चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

किंवा मां/दादी मां/ पिताजी गटातलं पात्र एखाद्या सीनमध्ये खूप उत्साहात, बडबड करताना दाखवलं >>>
साधारण बायपोलर ची आनंदी फेज चालू असल्या सारखं ओव्हर उत्साही,थोडं आक्रमक >>>

दोन्ही चपखल आहे. किंवा "कॅरेक्टरचे सेलिब्रेशन" सीन असतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचे भरपूर वर्णन. मग लगेच ते कॅरेक्टर मरते.

गेल्या काही वर्षांत असे न करता एकदम कॅरेक्टर्स मारली आहेत गॉट व इतर सिरीज मधे, त्यामुळे त्याचे धक्कातंत्र जमले होते.

त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचे भरपूर वर्णन. मग लगेच ते कॅरेक्टर मरते>>>. हम आपके मधली रेणुका.
अनू, अस्मिता धमाल चालू आहे ईथे. Lol

फोर्ड व्ह. फेरारी >>> +१
मलाही सिनेमा कुठे कुठे खेचलेला वाटला होता.
ख्रि. बेल एरवी आवडतो, पण यात ओ.अ‍ॅ. वाटला.

आणि डिंपलकडे माईक देतो. ती गायला लागते - 'वो प्यार जिस के लिए हम ने छोड दी दुनिया, वफा की राह में घायल वो प्यार आज भी है>>>>>>

तीने आज राज बब्बरला उद्देशुन गायले असेल. तेव्हा सु ओ ला सोडुन रा ब शी वफा केली आणि रा ब ने त्याच्या स्वभावानुसार त्या वफेला लगेच घायल केले असावे…

एखादं पात्र सिनेमात अतिशय हसरं, साधारण बायपोलर ची आनंदी फेज चालू असल्या सारखं ओव्हर उत्साही,थोडं आक्रमक असलं की पुढच्या 15 मिनिटात ते गाडीखाली आलं किंवा पिशाच्चाकडून खाल्लं गेलं >>>>>>

असे दाखवले तर तुमचे लक्ष त्या पात्राकडे व तदनुषंगाने कथेकडे लक्ष जाईल. नैतर तुम्ही जगातल्या सगळ्यात देखण्या हिरो हिरविनीकडेच पाहात बसाल अशी भिती असावी….

एक स्त्री सब पे भारी

स्त्री २ पाहिला तेव्हां ठीकठाक वाटला होता. रिलीजच्या आदल्या दिवशी पाहिला आणि आजपासून तो आवडू लागला आहे. Proud
नेमकं सांगता येत नाही. पाहिला तेव्हां पहिला भागच डोक्यात होता. गाजलेल्या पिक्चरचा सिक्वेल तेव्हढा दमदार असत नाही हा अनुभव असल्याने थोडीशी मनाची तयारी केलीच होती.

पण असं वाटलं कि पहिल्या भागात जे जे काही लोकांना आवडलेलं आहे तेच पुन्हा द्यायचा प्रयत्न केला आहे. याशिवाय एखाद्या सण समारंभासारखा मूवी बनवला आहे. सेलिब्रेशन मूड साठी फाईव्ह स्टार डिश बनवावी हाच मेकर्सचा उद्देश असावा. डायलॉग्ज मधे सेन्सॉर काहीच केलं नाहीये. धमाल आणि करमणूक एव्हढाच क्रायटेरिया लावला आहे.

स्त्री १ मधे गावात घडणारी हाकामारीची कथा होती. ती त्या गावची कथा होती ज्यात हाकामारी आगंतुक आहे. गावावर पसरलेली दहशतीची छाया आणि कॉमेडी हे मिश्रण अफलातून होतं. इथे कॉमेडी फुल्ल टू आहे पण कथा गावाची न वाटता हाकामारी (स्त्री) च्या कथेमागची कथा असं स्वरूप असल्याने पहिल्या भागाइतकी मजा नाही आली.

आज लक्षात आलं कि जर पहिला भागच पाहिलेला नसेल तर मग हे धमाल मनोरंजन आहे. तो भाग डोक्यातून काढून टाकायला पाहिजे.
श्रद्धा कपूरची एण्ट्री साऊथच्या कुठल्याही सुपरस्टारच्या एण्ट्रीला कॉम्प्लेक्स देणारी आहे. पहिल्यांदाच अशी एण्ट्री नायिकेला मिळालेली असेल. त्यातून एकामागोग एक येणारे कॅमिओ कम ट्रेलर्स, आयटेम साँग. खुर्चीतून उठू देत नाही.

मी पण स्त्री २ पाहिला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत engaging आहे.

प्रत्येकाने आपापले काम भारी केलंय, मजा आली.

क्रिती सेनॉन आणि क्रिती खरबंदा एकच आहेत कि वेगवेगळ्या हे शोधण्यासाठी आमच्या टीमने दोघींच्या चेहर्‍याची पडताळणी केली.
दोघींच्या चेहर्‍याची जिवणी, ओठ आणि गालाची ठेवण सारखीच आहे, डोळेही सारखेच आहेत पण भुवया वेगळ्या आहेत असे टीमला आढळले. मात्र बॉलीवूडमधेच काय बॉलीवूडच्या बाहेर देखील भुवया बदललेल्या असणे हे काही रॉकेट सायन्स नाही.

त्यामुळे आमच्या टीमने दोघींच्या मॅरीड लाईफबद्दल संशोधन केले असता क्रिती खरबंदा लग्नाळलेली आहे असे आढळले तर सेनॉन चे लग्न ठरायचेय आणि खरबंदाच्या पतीचे नाव प्रभास नाही तर सेनॉनचे लग्न प्रभासशी होणार असल्याच्या अफवा आहेत. दोघींचा नवरा एकच नाही यावरून या दोघी वेगवेगळ्या आहेत या निष्कर्षाला टीम आली.

मात्र प्रभास आणि अनुष्का शेट्टीचेही काही तरी असल्याची कुणकुण टीमला या संशोधनात लागली. मात्र अनुष्का शेट्टी आणि क्रिती सेनॉन या दोघीही दिसायला वेगवेगळ्या असल्याने आणि फरक दहा काय शंभर किमी अंतरावरून देखील स्पष्ट दिसत असल्याने याबाबतची पडताळणी अनावश्यक आहे असा अहवाल टीमकडून प्राप्त झाला आहे.

दोघींच्या चेहर्‍याची जिवणी, ओठ आणि गालाची ठेवण सारखीच आहे, डोळेही सारखेच आहेत पण भुवया वेगळ्या आहेत असे टीमला आढळले. मात्र बॉलीवूडमधेच काय बॉलीवूडच्या बाहेर देखील भुवया बदललेल्या असणे हे काही रॉकेट सायन्स नाही.>>>

हिरविणींचे पिक अमाप असले तरी कॉस्मेटिक
सर्जरी करुन देणारे मर्यादीत आहेत, त्यात नाववाले अजुन कमी
आणि ते कायम बिझी. त्यामुळे एकच साचा सगळ्यांसाठी वापरतात..

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघचा vedaa पाहिला
पहिला भाग बऱ्यापैकी आहे पण दुसऱ्या भागात टिपिकल बॉलिवूडिय मसाला टाकून माती खाल्ली आहे .
पहिल्या भागात दलितांचे शोषण , सवर्णांची दादागिरी , जातिव्यवस्था प्रभावीपणे दाखवली आहे . त्यामुळे फर्स्ट हाफ प्रामिसिंग वाटतो . दुसऱ्या भागात अचाट आणि अतर्क्य अशी हाणमारी आणि हिंसाचार होते .
आर्मीत असलेला माणूस इतक्या सहजी बावळटपणा दाखवेल हेच मुळी पटत नाही

जॉन अब्राहमने नेहमीप्रमाणे अभिनयाचा प्रयत्न केलाय आणि तो बऱ्यापैकी जमलाय . शर्वरी वाघ प्रॉमिसिंग वाटते . बाकी कलाकारांची कामेही ठीकठाक

वाणी कपूर ( शुद्ध देसी रोमान्स / बेफिक्रे फेम ) आणि निकीता दत्ता (घरत गणपती फेम) या दोघींच्या चेहऱ्यात बरेच साम्य आहे . जिज्ञासूनी गुगल करावे

Hitman पाहिला काल रात्री.
कथेचा जीव चिमूटभर आहे. पण रंगवलाय चांगला.
कंटाळा आला होता म्हणून काहीतरी light शोधत होते, त्यामुळे करमणूक झाली. Illogical असला तरी.
हिंदी त कोणी बनवला तर अदिती राव हैदरी आणि विजय वर्मा ला घ्या.

मी काल रात्री टाकाऊ म्हणून समजला गेलेला "My name is Anthony Gonsalves" बघितला. मस्त आवडला. नावाजलेल्या चरित्र अभिनेत्यांनी गच्च भरलेला, चांगली स्टोरी, चांगले संवाद असूनही हा पिक्चार बॉक्स ऑफिसवर हापटला. IMDB रेटिंग ३.९/१०!
असे का बरे? विचार करत आहे.

शादी मे जरूर आना
आताशी पाहिला. मध्यंतरापर्यंत मस्त आहे. नंतर पकवलं खूप. रोस्टावा लागेल.

काल रात्री स्त्री 2 बघितला ते आत्ता आठवले. निर्मात्यांची सुद्धा तशीच अपेक्षा असावी. आजकाल "रात गयी बात गयी" स्टाईलचे जे बिग बजेट चित्रपट येतात, हा त्यांच्यापैकी एक. चित्रपटाने बरीच कमाई केली आहे अशा बातम्या आहेत. थिएटर सुद्धा तुडुंब होते. पण मला "बघितला" इतकंच त्याविषयी बोलता येईल. तांत्रिक बाजू एकदम झकास (ती काय आजकाल गल्लीतल्या प्रोडक्शन ने चित्रपट बनवला तरीही झकासच असते म्हणा). फाईव्ह स्टार जंगलात असल्याने भीती ऐवजी नाईट सफारी सुरु आहे असे वाटत राहते. चिट्टी/चिठ्ठी यातले कन्फ्युजन, "दिशा दिखानी है" म्हंटल्यावर "कौन है ये दिशा दिखानी?" असे विचारणे हे यांचे विनोद.

कॉमेडी आहे पण कॉमेडी नाही. थ्रिलर आहे पण थ्रिलर नाही.

अतुल
अगदी चपखल आणि सडेतोड पोस्ट.

'शादी में जरूर आना बरा' आहे.
क्रिती खरबंदा आणि क्रिती सॅनन मधे 'ख' तै लक्षात रहात नाहीत. दोघीही सुंदर आहेत तरीही. सौंदर्यापेक्षा जास्त काही तरी लागते ना संस्मरणीय होण्यासाठी. अनुष्का शेट्टी फारच छान आहे. पर्फेक्ट भारतीय सौंदर्याच्या चेहरा आणि बांधा दोन्ही मापात अगदी आदर्शपणे फिट होते. नजरेतही धाक आहे तिच्या, त्यामुळे देवसेना म्हणून अगदी झळाळली होती.

स्त्री वरची पोस्ट वाचली अतुल. धन्यवाद.‌ छान लिहिले आहे. येथे येत जा. Happy

येथे वाचून हिंदुस्थानी बघितला नाही त्याबद्दल रमडचे धन्यवाद. ट्रेलर बघूनही यातना झाल्या. माया मच्छिंद्रा, लटका दिखा दिया, टेलिफोन धुनमे यांचा काही नॉस्टॅल्जिया नव्हताच. कमल हसन मेकप आणि प्रॉपमधे वहावत जातो. ते तर added bonus असतात पण तेथेच कथानक फिरते असे वाटत रहाते. चाची ४२० मधे मात्र धमाल उडवून दिली होती. पण त्यात ओम पुरी, अमरिश पुरी, परेश रावल आणि तबूचा मोठा वाटा होता.

पर्फेक्ट भारतीय सौंदर्याच्या चेहरा आणि बांधा दोन्ही मापात >> अचूक. भारतीय चेहरा असेल ती हिरवीन जास्त काळ राज्य करते.

स्त्री २ येत्या वीकेंडला किंवा त्यानंतरच्या (टिकला तर) पहायचा बेत आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे पहिल्या आठवड्याच्या तिकीटांचे भाव परवडत नाहीत. लाडकी बहीण, लाडका भाऊ , लाडका दाजी कुठल्याच योजनेत बसत नाही. लाकडा सवतोबा अशी योजना आली आणि काही धनलाभ झाला तर मग थाटात आयनॉक्सला बघू शकेन. इंटरव्हलला हप्त्यावर समोसा आणि पॉपकॉर्न सुद्धा घेईन.

हिंदुस्थानी-२ हिंदीमधे येत आहे म्हणून थांबलो आहे.

काल सहज मित्रांबरोबर गप्पा मारताना बाजूला टीव्हीवर कभी खुशी कभी गम लावला होता. काय रडकथा आहे! मधला हृतिक लंडनला येतो त्यातला अर्धा तास सोडला तर सतत सगळे रडत असतात. जया, काजोल, करीना सतत हातात पूजा की थाली घेऊन फिरत असतात. करीनाचे यात नावच पूजा असल्याने तिच्या हातातले तबक तर अनेक अर्थाने पूजा की थाली असते. अमिताभ मख्खपणे तेच परंपरा अनुशासन वगैरे टाइप बोलत राहतो. जया नेहमीप्रमाणे वैतागलेली. शाखा तुफान हॅम करतो. स्प्रिंग लावलेल्या बाहुलीच्या डोक्यासारखी मान अनेकदा हलवतो. काजोल ओव्हरअ‍ॅक्टिंग करते. हृतिक-करीना पकवतात. हे सर्व (ओके - यातले बहुतेक) एरव्ही प्रचंड ताकदीचे कलाकार आहेत याचा विसर पडेल इतके बोअर करतात.

आलोक नाथ मधेच रॅण्डमली मरतो. एखाद्याच्या मरण्याचे काहीही कारण तयार न करता त्याला मारल्याची उदाहरणे क्वचितच असतील.

अमिताभने वाकल्याशिवाय किंवा जयाने चौरंग्/स्टुलावर उभी राहिल्याशिवाय अमिताभच्या कपाळावर तिला टीका का काय लावता येत नाही हे ती त्यांची रोजची रिच्युअल असून सुद्धा त्यांना लग्नानंतर काही वर्षांनी समजते. भावाला शोधायला लंडनला गेलेला हृतिक तेथे पोहोचल्यावर आधी करीनाच्या कॉलेज मधे जातो. भाऊ बिऊ नंतर. काजोल तिच्या मुलाला मनोजकुमार ऑन स्टिरॉइड्स करण्याच्या प्रयत्नात सतत देशभक्तीचे डोस पाजत असते पण तिची बहीण कॉलेजात त्याच्या टोटल विरूद्ध वागत असते. ती एका व्हाइट्स-ओन्ली कॉलेज मधे शिकत असते - म्हणजे त्या बिल्डिंगसमोर नाचत असते. ट्राफलगार स्क्वेअर मधली आर्ट गॅलरी हे त्यांचे कॉलेज असते.

काजोलच्या मुलाचे दुसरी-तिसरी टाइप यत्तेतील कल्चरल फंक्शन हे $२०० डिनर सारख्या फाइन डायनिंग सेटिंग मधे असते. तो सगळ्या अनसस्पेक्टिंग लंडनवासी पालक व विद्यार्थ्यांसमोर एकदम जन गण मन सादर करतो. फक्त शेवटची ओळ विसरतो. म्हणजे लंडन मधे जन्मलेल्या पोराला "द्राविड उत्कल वंग" किंवा "विंध्य हिमाचल यमुना गंगा" वगैरे लक्षात राहायला काही अडचण येत नाही. पण शेवटी "जय हे, जय हे" झाल्यावर पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो.

एक मुलगा घराबाहेर असला तरी तो येत आहे हे "माँ सेन्स" ने ओळखणार्‍या जयाला दुसरा मुलगा मागून येऊन हाताने टॅप करून लक्ष वेधून घेईपर्यंत पत्ता लागत नाही.

हा रायचंद नक्की काय बिझिनेस करतो, शाखाला बेदखल केले म्हणजे नक्की काय केले, त्याने त्याच्या बिझिनेस मधे किंवा शाखाच्या जीवनात नक्की काय फरक पडला, शाखा लंडनला जाउन नक्की काय करतो हे मला अजूनही समजलेले नाही.

आणि सकाळी आवरून बाहेर पडलेल्यांना लंडनमधेच "आत्ता ओव्हलवर मॅचची शेवटची ओव्हर सुरू असेल" हे ठामपणे माहीत असू शकेल असे टायमिंग असणारी क्रिकेटची मॅच नक्की कोणत्या फॉर्ममधली, हे ही.

अस्मिता : तुमच्यासाठी कायपण! Lol

फा : भन्नाट लिहिलंय. वेगळा धागा न काढल्याने निषेध नोंदवत आहे Proud नंतर पुन्हा एकदा वाचून रिव्ह्यूबद्दल लिहिण्यात येईल.

वेगळा धागा हवा बरं का के3जी चा.
हिंदुस्तानी1 आवडला होता. कथा आजच्या काळातही रिलेट होते.बाकी त्यात चंदू शी संबंधित सर्वच गाणी अचाट अतर्क्य होती.तो सेनापती मर्मविद्या करताना एकदम डेंजर दिसतो. त्याचा आणि त्याच्या ऑन स्क्रीन बायकोचा प्रोस्थेटिक मेकप त्यावेळी हॉलिवूड च्या लोकांना बोलावून बराच महाग पडला असावा.

स्प्री मूव्ही बघायचा आहे. या पिक्चरमध्ये जसा सरकटा आहे तसा आमच्या गावी मानकाप्या नावाचा भूत फिरायचा. त्याला डोकं नसायचं. हात हलवत तो फिरायचा जो त्याच्या टप्प्यात येईल त्याची मान कापली जायची. हे भूत दिसलं की बसून चालायचं म्हणजे आपण त्याच्यापासून वाचायचो कारण त्याला कमरेतून वाकता येत नसे.

लंडन मधे जन्मलेल्या पोराला "द्राविड उत्कल वंग" किंवा "विंध्य हिमाचल यमुना गंगा" वगैरे लक्षात राहायला काही अडचण येत नाही. पण शेवटी "जय हे, जय हे" झाल्यावर पुढची "जय जय जय जय हे" ही ओळ मात्र तो विसरतो.>>
काजोल तिच्या मुलाला मनोजकुमार ऑन स्टिरॉइड्स करण्याच्या प्रयत्नात सतत देशभक्तीचे डोस पाजत असते >>> खूप हसले..
फा मस्त शॉर्ट रीव्ह्यु. जरा अजून यायला हवा.
ह्या लोकांना भारता बाहेर जाऊन तिथल्या लोकांना, त्यांच्या कल्चर ला नाव ठेवणे ह्यात काय भारी वाटते? काजोल तोंड वेंगाडून गोर्या बाईला काही तरी म्हणत चिडवत असते हिंदीत, आय मिन काय भारी आहे ह्यात? तुम्हाला इतकी घृणा असेल तर का राहता तिकडे?
स्त्री मला ही बघायचाय, पण थियेटर मधे.

तो सेनापती मर्मविद्या करताना एकदम डेंजर दिसतो>>> तो मुस्लिम मुका बनलेला माणूस का? श्या..., चाची परत बघावा लागेल. फारच धमाल होता तो. एखादे अचाट दृश्य सोडता..
कमल हसन ने काय तळमळीने केलेय काम, तबू ने माजलेल्या श्रिमंत मुलीचा रोल मस्त केलाय, अमरीश पुरी- पाघळलेला म्हातारा Happy , परेश रावल (मैं आपके पाव पडता हूं...ह्या संवादावर- ये मेरे "पाव" है म्हणत लादीपावावर हात ठेवतो कहर सीन आहे तो) Rofl

सेनापती कमल हसन गं हिंदुस्थानी मध्ये.
मुस्लिम मुका बाबा बुबु सिराज चाची मध्ये.तो आता त्या डेंजर सिरीज मध्ये पण होता मनोज वाजपेयी कोकणा च्या.नाव विसरले.करी काहीतरी आहे बहुतेक.तो सिरीज म्हणजे मायग्रेन ओढवून घेण्याचा उत्तम उपाय.

.चाची420 एक धमाल पिक्चर आहे.खूप वेळा बघायचे.तब्बू पण हॉट दिसते.कोणत्या ott वर आहे का?युट्युब कॉपी खूप घाण असतात.

सेनापती कमल हसन गं हिंदुस्थानी मध्ये>> ओह ओक. हिंदुस्थानी बघितला नाहिये.
हां, तो मुका सिराज होता चाची मधे, त्याने किलर सूप मधे हळवा इंस्पेक्टर काम खूप छान केलेय. रोजा मधे ही होता. साऊथ मोव्हीज मधे हमखास असतो.

Pages