चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भीती अशी नाही अनु, बोअर असेल तर बघू का नको हा विचार करतेय. सीन अंगावर येणारे असतील तर पुढे ढकलता येतील.

अन्जू १ टाईम वॉच आहे, सुहास जोशी साठी बघ. गोड आज्जे दाखवलिये तिला.

बाहुबली मधे खपून गेला>> अँकी तेंव्हा तो खूप तरूण होता हो. खपून पेक्षा चांगला शोभला होता त्या रोल ला तो. मग मात्र तो नॉशियेटिक फेस घेऊनच का वावरला कोण जाणे.
तुंबाड वॉज एक्सलंट फॉर मी. वातावरण निर्मिती, म्युजिक, स्टोरी सगळंच आवडलं मला. हृदयाची स्पंदनं वाढली होती निश्चितच.

अंजु बघ मुंज्या
टीपी म्हणून बघ

कोकण, समुद्र, घाट रस्ता, आपली लाल परी महामंडळ ST, फ्रेश चेहरे हिरो हिरोईन म्हणून आहेत.

एक टेक्निकल माहिती सांगा.
मुंज्या वेगळा आणि ब्रह्मराक्षस वेगळे ना?
आहेत का कोणी एक्स्पर्ट?

खूप तरुण प्रभास वीस वर्षापूर्वी होता.. वर्षम, छत्रपती,रेबल,चक्रम वगैरे तेलुगू सिनेमांमध्ये छान आहे तो..हिंदीमधे येईस्तोवर असा झाला ..

"फिर तेरी कहाणी याद आई"
यू ट्युब वर आहे.
Raat हा RGV चा सिनेमा आहे. मी पूर्वी यू ट्युबवर बघितला होता. आज नाही सापडला.
RGV चा "कौन" हा पण चांगला आहे.
घरबसल्या यू ट्युब वर बघण्यासारखा आहे.
आधी Sixth Sense पहा आणि मग तुंबाड पहा.

मुंज्या वेगळा आणि ब्रह्मराक्षस वेगळे ना?

दोन्ही ब्राह्मण भुते
मुंज्या म्हणजे लग्न न झालेलं लहान भूत
आणि ब्राह्मण व्यक्तीने अधर्मी कृत्य केल्यामुळे त्याला शाप लागून होणारे ते ब्रह्मराक्षस

भूत म्हणजे एनी इंटिटी आफ्टर डेथ फेज.राक्षस म्हणजे भूत विथ स्पेसिफाईड जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब रिस्पिन्सीबलिटीज.म्हणजे आयत आणि ऱ्होम्बस सारखे.

या क्षेत्रातल्या तज्ञांनी प्रकाश टाकावा.
सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.
भूत म्हणजे आयडी उडाल्यावर मायबोलीवर आलेला आफ्टर अवतार आयडी.
राक्षस म्हणजे मुळातच भयंकर प्रतापी मूळ आयडी जो लोकांना त्राही दानव करून सोडतो.

भुतांमध्येही जात पात उच्च नीच असे भेदभाव असावेत
अनेक प्रकार आहेत कारण त्यांच्यातही
खविस, समंध, पिशाच्च, झोटिंग
बाई भुतांत तर हडळ, चेटकीण, लावसाट, जखीण

चेटकीण हे भूत नसतं हो. शाप लागेल आपल्याला.
डाकीण पण एक प्रकार असतो.
चेटकिणीला डाकीण किंवा हडळ म्हणणे म्हणजे बायकोला चुकून शेजारणीच्या नावाने हाक मारण्यासारखे भयंकर आहे.

>>>>>>>>राक्षस म्हणजे भूत विथ स्पेसिफाईड जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब रिस्पिन्सीबलिटीज.म्हणजे आयत आणि ऱ्होम्बस सारखे.
Happy

RGV चा "कौन" हा पण चांगला आहे.
घरबसल्या यू ट्युब वर बघण्यासारखा आहे. >>> कौन म्हणजे उर्मिलाचा ना? थिएटरमधे पाहिला होता. जबरी वातावरणनिर्मिती आहे. रात्र, पाऊस, वादळ, पडके वाडे असले काही नसताना सुद्धा दिवसाउजेडी एका साध्या बंगल्यात सगळी कथा आहे. पण थरार जबरी आहे. थिएटर मधे आणखी इफेक्ट येतो.

फारएण्ड
पाउस आहे! मनोज बाजपेई बाहेर पावसात उभा असतो आणि आत येऊ द्या म्हणून रिक्वेस्ट करत असतो. मला आठवतंय. वेळ पण रात्रीची आहे.
ओके मी चेक केलं दिवस आहे.

पाउस आहे! मनोज बाजपेई बाहेर पावसात उभा असतो आणि आत येऊ द्या
+१

त्याची गाडी बंद पडते बहुतेक आणि किचनच्या खिडकीतून क्रीपी हसत 'दार उघडा' म्हणत असतो. उर्मिला पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फ्रॉक मधे एकदम गोड, निरागस आणि भेदरलेली वाटते म्हणून आपण त्याच्यावरच संशय घेतो. ट्विस्ट आहे.

अच्छा आशुचॅम्प.
मग तो मुंज्या बनल्यावर सेल्फ स्टडी करून ब्रम्हराक्षस पदवी घेतो वाटते. स्वतःला तसे म्हणतो आणि बाकीचे मुंज्या. त्याच्यामुळे जास्त राग आला असेल त्याला Lol

कौन भारी आहे.
कधी काळी राम गोपाल वर्मा वेगवेगळे थ्रिलर विषय चांगले मांडायचा तेव्हाचा चित्रपट.

पाउस आहे! मनोज बाजपेई बाहेर पावसात उभा असतो >>>
त्याची गाडी बंद पडते बहुतेक आणि किचनच्या खिडकीतून क्रीपी हसत 'दार उघडा' म्हणत असतो >>> हो आठवू लागले आता. बरीच वर्षे झाली पाहून. मला इन जनरल म्हणायचे होते की हॉरर म्हंटल्यावर जे "नेहमीचे यशस्वी" प्रॉप्स येतात ते यात नाहीत Happy

कधी काळी राम गोपाल वर्मा वेगवेगळे थ्रिलर विषय चांगले मांडायचा तेव्हाचा चित्रपट. >> टोटली. सत्या/कंपनी कोठे आणि "आग" कोठे. बहुधा प्रत्येक दिग्दर्शकाच्या प्रतिभेचा एक भारी काळ असतो व त्यानंतर अपरिहार्य घसरण सुरू होते. त्यामानाने यश चोप्रा बर्‍यापैकी टिकले. पण ते "जॉनरा" बदलल्याने असेल. नाहीतर मनमोहन देसाई (नसीब नंतर), प्रकाश मेहरा ( शराबी नंतर), सुभाष घई (सौदागर), एन चंद्रा (तेजाब), रागोव ( सरकार ), मधुर भांडारकर ( चांदनी बार?) - बरेच लोक या मार्गाने गेले आहेत. हे सगळे कलात्मक अर्थाने थोर नसतीलही पण एक करमणूकप्रधान कमर्शियल पिक्चर कसा काढावा याबद्दल थोर होतेच.

फा,
नेहमीचे यशस्वी" प्रॉप्स येतात ते यात नाहीत >>> कळले होते, पण स्वतःचेच रेटायचे होते. Lol
उर्वरित महत्त्वाच्या पोस्टीवर रेटण्याइतकी माहितीच नाही, त्यामुळे वाचून गप बसत आहे. Happy

मला इन जनरल म्हणायचे होते की हॉरर म्हंटल्यावर जे "नेहमीचे यशस्वी" प्रॉप्स येतात ते यात नाहीत >> "कौन" हॉरर कुठे आहे पण ? सयकोलॉजिकल थ्रिलर आहे ना ?

कळले होते, पण स्वतःचेच रेटायचे होते >>> Lol

असामी - मी हॉरर समजून पाहिला होता Happy आणि खरे सांगायचे तर जेव्हा पाहिला तेव्हा दोन्हीतला फरक माहीत नव्हता Happy

फारसा न चाललेला उर्मिलाचा "एक हसिना थी " पण चान्गला होता... होता.उर्मिलाने काही काही भुमिका फार भारी केलेल्या आहेत..रागोवने डरना मना है,डरना जरुरी है पण काढले होते...बरे होते ते.

विकि प्रमाणे "कौन" हा सयकोलॉजिकल हॉरर आहे. आणि नंतर विकी वर
Psychological horror is a subgenre of horror and psychological fiction with a particular focus on mental, emotional, and psychological states to frighten, disturb, or unsettle its audience. The subgenre frequently overlaps with the related subgenre of psychological thriller, and often uses mystery elements and characters with unstable, unreliable, or disturbed psychological states to enhance the suspense, horror, drama, tension, and paranoia of the setting and plot and to provide an overall creepy, unpleasant, unsettling, or distressing atmosphere.

Pages