मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनं फर्निचर पहिला भाग केस चा निकाल लागे परेन्त छान. मग आई जिवंतच आहे हे दाखवून फारच कचरा केला आहे. उपेम्द्र लिमयेला काही रोलच नाही आहे. आय ए एस मुलगा व सो बो वाली सून इतके बदलतात हे आजिबात पट त नाही. म्हातार्‍यांचे एकत्र चालायचे फुटेज दाखवुन उगीच सेंटी व्हायचा प्रयत्न केला आहे. मांजरे कर हिरो पंती पासून वाचलेले नाहीत. तो पार्ट कट केला तरी चालेल अर्धा तासाचा.

इथे वाचून एकदा काय झालं पाहिला. चांगला आहे, सुमित राघवन आणि तो बालकलाकार यांची कामं मस्त आहेत. भावनाप्रधान चित्रपट आहे, रडवून जातो.

Seaham Mike-ilFatima
Watched the movie on Netflix.
बालपणापासून अखंड बडबड करणे ही लकब, आयुष्यभर बरोबर राहिलेली. आणि पुढे मोठी होत असताना मित्रमंडळीं समावेत फुटबॉल खेळण्यातून निर्माण झालेली त्या खेळाबद्दलची आवड आणि प्रेम यातूनच पुढे जाऊन काही कारणाने फुटबॉल सामन्याची कॉमेंट्री करण्याची संधी मिळाल्या नंतर प्रोफेशनल कॉमेंटेटर बनण्यासाठीची धडपड आणि त्यासाठी एका मुलीचा खडतर प्रवास.. याचं उत्तम चित्रण करणारा चित्रपट!
नट नट्यांचे अभिनय , दिग्दर्शन , पटकथा, संगीत सर्वातच सामान्य असलेला चित्रपट पण
दक्षिणेत कडच्या चित्रपटांमध्ये विषयाचे वैविध्य खूप आढळत आहे हे निश्चित !

नवरा माझा नवसाचा 2 येतोय.
नवसाला पहिला नवराच पाहिला नव्हता. खूपच थकलेला तरुण ज्याची आत्या त्याच्या पेक्षा वयाने लहान आहे. (निर्मिती सावंत).
या भागात बहुतेक तो तारुण्य पीटिकांचा सामना करून तारुण्यात पदार्पण करत असावा. त्याचे वडील स्वप्नील जोशी त्याला नवस फेडण्यासाठी कुठेतरी पाठवत असणार.
या भागात सुप्रिया त्याची आई असेल तर आश्चर्य वाटायला नको.

See no evil, hear no evil वरून एक चित्रपट काढला होता.
गजब वरून भुताचा भाऊ
सत्ते पे सत्ता वरून आम्ही सातपुते
बीवी और मकान वरून बनवा बनवी

बीवी और मकान वरून बनवा बनवी>>>> बीवी और मकान बघितलेला नाही पण बनवाबनवी खरच जमुन आलेला माइलस्टोन...कधिही पाहिला तरी अजिबात कन्टाळा येत नाही.

बनवाबनवी भारीच एकदम.

भुताचा भाऊ ओरीजनल नव्हता तरीही मी कॉलेजात असताना, शाळेत असलेल्या लहान बहीणीला आणि एम पी तून आलेल्या मावसबहीणीला (ती ही शाळेतच होती) दाखवायला थेटरात गेलेले. आम्ही तिघींनी एन्जॉय केलेला हे आठवतंय. मावसबहीण तर जाम खूश झालेली कारण असले विनोदी मराठी पिक्चर तिने बघितलेच नव्हते. ते आपले राष्ट्रीय पारितोषिक विजेते दूरदर्शनवर दाखवायचे तेच बघितले जायचे.

See no evil, hear no evil वरून एक चित्रपट काढला होता.
>>
एकापेक्षा एक

See no evil, hear no evil वरून एक चित्रपट काढला होता.
>>
एकापेक्षा एक >>
नाही भुताचा भाऊ . त्यात सचिन ला मारून टाकल्यावर तो अशोक सराफ च्या अंगात शिरत असतो का काय असं आहे ,

एकापेक्षा एक मध्ये सचिन आंधळा असतो आणि अशोक शिंदे , अर्चना जोगळेकर , सुकन्या असा खूप मोठा स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे त्यात भुताटकीचा वास नाही .

नाही भुताचा भाऊ . त्यात सचिन ला मारून टाकल्यावर तो अशोक सराफ च्या अंगात शिरत असतो का काय असं आहे ,

एकापेक्षा एक मध्ये सचिन आंधळा असतो आणि अशोक शिंदे , अर्चना जोगळेकर , सुकन्या असा खूप मोठा स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे त्यात भुताटकीचा वास नाही .
>>
See no evil Hear no evil मधे ही भुताटकी नाहीये
आंधळ्या सचिनच्या बुटाच्या दुकानात बहिरा बेर्डे काम करत असतो. जिथे अशोक शिंदे चा खून होतो अन् आंधळी बहिरी दुक्कल अर्चना जोगळेकर चे पाय अन् सेंट नोटीस करतात.
हाच तो धान्यवडा फेम सिनेमा

भुताचा भाऊ मधे अशोक सराफ चा खून होतो अन् तो आपल्या (सावत्र ?) भावा (सचिन) सोबत त्याचा बदला घेतो असा प्लॉट आहे

घरत गणपती. .. हे घरत आहे. म्हणजे गणपती घरात आहे. पण तो घरतांचा... घरातल्यांच्या नाही.. घरतांचा आहे.
केवळ हे लिहायला मिळावं म्हणून ही पोस्ट आणि सिनेमा बघिताला बहुतेक.
बकवास! बाईपण-नॉनमराठीमुलगी-दिल्लीचेलोककायमजुगारखेळतात- गावमहात्म्य-एकत्रकुटुंब-आर्थिक..... बास! शेवटी अचानक सगळ्यांची बुद्धी फिरते. का फिरते. काही कारण नाही. पण शेवटी गळ्यातगळे घालायचे ठरलंय ना! मग ग्राफ वगैरे मरो. घरत गणपती परत सात दिवसाचा येणार हो!
स्टोरी काय? तर भाऊ भाऊ भांडून म्हणजे भांडले असावेत पूर्वी... त्याची परिणिती काय? तर गणपती सात ऐवजी दीड दिवसांचा आणू! अरे घरात हिस्सा मागा, आई वडिलांची वाटणी करा, रहात्या भावाला बेघर करा! घरात लक्ष्मणरेषा वगैरे मारा. कोकणातला आहे तर कलमी आंब्याच्या चार झाडांची वाटणी करा. मग त्या आंब्याचा मोहोर गळेल. मग परत एक व्ह्या की मोहोर येईल... अरे कितीतरी रुपकं आहेत.
पण छ्या! सगळे गणपतीला एकत्र ही येणार पण सात नाही दीड दिवस. सगळंच बेतासबात!
बरं ती आजी हा वाद सोडवते कसा? तर एकाला पैसे नसताना गावजेवण घालायला लावते. आणि दुसर्‍या शहरी भावाला पाटाच्या नसलेल्या पाण्यात अडकलेली पानं उचलायला लावते. आता एकाने दुसर्‍याला मदत केलीच पाहिजे ना. बाकी शक्यच नाही ही अशी भली थोरली समस्या सोडवणे. मग काय करुन टाकतात मदत.हाकानिनाका! आणि एका विहिरीत डुबकी मारुन करुन दाढी भारी परफ्युम मारुन आलोया! धमाल!
पीळ म्हणजे किती तो पीळ!

केवळ हे लिहायला मिळावं म्हणून ही पोस्ट आणि सिनेमा बघिताला बहुतेक.
>>>> Happy आवडले. हे असे होते. लिहिण्यासाठी बघायचे/वाचायचे नाही हे बजावत रहातेय, पण डाव उलटा पडतो.

मराठी सिनेमा बहुतेक वेळा पीळ असतोच. तू दिठी बघ अमित, मला आवडलेला. Happy
मला 'जाऊ द्या ना बाळासाहेब' बघायचा आहे पण चांगली प्रिंट सापडत नाहीये.

दिठी पूर्वी बघितलाय. आवडलेला.
तुझा धागा वाचल्यावर परत एकदा बघायचा आहे. सध्या 'आमोद सुनासी झाले' ह्याचं जितेंद्र जोशीने केलेलं वाचनं ऐकलं. किती क्रिस्प कथा लिहिली आहे! किमान शब्द आणि कुठेही वाचकाचा अपमान करुन समजावुन वगैरे न सांगता.

म्हटलं ना काही सिनेमांचा नावावरूनच अंदाज येतो आणि अजिबात बघावेसे वाटत नाही.
घरत गणपती... मी आधीच वाळीत टाकलाय Wink

पूर्वीसारखे नायिकेवर/ घरावर संकट, मग नायिकेची देवदर्शनासाठी तीर्थयात्रा आणि सगळं ठीक होतं.
मग आधी नायिकेचं घर उन्हात बांधलेलं असतं ते सावलीत बांधलं जातं.. या छापाचे सिनेमे का बंद झालेत ?
काय सिनेमे असायचे ते. सुपरहीट.

आमच्या बिल्डींगच्या बायका प्लॅनिंग करायच्या कधी बघायचा, हे कामाला गेल्यावर आणि यायच्या आत देवदर्शन उरकायचा बेत असायचा.
हळद, कुंकू, सवत, नणंद, भावजय, माहेर, सासुरवाशिण हे कळीचे शब्द असायचे. चुंबकासारखे महिला प्रेक्षक खेचून घ्यायचे.
पेपरला सिनेमाच्या जाहीरातीची टॅगलाईन असायची.

महिलांच्या अलोट गर्दीचा पंचविसावा आठवडा.
अलोट म्हणजे आत गेलेली महिला परत बाहेर लोटली जात नसावी.

हवेत का तुम्हाला? बाई पण भारी देवा, नाच ग घुमा हे असलेच आहेत. लिबरेटिंग बाई म्हणून आडवळणाने रिग्रेसिव्हच दाखवणारे.

Pages