सर्वसिद्धिकर प्रभो!

Submitted by संयोजक on 26 August, 2024 - 22:26

गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.

या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!

मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.

मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्‍या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!

रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.

इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्‍यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.

१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट माइंड्स ग! Happy माझेही हेच संकल्प आहेत म्हणून म्हणाले तसं. पैकी habuild चा संकल्प आधीच केलाय. आज याच धाग्यावर रोज अर्धा तास चालण्याचा अजून एक संकल्प केला.

उपक्रम चांगला अहे.

सर्वसिद्धिकरं प्रभो (र वर अनुस्वार) असं पाहिजे ना ?

१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
>>>
मिशन पहिल्याच दिवशी फेल. पण जे होणारच होते. कारण मुलगी आजारी आहे. बरी होताच रोज हे करायचे ठरवले होतेच. इथे धागा दिसला म्हणून लिहिले. पण आज निदान मुलापासून सुरुवात करतो. या आधी तो लहान असल्याने त्याचा अभ्यास मी फार घ्यायचो नाही.

@रमड
(हे मी जितके वाचलेय पाहिलेय ऐकलेय आणि जे मी फॉलो करते त्यावरुन लिहीतेय)
ग्रॅटिट्युड जर्नल :
सार: आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि भूतकाळातही घडलेल्या चांगल्या घटना/प्रसंग/मिळालेली मदत/व्यक्तींची मदत/साथ इत्यादी इत्यादी जे काही चांगले अनुभवलेय त्या सगळ्या प्रती कृतज्ञता प्रेम व्यक्त करायचे लिहून.
याचा हेतू हा की आपल्याला चांगलं काय घडतय याची दखल घ्यायची सवय लागते. छोट्यातल्या छोट्या चांगल्या गोष्टी असतात बरेचदा नकळत त्यांची दखल घेतली जात नाही एरव्ही. या निमित्ताने त्यांची नोंद होते.
एक वाईट आठवण जशी इतर त्याच प्रकारच्या आठवणी मनात जागवतं तसच एक चांगली आठवण इतर चांगल्या आठवणींची जाणीव करुन देते
लिखाणाचा पॅटर्न शक्यतो असा असतो (पण असाच असला पाहिजे अशी सक्ती नाही)
१) शक्यतो एका व्यक्ती/घटनेसाठी एक दोन ओळीत लिहावे
२) लिहीताना वर्तमानकाळात वाक्य असावे
३) रोज तेच किंवा वेगळे लिहीले तरी चालते
४) जर १५ वाक्य रोज लिहायचा नेम केला आपण तर त्याचे ३ शक्यतो समान भाग करायचे म्हणजे ५-५-५
अ) पहिले पाच आज घडलेल्या ५ घटना व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता १-५ वाक्य/पॉईंट्स
ब) दुसरे पाच - काल ते भूतकाळातल्या कोणत्याही ५ घटना व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता
क) तिसरे पाच हे भविष्यात जे चांगले घडावे अशी इच्छा आहे त्याविषयी ५ वाक्य आणि ती वाक्य वर्तमानात ते घडलेय/मिळालेय अशा प्रकारे लिहून कृतज्ञता व्यक्त करायची

हे लिहीताना सुरवातीला किंवा शेवटी युनिव्हर्सचे आभार मानायचे कारण आपल्याला हे अनुभवायला उर्जा पुरवली जिवंत ठेवले Proud

यात कोणी युनिव्हर्स म्हणते कोणी देव किंवा गुरु कोणी नेचर एलिमेंट्स म्हणते आणि आम्ही यातले काहीच मानत नाही असे म्हणणे असेल त्यांनी किमान व्यक्ती आणि घटनांचे आभार मानून बाकी सोडले तरी चालते. जे आतून वाटते तेव्हढेच करावे. चांगल्याची नोंद आणि चांगल्याप्रती कृतज्ञता भाव हे महत्वाचे बाकी ज्याची त्याची सजावट.

यातला भाग ३ जो भविष्यातील मॅनिफेस्टेशनचा आहे त्याचीही सक्ती नाही. जे मॅनिफेस्टेशन करतात किंवा ज्यांना ते करणे पटते किंवा ज्यांचे लॉजिकल माईंड त्यावर तितका आक्षेप घेत नाही त्यांनी हे करुन बघावे वाटले तर करावे. ज्यांना हे "कै पण नका सांगू" टाईप वाटते किंवा "एव्हढं सोडून बोला" म्हणणे आहे त्यांनी याकडे कानाडोळा करुन इग्नोरावे.
जे भाग ३ लिहीणार आहेत त्यांच्यासाठी टीप शक्यतो भाग ३ म्हणजे एका अर्थाने आपल्या मागण्याच त्या. तर या मागण्या जास्त आणि आधीचे घडून गेलेले कमी असे करु नये. आधी मिळालेय काय ते जास्तीत जास्त प्रमाणात बघून त्याप्रती कृतज्ञ राहून मग तेव्हढेच किंवा कमी मागणे लिहावे. म्हणून तो ५-५-५ चा नियम. म्हणजे किमान १० गोष्टी आधी मिळालेल्या लिहिल्या जातील. त्या निमित्ताने आठवल्या जातील,त्यांची जाणीव राहील मग मागा ना ५ मागण्या

असेच लिहावे का? हाच सिक्वेन्स हाच रेशो असावा का? तर असे काही नाही. तुम्ही ३ रा भाग स्किप करा तुमची इच्छा. ५-५ फॉर्मॅट फॉलो नाही झाला हरकत नाही. एक काहीतरी समोर फॉर्मॅट किंवा साचा असला सुरवातीला की सोपे होते काम आपले इतकेच. सवय लागली एकदा मनाला की आपोआप आपण आपली लय पकडतो
हे लिहूनच काढायचे की मनात आभार चालतील? - दोन्ही चालेल. जर्नल लिहीण्यामागे दोन हेतू. लिहीताना आपण मनात उच्चारही करतो आणि ते कागदावर उतरवतो तेव्हा अधीक पक्केही होते (अभ्यास कसा पक्का व्हायला आपण लिहून बघायचो तसे काहीसे) आणि काही काळाने कधी जर आपल्याला low feeling आले किंवा आपल्या मनाला एक बुस्टर डोस गरजेचा आहे वाटले तर या उदास मनस्थितीवाल्या काळात मेंदू प्रिचिंग मोडाला स्विकारत नाही की काहीच चांगले त्यावेळी दिसत नाही. अशावेळी हे जर्नल वाचायला घेता येते. Silver lining दिसायला ते मदत करते.

यापेक्षाही प्रत्यक्ष आभार मानणे योग्य नाही का? - ते तर मानावेतच त्या त्या वेळी पण तरी या नोंदी म्हणजे आपणच आपल्यासाठी करुन ठेवलेली सोय आहे.

जर्नल कोणते घ्यावे- बाजारात फॅन्सी जर्नल मिळतात. हे म्हणजे जीमला जायला जीमचे टीशर्ट घेतात काहीजणं त्या प्रकारात मोडेल. घेऊ शकता पण गरजेचे नाही ते. मी तर घरात जुन्या कोऱ्या डायऱ्या पडल्यात कुठून कुठून भेट मिळालेल्या त्याच वापरते.

रोज लिहावे का? - तर हो रोज लिहावे. नेम केलाय तसे लिहावे पण त्याचे प्रेशर घेऊ नये. जसे आपण म्हणतो मला अर्धातास व्यायाम करायचाय रोज पण आज वेळ नव्हता तर मी २० मिनिटेच केला किंवा सकाळी नमस्कार चुकले पण मी रात्री घातले नमस्कार. तसेच हे. करणे महत्वाचे. एखाद दिवस राहिले तर राहिले. त्यादिवशी किमान मनात तरी ग्रॅटिट्युड द्यावा जमल्यास आणि दुसऱ्या दिवशी सुरुवात करावी लिहायला.

वर्तमान काळात कसे लिहायचे याचे उदाहरण:

१) रमडमुळे आज ग्रॅटीट्युड जर्नल बद्दलचे विचार लिहीण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तिची आभारी आहे
२) सुमेधाने या जर्नल लिखाणाची मला आठवण करुन दिली त्याबद्दल मी तिची आभारी आहे (हा मुद्दा आहे खरेतर सहा महिन्यांपुर्वीचा)
३) व्यायामाचा नेम पुर्ण केल्याबद्दल मी स्वतःची आभारी आहे (हे घडणार आहे संध्याकाळी खरेतर) (असेच आज संध्याकाळी करणार असलेले भविष्यातील मागण्यांमधे येते असे नाही तर अगदी - ॠषिकेशला सोलो ट्रिप करुन आले त्याबद्दल माझे, मला सहकार्य केलेया प्रत्येकाची मी आभारी आहे. आता ही माझी मागणी झाली. जिचा पुर्ण होण्याचा काळ/ तारीख आत्ता मला माहिती नाही आहे. मी नोंदवत आहे म्हणजे सबकॉन्शिअसली यावर माझे मन काम करेल बॅकग्राऊन्डला आणि ती एकदिवस मी जर्नल मधे "आजच्या चांगल्या नोंदी विभागात लिहेन")

मीपण सांगू?
रोज 20-25 मिनिटं व्यायाम करायलाच हवा आहे. सुरूवात झाली आहे पण मधेच अवसान गेलं असं होऊ नये म्हणून इथे लिहिलंय. योगासनं हा माझ्यासाठी बेस्ट व्यायाम आहे. काही कारणास्तव (दुचाकी चालवायचा ताण जास्त झाला तर खूप पाठ दुखते.) योगासनं झाली नाहीत तर त्याला पर्याय 20 मिनिटं चालणं.
करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच.

Gratitude डायरी नावावरून अंदाज आला होता.. पण अधिक माहिती मिळाली ... चांगली संकल्पना आहे.
रोजच्या आयुष्यात सकारात्मक बाजूकडे बघा म्हणजे आयुष्य अजून छान होईल..
Thank you for sharing!

थँक्यू कविन! खूप छान, तपशीलवार समजावून दिले आहेस. इतके दिवस काय आणि कसं लिहायचं हे न कळल्याने जर्नल लिहीत नव्हते. आता लिहीन. कन्सेप्ट आवडली आहे.

थॅन्क्यु रमड, तुझ्यामुळे माझे काम सोपे झाले. आता मला जे विचारतात त्यांना मी आता लिहून काढलय तेच पाठवू शकेन. आणि सविस्तर लिहीले गेले त्यामागेही मैत्रिणीच आहेत. त्यांच्याशी पुर्वी झालेल्या प्रश्नोत्तरांमुळे माझ्या मनात "संभाव्य प्रश्न आणि उत्तर" तयार होती यावेळी. अजून एक, एक दोन ओळीत लिहीले जरी तरी तो भाव मात्र खरा असावा बास.

कविन on 29 August, 2024 - 07:00>> कविन तू एक्साक्ट माझ्या मनातले लिहिले आहेस gratitude जर्नल बद्दल!! same मीही असेच करते ५-५-५!! किंवा जे काही असेल त्यात असे भाग असतात जे घडून गेले जे आज घडले व जे अजून मला घडायला हवे आहे (ते तसे घडले आहे असे कल्पून )मी जो भेटेल त्याला या gratitude जर्नल बद्दल सांगत असते..आयुष्यात खूप खूप खूप खूप फरक पडतो. म्हणजे नीट लिहाच हं भावना जाग्यावर ठेऊन !! रेमटायचे नाही उगाच

gratitude जर्नल
याचा कधीतरी वेगळा धागा काढा कविन.. छान प्रकार दिसत आहे.

एक कप्पा आवरला.

संकल्पामधे चपाती किंवा भाकरी करायचे ठरवले आहे. पण आज थालिपीठ होते. माझे मीच केले.

आजचा दिवस सफल.

पेटीवर वाजवले.
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग.
मस्त गणेशोत्सव माहोल तयार झाला.

व्यायाम झाला छान
Refined शुगर आणि साखर घातलेले गोड काही खाल्ले नाही. स्वामी समर्थ प्रसाद स्वरूपात एक बेसन लाडू आणि एक केळ घरी आलेलं. मी केळ खातो तुम्ही लाडू संपवा अशी मांडवली केली.
मैदा तर काय प्रश्न आलाच नाही.
चपाती भाजी भाकरी भाजी असे घरचे नीट जेवलो त्यामुळे.
बाप्पा कृपेने दिवस दुसरा सुफळ संपूर्ण

आज व्यायाम ४५ मिनिटे
नो मैदा व्यवस्थीत पाळले (प्रलोभनांना बळी न पडता Proud ऑफीसमधे ट्रिट मिळालेला वडापाव रस्त्यावर बसलेल्या एका आजींना दिला आणि नवरा सॅन्डविचेस घेऊन आला घरी त्यालाही नकार देऊन घरातलेच जेवले. )
संकल्प आजही १००% पुर्ण झाला

कविन किती सॉर्टेड विचार आहेत तुझे. छान समजावून सांगितलंस ग्रॅटिट्यूड जर्नल बद्दल. हे असं काही असतं ( (Gratitude journal) हेच माहिती नव्हतं. ५+५+५ लक्षात राहील.
>>>>अजून मला घडायला हवे आहे (ते तसे घडले आहे असे कल्पून )>>>> हे आधी कळलं नव्हतं ते अंजली कुल मुळे नीट कळलं.

धनुडी, आपण आपल्या आपल्यात 'कधीही सुरू केलं तरी चालेल' असं ठरवूया...
मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन.
बिस्कीटं वर्ज्य करीन.

रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे.
>> नाही झालं

रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे.
>> झालं

रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे.
>> नाही झालं

रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे.
>> एकदा झालं

रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
>> झालं Happy

Pages