गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.
या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!
मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.
मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!
रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.
इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.
१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.
जो कोणी गोड बिलकुल खात नाही
जो कोणी गोड बिलकुल खात नाही बाहेर देखील, ते लोक उपाय शेअर करू शकता.>>> खास गोड खाण्यावर नियंत्रण करणे असा वेगळा उपाय नसावा.
मी खालील प्रमाणे करतो असल्या गोष्टी:
ज्याची आवश्यकता नाही, वरून त्याचा मला त्रास होतोय (होत असेल तर) त्यावर नियंत्रण करायचे आहे. आणि हे करताना मी कसला त्याग करत नाहीये की कशा पासून वंचित रहात नाहीये, इतर लोक खातात, त्यांना ते आवडते त्यांचा ना हेवा वाटण्याचे कारण ना ते चूक करताहेत असे समजण्याचे कारण. आधी मनाने ती गोष्ट न करणारे बनायचे जे एका रात्रीत होते. यासाठी त्या गोष्टीमागील एका एका मिथकाचाआधी समाचार घ्यायचा, लोक काय काय प्रतिक्रिया देतील, कसे भरीस पाडतील त्यावर मी कसा/कशी ठाम राहीन सगळी आधीच तयारी करायची. मग प्रत्यक्षात उतरवताना काहीही त्रास होत नाही. एवढा दिवस कंट्रोल केलाय तर आता स्वतःलाच थोडा रिवार्ड म्हणुन चीट डे वगैरेचेही गरज भासत नाही. सुरू करायला शुभमुहूर्त बघायला हरकत नाही पण काही कारणाने नाही जमले तर परत दुसया शुभमुहूर्ताची वाट बघा असे करून स्वतःला फसवण्यात अर्थ नाही.
कप्पा आवरला, चपात्या/ भाकरी
कप्पा आवरला, चपात्या/ भाकरी (मेन्यूमधे नव्हत्या म्हणून) नाही केल्या.
५०% सफल.
कप्पा आवरला, चपात्या/ भाकरी
.
व्यायाम केला आणि नो मैदा जमले
व्यायाम केला आणि नो मैदा जमले. आजचा दिवस सफल
व्यायाम जिम सुट्टी
व्यायाम जिम सुट्टी
मैदा नाही , आज मिसळ पाव पार्सल असूनही पाव नाहीच खाल्ला.
गोड नाही खाल्ले.
66 टक्के यश बाप्पा कृपेने.
अतरंगी 2 नंबर आणि 3 नंबर उपाय भारी आहेत.
देवाचं सांगितलं की लोकही आग्रह करत नाहीत.
मानव, मला स्वतःला कंट्रोल ठेवता येतोय.
समोरच्याला त्याच्या आग्रहाचा अपमान केला नाही असे न वाटता आणि आपण माणुसघाणे दिसू नये असे उपाय म्हणतोय.
संकल्प पूर्ण केला.
संकल्प पूर्ण केला.
नो जिम ११,५०० स्टेप्स.
नो जिम
११,५०० स्टेप्स.
शनिवारी योगासनं झाली. इथे
शनिवारी योगासनं झाली. इथे लिहिलं का ते आठवत नाही. काल 30 मि चालून आले. आजपण चालणार.
अजून तरी नीट चाललंय. नक्कीच जमणार.
आजचे सूर्यनमस्कार झाले
आजचे सूर्यनमस्कार झाले
काल रविवार.. फेसबुक उपास
काल रविवार.. फेसबुक उपास संपूर्ण ... सवयीने एकदा उघडून पहिले पण लगेच लक्षात आले म्हणून बाहेर पडले!
उद्यापासून पुढचे ३६५ दिवस
उद्यापासून पुढचे ३६५ दिवस कोणताही संकल्प केल्यशिवाय घालवीन.
आजचं चालणं नीट झालं.
आजचं चालणं नीट झालं.
चपात्या केल्या. कप्पा आवरला
चपात्या केल्या. कप्पा आवरला नाही…..
अतरंगी, कौतुक. चपात्या
अतरंगी, कौतुक. चपात्या शिकाव्या वाटल्या आणि सातत्याने प्रयत्न करत आहात. पुरुष म्हणून अधिकच कौतुक कारण बहुतेकांना इच्छा सुद्धा होत नाही स्वैपाक शिकण्याची.
संकल्प पूर्ण केला.
संकल्प पूर्ण केला.
दिवस ४
दिवस ४
आज स्विमिंग टँकला साप्ताहिक सुट्टी. शेतावर थोडं चालणं झालं. पण ठरवलं होतं, म्हणून संध्याकाळी एक वीस मिनीटांची चक्कर मारून आले. बिस्कीट आणि गोड काहीही खाल्लं नाही.
काल सोमवार पाचवा दिवस
काल सोमवार पाचवा दिवस
व्यायाम केला
मैदा अजिबात नाही
साखर किंवा साखर घातलेलं गोड नाही खाल्लं
पण काल गूळ घातलेल्या पुपो खाल्ल्या आहेत.
हे गोड गोड पकडायचं की नाही ते बाप्पाला ठरवू देत
नो मैदा जमले व्यायाम काल
नो मैदा जमले व्यायाम काल हुकला
पैल तो गे काऊ कोकताहे आणि
पैल तो गे काऊ कोकताहे आणि रखुमाई रखुमाई अशी दोन गाणी वाजवली.
जरा सोपी, कमी लय असणारीच वाजवते आहे. तेवढंच जमतंय सध्या.
तुला पाहते रे चं पहिलं music खूप जलद आहे. तेवढी बोटंच फिरत नाहीत अजून
सही अवनी!
सही अवनी!
'पैल तो गे' आवडतं. वाजवुन बघतो आज. रखुमाई कुठलं गाणं?
माझा रोज व्यायाम झाला.
काल कुठलं गाणं नाही वाजवलं.
चपात्या केल्या, कप्पा आवरला.
चपात्या केल्या, कप्पा आवरला.
१००% पूर्ण.
अतरंगी, कौतुक. _^_
अतरंगी, कौतुक.
_^_
मोबाईल वेळ कमी करणे खुप कठिण
मोबाईल वेळ कमी करणे खुप कठिण आहे. आज जिकिरीने सकाळच्या वेळेस मोबाईल दुर ठेवला.
व्यायाम केला, नो मैदा पाळले.
व्यायाम केला, नो मैदा पाळले. संकल्प पुर्ण
आज मंगळवार
आज मंगळवार
व्यायाम केला
मैदा पदार्थ नाही खाल्ले
मात्र आज साखर घातलेला चहा घेतला
कालची शिल्लक पुरण पोळी खाल्ली.
66 टक्केच म्हणावे.
१.असच न चुकवता रोज क्लास
१.असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
संकल्प पूर्ण.
अमितव, 'रखुमाई रखुमाई' हे
अमितव, 'रखुमाई रखुमाई' हे पोष्टर गर्ल या सिनेमातलं गाणं आहे. वाजवताना फारच एकसुरी वाटलं.
आज 'जिया ले गयो जी मोरा सावरिया' हे शिकायला सुरुवात केली आहे.ते खूपच आवडत आहे.
मी संकल्प केलेला नाही तरीही, रोज अर्धा तास वॉक ॲट होम करते आहे.
माझा कालपर्यंत नीट व्यायाम
माझा कालपर्यंत नीट व्यायाम झालाय. संध्याकाळी घरी गेले की आजचा करणार.
काल नो जिम + १०००० स्टेप्स.
काल नो जिम + १०००० स्टेप्स.
आज १ तास मस्त जिम झाले.
मी इथे येऊन नुसतेच सगळ्यांचे
मी इथे येऊन नुसतेच सगळ्यांचे प्रतिसाद वाचतेय, संकल्प पूर्ण झाल्याचे. मी एकही दिवस क्लास अटेंड करु शकले नाही.
Pages