Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक वाचनीय लेख : https://www
एक वाचनीय लेख : https://www.esakal.com/saptarang/nashik-saptarang-latest-article-by-trup...
भाषेतील विनोदाचा दर्जा
त्यातले सर्वाधिक आवडलेले हे :
रामायण व महाभारतातील फरक :
‘हरणा’चे वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण
आणि
वस्त्राचे ‘हरण’ करण्यावरून झाले ते महाभारत !
भाषेतील विनोदाचा दर्जा >> हा
भाषेतील विनोदाचा दर्जा >> हा लेख वाचून 'पुणेरी पाट्या' आठवल्या.
आज एका कोड्यात antenna हा
आज एका कोड्यात antenna हा शब्द त्याच्या मूळ अर्थाने विचारला होता.
one of a pair of slender, movable, segmented sensory organs on the head of insects, myriapods, and crustaceans
या शब्दाचा : a usually metallic device (such as a rod or wire) for radiating or receiving radio waves हाच अर्थ माहीत होता.
"Doctored" ह्या शब्दाचा उगम
"Doctored" ह्या शब्दाचा उगम काय असावा?
१. antenna हा शब्द त्याच्या
१. antenna हा शब्द त्याच्या मूळ अर्थाने >>> जीवशास्त्रात होता.
..
२. doctor << docere "to show, teach, cause to know," originally "make to appear right,"
https://www.etymonline.com/word/doctor#etymonline_v_13880
..
एक विनंती : हा मराठी भाषा व व्याकरण विभाग असल्यामुळे मूळ इंग्लिश शब्दांची चर्चा अन्यत्र करावी ( https://www.maayboli.com/node/62893 किंवा नवीन धागा काढायचा असल्यास काढता येईल).
म्हणजे सरमिसळ होणार नाही.
शब्दांच्या- भाषेच्या गमती छान
शब्दांच्या- भाषेच्या गमती छान आहेत लेखात.
“धाकटा जेष्ठात आला” हे आमच्याकडे तंतोतंत
परिवारात दोन भावांपैकी धाकट्याचा जन्म जेष्ठ महीन्याचाच आहे.
अरे वा ! छान योग
अरे वा ! छान योग
लांछन हा शब्द आपण फक्त
लांछन हा शब्द आपण फक्त नकारात्मक अर्थीच ऐकतो.
त्याचा अर्थ कलंक, बट्टा, डाग आहे तसाच खूण, निशाणी असाही आहे. या शब्दाची काही वेगळी रूपे -
- अलांछन : कोणतेही आरोप/ लांछन नसलेला, कलंकरहित
- श्रीलांछन : विष्णू मूर्तीच्या हृदयावर “श्रीलांछन” (लक्ष्मी) कोरलेले असते.
- मृगलांछन : हस्तसामुद्रिक / पामिस्ट लोकांच्या मते चक्रवर्ती होण्याचे भाग्य असलेल्या व्यक्तिच्या हातावर कमळाचे चिन्ह/ लांछन असते, त्याला म्हणतात मात्र “मृगलांछन”
- भृगु लांछन : पौराणिक कथेनुसार भृगु ऋषिंनी श्रीविष्णुच्या छातीवर लाथ घातली त्याठिकाणी उमटलेले वळ. देव ते सर्वकाल मिरवतो म्हणतात. अनेक विष्णुमूर्तींवर कोरलेले असते.
लांछन हा शब्द मूर्ती
लांछन हा शब्द मूर्ती शास्त्रात एखाद्या मूर्तीची व्यवच्छेदक लक्षणे, खुणा यासाठी देखील वापरतात.
बरोबर ऋतुराज. वरील ४ पैकी २
बरोबर ऋतुराज. वरील ४ पैकी २ मूर्तीची लक्षणेच आहेत
छान माहिती अनिंद्य.
छान माहिती अनिंद्य.
लांच्छन असा शब्द आहे, लांछन
लांच्छन असा शब्द आहे, लांछन नव्हे.
- अलांछन : कोणतेही आरोप/ लांछन नसलेला, कलंकरहित
पसायदानामधे हा शब्द येतो.। "चंद्र्मे जे - अलांच्छन"
लांच्छन, लांछन >>>
लांच्छन, लांछन >>>
इथे दोन्ही दिले आहेत : https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%...
दाते शब्दकोश
* या शब्दाची काही वेगळी रूपे >>> छान.
मी नेहेमी लांछन असा वाचला आहे
मी नेहेमी लांछन असा वाचला आहे. लांच्छन उच्चाराच्या अधिक जवळ जाणारा आहे.
बाऊ
बाऊ
=
१. भय वाटण्याजोगी वस्तु
२. मासा (सारस्वत बोली) >> रोचक आहे.
..
कांद्याला कृष्णावळ म्हणतात हे
कांद्याला कृष्णावळ म्हणतात हे नव्यानेच कळले!

कांदा - उभा चिरला तर शंखासारखा दिसतो, आडवा चिरला तर चक्रासारखा दिसतो, पातीसहित लोंबता धरला तर गदेसारखा दिसतो आणि कोरून कमलासारखा आकार देता येतो. अशा रीतीने शंख, चक्र, गदा, पद्म अशी विष्णू ची सर्व आयुधं कांद्यात दिसतात. कृष्ण हा विष्णूचा सर्वात क्लोजेस्ट अवतार..म्हणून कांदा हा कृष्णावळ!
पाताळयंत्री कसा आला कळत नाही.
पाताळयंत्री कसा आला कळत नाही. काय असेल?
पाताळयंत्र—न. उदेल इ॰ तेल काढण्याचें यंत्र; तेल, अर्क, सत्त्व काढण्याचें किंवा धातूचें भस्म करण्याचें साधन, यंत्र. मातीचीं दोन भांडीं तोंडास तोंड लावून वरून तीं चांगलीं लिंपून जमीनींत भट्टी इ॰ तयार करून तींत ठेवणें. [सं. पाताल + यंत्र]
यावरून कारस्थान करणारा कसा आला असेल ?
अवांतर छप्पन टिकली हा गुजराती तिरपण ठिगडी म्हणजे खूप ठिगळ असल्याने ज्याचा रंग सांगता येत नाही म्हणून कारस्थानी माणूस. शाळेत वापरला जायचा. नंतर ऐकला नाही.
>>> यावरून कारस्थान करणारा
>>> यावरून कारस्थान करणारा कसा आला असेल ?
जमिनीखाली आत इतकी घडामोड होते आहे याचा वरून अंदाज येत नाही, तसाच पाताळयंत्री माणसाच्या अंतस्थ हेतू/कारवायांचा वरवर पाहता थांग लागत नाही.
पाताळयंत्री माणसाच्या अंतस्थ
पाताळयंत्री माणसाच्या अंतस्थ हेतू/कारवायांचा वरवर पाहता थांग लागत नाही.
हे पटेबल वाटते
शहाजोगपणा या शब्दाचा उगम काये
शहाजोगपणा या शब्दाचा उगम काये?
कोण हे शहा आणि जोग??
आपटे रोड वर सुरुवातीलाच पाटी
आपटे रोड वर सुरुवातीलाच पाटी आहे
या रस्त्यावर दिवसातून दोनदा झडकं होते!
झाडणकाम असा शब्द आहे?
हा रस्ता दिवसातून दोनदा झाडला जातो..असेही लिहू शकत होते ना?
पेच
पेच
= पीळ; वेढा; आटा; वळसा >>
हिंदीत स्क्रू ड्रायव्हर ( हत्यार, कॉकटेल नव्हे ) ला पेचकश म्हणतात.
मराठीत काय म्हणतात ते आठवेना आता
मराठीत स्क्रू ड्रायव्हरच
मराठीत स्क्रू ड्रायव्हरच म्हणतात. लाडाने ड्रायव्हरचा डायवर करतात कधीकधी.
लाडाने >>
लाडाने >>
लहान मुलांना नॉनव्हेज, बाऊ
लहान मुलांना नॉनव्हेज, बाऊ म्हणून देतात
मासे, चिकन, मटण सगळं बाऊ
पेच पडणे - संभ्रमात पडणे
पेच पडणे - संभ्रमात पडणे
हेही एक
इंग्लिश शब्द जेव्हा मराठीत
इंग्लिश शब्द जेव्हा मराठीत लिहिले जातात, तेव्हा ऱ्हस्व दीर्घ चे नियम कसे पाळावेत?
काय की! फुड जंक्शन, फ्रुट
काय की! फुड जंक्शन, फ्रुट सॅलड, जेवणाचे बील असे शब्द वाचायची/ऐकायची सवय झाली आहे, त्यामुळे इंग्रजी बोलताना कधी कधी चुकून तसेच उच्चार केले जातात.
देवनागरीत कसे लिहावे? जाणकारांनी खुलासा करावा.
मी भरपूर इंग्रजी वापरते.
मी भरपूर इंग्रजी वापरते.
एकतर इंग्रजीतच लिहावेत, देवनागरीत लिहू नयेत. एखाददुसरा शब्द असेल तर ठीक आहे नाहीतर देवनागरीतली इंग्रजी वाक्ये 'डुगना लगान डेना पडेगा' टाईप वाटायला लागतात.
जसे उच्चार आहे तसेच लिहिते. मोठे ण वापरत नाही शक्यतो पण ऑटोकरेक्टने 'ट्रेण्ड' शब्द असाच दिला आहे. कारण इंग्रजी भाषेत मोठा 'ण' येतच नाही.
Cheat दीर्घ चीट
Hang हॅंग अनुस्वार वापरला जातो, जोडाक्षर नाही.
Honest ऑनेस्ट. नळाचा न.
Icebreak मधे दीर्घ आईसब्रेक.
Confident कॉन्फिडन्ट ---- ऱ्हस्व short I sound
It आणि eat इट आणि ईट. ----- ऱ्हस्व आणि दीर्घ अनुक्रमे
Leaking लीकिंग - दीर्घ ली कारण long ea = ee sound
Licking लिकिंग - ऱ्हस्व -लिक् उच्चार आहे.
Food फूड कारण oo - उच्चार फूड असाच आहे.
Good मात्र ऱ्हस्वच आहे. गूड नाही. येथे 'चुपके चुपके' आठवला.
Meal जेवण - मील
Mill - मिल
Romance रोमॅन्स लिहिले जाते कारण अमेरिकन उच्चार तोच आहे, रोमान्स नाही.
लेकीला 'फॉनिक्स' शिकवल्यामुळे माझे उच्चार बदलले आहेत. Phoenix- Sound वरून spelling तयार करणे.
हर्पाचे 'बील' मी 'बिल' लिहून फाडले असते.
मी उच्चारांचा नियम तंतोतंत पाळायचा प्रयत्न केला असता. त्यासाठी उच्चार गूगल वर ऐकता येतात. गूगल पण मी दीर्घ लिहिते कारण oo आहेत, u नाही. यात चूक-बरोबर काही नाही, आपल्या लेखनात सातत्याने आले की ते कृत्रिम वाटत नाही. आपापल्या सोयीनुसार हवे ते वापरावेत.
अस्मिता,
अस्मिता,

छान विवेचन
पण मला, पाट्या वाचताना काही काही शब्द चुकीचे वाटतात. उदा, न्युरोपॅथी हा शब्द मला न्यूरोपॅथी असा हवा होता असे वाटले. असे अनेक शब्दांबाबत घडते.
कदाचित आपल्या मेंटल कंडिशनिंग मुळे तसे वाटत असावे!
Pages