शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता छान विवेचन. इतर भाषिक शब्द लिहिताना शक्यतो उच्चारानुरुप लिहावेत असं वाटतं.
जोडाक्षर असले की उच्चार ऱ्हस्व होतो म्हणून न्युरोपॅथी जास्त संयुक्तिक वाटतं. अर्थात आपापली सवय, कंफर्ट आहेच

'तुप', 'फुल', 'पुजा', 'कुल लूक' हे आता मराठीत रुळले आहेच मग स्विट, स्मुथ हे ‘चुक' आहे असे तरी का म्हणावे ? Happy

पियू,
शहाजोगचे दोन अर्थ आहेत :
१. भरंवशालायक, विश्वसनीय

हा अर्थ पूर्वीच्या हुंडी बाजारातून आलेला आहे. https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%...

२. आव आणणारा
पण शहाचा संबंध शहाजोगपणाशी कसा जोडायचा ते काही सापडले नाही.

शीख
मूळ शब्द शिष्य >>> पंजाबीत सिख
पुढे त्याचे अनेक अपभ्रंश : शीक, शीख, सीक, सीख, सीग, सीण, सीत

मोल्सवर्थ शब्दकोश

बोवाळ
= लग्नकार्यादिकामुळें घरांत असणारी गडबड.

मूळ बॉवाळ
(गोवा) गलका; गडबड.
बॉवाळचे क्रि. = गडबड करणें; बरळणें.

दाते शब्दकोश

बोवाळ नव्हता माहित.

… हिंदीत बवाल आहे. …

आणि गंमत म्हणजे हिंदी/उर्दूतला “बवाल” हा अरबी “वबाल” (तंटा/ विपत्ती / भांडण) वरून आलाय Happy

World of words is so much fun !

अरबी “वबाल” >>> रोचक !
होय, शब्दसागरात एकदा डुबकी मारली की डोके लवकर बाहेर निघत नाही Happy

तिने तोंडातून ब्र काढला नाही..

असे का बरं म्हणत असतील?
ब्र हे अक्षर तसेही किती कठीण आहे काढायला...!!
त्यापेक्षा, ल काढला नाही अथवा य काढला नाही..असे तरी म्हणायचे!

खरं तर ते असं आहे की तिने तोंडातून ब्रश काढला नाही. पण नको तिथे शॉर्टकट मारण्याच्या जुन्या सवयीनुसार ब्रशचा ब्र झाला. पुढे तीच परंपरा मायबोलीवरपण आली.

स्थलरुद्ध

नेपाळबद्दल एका चर्चेत लिहितांना Land locked country असा उल्लेख एकाधिक वेळा आला. मराठीत “लँड लॉक्ड” ला काही चांगला पर्याय मला सुचेना.

नंतर एका विदुषीने सुचवलेला “स्थलरुद्ध देश” फार योग्य वाटला. तस्मात इथे डकवतो:-)

Land Locked Country = स्थलरुद्ध देश

त्या विदुषीना स्वतःचे भाषा प्रभुत्व दाखवायची हौस असेल (तशी ती खूप जणांची, बऱ्याच वेळा दिसते), पण साधी सरळ सोपी भाषा समजायला अधिक चांगली. जमीनबंद सारखा सोपा शब्द वापरावा. मी तर म्हणीन की "कुठेही किनारा नसलेला किंवा सर्व बाजूनी जमिनीने वेढलेला देश" असे लिहावे.

Plain Language Is for Everyone, Even Experts.

जमीनबंद ! कधी ऐकला नव्हता.

कुठेही किनारा नसलेला किंवा सर्व बाजूनी जमिनीने वेढलेला देश" … हे तर वाक्यच झाले की. हे नाही सोईचे.

स्थलरुद्ध देश = २ शब्द
जमिनीने वेढलेला देश = ३ शब्द
सर्वत्र जमिनीने वेढलेला देश = ४ शब्द

जाता जाता: माझ्या मते स्थलरुद्ध हिंदी आहे किंवा त्याचा अर्थ against the ground होतो. (चू.भू.दे.घे.)

against the ground ?
हा तर भलताच अर्थ झाला मग.

हा मराठी शब्द नाही म्हणता ?
अधिक अभ्यास करावा लागेल मग. (मला नाही, विदुषींना)

1. स्थलरुद्ध

2. जमीनबंद

3. भूवेष्टित

4. भूमंडित - हा वाचून उगाच सकलश्रीमंडित मान्यवर आणि वज्रचूडामंडित सौभाग्यवती असे मायने आठवले Happy

तर असे ४ पर्याय मिळाले, Plain Language Is for Everyone, Even Experts हा लेख बोनस. आभारी आहे.

Pages