सर्वसिद्धिकर प्रभो!

Submitted by संयोजक on 26 August, 2024 - 22:26

गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.

या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!

मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.

मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्‍या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!

रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.

इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्‍यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.

१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्यापासून हा पण धागा बंद होणार का? तसं असेल तर आजपर्यंतचे अपडेट्स देते. आज संकल्पाचा दिवस क्र. २०. आजचा धरून गेले २०ही दिवस रोज अर्धा तास चालण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.
उद्या हा धागा चालू असेल तर शेवटचा अपडेट उद्या देईन Happy

मागच्या गुरुवार नंतर update दिलेच नाहीत.

शुक्रवार travel आणि काम असल्याने व्यायाम नाही.
5 ते 6 हजार स्टेप झाल्या असतील
मैदा नाही खाण्यात.
कोल्ड कॉफी 2 घोट , चहा कपभर अशी साखर पोटात गेलीच.
शनिवार व्यायाम नाही
रात्री मिष्टान्न भोजन.
मैदा कशात असेल तर माहिती नाही
गोड मात्र खाल्ले गेले.
रविवारी व्यायाम नाही, गोड नाही मैदा नाही
सोमवार व्यायाम झाला.
मैदा नाही
गोड एक गुलाब जामुन खाल्ला.
मंगळवार काल व्यायाम नाही.
बाप्पा विसर्जन गोड खाल्ले , त्यात मिक्स असेल तर मैदाही.

एकूण काय तर 4 ते 5 दिवसात गाडी डगमगत आहे.

आज पासून परत रुळावर आणण्याचा प्रयत्न

Time to show off….

२१ दिवसांच्या मेहनतीची फळे….

लाटलेली पोळी
62E888D8-52CF-4B03-BBAF-BB139E3D5E16.jpeg

फुगलेली पोळी….
6FDF07D9-BDF6-4013-9980-B68C40A10A3A.jpeg

थापलेली गोल भाकरी.
59C2D58A-4109-4E3E-9F26-9AE80ABEE24F.jpeg

तव्यावर व्यवस्थित (खाली हवा न जाऊ देता) टाकलेली भाकरी…..

61BA2CE3-F4C7-4483-BC77-733D3D217074.jpeg

टम्म फुगलेली भाकरी….

0AACE878-8F00-4438-BBF4-4EEB91E43454.jpeg

अतरंगी , पोळी अगदी झकास जमली आहे!

तर आज फायनल अपडेट.
काल माझ्या रोज अर्धा तास चालण्याच्या संकल्पाचे २१ दिवस पूर्ण झाले. तर अशा रितीने इथे जाहीर केलेला संकल्प सुफळ संपूर्ण झाला आहे! Happy
आता खरी कसोटी आहे ती हा नेम यापुढेही चालू ठेवण्याची. बाप्पाच्या कृपेने ते ही जमेल अशी आशा करते.

या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद संयोजक! इथे आपण कोणालातरी अपडेट देतोय या विचाराने जो पुश मिळतो त्यामुळेच हे पूर्ण करू शकले. अधेमधे काही काही वेळा 'आज कंटाळा आला' किंवा 'आता नको जायला, उशीर होईल बाकीच्या गोष्टींना' वगैरे विचार डोक्यात आले. तरीही केवळ इथे मी अकाऊंटेबल आहे या एका विचाराने मला रोज चालण्यासाठी भाग पाडलं आहे.

आज सकाळी सकाळीच (८ च्या आधी) १०००० स्टेप्स झाल्या. अजुन तर दिवस जायचाय Happy

जब रात है ऐसी मतवाली
फिर सुबह का आलम क्या होगा

क्लास अटेंड केला. अर्धा तास चालले.
अशा रितीने माझा २१ दिवसांचा संकल्प सुफळ सपूर्ण झाला.
या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद संयोजक!
ह्या लागलेल्या चांगल्या सवयी चालूच ठेवणार आहे.

हा उपक्रम सुरू होण्याच्या आधीच काही दिवस
साखर नको
मैदा नको
व्यायाम सुरू
असे केले होते.
इथे साक्षात बाप्पा चरणी हजेरी द्यायची असल्याने " छोटंसं चॉकलेट आहे, त्याला काय हुतंय" सारखे विचार बाजूला पडले. उत्सवी वातावरण, मित्रांचे बड्डे, कार्यक्रम वै असल्याने 3 ते 4 दिवस गोड संपूर्ण टाळता आले नाही मात्र त्याची मात्रा कमी होती. "बाप्पा बघतोय हां" जाणीव असल्याने.
हे पुढेही सुरूच ठेवायचे आहे.
इथे जमेल तसे आठवड्यात एकदा तरी update देता आले तर ट्रॅक राहील आणि एक जाणीव राहील. असावं वाटतेय मला तरी.

हो, मीही इथे लिहायचे विसरले. खरं मागच्या व या आठवड्यात खूप येणं झालं नाही, इथे थोडाचवेळ यायला जमत होतं. माझ्या संकल्पानुसार मागच्या आणि त्याच्या मागच्या रविवारी थोबाडपुस्तक अजिबात बघितले नाही. नाही म्हणायला ८ तारखेच्या रविवारी whatsapp ला एका गज़लकार मित्राच्या निधनाची बातमी आली. त्यावर विश्वास नव्हता बसत म्हणून १ दा फेसबुक वर जाऊन फक्त खात्री केली. तिथे सगळीकडे त्यावरच पोस्ट होत्या. पण मी लगेच बंद केले.

720 ऍक्टिव कॅलरी / 75 मिनिटे व्यायाम / 15 तास स्टॅन्ड गोल >> सप्टेंबर महिना दररोज ह्या रिंग्स पूर्ण झाल्या.

व्यायाम नीट होतोय बाप्पा कृपेने
मैदा ना के बराबर म्हणतात तसे
केव्हा तरी साखर असलेले खाणे होतेय पण अगदीच 15 दिवसात एखादं वेळी.
त्याचा शरीरावर चांगला फरक पडत आहे.

Pages