमल वाचुन गै स झाला पण उंच
कमल वाचुन गै स झाला पण उंच भिंतींनी तो दुर केला.
तितका अभ्यास नसल्याने जंपसुट कळला नाही.
एकुण शशक मस्त जमलीय.
दोनतीन वेळा वाचून समजली. सगळे
दोनतीन वेळा वाचून समजली. सगळे डिटेल्स कळले नाहीत, तेवढं माहिती नसल्यामुळे. पण असं लिहू शकणं हे भारी आहे! मस्त!
मस्त जमली आहे. उपमांचा छान
मस्त जमली आहे. उपमांचा छान वापर.
कमल शब्दाने भारतीय संदर्भ
कमल शब्दाने भारतीय संदर्भ जोडायचा प्रयत्न केला. पण मग परत वाचताना समजले की पल्याडचा संदर्भ आहे. उत्तम जोडणी.
कमल शब्दाने भारतीय संदर्भ
कमल शब्दाने भारतीय संदर्भ जोडायचा प्रयत्न केला >> +१
छान जमली आहे
मस्त जमलेय. काही संदर्भ कळले
मस्त जमलेय. काही संदर्भ कळले नाहीत (राजकारण फार लक्षात रहात नाही म्हणून असेल)
साधनाशी सहमत.
साधनाशी सहमत.
कमल शब्दाने भारतीय संदर्भ
कमल शब्दाने भारतीय संदर्भ जोडायचा प्रयत्न केला. >> मी पण.
पण आधी उंच भिंतीचा संदर्भ आला.
मला bouncer गेलीये.
मला bouncer गेलीये.
सुरुवातीला कळाल्यासारखं वाटलं पण मग नाही नाही कळली
आतापर्यंत वाचलेली बेस्ट कथा!
आतापर्यंत वाचलेली बेस्ट कथा! मजा आली. बिल्डर, भिंती आणि कमल वरून लगेच कळली. शब्दरचना सुरेख झालीय.
अमितव
अमितव
भारी
कमल चा संदर्भ ते कमल नसून दुसराच कमल संदर्भ आहे हे कळल्यावर कळली.
कमल चा संदर्भ ते कमल नसून
कमल चा संदर्भ ते कमल नसून दुसराच कमल संदर्भ आहे हे कळल्यावर कळली.>> आत्ता कळला कमल चा संदर्भ.
Pages