चाललो मी माबो सोडून

Submitted by रघू आचार्य on 12 August, 2024 - 13:16

असे कधीच म्हणू नये.
कारण,

  • लोकांना आनंद होतो. बरं झालं पीडा गेली असे म्हणतात
  • वाचूनही अनुल्लेख केला जातो. त्यामुळे सोडून जाणार्‍यास जास्त त्रास होतो. मला कुणी जवळ घेत नाही असा हंबरडाच फोडायचा राहतो.
  • लोक अंदाज घेत राहतात कि किती दिवस संकल्प टिकतोय.
  • आपण ठरवून काही होत नसते. दीवार मधे मदनपुरी यांनी म्हटलेले आहे. ये वन वे ट्रॅफीक है. यहा आनेका रास्ता है,जानेका नही.
  • अशी घोषणा केल्यानंतर जर सांत्वन सोहळा पार पडला नाही तर माघार घेणे अवघड होते. माबोकर गप्प बसून गंमत पाहण्यात वस्ताद आहेत.

आणखी काही मुद्दे सुचले तर कळवा.

अशाच करू नये अशा गोष्टीं आवर्जून कळवा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात हातखंडा असलेल्यांचे मत वाचायला आवडेल Wink

' दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम' म्हणतात तसे आजवर कितीही छपरी आयडी असला नि तो ' आम्ही जातो आमच्या गावा' चा मेघ मल्हार आळवायला लागला कि पावसाळ्यात उगवणार्‍या भुईछत्रांप्रमाणे रोमात असलेले कुठले तरी आयडी खडखडून जागे होतातच नि "गुणाची ग चांदी" चा जप सुरू होतो असे बघितले आहे. ह्यावरून हे आयडी एकतर डु आयडी असावेत किंवा विनाकारण भाबडे जीव असावेत. ह्यावरून तुमचा दुसरा मुद्दा आपल्या दुर्दैवाने रद्दबादल समजा. मंदळ आपल्या दु:खात सहभागी आहे Wink

>>>>>>>>छपरी आयडी
Lol Lol
>>>>>>>>>पावसाळ्यात उगवणार्‍या भुईछत्रांप्रमाणे रोमात असलेले कुठले तरी आयडी खडखडून जागे होतातच
हाहाहा

असामी Lol

मायबोली सोडून चाललो या थिमला जास्त यश नाही मिळत. आपल्या मोजक्या मित्रांचे चार पाच कमेंट्स येतात आणि धागा थंड पडतो. बाकीचे गेला एकदाचा बरं झालं या विचाराने आनंदी होऊन रोमात असतात. मी विचार करतोय एका डू आयडीने दुःखद घटना या धाग्यावर निधनाची बातमी टाकावी. त्याला कदाचित जास्त यश मिळेल. चांगले शंभर एक प्रतिसाद आले की अचानक पूनम पांडेसारखं समोर यायचं. पण मग पुढचे शंभर एक प्रतिसाद शिव्या शापाचे येतील म्हणून हा प्लॅन जरा होल्डवर ठेवलाय.

#चाललो मी मायबोली सोडून - ऋन्मेष १,२,३,४......

#चाललो मी मायबोली सोडून - बोकलत १, २...?

#चाललो मी मायबोली सोडून - रघू आचार्य १....?

चालू द्या.

तसेच राजकारणातही #उपवास आंदोलन १,२,३,४ ....धरला आणि सोडला.

मायबोली सोडून चाललो या थिमला जास्त यश नाही मिळत.>> यश मिळतं काही प्रमाणात. 'नका हो सोडून जाऊ' म्हणत काहीजण भावूक ही होतात. पण शेवटी किती दिवस रडणार. मग 'जातोस तर जा बाबा' म्हणत पब्लीक आपल्या कामाला लागतं. आणि मग अंदाज घेऊन जातो जातो करणारा गुपचुप परत येतो.
पण ज्यांना माबो प्रशासक सन्मानाने नारळ देऊन निरोप देतात त्यातले काही जण खरोखर परत येत नसावेत असा अंदाज आहे.

मायबोली सोडून चाललो या थिमला जास्त यश नाही मिळत.> >>> नोकरी सोडुन जाणार्‍याला सेण्डऑफ पार्टी देतात. दोन दिवसांची कॅज्युअल लिव्ह टाकली तर त्यात कसले विशेष?

मी मायबोली सोडून जात आहे अशा आशयाचा गंभीर धागा काढल्यास दुसऱ्या दिवशी आयडी रद्द होईलच अशी सोय करा ऍडमिन.

<<<मायबोली सोडून चाललो या थिमला जास्त यश नाही मिळत. आपल्या मोजक्या मित्रांचे चार पाच कमेंट्स येतात आणि धागा थंड पडतो. बाकीचे गेला एकदाचा बरं झालं या विचाराने आनंदी होऊन रोमात असतात.>>>

मी याचा अनुभव घेतला आहे. अनेक वर्षे मायबोली "गाजवली" - अनेक शत्रू व काही मित्र मिळवले. नंतर माबो सोडतो म्हणून खरच आयडी रद्द करून घेतला. मग कुणि बोलावले नाही तरी आपला नविन आय डी घेऊन परत आलो. आता इथे केवळ मज्जा. इथै राहून परदेशातील अनोळखी लोकांना आपले शत्रू करून घेण्यापेक्षा बरे. काही काही लेखकांच्या लिखाणाची आतुरतेने वाट पहातो -जसे अमेरिकन निवडणुकीवर शेंडेनक्षत्र.
काय धमाल लिहितात! मजा येते वाचायला.

आय डी रद्द करवून घेण्याचे प्रिव्हिलेज आहे तुमच्याकडे, इतरांना तो रद्द झाल्यावर समजते की 'आता आपण इथे नाही राहिलो'

आयडी रद्द करा असे ऍडमिनना सांगुन ते रद्द करत नाहीत.
तुम्हाला काहीतरी कामगिरी करून आयडी रद्द करण्यास भाग पाडावे लागेल.

मानव,

सोप्या भाषेत भाषांतर करण्याबद्दल आभार

मानव, बेफिकिर, मी भारतीय पद्धतीने ते काम केले. माझा वशिला होता, अ‍ॅडमिनकडे. आमची ओळख होती!
अमेरिका काय नि भारत काय, सगळीकडे वशिला लागतो.
सगळीकडे लाचलुचपत मोठ्ठ्या प्रमाणावर चालू असते. भारतातल्या लोकांना त्याची लाज वाटते, पण इतर लोक निर्लज्ज असतात.

विडंबन काय विडंबन! ते तर सगळेच म्हणतात.
आपण माझ्याच धाग्याचे विंबल्डन केले असे म्हणावे.

ते तर सगळेच म्हणतात.
आपण माझ्याच धाग्याचे विंबल्डन केले असे म्हणावे>> मानव Lol

अगदी अगदी.. विम्बल्डनच मनात आले होते..
पण नंतर लोक म्हणतात ऋन्मेऽऽष धागा भर कटवतो, हाय जॅक करतो.. म्हणून लिहिले नाही.
हल्ली सेफ गेम खेळतो.. धागा भरकटल्यावरच त्यात उडी मारतो.

अहो कोण वेडा आजकाल 'मायबोली सोडून चाललो' असं जाहीर लिहिल? गेला हो तो काळ. आता मायबोली ही गुपचूप सोडून जायची गोष्ट आहे. 'लगनाsssssला जातो मी' असं वगैरे जाहीर करून अवलक्षण नसतं करवून घ्यायचं.

इससे याद आया,की याचा इन्व्हर्स नेहेमी लक्षात ठेवायचा आणि तसं वागायचं, म्हणजे हा प्रश्नच येत नाही. पिकासोच्या घरी एकदा पत्रकार आले, आणि त्यांनी विचारलं- 'कमाल आहे, तुमच्या घरात एकही 'द ग्रेट पिकासो'चं चित्र नाही?

तर पिकासो म्हणे- छ्या छ्या. मला कसली परवडताहेत पिकासोची चित्रं..!

असं आहे बघा. यू थिंक यू आर व्हाट ऑदर्स थिंक यू आर. थिंक. ऑदर्स. नॉट यू. पिकासो कुठे, आपण कुठे, पण सारे कसे सेम टू सेम आहोत की नाही!

Pages